रणसंग्राम - एक झुंजार : भाग १४
( भाग १ ते भाग १३ च्या सर्व लिंक या भागाच्या शेवटी मिळतील. )
मागील भागात -
अभिश्री आणि इतर सगळ्यांनी आदिनाथची सिक्रेट लव्हस्टोरी शोधुन काढली. त्यांच्या NKP पार्टीमधील एक मंत्र्याचा मुलगा सौरभ, याचा नीहारला पाठिंबा होता. इलेक्शनसाठी दोन प्लॅन ठरले, त्यापैकी कुठला घ्यायचा त्यावर सर्वजण संभ्रमात पडले. सौरभने अभिश्रीला फोनवर तिचं नुकसान करण्याची धमकी दिली.
------------------
तेव्हा माझ्या वाटी गेली होती तर खुप मजा घेतली. आता रडण्यासाठी तयार राहा. इलेक्शन हरणे तर सुरुवात आहे. माझ्याच भीतीमुळे तुझ्या बापानी बॉडीगार्ड ठेवला होता न तुझ्यासाठी. तोही काही करु शकणार नाही. सौरभ मोहिते काय चीज आहे हे कळेल लवकरच तुला आणि तुझ्या बापालाही."
"अरे यार sss… १ वर्ष आधीची गोष्ट हा आत्ता कशाला उगाळतोय. आता भाई आणि बाबा परत शाळा घेणार.." अभिश्री
अभिश्री घरी पोहचेपर्यत संध्याकाळ उलटुन गेली होती. अभिश्री डोक्यात चाललेल्या गोंधळामुळे थकुन गेली होती. आली तशी हॉलमध्ये रिक्लायनर चेअरवर मस्त पाय लांब करुन डोळे लावले.
परीतोष आणि आदिनाथ दुपारी घरी आले तशे हॉलमध्ये आपला पसारा मांडुन काम करत बसले होते. तिकडुन गौरी कॉफीचा ट्रे घेऊन आली.
"वाह sss… गौरे टेंशनमध्ये तुझ्या हातची कॉफी म्हणजे अमृत…" अभिश्री
"टेंशन येईल असा अगावपणा करायचांच कशाला…! मागच्या वर्षी त्या सौरभच्या वाटी गेली नसती तर आज ही वेळ आली नसती." आदिनाथ
"सॉरी आदी.. चुक माझी होती.." गौरी
"तिच्या चुकी बद्दल तु का सॉरी म्हणत आहेस…?" आदिनाथ
"भाई प्लीज नॉट नाऊ..
गोरे त्यांना पण दे गं जरा कॉफी. नाहीतर माझं कमी झालेलं टेंशन वाढवतील." अभिश्री
पण गौरीचं सगळं लक्ष होतं पोर्चमध्ये उभ्या शिवाकडे. अमर गायत्रीच्या अपघातामध्ये सिक्युरिटी असलेले शिवाचे वडील गेले तसंच ड्रायव्हर हरी म्हणजे गौरीचे वडील सुध्दा मरण पावले. विजयसिंहांनी दोन्ही कुटुंबांची जबाबदारी घेतली होती. सरपोतदार कुटुंबाप्रमाणे शिवा आणि गौरी सुध्दा त्याच दुःखाचे वाटेकरी होते. त्यामुळे त्यांचं एक वेगळंच भावनीक नातं निर्माण झालं होतं. बी. कॉम.नंतर विजयसिंहांनी तिला आदिषमध्ये रुजु करुन घेतलं. हळु हळु एक एक गोष्ट शिकत गौरी आता परीतोष आणि आदिनाथ दोघांच्या सर्व अपॉईंटमेंट, शेड्युल, सांभाळत होती. तिचं काम अगदी प्रामाणिक, चोख असल्याने गौरी शिवाय त्या दोघांचं पानही हलत नसे. गौरी त्यांच्या पेक्षा वयाने थोडी मोठी होती.
गौरी हळुच कॉफीचा ट्रे घेऊन शिवाकडे गेली. ट्रे हातात धरुन त्याच्याचकडे बघत उभी राहिली. तो मात्र हाताची घडी करुन ताठस्ट पणे उभा होता. फॉर्मल ड्रेस, कडक इस्त्री, बेल्टमध्ये गन, हात आणि चेहऱ्यावर बऱ्याच जुन्या नव्या जखमांचे ओरखडे.
"माझी कॉफी सर्वांना खुप आवडते. टेस्ट कराल थोडी…?"
अगदी नाजुक घोगऱ्या आवाजात तिने त्याला विनंती केली.
सडपातळ बांधा, नाकी डोळी नीट, चेहऱ्यावर नेहमी एक स्मित हास्य. परिस्थिती बेताची पण राहणीमान अगदी टाप टीप. लांब बाह्यांचा फॉर्मल शर्ट त्याखाली स्कर्ट, नाजुक चष्मा, नीट बांधलेले केस, अस्खलित इंग्रजी भाषा. आदिष सोफ्टेकच्या प्रतिमेला रीप्रेझेंट करताना ती स्वतःला कुठेच कमी पडु देत नसे.
"मी ऑन ड्युटी काही खात नसतो मॅडम." शिवा
"मला कशाला मॅडम म्हणता." गौरी
"सॉरी मॅडम प्रोटोकॉल आहे." शिवा
"गौराक्का… कुठे बिरबलाची खिचडी शिजवत बसलाय. आता काय उभ्या उभ्या कोल्ड कॉफी करता का." परीतोष
गौरी नाराजीने हॉलमध्ये गेली. सर्वांना कॉफी देऊन तिथेच तोंड पाडुन बसली. तेवढ्यात ईश्वरीसुध्दा तिथे आली आणि कॉफी घेतली.
"रॉंग स्टेशन आहे तो गौरे. कुठे त्याच्या मागे लागते. क्रिमिनल आहे तो. ६ महिने जेल मध्ये होता. विजय काकांनीच तर सोडवलं त्याला." परीतोष
"खरंच का रे…! असं काय केलं होतं त्यांनी." गौरी
"ओहो त्यांनी sss… कुणास ठाऊक वरती पोहचवलं असेल कोणाला. कसा दिसतो बघ न तो. अंगावर जागा कमी इंज्युरीचे मार्क्स जास्त. अगदी शर्टं फाडुन दंड बाहेर येईल असा राकट तो आणि तु फुक मारली तर उडशील." आदिनाथ
"आपल्या ऑफिसमध्ये एकाहुन एक पॉलिशड् ऑप्शन्स आहेत. तू बस बोट ठेव उचलुन अणू आपण." परीतोष
"सगळे दुतोंडी लोक आहेत ऑफिसमध्ये आत एक बाहेर एक. शिवा किती साधे आहेत." गौरी
"साधा… अगं पोरीsss.. एका हातानी माणसाचा कोथळा बाहेर काढतो तो. कधीही वेसण न लागणारा वळु आहे तो. कोणत्या ॲंगल नी तुला साधा वाटतो." आदिनाथ
आदिनाथ आणि परीतोष एकमेकांना इशारे करत गौरीला चिडवत होते. त्यांचं बोलणं ऐकुन ती जरा घाबरलीच.
"कोणाकडे लक्ष देते तु गौरी… जस्ट इग्नोअर देम." अभिश्री
"हो बेटा… शिवासमोर आपण खुप सर्वसाधारण लोक आहोत. त्याच्यासारखं कोणीच नाही बनु शकत. तुलाही कळेल लवकरच." ईश्वरी
"थँक यु काकी.
चला निघते मी. हॉस्टेल बंद होईल." गौरी
"अगं थांब न मग आज इथे." ईश्वरी
"नको काकी शेड्युल बीचकते. या दोघांच्या आधी ऑफिसला नाही पोहचले की गोंधळ उडतो मग. हॉस्टेलवरुन जवळ पडते. नंतर कधी थांबेल." गौरी
"बघा तुम्हा दोघांपेक्षा जास्त सिंसियर आहे ती." अभिश्री
"ती तर आहेच. तु बघ स्वतःकडे. गावभर भांडत फिरते." परीतोष
"तुमचं भांडण चालु द्या. मी जरा बाबांशी बोलतो स्टडीमध्ये." आदिनाथ
अभिश्री परीतोषकडे बघत बोलली.
"आई मी अजिंक्यला (तिचा लहान पणी दिलेला घोडा) घेऊन जरा बाहेर ग्राउंडवर जाते."
परीतोष इकडे तिकडे बघत हळुच तिच्यामागे निघाला.
अभिश्रीने शिवाला जिप्सीची चावी दिली व गौरीला हॉस्टेलवर सोडण्यासाठी सांगितले.
सौरभच्या धमकीमुळे शिवाला अभीच्या सिक्युरिटी जास्त काळजी होती.
परीतोषने शिवाला "तु जा...मी आहे तिच्यासोबत असा इशारा केला."
गौरी जरा बिचकतंच शिवासोबत गेली. ती सुध्दा ऐकुन होती की शिवा आधी जेलमध्ये जाऊन आलाय. वडील गेल्यानंतर विजयसिंहांनी त्याला चांगल्या शिक्षणासाठी बोर्डिंग स्कूलमध्ये टाकले होते. पण पुढे काय झाले, तो कधी आणि का जेल मध्ये गेला…? तो वाईट असेल का…? पण काकी त्याच्या बद्दल किती छान बोलल्या…? त्याच्या सोबत काही वाईट झालं असेल का…? अश्या अनेक विचारांच्या गोंधळात ती त्याच्या सोबत निघाली.
अभिश्री तिच्या घोड्यावर बसली आणि परीतोष त्यांच्या बरोबर वॉक करत होता.
"सांभाळुन तुझ्या वजणानी खाली बसेल तो घोडा.
आधीच आपल्या उचापात्या कमी असतात का की हे मॅच मेकिंग चालु केलं. " परीतोष
"जस्ट शट अप. मी आता जाड नाहीये.
ते काय आहे न प्रेम असं लपुन छपुन मनात ठेवायचं नसते. म्हणुन माझे प्रयत्न असतात की कोणीतरी तर आपलं प्रेम व्यक्त करावं." अभिश्री
परीतोष थोडा चपचपला. विषय बदलत इलेक्शन बद्दल तिला बोलला. तिने तिच्या मनातील गोंधळ त्याला सांगितला.
"फर्स्ट ऑफ ऑल तु मुर्ख आहेस हे मान्य कर."
अभिश्रीने वैतागुन त्याच्याकडे बघितलं.
"आदिनाथ तुझ्यापेक्षा खुप हुशार आणि मॅच्युअर सुद्धा. माणुस आणि परिस्थितीची समज आहे त्याला. लोकांशी कसं बोलायचं हे जरी तुला बरं येत असेल तरी काय बोलायचं हे त्याला जास्त कळतं. सो ट्रस्ट हिम." परीतोष
परीतोषकडे बघताना तिची पापणी सुध्दा लवत नव्हती. तो मात्र कधीच तिच्याकडे बघुन बोलत नसे हे आजचं तिला कळलं.
'एवढे दिवस याचं बोलणं आपण किती उलट घेत होतो. सांगु का ह्याला मलाही तु खुप आवडतो… की आत्ताच मिठीत घेऊ.'
ती घोड्यावरुन उतरली आणि परीतोषला मागुन घट्ट मिठी मारली. ५-१० सेकंद दोघंही एकमेांच्या हृदयाचा आवाज अनुभवत होते. परीतोषने लगेच तिला बाजुला केलं.
"बस बस... एवढासा प्रोब्लेम झाला की लगेच सहानुभूती लागते लहान मुली सारखी. असं म्हणुन त्याने लगेच तिला बाजुला केलं." परीतोष
अभिश्रीला खुप राग आला.
"याचा नक्की प्रोब्लेम काय आहे…! का छळतो असा..! प्रेम करतो तर व्यक्त का नाही करत…!"
"चल नुसती बसु नको जॉगिंग कर जरा त्याने एंड्रोफिन हार्मोन तयार होतं. स्ट्रेस कमी होतो त्याने." परीतोष
"हो का…! मग ऑक्सीटोसिन हार्मोननी काय बिघडलं तुझ. तो पण रिलीज होऊ दे जरा." अभिश्री
"म्हणजे…?"
"गुगल आहे ना… कर सर्च… ( मनात - बावळट प्रेम करतो आणि लव्ह हार्मोन माहीत नाही)
दोघंही वॉक करत पुढे निघाले.
घरी आदिनाथ विजयसिंहाशी बोलण्यासाठी त्यांच्या स्टडीमध्ये गेला.
"सिगार आणलीस का रे माझी…" विजयसिंह
"आईचा खुप विश्वास आहे हो माझ्यावर. तिला कळलं की मी तुम्हाला हे सगळं आणुन देतो तर त्रास होईल तिला" आदिनाथ
"अरेsss... नाही समजणार तिल. आधी तो दळव्या (त्यांचा पी. ए.) आणुन द्यायचा पण आता तोही तुझ्या आईचा चमचा झालाय. आणि कळलंच काही तर मी घेईल सांभाळुन तेव्हा." विजयसिंह
"ह्ममम… राहू द्या.. तिच्यासमोर बोलता आलं असत तर लपुन कशाला पिली असती." आदिनाथ
"अरे बेटा…बायको अशीच असते त्यांनाही माहिती असतं मी घेतो कधी कधी. पण मी वहावत नको जायला म्हणुन त्या आपल्या धाकात ठेवतात. कळेल तुलाही लवकरच." विजयसिंह
"ह्ममम…"
विजयसिंहांनी सिगार पेटवली. माणसाचा चेहरा बघुनच ते समोरच्या व्यक्तीच्या मनातलं ओळखत.
"मग.. आज काय बहिणीची बाजु मांडण्यासाठी आलास वाटतं…!"
"तसं नाही बाबा. पण ती अजुन खुप लहान आहे आणि तिच्या महत्वकांक्षा अंदाधुंद आहेत." आदिनाथ
"तिचा स्वभाव इतरांसाठी आणि स्वतः तिच्या साठी सुध्दा घातक आहे." विजयसिंह
"एग्झॅक्टली म्हणुनच रणदिवे (सी.एम) काकांचं म्हणणं योग्य आहे. तुम्ही परत मंत्री पदासाठी होकार द्यावा. अभीला तुमच्या बळकट अधिकारांसोबत तिच्या वागण्यावर एक अंकुश ठेवणाऱ्याची जास्त गरज आहे."
"तिला तुझी सुध्दा तेवढीच गरज पडेल. तुला शक्य होईल राजकारणाशी संबंध ठेवायला…?"
"म्हणुन तर तुम्हाला म्हणत आहे. जोवर तिच्यामध्ये एक स्थिरता येत नाही तोवर तुम्ही तिच्या पाठीशी राहुन तिच्यावर वचक ठेवावा. राजकारण तर नाही पण ज्या वेळेस तिला माझी गरज असेल तेव्हा मी नक्कीच तिच्या बरोबर राहील."
"ठीक आहे. मी करेन विचार. तिचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मी तुझ्या जखमा परत ताज्या नाही होऊ देऊ शकत बेटा. माझा निर्णय काळवेळ मी."
"ओके बाबा."
परीतोष जेवण करुन त्याच्या घरी गेला. दुसऱ्या दिवशी वोटिंगचा दिवस होता. अभिश्री सकाळी ७ वाजताच तयार झाली. सर्वजण सहसा मधल्या ओपन चौकातच चहा घेत. सकाळी सकाळी झाडांना दिलेला पाण्याचा ओलावा. विविध प्रकारच्या पक्षांची चिव चिवाट. तिथे असलेल्या बऱ्याच फुल झाडं वेलींवर चिमणी, सुगरणी, बुलबुल, सुर्यपक्षी अशा पक्षांनी आपली घरटी बांधली होती. तिथे बसुन झालेली दिवसाची सुरुवात अगदी प्रसन्न आणि उत्साही वाटत. त्याचं निसर्गाच्या सानिध्यात चौकाच्या थोडं बाजुला मोठा देवारा होता. अभिश्रीने देवघरात जाऊन नमस्कार केला आणि आई वडिलांच्या पाया पाडली.
"यशस्वी भव… मग उद्या रिझल्ट असणार न… माझ्या अंदाजे तर जिंकनारच तू. उद्या मी आणखी एका निर्णयचा निकाल सांगणार. तुझ्या भाई तर्फे जी तु गळ घातली होती त्याबद्दल. तुझ्या राजकारणी वाटचालीत माझ्या सहभाग नक्की कसा असेल ते मी उद्या सांगेल. तुझ्या भविष्यासाठी मला आदीचा भूतकाळ विसरणे योग्य नाही राहणार." विजयसिंह
"यस्सस सर.."
अभिश्रीवर आता दुप्पट प्रेशर होतं. ती कॉलेजला पोहचली. दक्ष अजुनही आदिनाथच्या प्लॅन साठी तयार नव्हता. मॅनेजमेंट समोर सर्व सांगुन निहारला इलेक्शनमधुन बाहेर काढणे त्याला योग्य वाटत होते.
"लिसन यार अभी प्लीज… आपली ३ वर्षांची मेहनत पणाला लागली आहे. एका चुकीच्या डिसिजनमुळे ती धुळीत मिळायला नको." दक्ष
"तुझी काळजी समजतेय दक्ष मला पण एवढं ऐक माझं. कधी तू माझी बाजु घेतली नाहीस तर चालेल किंवा माझं तुला पटलं नाही तर ठीक आहे. पण भाई वर विश्वास ठेव. त्याच्या कडे एक वेगळाच सिकस्थ सेन्स आहे." अभिश्री
"ठीक आहे. चल.. ये इलेक्शन हमारे भाई के नाम…" दक्ष
१० वाजताच वोटिंगची गडबड सुरु झाली. एका मोठ्या हॉल मध्ये वोटिंगची व्यवस्था केली गेली होती. कॉलेजचा काही स्टाफ आणि सिक्युरिटी तिथे नेमण्यात आली होती. आज निहार सोबत पहिल्यांदाच सौरभ मोहितेसुध्दा आला होता. पण तो शांत होता. वोटिंग सुरु होताच सर्वांच्या मनाची धड धड वाढली. काही लोक हॉलच्या बाहेरच्या लांब लचक कॉरिडॉर मध्ये, तर काही पायऱ्यांवर बसुन होते.
सौरभने हळुच तिथुन काढता पाय घेतला. एका पिऊनला पकडलं आणि त्याचा ड्रेस घालुन स्वतः च्या एका माणसाला सौरभने चहाच्या बहाण्याने वोटिंग हॉलमध्ये पाठवलं. सौरभचा मानुस १५-२० मिनीटांनी बाहेर आला. सौरभला त्या माणसाने जाताना अंगठा वर करुन इशारा केला.
सौरभने कोणाला तरी फोन केला.
"वोटिंग मशीनमध्ये सेटिंग झाली आहे. आता कोणीही बटण दाबला की वोट आपल्यालाच पडणार."
त्या माणसाकडे नित्याचं लक्ष गेलं. तिला काहीतरी संशयास्पद वाटलं. तिने पटकन त्याचा फोटो घेतला. त्यानंतर सौरभ तिथुन निघुन गेला.
नित्या ने प्रिन्सिपल सरांना सर्व सिक्युरीटी चेक करण्याची रिक्वेस्ट केली. पण त्यांनी सर्व ठीक असल्याचं सांगितलं.
५ वाजता वोटिंग बंद झालं. सर्वजण उद्याच्या रिझल्टच्या टेन्शनमध्ये घरी पोहचले.
स्ट्रेस कमी करुन शांत झोपायचं म्हणजे परीतोषची डायरी हा छान उपाय होता. बेडवर लोळत तिने आधी वाचलेल्या पानाच्या मागचं पान ओपन केलं.
कितनी मासुम हो तुम…
मेरी आवाज सुन लड पडती हो..
कभी मेरी धडकन भी सुन लिया करो…
रो पडोगी…
नकारला साथ असते होकाराची…
दुराव्याला साथ असते सहवासाची…
तुझ्या माझ्या प्रेमाला साथ आहे आपल्या भांडणाची…
बस... अभिश्री तिथेच घायाळ.
दुसऱ्या दिवशी सकाळी अभिश्री बराच वेळ झोपुन होती. आदिनाथ ने इंटरकाॅमवर तिला कॉल केला.
"खाली ये लवकर.."
त्याचा आवाज थोडा चिडका वाटला. ती डायनिंगमध्ये येताच. आदिनाथने तिच्या समोर न्युजपेपर भिरकावला.
"हा काय प्रकार आहे अभीsss…
यासाठी मी बाबांना तुझ्या पाठीशी उभं राहा म्हणुन बोललो का…?
तुझे हे असले स्टंट किती महागात पडतात विसरली का…?
मागच्या वर्षी त्या सौरभ मोहिते सोबत जे केलं त्यामुळे शिवाला इथे बोलवावं लागलं. तो जिथे होता त्यातुन बाहेर काढण्यासाठी बाबांना इच्छा नसताना त्यांची पावर चुकीच्या पद्धतीने वापरावी लागली. तुझ्यासाठी…
आणि आता.. हा कसला गोंधळ घालुन ठेवलाय तु. पॉलिटिक्स म्हणजे मस्करी समजतेस का..?
मला वाटलं होतं की आम्ही सगळे मिळुन तुझा अवखड पणा कमी करु, बट नाही.
बाबाsss... मी स्वतः तुम्हाला म्हणत आहे. परत मंत्री पद तर घेऊ नकांच पण राजकारणातुनच संपुर्ण निवृत्ती घ्या. आता काही एक गरज नाही आपल्याला. इच्या अशा वागण्याला अजुन खत पाणी नको. कॉलेज पुर्ण करून तुझ्या आर्ट हब वर फोकस कर. राजकारण बंद…"
कुठल्याही परिस्थितीत एकदम शांत राहणा-या आदिनाथचं असं रुप आज पहिल्यांदाच सगळ्यांनी बघितलं होतं. त्यामुळे कोणीच काही बोललं नाही. अभिश्री खाली मान घालुन तिथेच उभी होती. आदिनाथ वैतागुन निघुन गेला.
"बेटा कुठलीही गोष्ट करण्याआधी थोडा विचार करत जा. अटलिस्ट योग्य त्या व्यक्तीचा सल्ला तरी… तुझ्यामुळे पेपरमध्ये आलेली ही न्युज म्हणजे रणशंख फुंकल्याचं प्रतीक ठरु शकते. पहिली चाल आपण खेळायला नको कधीच.
राजकारणात छोट्या छोट्या कारणांमुळे रणसंग्राम घडु शकतो."
विजयसिंह थोडे चिंतीत स्वरात बोलुन विचार कर निघुन गेले.
क्रमशः
( पुढील भाग गुरुवार दिनांक २२ )
न्युज पेपरमध्ये अशी कुठली बातमी होती ज्यामुळे आदिनाथ आणि विजयसिंह अभिश्रीला एवढं बोलले…? तिचा त्या न्युजशी काय संबंध होता…?
विजयसिंह खरोखर नाराज झाले असतील तर ते अभिश्रीला पुढच्या वाटचाली साठी पाठिंबा देतील का…?
शिवा जेलमध्ये गेला होता या गोष्टीमुळे गौरी त्याच्याबद्दल काय विचार करेल …?
१ वर्ष आधी सौरभ आणि अभि श्री मध्ये काय झालं होतं..?
जाणुन घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
कथेची लिंक शेअर करु शेअर करु शकता. आपल्या प्रामाणिक प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरुर कळवा.
(सदर कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. कथेतील पात्रांचा व घटनांचा वास्तविकतेशी काहीही संबंध आल्यास तो योगायोग असेल. राजकारणा विषयी संपुर्ण ज्ञान मिळवणे ही अत्यंत कठीण गोष्ट असल्याने त्यातील चुकांसाठी क्षमस्व.)
{ कथा २००४ पासुन सुरु झाली आहे असे ग्राह्य धरण्यात यावे.सध्या काळ पुढे सरकल्याने २०१४ सुरु झाले आहे.}
लेखन : रेवपुर्वा
