रणसंग्राम - एक झुंजार : भाग १६
रणसंग्राम - एक झुंजार : भाग १५
मागील भागात -
अभिश्रीची युवा NKP पार्टी अखेर इलेक्शन जिंकली. घरी सर्वांनी तिचं कौतुक केलं. विजयसिंहांनी तिला पुढील ५ वर्ष पाठिंबा देण्याचं निश्चित केलं आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सांगितलं. कट्टा गँगचा अभ्यास जोमाने सुरु झाला. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पार्टी आयोजित केली गेली व तिथे एक मास्क घातलेला अज्ञात इसम अभिश्री समोर गन घेऊन उभा राहिला.
--------------------------------
पी. ए. दळवी विजय सिंहांच्या कानात कुजबुजले.
"संपतरावांची खास माणसं पार्टीमध्ये आलीत."
"आमंत्रण तर आपण दर वर्षी देतोच. पण मागच्या १० वर्षात पहिल्यांदाच त्यांच्या कडुन कोणीतरी आलंय.
"असो त्यांच्या पाहुणचाराकडे लक्ष ठेवायला सांगा. संपतरावांविषयी आपल्या मनात कधीच कुठला मळभ नव्हता आणि नाही." विजयसिंह
अभिश्री आणि तिची चौकडी गप्पा मारत बसली होती. अचानक मास्क घातलेला एक इसम अभिश्रीच्या अगदी समोर येऊन ऊभा राहिला.
त्याने खिशातुन एक बंदुक काढली आणि तीच्यावर ताणली.
अभिश्रीने त्याच्या डोळ्यात बघितले. तो माणुस बंदुक चालवणार तेवढ्यात त्याला शिवाने मागुन पकडले आणि गन असलेला हात मुरगळून त्याला खाली उबडं पडलं. त्या माणसाने ओरडणं सुरु केलं
"आ sss… अभी सेव्ह मी…आ sss… मेलो मेलो…!"
"हार्दिक…"
सर्व जण एकदाच ओरडले आणि पोट धरुन हसायला लागले.
"अबे…मेला असता न भावा…!" दक्ष
दक्ष ने हार्दिकला हात देऊन उभं राहण्यासाठी मदत केली.
"एक्स्ट्रिमली सॉरी सर…" शिवा
"अरे..वाह तुला बोलताही येतं..
आई ग… हाडं खिळखिळी झाली यार अभी..
मी. अर्नॉल्ड तुम्ही समोर असताना प्रँक तर काय छुटकुला पण नाही सांगणार " हार्दिक
"सॉरी सर… प्लीज…" शिवा
"कुठे त्याला सॉरी म्हणतो… मस्त जिरली एका माणसाची… आता सांभाळुन पंगे घेत जा.." अभिश्री
"चल.. एक पेग लागाते है सब ठीक हो जायेगा." जोसेफ
"जो sss…. तू पेताड आहेस त्यांना नको पाजु आता…" नित्या
"हॅलो ss.. चढली का तुला..! हार्दिक भाई है अपना." जोसेफ
"हार्दिक लक्ष्मीकांत रणदिवे आहेत ते." नित्या
"ओयेsss.. नित्या.. व्हॉट यार.." हार्दिक
"सॉरी सर… " नित्या
जोसेफ, दक्ष, हिमानीका थोडे वरमले. सी. एम.च्या मुलासोबत ते अगदी आपल्यासारखंच वागले.
पण तो तर हार्दिक होता..
सर्वांना आपल्या विनम्र आणि चार्मिंग. स्वभावाने परत आपलंसं करुन घेतलं.
हळु हळु लोकांची चहल पहल सुरु झाली. आदिनाथ सोडुन इतर सर्वांचे वाढदिवस, ॲनिवर्सरी हे मोठी पार्टी आयोजित करुन साजरे होत. कारण सहसा कुठल्याही समारंभाचा मुख्य उद्देश हा राजकीय संबंध जोपासणे हाच होता. अभिश्रीची बर्थ डे पार्टी सुध्दा त्याला अपवाद नव्हती. त्यात यंदाची पार्टी तर खासंच होती. विजयसिंहांनी यावेळेस त्यांच्या सर्व दूर जवळच्या, स्वतः च्या व इतर पक्षातील राजकारणी लोकांना तसच विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित केलं होतं. उपस्थित सर्व लोकांसमोर विजयसिंहांनी घोषणा केली की नेहमीप्रमाणे जर या वर्षी सुध्दा आई भवानीच्या कृपेने त्यांची NKP पार्टी सत्तेत आली आणि आपल्या लोकांची साथ मिळाली तर ते शिक्षण मंत्री पद परत स्वीकारतील.
त्यासोबतच NKP युवा पार्टी त्यांच्या प्रचारापासुन निवडणुक व पुढेही सर्व योजना राबिण्यात सहभागी असेल. अर्थात या गोष्टीचा अर्थ सर्वानाच कळला होता. विजयसिंह आता त्यांच्या मुलीसाठी राजकारणी प्रवेशाचा पाया रचत आहेत. जेवताना जवळपास सर्व लोकांमध्ये हाच चर्चेचा विषय होता.
नित्या आणि हिमानीका कोण काय बोलत आहे याचा कानोसा घेत होत्या. दक्षने त्याच्या अवती भोवती मुलींचा गर्हाडा करुन ठेवला होता. तो बोलायला लागला की मुली हुरळून जात. तोच गर्हाडा हॉल भर फिरवत तो सुध्दा लोकांच्या बोलण्याचा कानोसा घेत होता. एकच वेळी कमीत कमी ४-५ कामं तो सहज करत.
विजयसिंहांच्या घोषणेबद्दल बरेच पक्षातील, पक्षांतर लोकांमध्ये सकारात्मक, नकारात्मक चर्चा होत्या.
"वय कमी असलं तरी मुलीत स्पार्क आहे. विजयसिंहाच्या मार्गदर्शनातून नक्कीच पुढे जाईल."
"वय झालं तरी यांचा खुर्चीचा मोह काही सुटत नाही."
"साहेब जुने दिवस नवीन चकाकी घेऊन परत येतील."
"ही तर निव्वळ वंश परंपरा."
"नवीन पिढीला खरंच संधी मिळायला हवी."
"२१ वर्षांची पोर… काय दिवे लावणार…!"
अशा काई बाई गोष्टी त्यांच्या कानावर आल्या. लोकांची गर्दी ओसरत आली होती.
संपतरावांची खास माणसं जी सर्वात आधी आली होती ती आता निघण्यात होती.
"अप्पांचं वय झालय.. हल्ली बाहेर निघत नाहीत ते. त्यामुळे स्वतः नाही येऊ शकले. पण त्यांनी हा बुके आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे. असा निरोप देऊन ते निघाले."
विजयसिंह आणि अभिश्रीने तो बुके आणि शुभेच्छांचा सन्मानानी स्वीकार केला.
मुलगा चिरागच्या मृत्यु नंतर संपतरावांनी SBP पार्टीचं अध्यक्षपद सोडुन राजकारणातुन निवृत्ती घेतली असली तरी आजही पक्षात आणि बाहेर ही त्यांना व त्यांच्या शब्दाला मान होता.
आता घरच्या आणि जवळच्या लोकांची जेवणं सुरु होती. परीतोषने आणलेलं एक छोटंसं गिफ्ट हळुच इतर गिफ्टमध्ये मिसळुन ठेऊन दिलं. अभिश्री त्याच्याजवळ गेली.
"गिफ्ट मिळालं.." अभिश्री
"व्हॉट…?? मी कसलं गिफ्ट नाही दिलं. आजपर्यंत कधी दिलंय का.." परीतोष
"अरे तू नाही.. मी… तुझ्या क्लायंटनी जी स्कल्पचरची ऑर्डर दिली होती.. ती सकाळी तुमच्या गोडाऊनला पाठवली. त्यात एक काॅंप्लीमेंट्री गिफ्ट होतं. हार्ट शेपचा आकार केलेले स्टोनचे दोन हात आणि आतमध्ये ग्लासची पृथ्वी.
परीतोषच्या मनातील भावना तिला ज्या दिवशी कळल्या त्याच दिवशी त्याच्या धुंदीत तिने ते गिफ्ट बनवलं होतं. त्याला खगोल शास्त्राची आवड असल्याने तिने तसं कार्व्ह केलं होतं.
"ह्ममम… असेल मिळालं त्यांना." परीतोष
"परीतोष निघुन गेल्यानंतर तिने त्याच गिफ्ट बघितलं. एक लव्ह स्टोरीचं पुस्तक होतं. ते आणि त्यामध्ये संपुर्णपणे जाळी झालेलं पिंपळाच पान. ज्यावर अभिश्रीचा चेहरा प्रिंट करुन घेतला होता. खाली एक नोट
"तुझ्या नवीन आयुष्यासाठी खुप शुभेच्छा…"
जेवण आटोपुन, उर्वरित लोकांना निरोप देऊन सगळे घरी परतले.
विजयसिंहांना शब्द दिल्याप्रमाणे अभिश्रीने संपुर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं होतं. पुढचे २ महिने कट्टा गँगने मन लाऊन अभ्यास केला.
एक एक करत सर्वांच्या परीक्षा संपल्या. अभिश्री - फाईन आर्ट, नित्या - मास मीडिया, हिमानीका - एम. कॉम., दक्ष - एम. बी. ए. मार्केटिंग, जोसेफचं तन मन धन हे कंप्युटर होतं त्याला त्यात शिक्षण घेण्यात काही आवड नव्हती तरी एक डिप्लोमा कोर्स सर्वांनी त्याच्या माथी मारला.
परीक्षेनंतर सर्व निवांत झाले होते. आता त्यांच्यात विजयसिंहांच्या प्रचाराचे किडे वळवळणं सुरु झालं होतं. तोच हार्दिकचा एकाच वेळी सर्वांच्या मोबाईलवर मेसेज आला.
"कम्पल्सरी इंविटेशन फॉर पार्टी इन गोवा ॲट अवर प्रायव्हेट याॅट."
सगळे आश्चर्य चकित झाले होते. हार्दिकला फोन करुन कारण विचारल्यावर त्याने सरप्राइज असं सांगितलं.
पुढल्या आठवड्यात पुण्यातून जाताना बाय रोड जायचं ठरलं. घरची थोडं संकोचतंच परवानगी दिली.
सकाळी ६ वाजता अभिश्री, तिची चौकडी, आदिनाथ, परीतोष, भार्गवी, गौरी आणि शिवा (यावेळी नॉट ऑन ड्युटी) एक जिप्सी आणि २ रेंज रोव्हर घेऊन निघाले.
प्रवासात अभिश्री कसंही करुन परीतोषला स्वतःच्या जिप्सीमध्ये आणण्याचा प्रयत्न करत होती. पण तो असं उघड्या गाडीमध्ये येण्यासाठी नकार देत होता. रोज रोज त्याच्या डायरीतील कविता वाचुन आता तिला स्वतः ला अवरणे कठीण जात होते. या ट्रिपमध्ये परीतोषची कबुली घेऊनच परत जायचं असा तिने निष्चयच केला होता. त्यासाठी जोसेफनी एक फिल्मी तिला फंडा सांगितला. हार्दिकच्या जवळ जवळ जाऊन परीतोषला जळवायंच. अभिश्रीला तो पांचट वाटत होता पण इलाज नव्हता. यॉटवर जाण्या आधी २ दिवस गोव्यात फिरण्याचा त्यांचा प्लॅन होता. यावेळेस ऑफिशियल सिक्युरिटी सी.एम कडुन असल्याने शिवा थोडासा का होईना मिसळुन वागत होता. तरीही त्याचं लक्ष सर्वांच्या सुरक्षेकडे लागुन होतंच.
अभिश्रीने गौरीला सुध्दा पिन मारली. शिवाकडे बघुन ती म्हटली
"गौरे यावेळेस काम फत्ते झालंच पाहिजे. विश्वामित्राची तपस्या भंग करण्यासाठी असा चांस परत मिळणार नाही.
अभिश्रीला स्वतःच आणि गौरीचं टार्गेट पुर्ण करायचं होतं.
तिचं ऐकुन गौरीला पण हुरुप आला. एरवी बिझनेस मीटिंगसाठी ती आदिनाथ आणि परीतोषची असिस्टंट म्हणुन गोव्यात ३-४ वेळ येऊन गेली पण सुट्टी म्हणुन पहिल्यांदाच निश्चिंतपने गोवा एन्जॉय करणार होती.
गोव्यात येण्याचं प्रत्येकाचं आपापला एक वेगळं प्रयोजन तयार झालं होतं. कोणी प्रेमाच्या, कोणी दारुच्या तर कोणी स्वच्छंदपनाच्या नशेत दंग होण्यासाठी आलं होतं. पण हार्दिकचं सरप्राइज काय प्रयोजन होतं हे त्यांनी कोणालाच सांगितलं नव्हतं.
साधारण ५ च्या सुमारास ते लोक वाघा बीच जवळील सी हॉर्स रिसॉर्टमध्ये उतरले.
वाघा बीच हे रात्रभर नाच, गाणी, विविध मनोरंजक कला, प्रदर्शनासाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्यातील काही लोक रात्री बीचवर भेटु म्हणुन आराम करण्यासाठी रिसॉर्टवर थांबले. बाकी लोक लागुनच असलेल्या कलिंगुट बीचवर फेरफटका मारण्यासाठी निघाले. आदिनाथबद्दल सगळ्यांना माहिती असल्याने तो बिंदास्त शांभवीला फोनवर रोमँटिक वातावरणाची कॉमेंट्री देत एकटाच फिरत होता. भार्गवी तिच्या mbbsचे ऑडिओ बुक ऐकत फिरत होती. अभिश्री हार्दिक बरोबर सलगी करत मुद्दाम परीतोषच्या समोर समोर येत होती. पण तो दक्षच्या बोलण्यात गुंतुन होता. दक्षला mba नंतर आदिष जॉईन करायचं होतं. आदिनाथ आणि परीतोषला सुध्दा त्याचा चार्म आवडत होता. मार्केटिंगमध्ये त्याचा कोणी हात धरेल तर शप्पथ. हार्दिकला सुध्दा त्यांच्या बोलण्यात इंटरेस्ट येत होता. त्याची फिल्ड नसुन सुध्दा तो मुद्देशिर बोलत होता. अभिश्री पाण्यात जाऊन हार्दिक आणि परीतोषवर उडवत होती.
"बावळट मुलगी… तुला खेळायचं तर खेळ आम्हाला कशाला भिजवते. काही महत्त्वाचं सुरु आहे आमचं. थिल्लरपणा नाही."
अभिश्रीला खुप राग येत होता. हा जेलस का होत नाहीये.
तिकडे शिवा झपाझप पाऊल टाकत बीचच्या पार टोकाला पोहचला होता. त्याच्यामागे धावत गौरीची दमछाक होत होती. तिने आयडिया करुन शिवाला फोन केला आणि रस्ता हरवली असं सांगितलं. तिचा नंबर ट्रॅक करुन शिवाने तिला शोधलं आणि दोघंही चालत निघाले. थंड वारा, अथांग समुद्र, लाटांचा पायाला होणारा अलगद स्पर्श. अश्या धुंद वातावरणात प्रेमापासुन वाचायचं कसं. शिवा हाताची घडी घालुन तठस्तपणे समोर बघत चालत होता गौरी त्याच्याकडे बघत त्याच्या प्रेमात वहावत होती.
रात्री सर्व वाघा बीचवर जमले. आदिनाथने गिटार घेऊन गोवन फोक साँग गात होता. बाजुला मोबाईल स्पीकरवर कनेक्ट करुन शांभवी डुएटमध्ये गात होती. दोघांचाही आवाज सर्वांना मंत्रमुग्ध करत होता. धुंद होऊन बोनफायर भोवती सर्व गोवन फोक डान्स करत होते. अभिश्रीने मुद्दाम खास गोव्यातील दोऱ्या दोऱ्यांचा शॉर्ट स्कर्ट आणि क्रॉप टॉप घातला होता. हार्दिकची नजर तिच्यावरुन हातात नव्हती. अभिश्रीला त्या रोमॅंटिक वातावरणात परीतोषची साथ हवी हवीशी वाटत होती.
दुसऱ्या दिवशी त्यांनी बॅसिलिका चर्चमध्ये ठेवलेली मम्मी बघितली जीचे केस आणि नख आजही वाढत असतात. नंतर अघोडा फोर्टवर सर्वांनी दिलं चाहता है स्टाईलमध्ये फोटो काढले.
संध्याकाळी गोव्याबाहेरील एका बीचवर सर्व जमले. समोर ३०० फीट लांब ३० फीट उंच अशी आलिशान याॅट जणु एक पाण्यावर तरंगणारा बंगलाच.
"भार्गवी मॅडम तुमच्या पुस्तकांच्या बॅग बाहेरच ठेवा याॅटचा टायटॅनिक होईल नाहीतर…" हार्दिक
"हो का..! तशी वेळ आलीच तर आधी तुमच्या दारुच्या बॉटल फेकु पाण्यात. तसही स्लो पाॅयझन असतं ते." भार्गवी
"हॅलो.. अमृत आहे ते." जोसेफ
"कॉलेजला ये दाखवते तुझ्या अमृतानी सडलेला लीवर." भार्गवी
याॅट त्यांना समुद्रात थोडं आत घेऊन संथ पने चालत होती.
आतुन ती याॅट एका स्टार हॉटेल सारखी होती. रात्री सर्व तिथे जमले. अभिश्रीला काहीही करुन आज परिरोषची कबुली हवी होती, त्याचं लक्ष स्वतःकडे खेचायच होतं. तिने एक रॉक म्युझिक लावुन हार्दिक सोबत डान्स, सुरु केला. पण लक्ष सगळं परीतोषकडे. सारखे गाणे बदलत ती हार्दिकच्या आणखी जवळ जात होती आणि अचानक तिने त्याला मिठी मारली.
तो घाबरला आणि तिच्या पायावर लोटांगण घातलं.
"माते माफ कर मला.. तुला हवं ते त्याला बोल बाई.. बॉक्सिंग चॅम्पियन आहे तो परीरोष... पंचींग बॅग बनवेल माझी. दोन दिवस झाले जीव मुठीत घेऊन नाटक करत आहे." हार्दिक
"परीतोष ते बघुन जोरजोरात हसत होता.
अभिश्रीचा पारा १००च्या वर गेला. तिने जार मधील पाणी परीतोषच्या डोक्यावर ओतलं आणि बाहेर निघुन गेली.
सर्वांना त्यांचं भांडण नवीन नव्हतं. म्हणुन त्यांनी दुर्लक्ष केलं.
परीतोष सुध्दा तीच्या मागे गेला. ती रेलिंगला टेकुन उभी होती. मागे समुद्र होता.
"व्हॉट द हेलं अभी.. लहान आहेस का तु…" परीतोष
"तू खुप मोठा आहेस न… मग का त्रास देत आहे. मला इग्नोर का करतो. सारखं टोचुन बोलतो. खरंच तुझ्या मनात हेच असतं का..?
"मग काय तुझं कौतुक करत बसु…! बाकीचे करतात तसं.
"ग्रो अप अभी… बाळासारखं कोणी तुला सतत लॉलीपॉप नाही देणार. ॲक्सेप्ट द फॅक्ट..
समजते तेवढी हुषार आणि दाखवते तेवढी समाजसेवी नाही तु." परीतोष
"ओह.. तू ही ॲक्सेप्ट कर मग तुझ्या मनातल्या गोष्टी."
"व्हॉट.."
"तुला मी बिलकुल आवडतं नाही न..!" अभिश्री
"तुझाय आहे काय असं..!" परीतोष
"फाईन.. इफ यू डोन्ट लाईक मी, यू डोन्ट केअर अबाऊट मी." अभिश्री
ती रेलिंगवर चढली.
मग माझं काही झालं तर तुला काही फरक पडणार नाही.
अभी वेडेपणा करु नको खाली उतर.
बाय...म्हणुन ती रेलिंगवर उभी राहिली आणि परीतोषवर नजर रोखली. तिथुन साधारण १० फीट खाली असलेल्या समुद्रात मागच्या मागेच उडी मारली.
"अभी ssss…. नो…" परीतोष
क्रमशः
( पुढील भाग बुधवार दिनांक २८ )
अभिश्रीने केलेला वेडेपणा परीतोष कसा निस्तरेल…?
अभिश्री लोकांच्या साकारात्मक व नकारात्मक भूमिका सांभाळत कशी पुढे जाईल.
जाणुन घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
कथा शेअर करताना नावासह शेअर करावी. आपल्या प्रामाणिक प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरुर कळवा.
(सदर कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. कथेतील पात्रांचा व घटनांचा वास्तविकतेशी काहीही संबंध आल्यास तो योगायोग असेल. राजकारणा विषयी संपुर्ण ज्ञान मिळवणे ही अत्यंत कठीण गोष्ट असल्याने त्यातील चुकांसाठी क्षमस्व.)
{ कथा २००४ पासुन सुरु झाली आहे असे ग्राह्य धरण्यात यावे.सध्या काळ १० वर्ष पुढे सरकल्याने २०१४ सुरु झाले आहे.}
रणसंग्राम
लेखन : रेवपुर्वा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा