रणसंग्राम - एक झुंजार : भाग १५
मागील भागात -
गौरीला शिवाचा भुतकाळ काय असेल याची काळजी वाटतं होती. अभिश्री इलेक्शनच्या प्लॅन बाबतीत स्थिर नव्हती. परीतोशने तिला आदिनाथवर विश्वास ठेवण्यासाठी सांगितले. वोटिंगच्या दुसऱ्या दिवशी रिझल्ट आणि विजयसिंह अभिश्रीला कसा पाठिंबा देणार हे कळणार होत. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये आलेल्या बातमीमुळे आदिनाथ अभिश्रीवर चिडला व विजयसिंह काळजीत पडले.
---------------------------------------
बेटा कुठलीही गोष्ट करण्याआधी थोडा विचार करत जा. ॲटलिस्ट योग्य त्या व्यक्तीचा सल्ला तरी…
तुझ्यामुळे पेपरमध्ये आलेली ही न्युज जी म्हणजे साधी गोष्ट नाही. रांनशंख फुंकल्याचं प्रतीक ठरु शकते. पहिली चाल आपण खेळायला नको कधीच.
"भाई आणि बाबाच्या बोलण्याचं वाईट वाटुन घेऊ नको फक्त विचार कर."
ईश्वरीने अभिश्रीला चहा दिला आणि तिच्या कामासाठी निघुन गेली.
अभिश्रीने समोरचा पेपर उचलला त्यात पहिल्याच पानावर अर्ध पाण भरुन बातमी होती.
"आमदार मोहितेंच्या दारु फॅक्ट्रीवर रात्रीतुन पडली रेड"
"फॅक्टरी स्वतःची असण्याबद्दल त्यांचा साफ नकार"
आदल्या दिवशी अभिश्रीने नित्याच्या ओळखीच्या एका रिपोर्टर कडुन पोलिसांना टीप पाठवली होती. आमदार मोहितेंच्या फॅक्टरीमध्ये भेसळयुक्त दारु बनवल्या जाते. तिला कल्पना होती की फॅक्टरी मोहीतेंच्या नावावर नाही आणि पैसे खाऊ घालुन ते सुटतीलही. पण तिला सौरभने कॉलेजमध्ये केलेल्या गैरप्रकाराबद्दल त्याला धडा शिकवायचा होता. जेणे करुन सौरभ पुढे तिच्या वाटी जाणार नाही. पण आदिनाथ आणि विजयसिंह एवढे नाराज होतील तिला वाटलं नाही. त्याला कारणही तसंच होतं.
चहा पिता पिता तिला एक वर्ष आधीचा सौरभ सोबतचा किस्सा आठवला. अभिश्री, गौरी आणि तिची चौकडी एका पबमध्ये डान्स फ्लोअरवर आपल्याच नादात नाचत धुंद होते. सौरभ मोहिते अचानक त्यांच्यात घुसला. अभिश्रीला ते थोडं खटकलं पण तिने दुर्लक्ष करत त्यालाही ग्रुपमध्ये घेतलं. पण त्याने गौरीच्या जवळ जाण्यास सुरुवात केली. दारुच्या नशेमुळे तो हलत डुलत होता. ती जेवढी लांब जाऊन नाचत होती तो तेवढाच तिच्याशी लगट करत होता. शेवटी ती बाजुला सोफ्यावर जाऊन बसली. सौरभ परत तिच्या मागे गेला. अभीला आता ते सहन नाही झालं.
असेल मंत्र्याचा मुलगा म्हणुन कोणाला ही हात लावावं का…!
तो गौरीच्या जवळ पोहचताच अभिश्रीने बार काउंटरवर शोभेसाठी ठेवलेल्या कांच्या मुठीत उचलल्या. तिकडे जाऊन सौरभच्या रस्त्यात टाकल्या त्यामुळे तो घासरुन आडवा तिडवा खाली पडला. गौरी आणि आजुबाजुला सर्वजण हसत होते. तो चवताळुन गौरीच्या अंगावर धावुन गेला.
"कंपनीच्या मालकाच्या दोन्ही मुलांसोबत झोपते आणि मी हात लावला तर नखरे करते का तू…!
बोल किती पैसा पाहिजे मी देतो…?"
"मी माझ्या कष्टांनी कमावते. तुझ्यासारखी बापाच्या जीवावर नाही जगत." गौरी
हे ऐकुन त्याने गौरीवर हात उचलला. अभिश्रीने तिच्या खिशातुन लगेच एक छोटा चाकु काढला. त्याच्या हातावर अभी चाकु मरणारच की नशेमध्ये असल्याने पाय अडखळुन तो थोडा पुढे आला आणि चाकु सर्कन त्याच्या डोळ्यावर फिरला. त्याच्या डोळ्याला रक्ताची धार लागली. अभिश्री व तिच्या मित्रांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं व त्याच्या घरी कळवलं. मंत्री मोहिते त्या प्रकारामुळे खुप संतापले. खास पक्षाची मीटिंग मांडली व उघडपणे विजयसिंहाना धमकी दिली. तेव्हापासुन आदिनाथ आणि विजयसिंह तिच्या सुरक्षेची खास काळजी घेत.
-------------
चहा नाश्ता उरकुन अभिश्री तिच्या चौकडीला जिप्सीमध्ये घेऊन नेहमीच्या सिग्नल जवळ थांबली.
"अरे यार आपण यू टर्न घेऊन का थांबतो इथे…" जोसेफ
एक वयस्कर माणुस तिच्या गाडी जवळुन गेला आणि जाता जाता एक कागदाचा बोळा अभिश्रीच्या मांडीवर फेकला.
"त्या दिवशी त्या लंगड्या भिकाऱ्याला पैसे दिले. आज हा लंगडा माणुस काही तरी देऊन गेला. काय घोळ हा..?" जोसेफ
"तुझा पाय आत्ताच बरा झालाय न…! पुन्हा जर कोणाच्याही व्यंगाबद्दल काही बोलला तर तुझा तुटलेला पाय असा तोडेल की जन्मभर काडी घेऊन चालशील." हिमानिका
"सॉरी माते… ते स्टिकवाले आजोबा काय लव्ह लेटर देऊन गेले का..? असं म्हणायचं होतं." जोसेफ
"ह्ममन सांगेल नंतर." अभिश्री
१० वाजता सगळे कॉलेजला पोहचले. १२ वाजता निकाल होता. सौरभ आणि तो पिऊनच्या वेशातील त्याचा मित्र सुध्दा त्याच्या बरोबर होता.
१२ वाजेपर्यंत जवळपास संपुर्ण कॉलेजनी ग्राउंडवर हजेरी लावली होती आणि लक्ष होतं ते फक्त स्पीकर मधुन येणाऱ्या अनाउन्समेंट कडे.
विद्याभावन २०१४ च्या इलेक्शनमध्ये दरवर्षी प्रमाणे nkp युवा पक्ष ६००० मतांनी निवडुन आला आहे.
संपुर्ण कॉलेज अभिश्रीच्या नावाने दणाणुन गेला. निकाल घोषित होताच ढोल पथकाचा जल्लोष सुरु झाला. कट्टा गँगने मनसोक्त पणे ढोल, लेझिम वाजवत आपला विजय साजरा केला. अभिश्री घरी कळवण्यासाठी म्हणुन थोडं पलीकडे पायरीवर बसुन फोनवर बोलत होती. सौरभ तिथेच उभा होता. त्याने रागाच्या भारत स्टँडवर ठेवलेला ढोल जोरात लात मारुन खाली पडला. तो ढोल पायऱ्यांनी घरंगळत अभीकडे येत होता पण ती फोनवर बोलण्यात गुंग होती. तिच्या लक्षात येईपर्यंत ढोल अगदी ३-४ फुटांवर येऊन पोहचला. बस आता तो तिच्या अंगावर कोसळणारंच की तिच्यासमोर कोणीतरी उभं राहीलं. सुसाट धावत येणारा तो ढोल त्याने एका हाताने धरुन ठेवला होता. सर्वजण तिच्याकडे धावत पोहचले पण ती व्यक्ती तिथुन लगेच निघुन गेली.
"ए सिग्नलवरचे स्टिकवाले आजोबा…!
ते इथे कसकाय आले…?" जोसेफ
"त्यांनी एवढ्या वेगात येणारा ढोल एका हातानी कसा थांबवला…? आणि त्यांनी सिग्नलवर तुला त्या चिठ्ठीमध्ये नक्की काय दिलं." दक्ष
"ही व्यक्ती म्हणजे माझी सावली आहे. ती आहे तोवर संकट माझ्या केसालाही धक्का लाऊ शकत नाही." अभिश्री
"अरे पण ते आहे कोण..?" नित्या
"वेळ आली तर कळेलच तुम्हाला. त्यांना बाहेर येण्याची वेळ यावीही नाही… काही गोष्टी लपुन राहणे हेच आपल्याला सुरक्षित ठेवतं." अभिश्री
"अभी तुझ्या गोष्टी कधी कधी डोक्यावरुन जातात." जोसेफ
समोरुन सौरभ तिथे आला. अभिश्रीमुळे त्याच्या डोळ्यालाजो चाकु लागला होता त्यामुळे त्याचा तो डोळा निकामी झाला होता व त्या जागी काचेचा डोळा बसवला होता. आधीच धिप्पाड आणि राकट असलेला सौरभ त्या पांढरट धूसर बुबुळामुळे आणखीनंच विकृत दिसत होता.
"तुला काय वाटलं आम्हाला काही समजत नाही का…! इलेक्शनच्या ८ दिवस आधी तुम्ही लोकांनी काय काय केलं ते…!
जिंकण्यासाठी मुलांचे प्रायव्हेट मेसेज हॅक करुन त्यांना धमक्या दिल्या… लाज नाही वाटत का तुला…?
आदिनाथचा प्लॅन सौरभच्या बराच उशीरा लक्षात आला. आदिनाथच्या सांगण्या नुसार त्यांना लोकांच्या इमोशन्सचा वापर करायचा होता. एवढ्या वर्षातील त्यांनी केलेली चांगली कामं लक्षात ठेवणाऱ्या लोकांनी अर्थात त्याच भावनेने मत दिले. इतर ज्या लोकांना सौरभ मोहिते ने दारु, पैसे दिले होते त्या लोकांच्या भीती या इमोशनचा वापर करुन त्यांनी घेतलेल्या पैस्या बद्दल, दारु, अमली पदार्थ यासाठी काय शिक्षा होऊ शकते किंवा त्यांच्या घरी काय ॲक्शन घेतली जाऊ शकते अशे थ्रेटनिंग मेसेजेस त्यांनी अज्ञात नंबर्स वरुन पाठवले. त्यासोबत सौरभ मोहितेच्या बरोबर त्यांचे संबंध सिध्द झाले तर त्याच्या अवैध धंद्यांमध्ये ते मुल गोवले जाऊ शकतात अशीही भीती दाखवली. त्यामुळे त्याचे जवळपास ६०% लोक अभिश्रीच्या गँगनी फोडले होते.
"आणि तु केलेला बाळबोध पणा न समजण्या एवढे दुधखुळे आहे का आम्ही." परीतोष
"तुझा इथे काय संबंध. तु इथे कशाला नाक खुपसत आहे." सौरभ
"आदिषची सिक्युरिटी हॅक करण्याएवढी लायकी तरी आहे का तुझी..!" परीतोष
"कोण..? काय… ?"
सौरभ सिस्टीममध्ये काही तरी गडबड करु शकतो याचा अंदाज परीतोषला आधीच होता. त्यामुळे त्याने आदल्या दिवशीच संपुर्ण सिस्टीम बदलुन अभेद्य अशी सायबर सिक्युरिटी डिझाईन करुन घेतली होती. परीतोषने सौरभला त्या पिऊनच्या वेशातील मुलाचा सीसीटीव्ही फुटेज दाखवला जेव्हा तो वोटिंग सिस्टीम हॅक करण्याचा प्रयत्न करत होतं. जर तुझ्या दारु फॅक्टरीचं रेड प्रकरण तु उचलुन घेतलं तर तुझे हे फुटेज कशे वापरायचे ते आम्ही बघु." परीतोष
सौरभने काढता पाय घेतला.
"किती दिवस लोकांच्या कुबड्या घेऊन चालशील कधीतरी हातात येशील तेव्हा सगळा हिशोब चुकता करेल. तुझ्या चिरकुट रेडमुळे मला काही फरक पडत नाही. पण तुला ते जन्मभर पुरेल." सौरभ
"ऑल द बेस्ट." अभिश्री
सर्वजण आता निश्चिंतपने गप्पा मारत कॅम्पसमध्ये फिरत होते.
अभिश्री एका बेंचवर जाऊन बसली.
"उनाडक्या करुन झाल्या असतील तर पुस्तक उघड जरा. नाहीतरी प्रिन्सिपल सर खिशातच आहेत आपल्या, वरपास करुन देतील आरामात.
आतातरी भानगडी निपटल्या की अजुन कांड करायचे बाकी आहेत…" परीतोष
"भाई आणि बाबा बोलले. आता तुझंही लेक्चर ऐकु का…?अशा लोकांच्या वाटी जाऊ नको एन ऑल.." अभिश्री
"हम्मम...कुत्री जेव्हा पिसळतात तेव्हा दोनच मार्ग असतात. एक तर ते असतात त्या मार्गाने जायचं नाही. जे आम्ही करतो."
"आणि दुसरं…?"
"त्यांच्या मुसक्या आवळुन त्यांना बांधुन ठेवणे आणि वेळ आली तर…"
परीतोषने दोन बोटांची बंदुक केली आणि तिच्या कपाळावर ठेऊन गोळी चालवण्याचा इशारा करत तिथुन निघुन गेला.
पारीतोषच्या त्या अनपेक्षित आधाराने तिचं मनोबल वाढलं. आपल्याला खरोखर समजुन साथ देणारा जोडीदार म्हणुन तो तिच्या मनात घर करत होता.
संध्याकाळी घरी आल्यावर सर्वांनी तिचं जंगी स्वागत केलं. विजयसिंहांचे संपुर्ण कार्यकर्ते, जवळ दुरचे लोक अभिश्रीचं अभिनंदन करण्यासाठी आले होते.
"आई एवढं कौतुक कशाला..?
कॉलेजचं इलेक्शनतर होतं."
"बाळा हे फक्त कौतुक नाहीये. आता पासुन तुझं खऱ्या अर्थानी राजकारणात पदार्पण होईल त्याच स्वागत आहे. विजयसिंहांच भावी प्रतिबिंब बघण्यासाठी आलेत ते." ईश्वरी
अभिश्रीला आता फार मोठ्या जबाबदारीची जाणिव झाली होती.
चहा नाश्ता करुन कार्यकर्ते घरी परतले. तसं ती सर्व कार्यकर्त्यांना ओळखत होतीच पण आता तिला त्यांच्यात सामील व्हायचं होतं.
रात्री जेवणानंतर हॉलमध्ये आणखी एक निकाल जाहीर होणार होता.
अभिश्रीला उद्देशुन विजयसिंह बोलले.
आमच्यासाठी तुमच्या दोघांच्याही भावना एकसारख्या आहेत. आदीचं मन दुखावुन आम्ही तुझी साथ देऊ शकत नाही हे खरं असलं तरी तुझी स्वप्नही आम्ही मोडु देणार नाही.
यासाठी सुवर्णमध्य काढण्याचं मी आणि इश्र्वरींनी प्रयत्न केला आहे. तुला पाठिंबा देण्यासाठी मला मंत्रीपद घेण्याची तशी अवश्यकता मला वाटत नाही पण रणदिवेंच्या इच्छेचा मान म्हणुन मी यंदा मंत्रीपद स्वीकारेल. पण फक्त तुला पाठबळ म्हणुनच त्यात माझा कुठलाही सक्रिय भाग नसेल. तुला जेव्हा जेव्हा आमच्या सल्ल्याची माझ्या पदाच्या ताकदीची गरज पडेल मी देईल. परंतु त्यामध्ये खेळले जाणारे डावपेच, षडयंत्र, यात आमचा कुठलही सहभाग नसेल. आता त्या गोष्टी बघण्याची हिम्मत नाही राहिली आमच्यात.
आणि होsss.. तुला या सर्व गोष्टींचा जो काही वापर करुन घ्यायचा आहे तो ह्याच ५ वर्षात. त्यानंतर मी राजकारणातून संपुर्णपणे निवृत्त होणार, अमदारकीतुन सुध्दा. एक सामान्य माणुस म्हणुन खुप वर्षांची जगायची इच्छा आहे माझी.
अर्थात त्यासाठी आधी निवडुन यावं लागेल. नाहीतर बाजारात तुरी… व्हायचं.
मगsss... करशील न माझ्या प्रचाराची तयारी. तुमच्या टेक्नो पद्धतीने …" विजयसिंह
"अफकोर्स बाबा…
तुला त्रास होईल अशी मदत मी कधीच मागणार नाही."
"त्यापेक्षा त्यांना त्रास होईल अशा उचपत्या कमी झाल्या तर तशा मदतीची गरजही भासणार नाही." आदिनाथ
"अभिश्रीने तिचे. कान धरले
सॉरी न भाईsss… प्लीsssज…माफ नाही करणार मला." अभिश्री
"एवढा गोड चेहरा केल्यानंतर तुझ्यावर नाराज राहणं जमणार आहे का मला…?
आणि हो नाराजी गेली असली तरी या सर्वात माझ्या सहभागाची कसलीही अपेक्षा ठेवायची नाही." आदिनाथ
ती हळुच तोंडातल्या तोंडात बोलली.
"ते मी वेळ आली की मिळवुन घेईल बरोबर."
"व्हॉट .."
"नाथिंग भाई… आय लव्ह यू…"
"आणि हो शेवटची गोष्ट. तुझ्या फायनल इयरच्या एक्झॅमसाठी काही महिनेच उरलेत. ती उरकेपर्यंत नो राजकारण." विजयसिंह
"ओके बॉस…" अभिश्री
अभिश्री आणि कट्टा गँग जोमाने अभ्यासाला लागले. महिन्याभरात अभिश्रीचा वाढदिवस आला. नेहमी प्रमाणे आदल्या दिवशी पुजा झाली आणि दुसऱ्या दिवशी वाढदिवसाची मोठी पार्टी.
संध्याकाळ व्हायची होती. आमंत्रित लोक येणं अजुन पुर्ण सुरु झालं नव्हतं.
पी. ए. दळवी विजय सिंहांच्या कानात कुजबुजले.
"संपतरावांचे खास माणसं पार्टीमध्ये आलेत."
"आमंत्रण तर आपण दरवर्शी देतोच पण १० वर्षात पहिल्यांदाच त्यांच्याकडुन कोणीतरी आलंय." विजयसिंह
"असो त्यांच्या पाहुणचार कडे लक्ष ठेवायला सांगा. संपत रावा विषयी आपल्या मनात कधीच कुठला मळभ नव्हता आणि नाही." विजयसिंह
अभिश्री आणि तिची चौकडी गप्पा मारत बसली होती. अचानक मास्क घातलेला एक इसम अभिश्रीच्या अगदी समोर येऊन ऊभा राहिला.
त्याने खिशातुन एक बंदुक काढली आणि तीच्यावर ताणली.
क्रमशः
(पुढील भाग शनिवार दिनांक २४)
अभिश्रीवर बंदुक तणनारा तो इसम कोण असेल…?
संपतरावांच्या खास माणसांचा तिथे येण्यामागे काय हेतु असेल…?
जाणुन घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
कथा शेअर करताना नावासह शेअर करावी. आपल्या प्रामाणिक प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरुर कळवा.
(सदर कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. कथेतील पात्रांचा व घटनांचा वास्तविकतेशी काहीही संबंध आल्यास तो योगायोग असेल. राजकारणा विषयी संपुर्ण ज्ञान मिळवणे ही अत्यंत कठीण गोष्ट असल्याने त्यातील चुकांसाठी क्षमस्व.)
{ कथा २००४ पासुन सुरु झाली आहे असे ग्राह्य धरण्यात यावे.सध्या काळ १० वर्ष पुढे सरकल्याने २०१४ सुरु झाले आहे.}
लेखन : रेवपुर्वा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा