रणसंग्राम - एक झुंजार : भाग १७
मागील भागात -
अभिश्रीच्या वाढदिशी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये विजयसिंहांनी त्यांची पार्टी सत्तेमध्ये आल्यास ते परत मंत्रीपद स्वीकारण्याची इच्छा दर्शविली आणि युवा पक्ष त्यांना साथ देतील. अभिश्री आणि इतर सर्वांची परीक्षा आटोपल्यानंतर हार्दिकने त्यांना गोव्यात पार्टीसाठी नेलं.
---------------------------------
मग माझा काही झालं तर तुला काही फरक पडणार नाही.
"अभी वेडेपणा करु नको खाली उतर."
बाय...म्हणन ती रेलिंग वर उभी राहिली आणि परी तोष वर नजर रोखली. तिथून साधारण १५ फूट खाली असलेल्या समुद्रात मागच्या मागेच उडी मारली.
अभी ssss…. नो…
परीतोष खुप भांबावला. कसं बसं स्वतः ला सावरुन त्याने लाईफ बोटसाठी सिक्युरिटीला बोलावलं आणि लगेच त्याच जागेवरुन पाण्यात उडी मारली.
परीतोष वेड्यासारखं कधी पाण्यात कधी बाहेर तिला शोधत होता. स्पॉट लाईटमध्ये अंधुक असं दिसतं होतं. तरीही परीतोष हात पाय मारतच होता. थोडं पुढे जाताच त्याला ती पाण्यावर तरंगताना दिसली. त्याने लगेच तिला कवटाळुन घेतलं. तेवढ्यात गार्डस्नी लाईफ बोट पाण्यात उतरवली. परीतोषने हळुच तिला बोटमध्ये ठेवलं आणि स्वतः त्यात चढला.
अभी sss.. अभी ssss… उठ ना प्लीज…
ती काही केल्या शुद्धीत येत नव्हती. गर्ड्स त्यांची बोट हळु हळु वरती घेत होते. त्याने तिचा हात घट्ट पकडुन ठेवला होता. त्याचे अश्रु तिच्या हातांवर ओघळत होते.
त्याने गार्डसाला विनंती केली यातलं कोणाला काही कळु नका देऊ आणि तिला रुममध्ये नेउन बेडवर झोपवलं. पोट दाबुन पाणी काढण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग नाही झाला. तो भार्गवीला बोलावण्यासाठी निघतच होता की अभिश्रीने त्याचा हात पकडला आणि स्वतः जवळ खेचलं.
मिश्खील पणे तोंडातुन पाण्याची पिचकारी सोडली.
ती बेशुद्ध असल्याचं नाटक करत होती हे बघुन त्याचा संताप झाला.
"यू डोन्ट केअर अबाऊट मी ना… मग मला वाचवण्यासाठी उडी का मारली..?" अभिश्री
स्वतः ला कसं बसं शांत करत तो तिला म्हणाला.
"कपडे बदलुन बाहेर ये मग बोलु. मी पण चेंज करुन येतो."
तिकडे खाली हॉलमध्ये सर्वांच्या नाच, गाणं, गप्पा सुरु होत्या. गौरी एका कॉर्नर टेबलवर बसुन शिवाकडे एकटक बघत होती. त्याचं लक्ष मात्र इतर गार्ड बरोबर सगळं ठीक आहे की नाही बघण्यात होतं. अभिश्री बद्दल कळताच तो तिकडे गेला पण परीतोषने त्याला ओके असा इशारा केला आणि तो पार्टी हॉलमध्ये परतला. तिथे अधुन मधुन त्या लोकांशी थोडफार बोलत होता. आदिनाथचं लक्ष गौरीकडे गेलं तसा तो हसला आणि शिवाला जेवण करु म्हणुन मुद्दाम गौरीच्या टेबलवर नेलं. ही गोष्ट त्याच्याही लक्षात आली पण आता देण्यासाठी काही बहाणा नव्हता. गौरीला तर अभाळ ठेंगणं झालं. आदिनाथने फोन आल्याचं सांगुन तिथुन पळ काढला.
तिच्या एक टक बघण्याने शिवाला खुप अवघडल्या सारखं होत होतं.
"तुम्ही काही घेतंच नाही आहा..!
स्टार्टर देऊ..? खुप भारी आहेत. प्रॉंस, पापलेट, क्रॅब्स, गोव्याची स्पेशालिटी आहे. मी तर कॉन्फरन्स असली की मस्त ताव मारत असते." गौरी
तिच्यासमोर जवळपास ७-८ प्लेटमध्ये वेग वेगळे प्रकार ठेऊन होते. एक एक ॲटम ती अगदी जिभल्या चाटत फस्त करत होती. आणि त्यालाही आग्रह करत होती.
शिवाला तिचा निरागसपना कुठेतरी सुखावत होता.
"नॉन व्हेज…?" शिवा
"ओह नो.. वेज आहा का.. पनीर घ्या तेही बरच असतं."
"विगन आहे. प्राण्यांपासुन असलेलं काहीच नाही. दूध, दही, अंडी नथिंग." शिवा
"अरे देवा… उरलं काय..? पाणी आणि हवा..?"
"शिवाने छोट्याशा प्लेटमध्ये चमचाभर सॅलड घेतलं.
क्वालिटी फुड हॅज मोअर एनर्जी." शिवा
लाज वाटुन तिनेही सॅलडचं एक पान उचलुन तोंडात टाकलं. एखादं औषध खाल्ल्यासारखं तोंड करत तिने ते पाण्यासोबत गिळलं.
शिवाला तिच्या चेहऱ्याकडे बघुन हसु आलं.
"किती गोड हसता तुम्ही..!" गौरी
"तुम्ही तुमचं खाऊ शकता." शिवा
"थॅंक यू. मी खुप फुडी आहे." असं बोलुन तिने उरलेले इतर स्पेशल मेण्यु सुध्दा बोलावले.
आज शिवाला पहिल्यांदा हसताना बघितलं. गौरी त्याच्याकडे बघुन खळखळुन हसत होती. त्याच्या नकळत तो तिच्या निखळ हसण्यात गुंतत होता.
"सॉरी तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारु. म्हणजे तुम्हाला कोणी फसवल होतं का..? म्हणजे अम शुअर त्या माणसांनीच तुम्हाला त्रास दिला असेल ज्याचा तुम्हाला जीव आय मिन हत्या आणि जेल.. आय ट्रस्ट यू… सॉरी
मला बस तुमचा त्रास शेअर करायचं आहे." गौरी
शिवा भानावर आला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.
"थँक यू फॉर डिनर मॅम.." म्हणुन हॉल बाहेर निघुन गेला.
"अरे यार. उगाच विचारलं. असो एवढं तर बोलला पुढच्या वेळेस आणखी बोलेल." गौरी एकदम खुश होऊन सर्वांशी गप्पा मारत बसली.
वर अभिश्री आणि परीतोषचा काय गोंधळ सुरु होता याची खाली कोणाला कल्पना नव्हती. दोघंही कपडे बदलुन रुमच्या बाहेर आले.
पारीतोषने एवढा वेळ दाबुन ठेवलेला राग आता अनावर झाला होता. तो अभिश्रीवर जवळ जवळ धावुन गेला.
"आर यू आऊट ऑफ युअर माईंड." परीतोष
तो तिच्या अगदी जवळ आणि रागाने थरथरत होता.
जीव वर आलाय का तुझा..?
केव्हा मोठी होणार तु..?
त्याचा तसा अवतार बघुन ती दचकुन थोडी मागे सरकली आणि अचानक त्याला बिलगली.
"आय लव्ह यू परी.." अभिश्री
परीतोषसाठी हा अकस्मात धक्का होता. मिनिटभर तो तसाच स्तब्ध उभा राहिला आणि अचानक तिला स्वतःपासुन लांब केलं. तिच्यापासुन तोंड फिरवुन उभा राहिला.
तुझ्या चांडाल चौकडीचे असले स्टंट माझ्यावर नाही चालणार.
ग्रो अप. मुद्दाम त्यांच्या समोर असला थिल्लर पणा सुरु आहे न..?
"नो अम रिअली सिरियस. कोणीच नाहीये." अभिश्री
"व्हॉट नॉन सेन्स इज धिस..? दोन वेळ कौतुक काय केलं तु तर मलाच मस्का लावायला निघालीस.
लूक ॲट यू..
सच ॲन अन् स्टेबल गर्ल यू आर. ना तुला स्वतः ची अशी समज ना निर्णय क्षमता. कधी याचा वशिला कधी त्याचा. तुझं स्वतः च असं काय आहे. प्रत्येक वेळी भाऊ, वडील, माझे डॅड यांच्या नावानी पुढे जाते. सी.एम. अँड ओह गोड त्यांचा मुलगा ही.
आणि अता माझाही वापर करायचा तुला..!
या जन्मात ते शक्य नाही. तुझ्या या ट्रिक्स चांगलच ओळखुन अहो मी. तुझ्या पॉवर, उपकार, प्रेम या स्ट्रॅटेजीचा वापर माझ्यावर होऊ शकत नाही. मला तुझ्या सारख्या मुलींची कीव येते. म्हणुन नाईलाजाने अडकली की मदत करावी लागते." परीतोष
पाठमोरा राहुनच तो एवढं सगळं बोलुन तसाच तिच्याकडेन बघता पलीकडे त्याच्या रुममध्ये निघुन गेला.
अभिश्री बराच वेळ तिथे डेक वरच बसुन होती. तिच्यात काही विचार करण्याएवढ त्रणंच उरलं नव्हतं. खरं- खोटं, भास - सत्य सर्वच आकलनशक्तीच्या बाहेर जात होतं.
थोड्या वेळानी हार्दिक तिथे आला. तिला तसं बघुन त्याला एकंदर परिस्थिती समजली. तो तिच्या बाजुला जाऊन बसला. थोड वेळ शांत राहुन तो बोलला.
"आय डोन्ट नो तुला या गोष्टीचा काही फारक पडत असेल का..!
पण मी नेहमी तुझ्यासोबत असेल कुठल्याही परिस्थितीमध्ये कधीही मी तुला नाही म्हणणार नाही. माझा नेहमी होकराच असेल.
डोन्ट वरी. जस्ट गिव्ह युरसेल्फ सम टाईम." हार्दिक
"थँक यू हार्दिक. राईट नाऊ इट मिन्स अ लॉट टू मी."असं म्हणुन तिने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवल.
पारीतोष तेव्हाच रूमच्या बाहेर आला. हार्दिक तिच्यासोबत आहे हे दुरून बघितलं आणि परत आत गेला.
थोडा वेळ बसुन हार्दिक आणि अभिश्री खाली हॉल मध्ये गेले. तिथे आदिनाथ एक सुंदर गाणं गात होता. डुएट मध्ये शांभवी फोनवर होतीच.
पल.. दो पल... की क्यू है जिंदगी…
इस प्यार को है… सदिया काफी नाही..
तो खुदा से मांग लू मोहलत मै एक नई..
रहेना है बस यहा… अब दुर तुझासे जना नाही..
जो तु मेरा हमदर्द है.. जो तु मेरा हमदर्द है..
सर्व जण मंत्रमुग्ध होऊन त्यांचं गाणं एन्जॉय करत होते. कोणी तिथेच पेंगत होतं. भार्गवी मात्र गाणं ऐकता ऐकता तिचं मेडिकलच पुस्तक वाचत होती. हार्दिकने कंटाळुन तिचं पुस्तक आणि चष्मा लपवुन ठेवला. त्यांची छान गट्टी जमली तिथे.
दुसऱ्या दिवशी गोव्यात थोडं फिरुन ते लोक फ्लाईटनी मुंबईला परतले. हार्दिक सोडुन इतर सगळे पुण्यात पोहचले. शेवटपर्यंत त्याने काही पार्टी देण्या मागचं नीटसं असं कारण सांगितलंच नाही. पण भार्गवीला त्यानी पार्टी का दिली असावी त्याचा अंदाज आला होता. पण तिने तसं कोणाला सांगितलं नाही.
घरी आल्यानंतर १५-२० दिवस सर्वांनी बरीच मजामस्ती केली. सिंहगड, राजमाची ट्रेकिंग, शेवनेरी किल्ला, मस्त असा पावसाळ्याचा आनंद लुटला. आता वेळ होती कामाला लागण्याची. प्रचार सुरु होण्याआधी त्यांना नोकरी, व्यवसाय काहीतरी सुरु करायचं होतं. काम न करता राजकारणाच्या नावाखाली फिरणं हे कोणाच्या तत्वात बसणारं नव्हतं.
दक्षला आधीपासुनच आदिष सॉफ्टेकमध्ये काम करण्याची इच्छा होती. आदिनाथ आणि परीतोषला सुध्दा त्याच्या कॉलिफिकेशनवर भरोसा होता. त्यामुळे तो रीतसर इंटरविव्ह देऊन आदिष सॉफ्टेकमध्ये रुजु झाला.
अभिश्रीने ईश्वरीच्या सर्वात वरच्या मजल्यावर तिची एक छोटीशी आर्ट गॅलरी सुरु केली. तिथे ती विविध भेट वस्तू, मुर्त्या, कलाकृती, पेंटिंग बनवुन विकणार होती. हिमनिकाचं एम. कॉम. फायनल राहिलं होतं आणि नित्याचा सुध्दा कोर्स बाकी होता. जोसेफला कोर्सशी काही घेण देण नव्हत़च. स्वतः पुर्ता पैसा तो त्याच्या कंप्युटर टॅलेंटनी कमवतंच होता मग मार्ग सरळ असो की उलटा. नोकरी, बिझनेस, लग्न यांच त्याला बंधन नको होतं.
महिन्याभरात त्यांचं नवीन रुटीन सुरु झालं. अधुन मधुन वेळ मिळेल तसं सगळे कॉलेज कट्टयावर भेटत.
-----------------------
सरपोतदारांची रोजची सकाळची गडबड सुरु होती. विजयसिंह पार्टी ऑफिसला जाण्यासाठी तयार झाले, अभिश्री आणि ईश्वरी इन्स्टिट्युटकडे निघत होत्या. आदिनाथ मात्र वरती रुममध्ये फोनवर बोलत निवांत आवरत होता. हल्ली तो जिकडे तिकडे कानात ब्लूटूथ हेडफोन लाऊन फिरत. घरी ऑफिसमध्ये सर्वांना आश्चर्य वाटत होतं. हा आजकाल एवढा मनमोकळा कसकाय बोलत वागत असतो. अभिश्री येता जाता त्याला जय शंभु म्हणुन चिडवत.
"आज कुठल्या कलर चा ड्रेस घालू शंभु…?"
"काळा घाल."
"असं नाही छान सांग ना प्लीज रोज सारखं."
"मला नाही सुचतंय"
"हममम… म्हणजे काहीतरी झालंय. सांग आधी.. आहेस कुठे..? काय झालं..? त्याशिवाय मी फोन ठेवणार नाही."
"क्लासच्या टेरेसवर. मला अजिबात छान वाटत नाहीये. खुप त्रास होत आहे.ज्या गोष्टीसाठी मी जगत होती तीच माझ्याजवळ नाही राहिली आता. आणि तू तर काही बोलुच नको सर्व कळलंय मला. मुद्दाम गोष्टी लपवल्या माझ्यापासुन."
तेवढ्यात फोन कट झाला.
"हॅलो शांभवी… हॅलो.. हॅलो…"
आदिनाथला चांगलाच घाम फुटला. काही सेकंद तो पुर्णपणे बधीर झाला होता. भानावर येऊन तो खाली पळत सुटला. हॉलच्या दारातुन तो बाहेर पडणारच की अभिश्रीने त्याला आवाज दिला
"भाई sss.. टी शर्ट खाली पँट तर घाल टॉवेल आहे नुसता."
"ओह शेट.." म्हणत तो विजयसिंहांच्या रुममध्ये पाळला. टी शर्ट खाली त्यांचा एक पैजामा घालुन कोणाला काही न बोलता तो परत धावत सुटला. घरचे त्याची तारांबळ अख वासुन बघत होते.
"अगं काय हे..! बिना इस्त्रीचा रुमाल नाही घेत हा कधी आणि असा काय ताल बनुन गेलाय." ईश्वरी
"चिल् मॉम.. अब इताजार की घडीया खतम होनेवाली है."
"लवकर झालेली बरी नाहीतर हा अजुन काय काय विसरेल देव जाणे."
दोघी जणी हसत आपल्या कामासाठी निघुन गेल्या.
आदिनाथ कसा बसा शांभवीच्या बिल्डिंग जवळ पोहचला आणि तडक टेरेसवर गेला. समोर शांभवी टेरेसच्या परापेटवर उदास बसुन होती.
"आय ॲम सॉरी शांभवी. मी गुन्हेगार आहे तुझा. माझ्याबद्दल तुला सगळं कळलं असेलच म्हणुन पाठमोरी बसुन आहेस न…?
तू देशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे मी. हवं तर माझं तोंडही बघु नको पण तू तुझं कुठलंही नुकसान नको करुन घेऊ प्लीज.
निघतो मी.." आदिनाथ
क्रमशः
( पुढील भाग रविवारी १ तारखेला नक्की प्रकाशित होईल. यावेळी झालेल्या दिरंगाईसाठी क्षमस्व.)
आदिनाथची खरी ओळख शांभवीला कलाळण्यामागे नक्की अडचण होती…?
परीतोष जर अभिश्रीवर एवढं प्रेम करत असेल तर त्याने ते कबुल का नाही केलं..?
हार्दिकला अभिश्री बद्दल काही भावना आहेत का..?
जाणुन घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
कथा शेअर करताना नावासह शेअर करावी. आपल्या प्रामाणिक प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरुर कळवा.
(सदर कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. कथेतील पात्रांचा व घटनांचा वास्तविकतेशी काहीही संबंध आल्यास तो योगायोग असेल. राजकारणा विषयी संपुर्ण ज्ञान मिळवणे ही अत्यंत कठीण गोष्ट असल्याने त्यातील चुकांसाठी क्षमस्व.)
{ कथा २००४ पासुन सुरु झाली आहे असे ग्राह्य धरण्यात यावे.सध्या काळ १० वर्ष पुढे सरकल्याने २०१४ सुरु झाले आहे.}
लेखन : रेवपुर्वा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा