रणसंग्राम - एक झुंजार : भाग २०
भाग टाकण्यात खुप उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. वाचनाची कडी तुटली की वाचकांचा खुप हिरमोड होतो याची कल्पना मी करु शकते. आता कथा खऱ्या रंगात येत आहे. पुढचे भाग दर दोन दिवसाला येत राहतील.
मागील सर्व भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मागील भागात -
सर्वांनी मिळुन शांभवीच्या टेरेसची कायापालट करुन तिचा मुड ठीक करुन दिला. पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्या सोबत जोडण्यासाठी अभिश्रीने आपले मुद्दे आधी त्यांच्या घरच्यांना पटवुन देण्याचा प्लॅन केला. आदिनाथ आणि अभिश्री हे दोघं सरपोतदार आहे हे कळल्या नंतर शांभवी त्याला सोडुन गेली.
-------------------------------
"काय झालं गौरे..?" अभिश्री
"अगं.. दुपारी अचानक शांभवी आली ऑफिसमध्ये. तिने आदिनाथला तुमच्या NKP युवा पार्टी fb पेजवरचा तुझा फोटो दाखवला."
"हा मग..?"
"आदिनाथने ही गोष्ट तिच्यापासुन लपवली होती की तुम्ही सरपोतदारांची फॅमिली आहात.."
"पण अडचण काय आहे..?"
"ते आदिनाथलाच माहिती आहे. पण तो सध्या काहीच बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही."
"का..?"
"कारण शांभवी त्याला कायमचं सोडुन निघुन गेली.."
अभिश्री एका क्षणात बधीर झाली. एकाच भेटीत तिने आदिनाथ - शांभवी बद्दल खुप स्वप्न रंगवले होते. तिला आदिनाथला बोलायची खुप इच्छा होत होती. पण आदिनाथचा स्वभाव ती ओळखुन होती. एवढी मोठी घटना घडल्या नंतर तो त्याचं मन फक्त शब्दांसमोरच मोकळं करत. त्यामुळेच परीतोष आणि गौरी सुध्दा खालीच होते.
"झालं समाधान.. त्या दोघांचं छान सुरु होतं. तुला मध्ये हिरो बनायची काय गरज होती. सर्व फुटेज स्वतः कडेच पाहिजे असते." परीतोष
"ही वेळ असं काही बोलण्याची नाही अरे… मार्ग काढणं आवश्यक आहे. मला वाटते आदिनाथला थोडं शांत होऊ देऊ मग त्याला बोलु." गौरी
परीतोष खुप जास्त नर्वस होता. हॉलमध्ये त्याच्या सारख्या इकडून तिकडे चकरा सुरु होत्या. आदिनाथच्या या अवस्थेचा सर्वात जास्त त्रास त्याला होत होता. अधुन मधुन त्याची करडी नजर अभिश्रीकडे वळत होती. त्यामुळे तिला अधिकच अपराधी असल्यासारखं वाटत होतं.
"ठीक आहे.. इतरांना ही सांगुन ठेव अजुन रायता पसरवु नका. शांत राहा आणि आम्हालाही राहु द्या. मला काही सुचत नाहीये सध्या. तू प्लीज आजचं काम बघशील का…? मी घरी जातो." परीतोष
"बस आता किती बोलशील तिला..! जा तू.. मी जाते ऑफिसला. अभी तू काळजी करु नको आपण काहीतरी मार्ग काढू यातुन." गौरी
अभिश्रीने तिला थंक यू म्हणत मिठी मारली.
विजयसिंह आणि ईश्वरी जेवणासाठी घरी पोहचले. चौघा मुलांपैकी कोणीच जेवलं नाही. वातावरण बघुन काहीतरी मोठं बिनसलं याचा त्यांना अंदाज आला. पण सध्या त्यांनी ते त्यांच्यावर सोडलं. वातावरण निवळलं की मुलं स्वतःहुन सांगतील हे त्यांना माहिती होतं. मुलांच्या काही अडचणी त्यांना त्यांच्या परीने सोडवता यायला हव्या हे ते जाणुन होते.
अभिश्री तिच्या आर्ट गॅलरीमध्ये गेली. तिची चौकडी तिथेच प्रचाराचा आराखडा करत बसली होती. आदिनाथबद्दल कळताच सर्वांना तेवढंच वाईट वाटलं. तरी त्यांनी स्वतः ला कामात गुंतवलं. शक्य तेवढी कार्यकर्त्यांची कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक माहिती त्यांच्या सिस्टीममध्ये टाकली. सर्वांचे सोशल मीडिया, वॉट्स ॲप अकाऊंट लिंक केले. ज्यामुळे त्यांना कार्यकर्त्यांचा स्वभाव व काम करण्याची पद्धत समजणं सोपं जाणार होतं. ईतर गोष्टी सांगण्यासाठी त्यांना विजयसिंह व पी. ए. दळवींची मदत होणारच होती.
संध्याकाळी सूर्याचा तांबडा प्रकाश तिच्या हॉल बाहेरील टरेसमद्ये पसरला होता सोबत गार वारा आणि कॉफी. अभिश्रीची आर्ट गॅलरी शेवटच्या मजल्यावर होती. दोन मोठे हॉल आणि त्याला लागुन टेरेस. टेरेसवर विविध मुर्त्या, झाडांमध्ये सगळे आपापल्या सोयीने बसुन स्वतःच काम करत बसले होते तर कोणी खाली पथारी मांडून पसरले होते. तेवढ्यात हॉल मधुन किंचाळण्याचा आवाज आला.
"अभीsss… "
अभिश्री गोल फिरणाऱ्या चाकावर मातीचं शो पीस बनवत होती. अभिश्री हॉलकडे पळाली. बाकी लोक उठतच होते की दक्ष ने त्यांना अडवलं.
हॉलमध्ये परीतोष एका कपाटावर चढुन बसला होता आणि अभिश्रीच्या नावाने ओरडत होता.
अभिश्री तिथे पोहचली.
"तुला साधी स्वच्छता ठेवता येत नाही का..? तिथे दोन मोठे उंदीर आहेत.(त्यांनी हातानी मांजरा एवढी साईज दाखवली) तुला माहित आहे न मला किळस वाटते." परीतोष
"तुला काय वाटते त्याचाशी मला काही घेणं देणं नाही. माझं कपाट मोडेल खाली ये." अभिश्री
"आधी हाकल त्यांना." परीतोष
"रोमिओ - जुलीएट बाहेर झाडाजवळ जा तुमच्या घरात." अभिश्री
"हॅलो.. व्हॉट द हेक इज दिस…? रोमिओ जुलीएट…? उंदरांना कोणी घरात ठेवत नाही आणि तू तर अख्ख खानदान पोसते..?" परीतोष
"उंदीर नाही हॅम्स्टर आहेत ते माझे. तुझ्या पेक्षा स्वच्छ असतात ते. रोज आंघोळ करतात. स्टुअर्ट लिटिल बघितला होता न आपणच. तुला माणसांशी नीट वागता येत नाही जनावराशी काय वागणार. गेले ते पलीकडे. ये खाली आता." परीतोष
परीतोष वरुन खाली उतरला उंदीर लांब दिसतच होते. तो अभिश्रीचा खांदा धरुन तिच्या मागे मागे चालत होता.
"डोक्यात फरक असणारे लोक अशे चाळे करतात." परीतोष
"काम काय आहे ते बोल लवकर." अभिश्री
त्यांना असं बघुन दक्षने मागुन शायरी सुरु केली.
"जब भी आते है तेरे आशियाने, उलझन सी होती है हमे..
तुझपे बेपनाह मरते तो है मगर तेरा हाथ थाम ने से डरते भी है…"
शायरी ऐकुन दोघंही लांब झाले. अभिश्री तिच्या पॉटरी कडे वळली. परीतोष आजुबाजुला तिचं कलेक्शन बघत त्यांना नाव ठेवत होता.
अभिश्रीच्या डोक्यात एकीकडे आदिनाथ आणि शांभवीचे विचार सुरु होते आणि हात खाली चाकावरच्या मातीच्या पॉटवर फिरत होते. पॉट खाली गळून पडणारच की परीतोषनी त्या पॉटला हाताने आधार दिला आणि त्याचा आकारच बदलला. दोघांच्या हातानी ते पॉट एक वेगळाच आकार घेत होतं. ठरवल्या पेक्षा अगदी वेगळं. दोघंही एकमेकांकडे बघणं टाळत होते. त्या मातीला आकार देताना होणारा बोटांचा अवचित स्पर्श त्यांना सुखावत होता पण ते तसं दाखवत नव्हते.
परीतोषने दक्ष कडे बघुन नजरेने काहीतरी खुनवलं.
"माती कच्ची असतानाच तिला आकार द्यावा लागतो. आकार घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो. थोडी दिशाभूल तिच्या अस्तित्वासाठी घातक ठरू शकते. आकार घेऊन त्याला उन्हाच्या झळांनी पक्क होऊ देऊन आगीतून ताऊन सुलाखून मग कुठे प्रेमाच्या रंगांची झालर द्यायची असते. कुठल्याही गोष्टीला परिपक्व होण्यासाठी ठराविक वेळ द्यावाच लागतो. ओलेपणात रंग भरशील तर त्याची माती होईल." परीतोष
"प्रवचन संपलं असेल तर पॉट खाली उतरवायचं का..? ठरलं त्यापेक्षा भलतंच झालं ते. ४ वर्ष कॉलेज शिकल्यानंतर आता तू मला पॉटरी शिकवणार का..?" अभिश्री
परीतोषनी तिच्यासमोर कोपरापासून हात जोडले.
"तुझ्या मंदपनावर चिडावं की हसावं खरंच कळत नाही कधी कधी. माझ्या क्लाएंटच्या ऑर्डरची लिस्ट आणि डिटेल्स रिसेप्शनवर ठेवलेत बघुन घेशील."
एवढं बोलुन तो निघुन गेला.
"आला मोठा मला पॉटरी शिकवायला…" अभिश्री
"लोक डोळे बंद करून प्रेम करतात पण तू डोकं बंद ठेऊन केलंय वाटते. अभी यारsss... तु वेडी आहेस का..? ही लव्हज यू सो मच." दक्ष
"हे बघ.. त्याची चाकरी त्याच्या ऑफिसमध्ये करायची. माझ्यासमोर त्याचे गुणगान नाही गायचे. जर तो माझ्यावर प्रेम करत असेल तर आता त्यानी समोरुन यावं आणि स्वतः चा ॲटीट्युड बाजुला ठेऊन कबुली द्यावी. जर तो माझं मन जिंकण्यात यशस्वी झाला तर मी विचार करेन. त्याच्या बद्दल मला ज्या इमोशनस तयार झाल्या होत्या त्या त्याने स्वतःहुन संपवल्या." अभिश्री
"हाये मेरी घायल शेरणी.." नित्या
"जाऊ दे. आपण कामावर फोकस करु सध्या." हिमानीका.
परीतोष थोडं पलीकडे उभं राहुन त्यांचं बोलणं ऐकत होता. अभिश्रीने पाळलेले दोन्ही गुबगुबीत पांढरे उंदीर परत त्याच्या बाजुला आले. त्याने मस्त पैकी दोघांना हातावर घेतलं.
"हाय रोमिओ - जुलिएट सॉरी मित्रांनो मघाशी तुमच्यावर ओरडलो पण काय करणार त्या वघीनीशी विनाकारण बोललो तर फाडुन खाईल न ती मला. चलो बाय बाय." परीतोष
दक्षने वाकुन परीतोषला बघितलं आणि गालातल्या गालात हसला. परीतोषने इशारा केल्याप्रमाणे दक्षने पॉटरी करतानाचा त्या दोघांचा फोटो काढला होता आणि परीतोषला लगेच पाठवला. त्यासोबत एक शायरी सुध्दा.
"थोडे गुस्से वाले थोडे नादान हो तुम..
मगर जैसे भी हो मेरी जान हो तुम…"
परीतोषचा तर दिवसचं बनला होता.
त्याने थॅंक यू भाई म्हणुन रिप्लाय दिला.
दोन तीन दिवस अशेच गेले. अभिश्रीला काहीतरी करुन आदिनाथशी बोलायचं होतं. बस एकदा तरी तो रुमच्या बाहेर यायला हवा याची ती वाट बघत होती. पण तो सगळं त्याच्या रुम मध्येच मागवत. अधुन मधुन त्याच्या रूम मधून व्हायोलिनचे सॅड म्युझिक ऐकू येत.
संध्याकाळी अभिश्री तिच्या चौकडीच्या फ्लॅटवर गेली. सर्वांनी हॉल मध्ये मूव्ही बघत थोडा निवांत वेळ घालवला. कोणीतरी दार वाजवलं सर्वजण मोजत होते त्यांच्यात कोण मिसिंग आहे ते. पण ते पाचही लोक तिथेच होते. नित्या ने दार उघडलं एक छोटी मुलगी तिच्या हातात चिठ्ठी देऊन पळाली. त्या चिठ्ठी मध्ये काहीही लिहिलं नव्हतं. कागद अगदी कोरा होता.
"ओह नो… हाऊ कुड आय फर्गेट इट. चला पटकन सगळे." अभिश्री
अभिश्रीने कोणाला कपडे सुध्दा बदलू नाही दिले. घरच्या अवतारात त्यांना गाडीत बसवलं.
"तुझ्या जिप्सी सारखीच माझी अवस्था आहे अर्धी उघडी, बॉक्सर, बनियान. काही लाज वाटते का तुला. आणि प्लीज.. या कपड्यात हाकलतील अशा ठिकाणी नेऊ नको." जोसेफ
"डोन्ट वरी जिथे चाललो तिथे अशेच लोक जास्त असतात." अभिश्री
अभिश्रीने ४ दिवस आधीचा तो कागद काढला ज्यामध्ये एक अड्रेस दिला होता. तिने एका टपरी जवळ गाडी थांबवली. जोसेफनी ताणुन सर्वांच्या नावाचे वडापाव खाल्ले. त्याचा अधाशीपणा बघुन सर्वांनी फक्त चहाच पिला. त्यांच्या समोर एक बाई येऊन उभी राहिली. अभिश्रीकडे बघुन ती समोरच्या गल्ली मध्ये गेली.
"चला सगळे पटकन." अभिश्री
तिने सर्वांना त्या बाईच्या मागे चालायला सांगितलं. जोसेफच्या दोन्ही हातात एक एक वडापाव होता. अर्धी गल्ली होताच ती बाई गायब. समोर चड्डीवर असलेला छोटा मुलगा आला. परत त्याच्या मागे दुसऱ्या गल्लीत. मग बनियान लुंगी घातलेले काका आणखी एका गल्लीत घेऊन गेले. सर्वांचे डोळे त्या बारीक बारीक गल्ल्यांना बघुन गर गरत होते. समोरून आलेल्या माणसाला क्रॉस करता येणार नाही एवढ्या त्या बारीक गल्ल्या. राहणारे लोक अगदीच बेताच्या परिस्थितीचे. अंगावर तोडके मोडके कपडे, उन्हा तान्हात मोल मजुरी करणारे, कचरा उचलणारे, सिग्नलवर फिरणाऱ्या लोकांसारखे ते लोक दिसत होते. ७-८ गल्ल्या बदलुन ते लोक एका डेड एंडला पोहचले. समोर फक्त भिंत पुढे रस्ता नाही. मागुन एक मुलगी धावत आली आणि तिने भिंतीवर चढुन पलीकडे उडी मारली.
"मी आता पुढचे ७ जन्म या भुल भुलैया मधुन काही निघणार नाही. माझी समाधी या भिंतीत करा आणि ओलांडून जा." जोसेफ
सर्वांनी जोसेफला उचलुन पलीकडे फेकलं आणि भिंत ओलांडली. समोरच्या छोट्याशा घरात ते लोक शिरले.
"फायनली आपण कुठे तरी आलो." दक्ष
नित्याला संपुर्ण प्रकारची खुप उत्सुकता होती ती तिच्या हिडन कॅमेरामध्ये सर्व रेकॉर्ड करत होती. दक्ष तिथे राहणाऱ्या लोकांना ऑब्जर्व्ह करत होता. हिमनिका त्यांना तिथे पोहचवण्याची मॅनेजमेंट कशी केली असेल याचा विचार करत होती. जोसेफला त्याचे उरलेले वडापाव उडी मारताना पडल्याच दुःख होत होतं. कारण त्याच्या कामाचं तिथे काहीच नव्हतं. त्या एरियाचा आणि टेक्नॉलॉजीचा दूर दूर पर्यंत काही संबंध दिसत नव्हता. अगदी मोबाईलला रेंज सुध्दा नव्हती. त्या छोट्याशा घरात समोर तीशीतला एक माणूस खुर्चीवर बसुन होता. दिसायला बारीकसा, अंगात साधा हातानी शिवलेला शर्ट पैजामा, अगदी त्या वस्तीत राहणाऱ्या लोकांसारखाच तो दिसत होता पण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. त्याने सर्वांचं नाव घेऊन स्वागत केलं. पण कोणीच त्याला ओळखलं नाही.
त्याने बोलायला सुरुवात केली.
"दक्ष.. ऑफिसमध्ये तुझ्या नावाने पैष्यांचा घोळ होणार. पण आदिनाथ आणि परीतोषचा विश्वास आहे तुझ्या प्रामाणिक पणावर. यावेळी वाचशील पण पुढे माणसं सांभाळुन जोड.
नित्या तुझ्या स्पाय कॅमेरामध्ये जे तू सुरुवातीपासून रेकॉर्ड केलंय ते काहीही दिसणार नाही.
हीमानिका आज तुला जो मुलगा बघायला येणार ते स्थळ शेवटचं असेल.
जोसेफला त्याने एक जेलुसिलच्या गोळ्यांची स्ट्रिप फेकली. तू खाल्लेल्या साडे तीन वडापाव मुळे संध्याकाळी तुझी ॲसिडिटी वाढेल त्यासाठी ही गोळी."
सर्वजण आ वासून त्या माणसाकडे बघत होते. कारण त्याने ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या त्यांच्यातही बोलण्यात आल्या नव्हत्या. मग या अज्ञात माणसाला कसकाय माहिती…?
"अभी… आदिनाथ सावरेल यातुन डोन्ट वारी." अज्ञात व्यक्ती
"अरे मला तरी सोड.
विसरले का तुम्ही सगळे..? कुठे बघितलंय याला.. गेस करा बरं.." अभिश्री
--------------------------
"शांभवी थँक यू... फोन उचलल्या बद्दल…
प्लीज फक्त एक संधी दे.." आदिनाथ
"तू मला का नाही सांगितलं की तुझे वडील अमरसिंह सरपोतदार आहेत…?" शांभवी
" मला तुझ्या भावना दुखवायच्या नव्हत्या आणि तुला गमवयच नव्हतं. सॉरी शांभवी.. बस एकदा भेट. प्लीज." आदिनाथ
"तुला माझ्या वडिलांचं नाव आधीपासुन माहिती होतं..?" शांभवी
"हो…" आदिनाथ
"म्हणुन तु तुझी ओळख लपवली. यानंतर मला कधीच काँटॅक्ट करु नको. मी हे शहर सोडून जात आहे. तुम्ही राजकारणी लोक खोटी असता आणि खोटीच राहणार. स्वतः च्या फायद्यासाठी फक्त वापर करायचा असतो तुम्हाला." शांभवी
"शांभवी नो.. प्लीज". आदिनाथ
क्रमशः
( पुढील भाग २ दिवसात नक्की पोस्ट करेन.)
शांभवीचं खरं नाव काय आहे? अमरसिंहांचा आणि तिचा काय संबंध?
त्या अज्ञात व्यक्तीला सर्वंची पर्सनल माहिती कशी समजली..? त्याची पुढे अभिश्रीला काय मदत होणार..?
जाणुन घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
कथा शेअर करताना नावासह शेअर करावी. आपल्या प्रामाणिक प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरुर कळवा.
(सदर कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. कथेतील पात्रांचा व घटनांचा वास्तविकतेशी काहीही संबंध आल्यास तो योगायोग असेल. राजकारणा विषयी संपुर्ण ज्ञान मिळवणे ही अत्यंत कठीण गोष्ट असल्याने त्यातील चुकांसाठी क्षमस्व.)
{ कथा २००४ पासुन सुरु झाली आहे असे ग्राह्य धरण्यात यावे. काळ पुढे सरकल्याने साल २०१५ सुरु झाले आहे.}
रणसंग्राम - एक झुंजार
लेखन : रेवपुर्वा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा