रणसंग्राम - एक झुंजार : भाग १९
मागील भागात -
आदिनाथ शांभवीचा मुड ठीक करण्याच्या पुर्ण प्रयत्नात होता. अभिश्री आणि तिच्या मित्रांची मतं पक्षाच्या कार्यकर्त्यांपेक्षा खुप वेगळी होती. अभिश्री आणि आदिनाथची त्यावर चर्चा झाली. अभिश्री आता दोन्ही अडचणी सोडवण्यासाठी सर्वांना घेऊन बाहेर पडली.
----------------------------------
"तुमच्यात नक्की काय सुरु आहे..? गोव्याचं भांडण अजुन निपटलं नाही का..? तेव्हापासुन फार कमी सोबत दिसता.. म्हणजे खोड्या पण काढत नाही." आदिनाथ
"भाई जस्ट लिव्ह इट.. आय डोन्ट वाॅना टॉक अबाऊट हिम एनी मोअर." अभिश्री.
"बरं राहिलं… पण आपण जात कुठे आहो हे तर सांग.." आदिनाथ
"कळेल कळेल लवकरच कळेल.." अभिश्री
तेवढ्यात अभिश्रीच्या मोबाईलवर मेसेज आला…
"हॅलो बेटा. तुला शक्य असेल तर लवकरात लवकर मुंबईला येऊन भेट. खाजगी काम आहे."
तो मेसेज होता सी. एम. लक्ष्मीकांत रणदिवेंचा.
तिला थोडं आश्चर्य वाटलं. खाजगी काम काय असु शकते..? तिने उद्या मुंबईला येते असा रिप्लाय दिला. तसही कार्यकर्त्यांना संबंधी तिला सुचलेला पर्याय सी.एम. च्या कानावर घालणं आवश्यक होतं.
ते सर्व अभिश्रीच्या आर्ट गॅलरी म्हणजे चेस इन्स्टिट्युट मध्ये पोहचले. तिथे कामाला असलेल्या लोकांकडुन तिचं काही सामान त्यांच्या एका दुसऱ्या गाडीत ठेऊन घेतलं.
"अगं ए.. तू तुझ्या ऑर्डरची डिलिवरी करण्यासाठी आम्हाला आणलाय का सकाळी सकाळी..?" आदिनाथ
"नाही रे भाई.. बी पेशंट."
"तू आणि शांभवी खरोखर पेशंट बनवाल मला."
अभिश्रीने स्वतःची आणि सामानाची दोन्ही गाड्या शांभवीच्या घराच्या बाजुला थांबवल्या. माणसांहाती ते सामान शांभवीच्या हॉलवरती टेरेसवर ठेवलं. अभिश्रीला शांभवीचं घर आधीच माहिती आहे हे बघुन तो तिच्याकडे खुन्नस देऊन बघत होता आणि ती खोडसळ पणे हसत होती.
"अरे sss.. का बोललो मी हिला.. तू मार खाऊ घालशील. हा सगळा पसारा इथे बघुन ती आणखी चिडेल." आदिनाथ
"भाई चुपचाप तिथे कोपऱ्यात बस. हातची घडी तोंडावर बोट."
दक्ष,जोसेफ सुध्दा कोपऱ्यात जाऊन बसले.
"ओयेsss.. हॅलो.. तुम्ही काय बसलात..! काम कोण करेल." अभिश्री
"गर्लफ्रेंड त्याची. वहिनी हिची आणि हमाल्या आम्ही करायच्या..! हे बरंय." जोसेफ
जोसेफला अंग मेहनतीचा अती कंटाळा होता. फक्त मोबाईल, लॅपटॉप कंप्युटरवर बोट फिरवायचे. त्यामुळे सगळे मुद्दाम त्याला काम देत.
अभिश्रीने आणलेल्या वस्तु सर्वांनी २-३ तासात टेरेसवर लावल्या आणि थकुन जागा मिळेल तशे लोळत पडले. शांभवी वरती येईल याचा अंदाज घेऊन आदिनाथने त्यांना अक्षरशः तिथुन हकलवुन दिलं.
आदिनाथने शांभवीला मेसेज केला.
शांभवी खाली हॉलमध्ये पापडांचा उंडा चुरत होती. आज तिच्या आई आणि मामींच्या बचत गटाला पापडांची मोठी ऑर्डर मिळाली होती. सर्व बायका मिळुन गप्पा मारत काम करत होत्या. शांभवीचा मामेभाऊ जयेश आतल्या रुममध्ये अभ्यासाच्या नावाखाली तिच्या मोबाईलवर गेम खेळत बसला होतं. तो घोषणेच्या सुरात ओरडला.
"ताई जिजुंचा मेसेज आहे. तुझ्या प्रोब्लेमचं सोलुशन बघ्याण्यासाठी टेरेसवर येऊन भेट."
सर्व बायका तोंडाला पदर लाऊन हसत होत्या. शांभवीचं तर लाजुन पाणी पाणी झालं. ती तडक उठुन रुममध्ये गेली जयेशच्या पाठीत एक धपाटा घातला आणि धावत टेरेस कडे गेली. आदिनाथ पायऱ्यांमध्येच उभा होता. शांभवी येताच त्याने तिचा हात धरुन स्वतः कडे खेचलं.
"आदी sss.. दचकले ना मी.. सोड बरं.. कोणी येईल. अर्ध्या वेटाळीला कळलय तू इथे आल्याचं. हात पण पापडाच्या कणकीचे आहेत." शांभवी
तिचा हात हातात घेत आदिनाथ म्हणाला.
"एवढे नाजुक हातानी कणीक नसते चुरायची."
"बरं पुढल्या वेळी तुला बोलवेल."
"पुढल्या कशाला आत्ता येतो चल."
"त्याची काही गरज नाही. तू माझा मुड ठीक करण्याचं सोलुशन आणलं असेल तरच बोल नाहीतर निघते मी.
"ह्ममम.. बर." आदिनाथ ने तिच्या डोळ्यांवर हात ठेवून तसच वरती नेलं. आदिनाथने डोळ्यावरुन हात काढताच शंभवीचा चेहराच खुलला. ओसाड पडलेल्या टेरेसचं अगदी वृंदावन झालं होतं. सर्वत्र सुंदर रंगीत कुंड्यांमध्ये हिरवीगार झाडं, वेली, विविध रंगांची फुले, अचानक आलेली चिवचिवणारी पाखरे, कुठे अप्रतिम अश्या माती, दगडाच्या मुर्त्या, मडके आणि इतर बऱ्याच शोभेच्या वस्तु. तिथे असलेल्या शेडला मोठा पडदा लावलेला व त्यावर संगीतवर आधारित कलाकृती पेंट केलेल्या. हे सर्व सामान अभिश्रीने तिच्या जुन्या कलेक्शन मधुन आणलं होतं.
शांभवी ते मंजुळ वातावरण बघुन आनंदात गायला लागली.
"आदिनाथ तिच्याकडे भान हरपुन बघत होता."
"शांभवीने त्याला मिठी मारली. थँक यू आदी. मला कधी वटलच नाही तू असं काही करशील. एवढं सगळं एकट्यानी कसकाय केलं तू..?"
"अगं.. तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद म्हणजे अमृत आहे माझं. आणि तुझ्यासाठी मी नाही करणार तर कोण करेल..?"
"आम्ही…"
बाजुला झाडांमध्ये लपलेली अभिश्री आणि तिची मंडळी बाहेर आली. आदिनाथने त्यांना हकालल्या नंतर ते लोक शेजाच्या घरात जाऊन त्यांच्या टेरेस वरुन परत आले.
"वहिनी हे सगळं आम्ही केलंय बरं. भाई सगळं फुटेज स्वतः घेत आहे." नित्या.
"हो.. सकाळी ४ वाजता उठून अभ्यास नाही केला यांनी पण तुमच्यासाठी आलो इथे." दक्ष
"तू दुपारी ४ ला सुध्दा अभ्यास केला नाही कधी." हिमनीका
"सर्वात जास्त कष्ट मी घेतले बर वहिनी." जोसेफ
सारखं वहिनी नाव ऐकुन शांभवीला खुप लाजल्यासारख होत होतं.
"ए गप बसा रे..वहिनी माझी आयडिया होती ही." अभिश्री
सर्वांनी शांभवीला आपापली नावं सांगितली. त्यांचं मोकळं वागणं चिडवणं ती एन्जॉय करत होती. बरेच वेळा संगुनही आदिनाथने त्याच्या घरच्यांबद्दल तिला सांगितल नव्हता.
आदिनाथ त्यांच्या येण्यानी पुर्णपणे बिथरला होता. त्याने कधीच कोणत्या ओळखीच्या व्यक्तीची भेट शांभवीशी करुन दिली नव्हती. परीतोषसोबत फोनवर कधीतरी बोलली होती. कसं बसं ओढत आदिनाथ त्यांना घेऊन गेला.
शांभवीने त्यांना बाय केलं. तेवढ्यात तिचा मामेभाऊ जयेश बाहेर आला.
"ताई ही लोक कोण होती."
"अरे ती अभिश्री.. म्हणजे आदिनाथची बहिण आणि ते तिचे मित्र."
मी त्यांना कुठेतरी पाहिलंय.. पण कुठे आठवत नाहीये.
"बघितलं असेल कॉलेजमध्ये वगैरे. ते पण कॉलेजमध्येच वाटतात."
"नाही दुसरं कुठेतरी. तुझा मोबाईल दे न आठवेल मला."
"नुसतं म्हणायला बारावीत.. अभ्यासाच्या नावाखाली गेम खेळत बसतो नाहीतर सोशल मीडिया. समोर लोकांशी बोलायचं नाही आणि फेसबुकवर फ्रेंडलीस्ट वाढवायची."
"चिल्ल… ताई.. टेक इट इझी.. चल पापड लाटू."
---------------------------
अभिश्रीने गाडी परत नेहमीच्या सिग्नल जवळ थांबवली.
"आता परत स्टिकवाले आजोबा येणार.." जोसेफ
एक छोटीशी मुलगी गाडीजवळ आली. तिने हात पुढे केला त्यात एक चिठ्ठी होती. अभिश्रीने ती चिठ्ठी उचलली आणि तिच्या हातात पैस्यांच बंडल ठेवलं.
"अरे यार आता तरी सांग हा काय प्रकार आहे..?" हिमानिका.
"४ दिवसांनी सगळं उलगडेल हा काय प्रकार आहे ते." अभिश्री
अभिश्रीने चिठ्ठी तिच्या हातात दिली त्यात ४ दिवसानंतरची तारीख आणि एक पत्ता दिला होता.
भरपुर काम करुन त्यांना चांगलीच भुक लागली होती. घराजवळच त्यांच्या नेहमीच्या गाड्याजवळ पोहे खाण्यासाठी ते लोक थांबले.
"हा आता भाईच्या प्रोब्लेमच सोलुशन तर मिळालं. राहिला प्रश्न आपल्या प्रोब्लेमचा. जसं भाई म्हंटला की कार्यकर्ते आपलं ऐकणार नाहीत मग ते ज्यांचं ऐकतात त्यांना आपण आपले मुद्दे, पद्धती पटवुन द्यायच्या.
"म्हणजे कोण..?" नित्या
"हे बघा.. आपले जवळपास सर्व कार्यकर्ते वयस्कर आहेत म्हणजे त्यांची मुलं कॉलेजला जाणारी आहे. आपण त्या मुलांना टार्गेट करायचं आणि ज्यांची मुलं शाळेत जातात त्यांच्या आई लोकांना पटवुन द्यायचं की आपले उद्दिष्ट हे कशाप्रकारे त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी फायद्याचं आहे." अभिश्री
"पण हे कार्यकर्ते त्यांच्या मुला, बायकांचं ऐकतील..?" हिमानिका
"का नाही ऐकणार..! बायकोनी मनावर घेतलं की सहसा नवऱ्यांना ते ऐकावंच लागतं. राहिला प्रश्न कॉलेजच्या मुलांचं ऐकण्याचा तर आजकाल घरी ज्या काही नवीन पद्धती स्वीकारल्या जातात ते मुलांमुळेच. म्हणजे स्मार्ट tv, ऑटोमॅटिक गॅजेट्स, ऑनलाईन शॉपिंग." दक्ष
"ह्ममम ट्राय करुन बघायला हरकत नाही. जर ही स्ट्रॅटेजी चालली तर विभागातील जनतेला पण आपल्या पद्धती पटतील. हे असं घोषणा, नारेबाजी, फ्लेक्सचा प्रचार करण्याची गरज नाही पडणार." नित्या
"बट यासाठी ह्यूज डेटा लागेल. आपल्याकडे जसं आपल्या कॉलेजच्या मुलांची अगदी त्यांच्या आवडी निवडी,नातेवाईक, या सर्वांची माहिती फिड होती तशीच कार्यकर्त्यांची आणि पुढे चालुन विभागातील जनतेची सुध्दा माहिती लागेल." जोसेफ
"यस.. मिळेल ती एका सोर्स कडुन." अभिश्री
जोसेफ आदिनाथकडे बघत होता.
"सायबर लॉ आणि इथिक्सचं एक पुस्तक घ्यायचं. त्यातल्या नियमानुसार जी काही मदत लागेल त्यासाठी आदिष. नाहीतर जेल आणि तिथे टायरमध्ये टाकून तुझी धुलाई." आदिनाथ
क्षणभर जोसेफनी ते इमॅजिन केलं आणि त्याच्या अंगात काटा आला.
"डोन्ट वरी जो… ४ दिवसांनी त्या ॲड्रेसवर तुला हवं ते सगळं मिळेल." अभिश्री
अभिश्री आणि चौकडी आवरुन आर्ट गॅलरीमध्ये जमले.
कट्टा गँग आता शनिवार रविवार पुर्णपणे प्रचारासाठी काम करणार होते. विजयसिंहांच्या पार्टी ऑफिसमधुन त्यांनी सर्व कार्यकर्त्याची माहिती असलेल्या फाईल्स मागवल्या काही हार्ड तर काही सॉफ्ट कॉपी. पण ती माहिती अगदी जुजबी होती. जोसेफला नक्की कोणत्या प्रकारची माहिती हवी आहे हे त्याने लिहिणं सुरु केलं.
तेवढ्यात तिला हार्दिकचा फोन आला.
सी.एम. ला मेसेज केल्या नंतर तिने हार्दिकलाही मेसेज केला की ती दुसऱ्या दिवशी मुंबईला येणार.
"हे.. तू अचानक कशी येत आहे इकडे…?" हार्दिक
"म्हणजे..? तुला भेटायला येण्यासाठी कारण हवंय का..?" अभिश्री
"तसं नाही.. आय मीन तुला डॅडनी बोलावलंय ना इथे..?" हार्दिक
"हो.. काही प्रोब्लेम आहे का..?" अभिश्री
"प्रोब्लेम नाही.. बट.. उद्या नको येऊ.." हार्दिक
"असं का बोलत आहेस…? तू नीट उत्तर दे नाहीतर मी आत्ता निघेल" अभिश्री
"ॲकच्युली.. मी १५ दिवसांनी लंडनला जाणार आहे. नेहमीसाठी. मे बी.. मी जावं नाही हे समजण्यासाठी त्यांनी तुला बोलावलं असेल. ऐक ना.. उद्या नको येऊ. मी डॅडला बोलतो."
"अरे पण नेहमीसाठी.. का..? आणि भेटू का नको.. ? जाण्याच्या आधी तरी.. म्हणजे मला काही कळत नाहीये.. मी आत्ता निघते" अभिश्री
"हे हे.. कुल डाऊन. ठीक आहे जाण्याआधी भेटू आपण. मी कळवतो तुला तसं." हार्दिक
पुढे काही न बोलता त्याने फोन ठेऊन दिला. तिला आश्चर्य वाटलं मनमोकळ्या हार्दिकचं बोलणं असं अचानक तुटक कसं झालं?
परत फोन वाजला तिने न बघता लगेच उचलला.
हॅलो हार्दिक असं वागु नकोस प्लीज. नीट बोल n माझ्याशी. तू असं दूर गेला तर…
"नाव दिसत नसेल तर डोळे नीट चेक करुन घे."
"परीतो… हे बघ सध्या माझं डोकं ठीक नाहीये तुझ्या सो कॉल्ड क्लाएंटची जी ऑर्डर आहे ती मेल करुन दे."
"तुला बोलण्यात मलाही इंटरेस्ट नाही. पण तुझ्या मूर्खपणा मुळे सगळ्यांना जे भोगावं लागतं ते आम्ही निस्तरत बसतो."
"म्हणजे…?"
"म्हणजे ताबडतोप घरी ये तुझ्या. आदिनाथची तब्बेत ठीक नाहिये. ज्याचं कारण तूच आहेस."
"व्हॉट.. ओके मी आलेच."
अभिश्री गाडी काढून लगेच घरी पोहचली. परीतोष आणि गौरी हॉलमध्ये होते. आदिनाथ नुकताच झोपला होता. परीतोष रागाने तिच्याकडे बघत होता. तिने दुर्लक्ष केलं.
"काय झालं गौरे..?" अभिश्री
"अगं.. दुपारी अचानक शांभवी आली ऑफिसमध्ये. तिने आदिनाथला तुमच्या NKP युवा पार्टी fb पेज वरचा तुझा फोटो दाखवला."
"हा मग..?"
"आदिनाथने ही गोष्ट तिच्यापासून लपवली होती की तुम्ही सरपोतदारांची फॅमिली आहात.."
"पण अडचण काय आहे..?"
"ते आदिनाथलाच माहिती आहे. पण तो सध्या काहीच बोलण्याच्या मनस्थिती मध्ये नाही."
"का..?"
"कारण शांभवी त्याला कायमचं सोडुन निघुन गेली.."
क्रमशः
( पुढील भाग लवकर पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन.)
शांभवीला सरपोतदार चा एवढा राग का होता?
हार्दिक नेहमीसाठी लंडनला कशामुळे जात आहे..?
संपुर्ण विभागाची माहिती पुरवणारा असा कुठला सोर्स अभिश्रीला ४ दिवसांनी भेटणार…?
जाणुन घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
कथा शेअर करताना नावासह शेअर करावी. आपल्या प्रामाणिक प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरुर कळवा.
(सदर कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. कथेतील पात्रांचा व घटनांचा वास्तविकतेशी काहीही संबंध आल्यास तो योगायोग असेल. राजकारणा विषयी संपुर्ण ज्ञान मिळवणे ही अत्यंत कठीण गोष्ट असल्याने त्यातील चुकांसाठी क्षमस्व.)
{ कथा २००४ पासुन सुरु झाली आहे असे ग्राह्य धरण्यात यावे. काळ पुढे सरकल्याने साल २०१५ सुरु झाले आहे.}
रणसंग्राम
लेखन : रेवपुर्वा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा