Login

रंगात तुझ्या रंगतांना भाग 14

कथा सहवासाची कथा पुन्हा प्रेमात पडतांनाची

रंगात तुझ्या रंगतांना भाग 14

©️®️शिल्पा सुतार
.........

सकाळी प्रदीप दिपू, सुमीतला तयार करत होते. सगळ्या बुक्स घ्या. मुलांनी नाश्ता केला. आज अनघाला लवकर जायच होत. रेखा ताईंना आईकडे सोडायच होत. मूल शाळेत गेले.

"घर एकदम शांत होत ना मुल शाळेत गेले की." रेखा ताई बोलत होत्या.

"हो आता आई तुम्ही पण तिकडे आई कडे जाणार. थोडे दिवस जा. पण तुम्हाला इकडे रहायच आहे माझ्या जवळ." अनघा समजावत होती.

"हो येईल मी."

प्रदीप आले.

"चला नाश्ता करून घ्या मला उशीर होतो आहे."

मालती काकू येवून बसल्या.

"प्रदीप आईंना गोळ्या लिहून दे ना. घरी जातांना घेते मी. मग सोडते त्यांना तिकडे. "

सगळ्यांचा चहा नाश्ता झाला.

बँकेत जातांना ती रेखा ताईंना घेवून प्रतिभा ताई कडे आली.

"आई सासुबाई राहतील थोडे दिवस इथे तुमच्या कडे."

"काही प्रॉब्लेम नाही. या रेखा ताई."

"मला उशीर होतो आहे. मी निघते आई." अनघा निघाली.

" काय झालं रेखा ताई? तब्येत ठीक आहे ना? कसे आहेत तिकडे सगळे? " प्रतिभा ताई विचारत होत्या.

"खूप चांगले आहेत. मालती ताई ,प्रदीप.. अनघा सुमीतची छान काळजी घेतात."

प्रतिभा ताई, रेखा ताई यांचा फिरायचा ग्रुप होता. दोघी मैत्रिणी होत्या.

" सुमीत रहातो ना आता तिकडे? "

" हो ठीक आहे तो. "

दुपारी प्रदीप घरी आले होते. त्यांच्या बरोबर काम करणारे लोक होते. सुमीत दिपू साठी त्यांनी त्यांच्या रूम मध्ये जागा केली. दोन लहान बेड कोपर्‍यात मांडले. छान बसके काॅट होते. त्यावरून पडले तरी काही लागणार नाही असे अगदी खाली होते ते. नवीन गादी बेडशीट खूप छान अॅरेंजमेंट झाली होती.

दिपू, सुमीत शाळेतुन आल्या नंतर बघत होते. खूप खुश होते ते. सुमीत मम्मी जवळ रहाणार होता म्हणून खुश होता तर दिपू डॅडी जवळ. दोघांनी आपले काॅट कोणते ते ठरवून घेतले.

संध्याकाळी अनघा घरी आली. मुल आनंदाने तिला नवीन काॅट बद्दल सांगत होते. ही अरेंजमेंट लगेच होईल अस अनघाला वाटल नव्हत. तिला समाधान वाटल. "मुलांनो अभ्यास झाला का?"

" हो ट्युशन टीचर आली होती."

मालती काकू बागेत फेर्‍या मारत होत्या. सुमीत, दिपू खेळत होते. आज अनघाने मुलांची आवडती पुरी भाजी केली होती. खूप छान चव होती तिच्या हाताला. मालती काकू दिपूला हा बेत खूप आवडला . सुमीत खुश होता तिघांच जेवण झाल.

अनघाने रेखा ताईंना फोन लावला. " कशा आहात आई?"

"मी ठीक आहे ग. तू किती काळजी करतेस."

"गोळ्या घ्या."

हो.

"झाल का जेवण? "

" हो झाल. "

आता अनघा प्रतिभा ताईंशी बोलत होती. "आई काही लागल तर अगदी अर्धा रात्री फोन कर. मी लगेच येईन तिकडे."

"हो अग ठीक आहेत रेखा ताई आणि त्या थोड्या दिवसांनी येणार आहेत तिकडे. "

"हो काळजी घ्या एकमेकींची."

प्रदीप आले. दोघ मुल त्यांना थँक्यू बोलत होते.

"थँक्यू डॅडी. आम्हाला आमचा काॅट आवडला." दिपू खुश होती.

"आता स्वतःचा काॅट नीट आवरून ठेवायचा. "

हो.

ते सुमीत कडे बघत होते. सुमीतने दिपू कडे बघितल.

" डॅडी सुमीतला थँक्यु बोलायच आहे." दीपुने सांगितल.

" हो मग तो बोलेल ना." प्रदीप बोलले.

दिपू तीच तीच खेळत होती. अनघा आवरत होती. प्रदीप, सुमीत समोरासमोर होते. ते सुमीत जवळ खाली बसले. त्याच्याशी हसले. थँक्यु.. सुमीत हळूच बोलला.

"बेटा माझ्याशी मोकळ बोलत जा .मी नाही रागवत. "

त्याने मान डोलवली .

"अस नाही. तू दिपू तुझ्या मम्मी सोबत बोलतो तस मोकळ बोल. "

ओके.

"आपण फ्रेंड्स व्हायच का? एक काम करू आपण दोघ छान खेळत जावू रोज थोड्या वेळ."

"डॅडी मी पण खेळते." दिपू पळत आली.

"हो पण आमची बॉइज टीम मी आणि सुमीत फक्त. "

" ठीक आहे मग आमची गर्ल्स टीम. मी आणि मम्मी. "

" आता आम्ही जेवून येतो. मग तुमच्या सोबत बोलतो."

"ठीक आहे डॅडी. आज मम्मीने मला आवडतात तश्या गोल गोल पुर्‍या केल्या आहेत. "

" अजून खायच्या का? चल दिपू." अनघाने तिला जवळ घेतल.

" नको खूप पोट भरल. "

" उद्या डब्यात देते. "

" हो मम्मी."

अनघा, प्रदीप जेवायला खाली आले. " आज मुलांच्या आवडीचा मस्त बेत दिसतो आहे. काय छान झाली भाजी. पुर्‍या मस्त होतात तुझ्या."

" हो दिपूला अजुन काय काय आवडत ते सांग प्रदीप. "

"माझ काय? मला काय आवडत ते नाही जाणून घेणार का?"

अनघा खूप हसत होती. "प्रदीप जेव ना."

जेवण झालं. दोघ रूम मधे आले. मुल समोर होते. अनघा खुश होती. सुमीत छान अभ्यास करत होता. तो दिपू सोबत खूप बोलत होता. थोडस प्रदीप सोबत बोलत होता. आता त्याला भीती नव्हती की मम्मी कुठे जाईल. थोडा वेळ त्यांनी गेम खेळला. चला झोपा आता.

मूल झोपले होते. प्रदीप लॅपटॉप वर काम करत होते. अनघा त्यांच्या जवळ जावून बसली. त्यांनी लॅपटॉप बाजूला ठेवला. अनघाला मिठीत घेतल.

" काय काम सुरू आहे? "

"हे बघ हा रिसर्च पेपर सबमिट करायचा आहे."

अनघा बघत होती. "किती अवघड आहे."

" प्रत्येकाला दुसर्‍याच काम अवघड वाटत."

"तु खुप चांगला आहेस प्रदीप. अगदी समजून घेतोस मला. लव यु."

"काय झालं आता?"

"मुल इथे आहेत तर मला बर वाटत आहे."

" मग आता काय? मला काहीतरी मिळायला हव. आपल्या साठी कुठे व्यवस्था?"

" बाजूच्या खोलीत. " ती एकदम लाजून म्हणाली.

दोघांनी हळूच रूम बंद केली. दोघ दुसर्‍या रूम मध्ये आले. छान आहे हा ही एकांत. "तू आपल्या साठी खूप करते. मला काय हव नको ते नीट लक्ष देते अनघा. इतक सगळ काम कस जमत तुला. प्रत्येकाच मन जपतेस तू "

अनघा लाजली. "मला ही हे हव आहे. तू खुश असला की मला छान वाटत प्रदीप. "

" बरोबर आपल्या दोघांना हे हव आहे हे सहजीवन." अनघा प्रदीप सोबत रमले.

थोड्या वेळाने ते रूम मध्ये आले. "हे छान झालं . मुल शांत आपल्याला ही वेळ मिळतो."

ती त्यांच्या मिठीत झोपली.

सकाळी अनघा आवरत होती. मुल रेडी होते. मुलांच सामान दुसर्‍या रूम मधे होत. दोघ शाळेत जायला निघाले. दिपू पळत येवून प्रदीपला भेटली. तिने गोड पापी दिली. लव यू डॅडी. तिच्या मागे सुमीत होता. तो प्रदीपला बघून एकदम थांबला.

" इकडे ये सुमीत."

तो बघत होता अनघा कुठे आहे. ती रूम मधे नव्हती. हिम्मत करून तो प्रदीप जवळ गेला. प्रदीपने त्याला जवळ घेतल. त्याच्या गालावर पापी दिली. सुमीत लाजला होता.

गुड मॉर्निंग बेटा.

गुड मॉर्निंग डॅडी.

प्रदीप खुश होते.

मुल शाळेत गेले.

दोघ नाश्ता करत होते. मालती काकू आत होत्या.

"काकू कुठे आहेत?"

"येत आहेत. "

"अनघा मुलांची परीक्षा कधी आहे?"

"मुलांना असाईनमेंट असतात. दर महिन्याला."

"झाल्या का त्या."

हो

" आपण फिरायला जायच का मुलांना घेवून?"

"हो चालेल."

"मी ठरवतो मग."

" मुलांना शाळेतुन दोन दिवस सुट्टी घ्यावी लागेल . मी टीचरला फोन करते. "

शाळेतून आल्यावर मुलांना पिकनिकच समजल. मुलं तर खूपच खुश होते. दोघ ठरवत होते काय काय करायच. दोघांनी त्यांच खूप सामान बाहेर काढल होतं. अजून ते दोघ गेम्स घेत होते.

" अरे हे एवढं सामान का बाहेर काढलं आहे? "

"मम्मी हे घेऊन जायचं आहे पिकनिकला." सुमीत, दिपू बिझी होते.

"एवढं सामान नाही नेऊ शकत. दोघांनी मिळून दोन-चार गोष्टीचे पुस्तक. एक दोन पझल रोजचे कपडे स्विमिंग कॉस्ट्यूम गॉगल एवढच घ्यायच आहे. बाकीचं न लागणारे सामान मी बघते. मग ते कपाटात ठेवा. "

प्रदीप घरी आले मुल अनघा बिझी होते." काय सुरू आहे?"

" पिकनिकची तयारी. मूल किती घाई करत आहेत. "

" मलाही घाई झाली आहे. इकडे ये अनघा थँक्स." प्रदीपने तिला जवळ घेतल.

" का आता? "

" तुझ्या मुळे मी पण बर्‍याच दिवसांनी खूप खुश आहे. "

" प्रदीप टच वूड. नको ना अस बोलायला. "

आज ते पिकनिकला जाणार होते. दोघ मुल एकदम लवकर उठून बसले होते. प्रदीप रेडी होते ते सामान कार मधे ठेवत होते.

अनघा आवरत होती. "काकू तुम्ही नक्की रहाल ना एकट्या की येता सोबत? "

" नाही मी राहीन."

अनघाने प्रतिभा ताईंना फोन लावला. "आम्ही निघतो आहोत . काकू एकट्या आहेत. तसे बागकाम करणारे घरात काम करणारे लोक आहेत. तरी तुम्ही उद्या एक चक्कर मारा."

"हो नक्की."

ड्रायवर सोबत होता. ते चौघे फिरायला निघाले. अगदी एक फॅमिली झाले होते ते आता. सुमीत, दिपू खूप छान एडजेस्ट झाले होते. ते खूप खुश होते. गप्पां मधे गुंग होते. प्रदीपने अनघाच्या खांद्यावर हात ठेवुन तिला जवळ घेतल. ते दोघ ही खूप एन्जॉय करत होते.

"प्रदीप नको ना. तिकडे सरक."

" अनघा बस आरामात आपण आपल्या हनिमूनला चाललो आहोत. फरक एवढा आहे की हे आपल्याला ऑलरेडी दोन मुल आहेत."

अनघा खूप हसत होती.

"मग आता आपला काय प्लॅन आहे?"

"काही नाही. "

"अस चालणार नाही. मला खूप एन्जॉय करायच आहे. सदोदित माझ्या सोबत रहायच. गोड बोलायच. हो नाही करायच नाही. नाही तर पुढच्या वेळी आपण दोघ जावू फिरायला. मुलांना येवू देणार नाही."

" प्रदीप तू पण ना. ही काय धमकी आहे का?"

" हो.. अस कराव लागत. "

तीन तासाने ते सुंदर रिसॉर्टला पोहोचले. मुलांना काय करू काय नको अस झाल होत. सुमीत आधी सारख मस्ती खोर झाला होता. दोघ पळत आत गेले. मस्त फॅमिली रूम त्यांनी बूक केली होती. मागे छोटा लाॅन होता. छोटा स्विमिंग पूल होता. दोघ मुलांना त्यांच्या सोबत झोपायला जागा होती. त्यांचे कॉट समोर होते. मध्ये मोठा पडदा होता. इकडे किंग साइज बेड होता.

"आवडली का रूम मुलांनो?"

हो.

प्रदीपने फोन करून जेवण मागवल. मुल बाहेर बागेत खेळत होते.

"सुमीत दिपू एकमेकांकडे लक्ष द्या. सोबत रहा." अनघा काळजीत होती.

"त्यांना सांभाळायला एक असिस्टंट घेतली आहे अनघा. काळजी करू नकोस. ती बघ सोबत आहे." प्रदीप सांगत होते.

अनघाने बघितल ती मुलगी लक्ष देवून होती.

प्रदीप अनघा टीव्ही बघत होते. जेवण आल. प्रदीप मुलांना घेवून आले. "थोडा वेळ आराम करा आता मुलांनो मग संध्याकाळी आपण बोटिंगला जावू."

तिथे जवळ मोठा तलाव होता.

दोघ मुल जेवून झोपले. अनघा प्रदीपने सोबत थोडा वेळ घालवला. संध्याकाळी ते सगळे बोटिंगला गेले. मोठी बोट होती. आत मध्ये जेवणाची व्यवस्था होती. डिस्को होता एकंदरीत दोन-तीन तास राईड होती. सुरुवातीला ते सुंदर निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत होते. दिपू, सुमीत छान डान्स करत होते. जेवायला ही आवडते पदार्थ होते. प्रदीप अनघा सोबत रमले होते. रात्री रूम वर वापस आल्यावर मुल थकले होते ते झोपले.

"आता काय करू या?"

"छान मुव्ही बघायचं का?"

"हो चालेल."

मुव्ही बघता बघता अनघा झोपली. अगदी निरागस आहे ही. प्रदीप तिची काळजी घेत होते.

सकाळी नाश्ता झाला.

"चला मुलांनो आज स्विमिंग."

दोघ मुल खुश होते. अनघा त्यांचे कपडे शोधून ठेवत होती.

त्यांच्या रूम मागे छोटा पूल होता. प्रदीप दोघ मुलांना घेवून पाण्यात खेळत होता. अनघा बाजूला बसुन तिघांकडे बघत होती. आज तिने छान स्लिवलेस ड्रेस घातला होता. केस मोकळे होते. खूप सुंदर दिसत होती ती. एक वेगळाच ग्लो होता चेहर्‍यावर.

" अनघा आज तू खूप गोड दिसते आहेस. हो ना मुलांनो."

"हो मम्मी तू स्वीट आहेस." दिपू बोलली.

अनघा लाजली.

"मम्मी आत ये ना." सुमीत बोलवत होता.

नाही.

" चल अनघा."

"नको प्रदीप."

" मी आहे ना."

नाही.

मधेच ते तिघ तिच्या अंगावर पाणी उडवत होते. सुमीत प्रदीप सोबत थोड तरी बोलत होता.

"चला आवरा आता आपल्याला मस्त लंच साठी जायच आहे. तिकडे गेम्स आहेत. "

मुल आत पळाले. प्रदीपने पुढे होवुन अनघाला उचलून घेतल. दोघ स्विमिंग पूल मधे होते. ती एकदम दचकली. प्रदीप सोड मला. कपडे ओले झाले होते. एकदम अंगाला चिकटले होते. तिचे केस ओले झाले होते. ती ते मागे घेत होती. त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. तिने एकदम प्रदीपला मिठी मारली.

"मग आता काय अनघा ? कपडे ओले झाले आहेत. चल बाथरूम मधे."

ती खूप लाजली होती. प्रदीप नको.

" अस चालणार नाही." तो तिला उचलून आत घेवून गेला.

"प्रदीप मुलांच आवरव लागेल. सोड ना."

दोघ मुल दुसर्‍या बाथरूम मधे होते.

"मुलांचे कपडे बाहेर काढले आहेत ना?"

हो.

" मी आवरतो त्यांच. "

मुल आवरून खेळायला गेले. प्रदीप अनघाला हवा तो एकांत मिळाला होता.