Login

रंगांत तुझ्या रंगतांना भाग 13

कथा सहवासाची कथा पुन्हा प्रेमात पडतांनाची
रंगात तुझ्या रंगतांना भाग 13

©️®️शिल्पा सुतार
.........

अनघा प्रदीप दोघ रूम मधे आले. अनघा काहीतरी आवरल्या सारख करत होती. तिला माहिती होत आज नक्की प्रदीप तिला जवळ घेतील. अगदी अवघडलेला पणा आला होता. दोघांना एकांत मिळाला होता जो त्यांना हवा ही होता नको ही होता. द्वीधा मनस्थिती होती. प्रदीप ही विचारात होते घेवू का पुढाकार. अनघा आज अगदी कंफर्टेबल आहे माझ्या सोबत.

तेवढ्यात तिला सुंदर फुलांचा वास आला. निशिगंध आहाहा. प्रदीप बुके घेवून उभे होते. "माझे आवडते फुल."

"हो माहिती आहे. लग्नात समजल मला तुला निशिगंध खूप आवडतो. तुझ्यासाठी आहेत घे ." ती खुश होती.

घे. प्रदीपने तिला मिठीत घेतल. अनघा त्याच्या जवळ शांत होती. तिला आता काही आठवत नव्हत. पूर्वी पासून ते दोघ कपल आहेत आणि त्यांच्या आयुष्यात आधी कोणी नव्हत अस वाटत होत. प्रदीप मुळे कंफर्टेबल झाली होती ती. अति चांगला स्वभाव खूप समजून घेत होते ते अनघाला. आता अनघा त्यांच्या मिठीतून थोडी बाजूला सरकली. ती फुल नीट ठेवत होती.

"हे घे तुला अनघा माझ्या कडून."

गिफ्ट होत तिने ते उघडल. सुंदर डायमंड नेकलेस सेट होता. "कश्याला आणला एवढा महाग ." तिने अगदी नेहमी प्रमाणे त्यांना रागावल.

"तुझ्या साठी नाही माझ्या साठी सुरू आहे हे. म्हणजे गिफ्ट बघून बायको खुश होईल आणि माझ्या जवळ येईल."

अनघा हसत होती. " काहीही तुमच ."

"नेकलेस घालून दाखव. थांब त्या आधी हे घे."

"अरे बापरे किती गिफ्ट. काय आहे? अगदी लाडीगोडी सुरू आहे. " तिने गिफ्ट उघडल. दोन दिवसा पासुन ती साडी वर होती. आत कंफर्टेबल नायटी होते. थँक्यू.

ती आत कपडे बदलायला गेली. तिला सुचत नव्हत काही. प्रदीप खूप प्रमाने वागता आहेत. काही नको म्हणायला. केव्हा न केव्हा सुरुवात करायची आहे सोबत रहायची. ती बाहेर आली .

प्रदीप तिच्या जवळ आले. छान दिसते आहेस. त्यांनी तिला जवळ घेतल. नेकलेस घालून दाखव. मला माहिती आहे तू त्यात अजून सुंदर दिसशील.

ती बॉक्स घेवून आली. "तुम्ही घालून द्या."

"आधी प्रदीप म्हण. अहो वगैरे नको."

"ठीक आहे आपण दोघ असतांना प्रदीप म्हणेल. सगळ्यां समीर नको."

"का अस? मला काही प्रोब्लेम नाही."

"दोघी आजीं समोर कस वाटत? तुम्ही एवढे मोठे डॉक्टर."

" तू पण बॅंकेत आहे मोठ काम करते आज पासून मी पण तुला अहो म्हणणार. "

अनघा आता हसत होती." ठीक आहे प्रदीप. मी प्रदीप म्हणते. "

" नेकलेस छान दिसतो आहे. "

प्रदीपने तिला जवळ घेतल. अनघाला कसतरी वाटत होत. शरीराला प्रदीप हवा होता. मन अजूनही नकार देत होत. तिच्या मनाने आता विचार करण बंद केले. ती त्याच्या स्पर्शाने मोहरत होती. एका क्षणाला तिने नकार दिला. प्रदीपने काही ऐकुन घेतल नाही. अनघा माझ्यावर सोड सगळं. शांत हो. ती आता गप्प होती. थोड्या वेळाने ती त्याला तेवढाच प्रतिसाद देत होती. सह जीवनाला सुरुवात झाली होती. ती त्याच्या सोबत खूप आनंदात होती.

सकाळी अनघा उठली. प्रदीप अजून उठलेले नव्हते. ती फ्रेश होऊन आली. ते काॅटवरुन तिच्या कडे बघत होते. ती एकदम लाजली. त्यांनी पुढे होवुन तिला जवळ घेतल. "मुलांना शाळा आहे. मला ही बॅंकेत जायच आहे. जावू दे ना प्रदीप. तू पण आवर माझ्या मदतीला ये. मुलांना तयार कर."

प्रदीप हसुन ऐकत होते ती काय काय म्हणते ते. "तू म्हणशील तस अनघा. चल. "

रोज प्रमाणे थोडी धावपळ झाली. मुल शाळेत गेल्यावर अनघा आत आली. तिने चहा केला. रेखा ताई दिसल्या नव्हत्या सकाळ पासून. "आई तुम्ही अजून रूम मध्ये? "

"अग काय करू मी समजत नाही?"

"तुम्ही नेहमी सकाळी फिरायला जातात ना. चहा करतात बागकाम करतात तस करा काही तरी."

"ठीक आहे." त्यांच्या चेहरा पडलेला होता.

अनघा नाश्ता घेवून आली. "आई, काकू चला." ती प्रदीप जवळ बसली. प्रदीपने तिचा हात गुपचुप धरून ठेवला. तो तिच्याशी हसत होता.

" प्रदीप प्लीज हात सोड ना." ती हळूच बोलली.

नाही,

" प्लीज, कोणी येईल ना, बघेल ना." तीने रागाने बघितल.

प्रदीपने ऐकल नाही. दुसरीकडे बघून घेतल. काय कराव?

"काय झालं प्रदीप?"

"तु मला सोडून बँकेत जात आहेस. आता लग्न झालं आपल. आता छान वेळ होता. मुल गेली शाळेत. "

अनघा लाजली." तू पण रोज जातोस ना हॉस्पिटल मधे. "

" आज थांबू का घरी?"

"मला जाव लागेल बॅंकेत. प्लीज समजून घे. सुट्टी संपली."

प्रदीप रागावले होते.

"प्रदीप यावर पण करू आपण विचार. "

" बरोबर आहे हा वेळ वापरायला पाहिजे. " प्रदीप तिच्या कडे बघून बोलत होते.

अनघा खूप हसत होती. प्लीज प्रदीप.

"आज रात्री हो नाही करायच नाही."

" ठीक आहे. "

" आपण दोघ डिनर साठी जायच. "

"बाकीचे? " अनघा विचारत होती.

" ते नाहीत आपण फक्त."

" अरे पण अस कस वाटत? "

" मी हात सोडणार नाही." प्रदीप ठाम होते.

" बर हो. जावु या. "

त्याने हात सोडला. ती बाजूला सरकुन बसली.

समोरून रेखा ताई, मालती काकू येत होत्या. रेखाताईंचा चेहरा उतरलेला होता.

"आई तुम्ही नाश्ता करून लगेच औषध घेऊन घ्या. "

" बरं वाटतं आहे ना काकू?"

" हो मी ठीक आहे. "

अनघा प्रदीप कडे बघत होती. तिला काळजी वाटत होती. आई एक तर नीट रहात नव्हत्या. त्यांना आवडल नव्हत इकडे. अनघा तो विचार करत होती. आता काय करू या?

नाश्ता झाला. "मी निघते. काकू प्लीज आईं कडे बघा."

त्या हो म्हटल्या.

" अनघा अग मी काय लहान आहे का तू जा बॅंकेत मी ठीक आहे." रेखा ताई म्हणाल्या.

अनघा बँकेत आली. बर्‍याच दिवसांनी भेटल्या मुळे मैत्रिणी गोळा झाल्या. गप्पा गंमत सुरू होती.

रमा जवळ आली. "कसे आहेत डॉक्टर? त्यांच घर? फिरायला नाही गेले का? "

" अरे आम्ही काय लहान आहोत का. जावू नंतर फिरायला मुलांसोबत. "

" काहीही अनघा. तू स्वतःला खूप मोठी समजते. छान दिसते आहेस तू लग्नानंतर. सुमीत दीपु ठीक आहे ना?"

"हो टच वूड दोघांच पटत."

"बर झाल. तू खुश आहेस ना?"

"हो अग प्रदीप खरच खूप चांगला आहे."

सावंत साहेबांनी आत बोलावलं. काम ही खूप होत. अनघा आत गेली. "आता जोरात कामाला लागा."

हो सर. काम समजून घेवून ती बाहेर आली.

प्रदीप जरा वेळाने हॉस्पिटल मधे आले. दुपारी त्यांनी अनघा ला फोन केला. "लंच साठी येते का इकडे."

"नाही जमणार. माझ अजून काम सुरू आहे. आज खूप धावपळ होते आहे माझी ." अनघा घाईत होती.

"वेळेवर जेवून घे."

हो.

संध्याकाळी ती घरी आली. मुलांची ट्युशन टीचर आलेली होती. दोघ अभ्यास करत होते. रेखाताई अजूनही रूममध्येच बसलेल्या होत्या. ती आत गेली.

"आई तुम्ही आज फिरायला गेल्या नाही का? "

" नाही ग मला विशेष बर वाटत नाही. " रेखा ताई थकल्या सारख्या वाटत होत्या.

" काय झालं आहे? "

" काही नाही मन लागत नाही." त्या रडवेल्या झाल्या होत्या.

" आई काय झालं? आमच काही चुकलं का? " अनघा त्यांच्या जवळ बसली.

" नाही मला उदास वाटत आहे. "

"आज दुपारी पण त्याविषयी जेवल्या नाहीत." मालती काकूंनी आत येत सांगितलं.

" आई काय अस औषध असतात तुमचे. "

" काही नाही ग मला करमत नाही इकडे. "

" सुरुवातीला असंच होतं इथे आपल्याला लहान घरात राहायची सवय आहे ना. म्हणुन होत. आई मनाला लावून घेऊ नका. "

मुलं बाहेर खेळत होते. जरा वेळाने त्या दोघांना जेवायला दिलं.

"हे बघा सुमित दिपू मी घरी नाही. आजीला बरं नाही आजीला त्रास देऊ नका. "

" मम्मी तू कुठे चालली आहे? "

" मला डॅडी बरोबर बाहेर जायचं आहे." जायला नको वाटत आहे. एकीकडे नवरा एकीकडे घरचे. दोघांच मन कसे सांभाळू.

प्रदीपचा फोन आला. तिने रेखा ताईंच्या तब्येतीबद्दल सांगितलं. "प्रदीप आपण नको जायला. आत्ताच आईंना पंधरा दिवसांपूर्वी बरं नव्हतं. ब्लड प्रेशर वाढला होता. परत त्रास झाला तर. घरी कोणी तरी हव. "

" हो बरोबर आहे तू घरीच थांब मुलांजवळ मी येतो थोड्या वेळाने. "

अनघा घरीच होती.

"मम्मी तुला जायचं नाही का बाहेर?"

" नाही आजीला बरं वाटत नाही मी घरीच आहे. "

रेखाताईंना परत कसं तरी वाटलं. "अनघा अग तू बाहेर जा. मी ठीक आहे. "

" नाही आई चला बर तुम्ही जेवून घ्या. " तिने दोघींना वाढून दिलं. जरा वेळाने प्रदीप आले. ते रेखाताईंच्या रूम मध्ये आले. त्यांनी त्यांना तपासलं. गोळ्या कुठल्या चालू आहे ते बघितलं.

" मागे मी दिलेले औषध संपले का?"

"हो ते लगेच संपले. "

" ठीक आहे मी उद्या तुमच्यासाठी औषध घेऊन येईल. आज हीच गोळी घ्या. तुम्हाला काही टेन्शन आहे का कुठल्या गोष्टीच? इथे करमत नाही का? अनघा काकूंची तब्येत महत्त्वाची आहे. त्यांना थोडे दिवस तिकडे आईकडे राहायचं असेल तर जाऊ दे."

" हो आई तुम्ही थोडे दिवस माझ्या आईकडे जाऊन रहा. काही हरकत नाही. बरं वाटलं की मग इकडे येता येईल. "

" नाही मला तसा काही त्रास नाही." रेखा ताई बोलल्या.

" आई ठीक आहे तुम्ही जाऊ शकता. सुमितही राहतो आहे आता. "

" नक्की ना? "

हो.

अनघा खाली ताट करायला निघून गेली. तिला खूप कसंतरी वाटत होतं. रेखाताई तिची जबाबदारी होत्या. आता तिचं लग्न झाल्यामुळे त्या एकट्या पडल्या होत्या. करणार तरी काय? मी तर नाही म्हणत होती या लोकांनी बळजबरी केली. पण खूपच छान झालं. मला आता प्रदीप सोबत का आवडतं. पण आईचं काय? ती विचार करत होती.

प्रदीप जेवायला आले. "काय विचार चालला आहे? रेखा काकूं बद्दल का?"

"हो प्रदीप मला ना अगदीच गिल्टी वाटत आहे."

"त्यात काय वाईट वाटून घेण्यासारखं? त्यांना जिथे आवडतं तिथे त्या राहतील. तिकडे त्यांचा ग्रुप असेल. फिरायला जायला जागा असेल."

"इथून काही अरेंजमेंट नाही करता येणार का?"

" करता येईल ना रोज सकाळी त्यांना ड्रायव्हर बागेत सोडून देईल. पण त्यांना आता जाऊदे आठ पंधरा दिवस तिकडे तिकडून त्या वापस आल्यानंतर आपण त्यांना सावकाश या गोष्टी सांगू. आता जर तू सांगितलं तर त्यांना वाटेल की आपण त्यांना जाऊ देत नाही. त्यांनी टेन्शन घेतलं तर? बीपी नॉर्मल होण गरजेचं आहे. "

" बरोबर बोलतो आहेस तू प्रदीप. "

आज मुलं प्रदीप अनघाच्या रूममध्ये होते.

" ही रूम किती मोठी आहे ना. छान आहे. " सुमीत रूम बघत होता.

दिपू सुमित खेळत होते. त्या दोघांची खूप छान जोडी जमली होती. प्रदीप त्या दोघांशी बोलत होते. दिपू त्यांना शाळेत काय झालं ते सांगत होती.

" सुमीत तु काय केल आज?"

सुमीतने सांगितल त्याला पी टी चा पीरेड खूप आवडतो. दिपू अनघा हसत होते.

"कोणी हसू नका माझ्या सुमीतला. फिजीकल फिटनेस खूप इम्पॉर्टंट आहे." प्रदीपने त्याची बाजू घेतली. सुमीत खुश होता.

" उद्या सकाळी शाळा नाही का चला जाऊन झोपा. "

आता सुमितही छान मिक्स होत होता. त्याला दिपू सोबत आवडत होतं. दोघं मिळून खेळत होते. अभ्यास करत होते.

मुलं रेखाताईंच्या रूममध्ये होते. अनघा त्यांना विचारत होती उद्याचा अभ्यास झाला का? बॅग भरली का? मुला आल्यामुळे रेखाताई खुश होत्या.

" आता बरं वाटत आहे का आई?"

हो.

"उद्या सकाळी मी तुम्हाला आईकडे सोडून देईल."

"चालेल ना तुला?"

" हो आई तुम्ही सुमितला सांगून जा. "

"सुमीत इकडे ये. आजी थोडे दिवस त्या आजी कडे राहणार आहेत चालेल ना तुला? "

" आजी नको जावू. "

" अस करायच नाही. मी आहे ना तुझ्या सोबत. सुमीत दिपू मम्मी जवळ रहातील. फक्त दुपारी थोड्या वेळ मालती आजीजवळ राहावे लागेल."

"चालेल मम्मी काही हरकत नाही. "

" हा रात्री कुठे झोपेल. "

" माझ्या जवळ. आई तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त तुमची तब्येत सांभाळा."

मम्मी आहे मग सुमीतला प्रॉब्लेम नव्हता.

अनघा रूम मध्ये आली. ती टेन्शनमध्ये होती.

" आता काय झालं आहे अनघा? "

ती प्रदीप जवळ जाऊन बसली

" काय कराव आईंना माझ्या आई कडे जावू दिल तर सुमीत राहणार नाही. सुमीत दिपूला आपल्या सोबत रूम मध्ये घेवून झोपू शकत नाही. दोघं मुलं बऱ्यापैकी समजूतदार होते. त्यांच्यासमोर आम्ही दोघं असे एकत्र झोपण बरं वाटत नाही. "

" ठीक आहे अनघा नवीन घर. त्यात मुल नाही रहात आजी जवळ काय करणार. "

" एक रिक्वेस्ट होती. जो पर्यंत सुमीतला सवय होत नाही तो पर्यंत आपण मुलांना आपल्या सोबत ठेवायच का? हॉटेल मधे असत तस फॅमिली रूम सारख. सुमीतला रोज तिकडे झोपायच टेंशन असत. ते टेंशन कमी होईल. आज ही शाळेत जातांना बोलत होता मम्मी तू कुठे जावू नकोस."

" काही हरकत नाही. येवू दे मुलांना इकडे. मुल ठीक असल्यावर तू खुश असते. मुल रहातील आपल्या सोबत. आपल काय मग अनघा? काय ठरवल?" प्रदीप तिच्या कडे बघत होते.

"आपण दोघ मुल झोपले की दुसर्‍या रूम मध्ये एकत्र वेळ घालवू शकतो." ती एकदम बोलली. आपण काय म्हटलो ते समजल्यावर ती गप्प बसली.

प्रदीप हसत होते. त्यांनी तिला जवळ ओढून घेतल. तिने हसत लाजून त्यांच्या छातीवर चेहरा लपवला. "अरे वाह अनघा खूप आयडिया आहेत तुझ्या कडे. "

" प्रदीप म्हणजे मी आपला ही विचार करते आहे. "

" हो समजल मला. चल आता आजच्या दिवस या रूम मधे आपण दोघ आहोत. वेळ नको घालवायला."

"मला चिडवलं तर मी येणार नाही. "

प्रदीपने तिला उचलून घेतल. आता काय करणार?

दोघ छान रमले होते.