Login

रणसंग्राम - एक झुंजार भाग १३ #मराठी_कादंबरी

Abhishree brings everyone to an air balloon point. They are surprised to see aadinath and Shambhavi there. Aadinath is shocked as he realised they are following and leaves immediately. Later hardik finds out Nihar has bck up from Saurabh mohite. Ever

रणसंग्राम - एक झुंजार : भाग १३

भाग १ ते भाग १२ च्या लिंक या भागाच्या शेवटी दिलेल्या आहेत. )

मागील भागात -

निहारच्या गैर प्रकारामागे परीतोष नाही असं त्याने घरी येऊन अभिश्रीला सांगितलं आणि तिलाही त्याच्यावर विश्वास होता. आता त्या व्यक्तीला शोधण्यासाठी सर्व कामाला लागले. हार्दिक रणदिवे अभीला भेटण्यासाठी पुण्यात आला. अभी व तिच्या चौकडीने मिळुन हार्दिक सोबत खुप मजा केली. अभिश्री त्या सर्वांना अशा ठिकाणी नेले जिथे जाऊन सर्व घाबरुन आरडा ओरड करत होते.

------------------------

घाबरत घाबरत जोसेफने त्या नंबरचं लोकेशन ट्रॅक केलं आणि परत झोपला. अभिश्री कुत्सितपणे हसली. सिक्युरिटी कडुन त्या चौघांना उचलुन गाडीत टाकलं. थंडगार हवेत सर्व तासभर गाढ झोपले. आपण कुठल्यातरी स्वप्नात आहो अशी त्यांची समजुत झाली. 

झोप उघडली तेव्हा सर्वांची आरडा ओरड सुरु झाली. उभ्या जागी चकरा येऊ लागल्या हात पाय थर थर कापत होते.

अभिश्रीने त्या सर्वांना शहराबाहेर एका एअर बलुनमध्ये बसवलं होते. तो एअर बलुन त्यांच्यासह जमिनीपासुन शे दीडशे फीट उंच उडत होता. 

"शशश… गप्प बसा रे." अभिश्री

"अगं का आमच्या जिवावर उठलिये तु…? झाडावर चढायला लावते, चोरुन लोकांच्या घरी काय नेते, पाय अजुनही दुखतो माझा. आज तर बॉडीचे पर्ट वेचावे लागतील." जोसेफ

"बट इट्स ब्युटीफूल यार अमेझिंग." हिमनीका

"माझ्या पोटात गुड गुड होतंय यार…," दक्ष

"शांत राहा रे… ते लोक बघतील आपल्याला… मी जेव्हा सांगेल तेव्हा एकदम सगळ्यांनी उभं रहा." अभिश्री

"एवढ्या वर कोण ऐकणार? कोण आहे तिकडे? 

ओहsss माय गॉड..!

आदिनाथ..! 

हा इथे काय करत आहे?" दक्ष

"चकण्या नीट बघ नाss. भावी वहिनी सोबत आहे तो." जोसेफ 

"अच्छाsss.. 

मग आवाज देऊ की त्यांना. भाईsss.." नित्या

"एsss.. फुटका भोंगा.. तोंड बंद कर…

त्यांना कळु द्यायचं नाही म्हणुन लपुन ट्रॅक करत आलोय इथे." जोसेफ

"ओहss.. सिक्रेट लव्ह स्टोरी का..! सो sss.. स्वीट." नित्या

"आता जर का परत कोणी बोललं तर इथुन खाली फेकुन देईल." अभिश्री

त्यादिवशी अभिश्रीने आदिनाथचं फोनवरील बोलणं लपुन ऐकलं होतं. त्यात तिला शांभवी हे नाव कळलं आणि तिने फॅशन शो सुरु होण्याआधी ओपनिंग साँग सादर केलं, हे कळलं. आदिनाथनेच तिचं नाव रेकमेंड केलं होतं. फॅशन शोचं ओपनिंग एखाद्या प्रोफेशनल सिंगरपासुन केलं तर सगळ्यांना आवडेल असं सांगुन. त्यानंतर अभिश्रीने जोसेफच्या मदतीने शांभवीचा फोन हॅक केला. शांभवीच्या फोनमध्ये ही लोकेशन दिसताच त्यांना ट्रॅक करत ती तिथे पोहचली.

जवळंच दुसऱ्या एअर बलुनमध्ये आदिनाथ आणि शांभवी हातात हात घेऊन उभे होते. पॅराशुट सारखा हवा भरलेला मोठा बलुन, तो हवेत मंद गतीने उडत राहावं यासाठी त्यात सतत आग तेवत होती. अगदी त्यांच्या प्रेमासारखी. बलुनखाली जाड दोरखंडांनी लटकवलेली मोठी बास्केट ज्यामध्ये ते दोघंही त्या निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद लुटत होते. सकाळचा थंड वारा, भुरभुरनारा पाऊस, हिरव्यागार जमिनीच्या शे दोनशे फीट उंच, वरती निळसर काळं आकाश.

शांभवी अचानक भानावर आली. तिने त्याचा हात झटकला.

"ह्ममम… मग किती पैसे उडवलेत एवढा घाट घालण्यात…! तुला माहिती आहे न मला असा फाजील खर्च आवडत नाही. तुझ्या कमाईचे नसताना तर मुळीच नाही.माझी आई म्हणते सुख कधी पैसा देऊन मिळत नाही. 

हे जे तू माझ्यावर उडवतो ते तुझ्या बाबंचेच पैसे आहेत ना..?

तुझी अशी वेगळी काय आयडेंटिटी आहे..? 

बाहेर पडुन बघ तुझी काय व्हॅल्युव आहे ते." 

शांभवी थोडं रागातच एका श्वासात सर्व बोलुन गेली.

आदिनाथने तिच्या डोळ्यात बघत एक गोड स्माईल दिली. हळुच तिचा हात परत आपल्या हातात घेतला. 

हे बघ एक तर हा फाजील खर्च नाही. कारण माझे बाबा म्हणायचे की आपण जे काही कमवतो ते आधी आपल्या कुटुंबासाठी, त्यानंतर आपल्याशी जोडलेल्या लोकांसाठी आणि मग समाजासाठी. देवाच्या कृपेने माझ्या घरच्यांनी हे सर्व मिळवलं आणि मलाही त्याचा भाग बनवलं.

राहिला प्रश्न आयडेंटिटीचा तर हा बिझनेस माझ्या बाबांचं स्वप्न होतं, जे मी जगत आहे. ते नसतानाही त्यांचं अस्तित्व आहे या कामात. मोठ्या बाबांनी खुप मेहनत घेऊन फक्त माझ्या आणि बाबांसाठी हे उभारलं. जर मी त्यांचं हे स्वप्न पुर्णत्वाला नेऊ शकलो तरंच माझ्या अस्तित्वाला अर्थ असेल. आपल्या लोकांमध्ये आपली व्हॅल्युव असते. त्यांना सोडुन आपली किंमत राहत नाही. आणि आता तूही आमचा भाग आहे.

सो यानंतर असा विचार करायचा नाही. 

पैसा देऊन सुख मिळत नाही पण सुखाचे क्षण तर उपभोगु शकतो न..? 

इथे माझ्या पद्धतीने उपभोगु, खाली गेलो की तु तुझ्या पैशांनी भजी खाऊ घाल तिथे तुझा पद्धतीने होईल.

शांभवी यावर निरुत्तर झाली. तिलाही ते कुठेतरी पटलं. तिला त्याचे विचार खुप खोल व कुठल्याही सर्वसाधारण मानसाच्या पलीकडे जाणवले.

"आईलाsss... भाई इतका वेळ बोलु शकतो..!" हिमानीका

"मी पण पहिल्यांदाच बघतेय. आमच्याशी तर महिन्याभरात भरात बोलतो एवढं." अभिश्री

"ते लोक काय बोलत आहे ऐकुच येत नाहीये राव.." नित्या

"पुढल्या वेळेस माईक लावु हा आपण." हार्दिक

"हाsss.. म्हणजे भाई मला एवढ्याच फुटांवरुन खाली फेकेल. त्याच्या जी. एफेचा. फोन हॅक केलाय मी. ही हेट्स हॅकिंग त्यावरुन नेहमी मला हुल देत राहतो." जोसेफ

"अरेsss.. चला रे खाली आता. एक तर सकाळ सकाळी आणलंय… पोटात गुड गुड वाढत आहे. चला रे लवकर.' दक्ष

"शशशश.. थांब थोड कंट्रोल कर." हिमानीका

"बरं… आपल्याला भेटुन वर्ष होत आलंय. तू आजवर तुझी खरी आयडेंटिटी सांगितली नाही कधी." शांभवी

"म्हणजे…?" आदिनाथ

"म्हणजे जशी माझी आहे 'शांभवी सरिता जाधव'.

"मग आहे की माझी पण 'आदिनाथ गायत्री सबनीस'.

"असंsss.. नाही. मी आधीपासुनच माझ्या वडिलांचं नाव लावत नाही. माझी आई सुध्दा. आय हेट माय फादर म्हणुन आईचं नाव लावते." 

"अँड आय लव्ह माय मॉम म्हणुन मी लावलं."

"ओहsss.. कम ऑन.. यु नो व्हॉट आय मीन." 

आदिनाथ थोडा काळजीत पडला. त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं.

"वेळ आली की मी माझी खरी ओळख नक्की सांगेल. प्लीज ट्रस्ट मी टील देन."

डोळे बंद करुन तो मनात बोलला.

'माझं सरपोतदार नाव जोवर पडद्या आड आहे तोवर आपलं प्रेम शाबुत आहे. ज्या दिवशी ते बाहेर येईल त्यादिवशी सगळं संपेल.'

अचानक आदिनाथ, नित्या आणि हार्दिक हे तीघही एकदाच ओरडले..

ओहsss.. शेट..!

अभिश्रीचा बलुन त्यांच्या अगदी जवळ आला होता. आणि ते सगळे डोळ्यात प्रेमभावना ओसंडत आदिनाथकडे बघत उभे होते. त्यामुळे आदिनाथ ओरडला आणि अचानक ऑफिसचं काम आठवलं सांगुन बलुन लवकर खाली घ्यायला लावला.

नित्याच्या मोबाईलवर एक न्युज पिंग झाली. त्यात सी.एम.चा फॅमिली फोटो होता.

"तू हार्दिक रणदिवे आहेस..?" नित्या हार्दिकच्या कानात कुजबुजली.

"यसsss.. बेबी.. पण त्यावर नंतर रिॲक्ट हो. एक इंपॉर्टन्ट गोष्ट दाखवतो. मी माझ्या विषयी स्वतःहुन विषय काढेल नंतर. प्लीज बीहेव कॅज्युअल टिल देन."

हार्दिकने त्याच्या फोनमध्ये एक गोष्ट दाखवली. मला आत्ता आठवलं त्या निहारला मी कुठे बघितलं.

हे बघा…"

"ओह नो.. हा चम्या…"

नित्या आणि अभिश्री फोटो बघुन चमकल्या. 

हार्दिकच्या घरी एका फंक्शनमध्ये त्याने सेल्फी काढला होता, जो त्याने प्रोफाईलवर लावलेला. त्या फोटोमध्ये हार्दिकच्यामागे चुकुन दोन लोक बोलताना निघाले. एक म्हणजे निहार आणि दुसरा सौरभ.  सौरभ म्हणजे पुण्यातील विजयसिंहांच्याच NKP पार्टीमधील मंत्री मोहितेंचा मुलगा. त्याचे वडील भ्रष्टाचारासाठी चांगलेच प्रसिद्ध होते. तेच बीज सौरभमध्ये ही पेरलं गेलं होतं.

पण सौरभचं असं करण्याचं कारण त्यांना समजत नव्हतं. पार्टी एकच असल्याने अभिश्रीला हरवुन त्यांना कुठलाच राजकारणी फायदा होणार नव्हता. सगळेच गहन विचारात पडले. खाली उतरुन ते जवळच एका रिसॉर्ट मध्ये गेले. दक्ष रिसॉर्ट बाहेर गाडी पार्क करताच आधी वॉशरुम मध्ये पाळला. फ्रेश होऊन सर्व नाश्त्यासाठी जमले.

"आता काय करायचं.." जोसेफ

"खुप स्मार्टली खेळतोय तो.स्मार्ट फोनचं वापर न करता बोलणं, भेटले सुध्दा मुंबईमध्ये. त्यांना माहिती होतं आपण लक्ष ठेऊन अहो ते. एक काम करुयात. निहार जेवढ्या मुलांना भेटला त्यावर आपली गँग लक्ष ठेऊन आहेच. त्यांची लिस्ट फायनल करु. फ्लॅटवर पोहचलो की सगळं डिस्कस करु. 

नाश्ता करुन सर्व तासाभरात फ्लॅटवर पोहचले. सगळ्यांनी आपापले लॅपटॉप काढले. कॉलेजचे सिसी.टीव्ही, स्टुडंट्सचा डेटाबेस ज्यामध्ये त्यांचा नंबर, फोटो, पत्ता, सोशल मीडिया अकाउंट ही सगळी माहिती असणारं एक सॉफ्टवेअर सगळ्यांकडे इंस्टॉल केलेलं होतं. आता गरज होती त्यांचे पर्सनल डिटेल शोधण्याची. त्यासाठी इतर गँग मेंबर्स कामाला लागले. आदिनाथच्या ऑफिसमधुन काही खास गॅजेट्स मागवले ज्यांच्या सहायाने त्या मुलांचे बँक डिटेल्स, डेबिट, क्रेडिट ट्रांजॅक्शन्स ट्रॅक करता येणार होते. 

हार्दिकसाठी हा खुप वेगळा अनुभव होता. त्याच्याच एवढी मुलं ही, पण किती निष्ठेनी काम करत आहे. त्याला स्वतः चं असं काही ध्येयं नसल्याचं वाईट वाटत होतं. पण अभिश्री त्याला प्रत्येक गोष्टीत सामील करत होती. दिवसभर सगळे न हलता माहिती गोळा करण्यात कसुंन भिडले होते. हार्दिकला मानत नसताना तिथुन जावं लागणारं होतं. पण तो लवकरच परत भेटायला येणार असं सांगुन निघाला.

"नित्या डारलींग... आने के बाद हम मेरा सिक्रेट फोडेंगे. तब तक किसीसे कुछ ना कहना." हार्दिक

बाय गाईज.

नित्या हार्दिक बाबत थोडी अवघडुनंच होती. तिने हलकीशी स्माईल दिली.

पुढचे ४-५ दिवस कोणीच कॉलेजला गेलं नाही. त्यांना स्वतः ची कुठलीच हालचाल जाणवु द्यायची नव्हती. त्यांचं लक्ष संपुर्णपणे निहारच्या हालचालींवर होतं. जोसेफनी असं ॲप्लिकेशन बनवलं होतं ज्यामध्ये कुठल्याही सी. सी. टी.वी. च्या लोकेशन वरुन ती तो हॅक करत. तो ज्या ज्या लोकांना भेटत असे त्या लोकांना लिस्टमध्ये टाकायचं.

"बऱ्यापैकी लोक जमा झालेत. आजकाल सर्व डिजिटल झाल्याने त्यांची माहिती सुद्धा बरीच मिळाली. पण आता या माहितींच करायचं काय…?" जोसेफ

"काय करायचं म्हणजे..! पुरावे आहेत आपल्याकडे. मॅनेजमेंटला दाखवु सौरभ, निहार मुलांना पैसे, दारु, सिगरेट देत आहे. मोहितेंच्या मालकीचा बार आहे तसही." हिमानीका

"हो पण त्यानी आपल्याला फायदा होईल असं काही सिध्द होणार नाही." नित्या

"आपण त्यांच्या परेंट्सला सांगु तुमची मुलं हे गुण उधळत आहेत." दक्ष

"एक तर घरचे ऐकणार नाही आणि मुलं सुध्दा मान्य करणार नाहीत. आणि जर त्यांना घरच्यांनी रागवलं तर ते आपल्याला वोट देतील का..?" अभिश्री

"त्यांचं नुकसान रोखण्यासोबत आपल्याला इलेक्शन सुध्दा जिंकायचं आहे. मलाही असंच वाटते की मॅनेजमेंट समोर सगळं उघडं करुन त्या मुलांना रस्टीकेशनची धमकी द्यावी. मे बी ऐकतील." दक्ष

"आर यू शुअर…? 

करणं या गोष्टीमुळे हा प्रकार थांबेल कदाचित पण ज्यांना आधीच पैसे मिळाले त्यांचं काय..? 

ते का आपल्याला वोट देतील..? 

सगळ्यांनीच रस्टीकेट होण्यासारखं असं काही केलं नाही." अभिश्री

"निहारचं तिकीट काढुन घेतलं तर... आपल्याकडे पुरावे आहेत." नित्या

"एक तर तसं प्रत्यक्षपणे सिध्द होणार नाही आणि दुसरा आपण कॉंपिटीशनला घाबरलो असं होईल." अभिश्री

"ट्राय तर करु हरण्यापेक्षा हे बेटर आहे." दक्ष

"बघु काहीच ऑप्शन नाही मिळाला तर हे करु. सध्या डोकं बधीर झालंय." अभिश्री

"चला जरा आराम करु." जोसेफ

"तसंही तु दुसरं काय करत होता. नुसता लोळत पडलेला." हिमनीका

"आपल्याला असेल छक्के पंजे येत नाही राव. मला फक्त माझं काम चोख येतं २४/७." जोसेफ

"नशीब तेवढे उपकार करतो." नित्या

अभिश्री ५-६ दिवसानंतर घरी गेली होती. रात्री जेवताना पण ती शांतच होती. 

विजयसिहांचा सल्ला कसा घ्यावा…? 

ती विचारात होती. आधीच अमरसिहांबद्दल विचारुन त्यांना त्रास झाला होता, त्यामुळे ती शांत होती." अभिश्री

रात्री टेरेसवर एकटी बसुन असताना आदिनाथ तिथे कॉफी घेऊन आला.

"ह्ममम्.. सो कुठे अडकल्या मॅडम..?

"यू डोन्ट लाईक पॉलिटिक्स ना भाई..!"

"यस बट आय डोन्ट लाईक युअर सॅड फेस इदर."

"तू मदत करशील माझी..?

"अप्रत्यक्षपणे.. मे बी…"

तिने त्याला निहार विषयी सर्व गोष्टी सांगितल्या. आणि आता मॅनेजमेंट समोर ते मांडुन निहारचं तिकीट कॅन्सल करु हा पर्याय निवडायचा विचार आहे असं सांगितलं.

"आर यू मॅड…! 

असं केल्याने तुमची इमेज काय राहणार..? 

आणि सौरभ हा मंत्र्याचा मुलगा आहे. तो इझिली असं करु देईल का.." आदिनाथ

"मी एक सजेस्ट करतो बघ पटत असेल तर.."

आदिनाथने बराच वेळ अभिश्रीला काही गोष्टी सांगितल्या व शांतपणे उद्या त्याचा विचार करण्यासाठी सांगितलं. तिचं डोकं बरच जड पडलं होतं.

"आणि हो तुमची मझ्यावरची हेर गिरी जरा बंद केली तर बरं होईल. तुझं हे इलेक्शनचं आटोपलं की शांभवी बद्दल बोलु." आदिनाथ

"कोण शांभवी भाई…?"

"आगव मुलगी जा पळ… गुड नाईट."

पुढचा दिवस ती घरीच होती. आदिनाथसोबत बोलुन तिने शक्य तेवढी आखणी तयार केली.

संध्याकाळी फ्लॅटवर तो प्लॅन त्यांच्या चौकडीला सांगितला. 

"अभी यार.. आपला ऑप्शन जास्त बेटर आहे. 

एकदम स्ट्रेट..

निहार बद्दल मॅनेजमेंटला सांगु बात खतम. आदिनाथच्या प्लॅनमध्ये खुप रिस्क आहे." दक्ष

बाकी लोकांना दोन्ही प्लॅनमध्ये कन्फ्युज होत होतं. शेवटी अभिश्रीने दक्ष सोडुन इतर सर्वांना आदिनाथच्या प्लॅनसाठी तयार केलं. इच्छा नसतानाही दक्ष कामाला लागला.

पुढचे आठ दिवस कोणी काहीच हालचाल केली नाही. कॉलेजमध्ये इतर गँग मेंबरला सुध्दा कॉलेजमध्ये जाण्यासाठी नको म्हटलं.कधी फ्लॅटवर तर कधी अभिश्रीच्या घरी ते लोक जमत. वोटिंग आता उद्यावर येऊन ठेपलं. 

"ऐका माझं प्लीज.. 

आज शेवटाचा चांस आहे. कॉलेजमध्ये जाऊन बोलु निहार विषयी." दक्ष

"आता एवढी मेहनत केली तर मागे हटायचं नाही. जे होईल ते फेस करु. जिंकु नाही तर हरु." हिमनीका

दक्षने अभीचे दोन्ही हात हातात घेतले.

"अभी डीयर... लीसन टू मी.. आर यू रिअली कॉन्फिडंट..? हे वर्क होईल..?" दक्ष

"खर सांगु.. तर नाही." अभिश्री

"हे बघ.. उद्या १० वाजता वोटिंग सुरु होईल. तोपर्यंत माझ्या गोष्टीचा विचार कर प्लीज. 

करशील ना..?" दक्ष

"ठीक आहे. मलाही तसंच वाटतंय परत विचार करावा.

उद्या सकाळी ८ वाजता भेटु कट्टयावर."

दक्षला बोलुन अभिश्री घरी जाण्यासाठी निघाली.

वाटेत असताना तिला एक ऑडिओ मेसेज आला.

"मला एवढी घाबरलीस की माझं नाव समजताच कॉलेजमध्ये येणाच बंद केलं. 

एवढी दहशत…? 

असायलाच पाहिजे.पण इलेक्शनमधुन माघार घेऊ नको बरं. अशी सहजा सहजी तुझी सुटका होणार नाही लक्षात ठेव. तेव्हा माझ्या वाटी गेली होती तर खुप मजा घेतली ना.. आता रडण्यासाठी तयार रहा. इलेक्शन हरणे तर सुरुवात आहे. माझ्याच भीती मुळे तुझ्या बापानी बॉडीगार्ड ठेवला होता न तुझ्यासाठी. तोही काही करु शकणार नाही. सौरभ मोहिते काय चीज आहे हे कळेल तुला आणि तुझ्या बापाला लवकरच." 

अरे यार sss… १ वर्ष आधीची गोष्ट हा आत्ता कशाला उगाळतोय. आता भाई आणि बाबा परत शाळा घेणार.." अभिश्री

क्रमशः

( पुढील भाग सोमवार दिनांक १९)

सौरभ आणि अभिश्रीमध्ये असं काय झालं होतं की तो तिच्या जिवावर उठला होता…?

अभिश्री दुसऱ्या दिवशी काय निर्णय घेईल…? कुठला प्लॅन ठरवेल दक्ष की आदिनाथचा…?

त्यांच्या या प्लॅनचा वोटींगवर काय परिणाम होईल…?

जाणुन घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

कथा शेअर करताना नावासह शेअर करावी. आपल्या प्रामाणिक प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरुर कळवा.

(सदर कथा संपुर्णपणे काल्पनिक आहे. कथेतील पात्रांचा व घटनांचा वास्तविकतेशी काहीही संबंध आल्यास तो योगायोग असेल. राजकारणा विषयी संपुर्ण ज्ञान मिळवणे ही अत्यंत कठीण गोष्ट असल्याने त्यातील चुकांसाठी क्षमस्व.)

{ कथा २००४ पासुन सुरु झाली आहे असे ग्राह्य धरण्यात यावे. सध्या काळ १० वर्ष पुढे सरकल्याने २०१४ सुरु झाले आहे. }

लेखन : रेवपुर्वा

रणसंग्राम भाग १

रणसंग्राम भाग २

​​​​रणसंग्राम भाग ३

रणसंग्राम भाग ४

रणसंग्राम भाग ५

रणसंग्राम भाग ६

रणसंग्राम भाग ७

रणसंग्राम भाग ८

रणसंग्राम भाग ९

रणसंग्राम भाग १०

रणसंग्राम भाग ११

रणसंग्राम भाग १२