रणसंग्राम - एक झुंजार भाग : २२
मागील सर्व भाग खालील लिंकवर मिळतील
मागील भागात -
अभिश्री आणि तिच्या मित्रांना भेटलेला व्यक्ती कदिरन ज्याला त्यांच्याबद्दल सर्व माहिती होती. त्याच्या इंद्रायणी नगर मधील सर्व लोक म्हणजे त्याचे गुप्तहेरच असल्यासारखे होते. जे संपुर्ण शहरात विखुरले गेले होते. आदिनाथने अखेर उघड केलं की शांभवी संपतरावांची मुलगी आहे.
*************************************
"हो शांभवी चिरागचीच बहिण.. ज्याने आई बाबांना जीवे मारलं. त्या घटनेनंतर तिच्या आईने शेलारांच घर सोडलं. तेव्हापासून शांभवीच्या मनात तिच्या वडिलांचा आणि राजकारणाचा प्रचंड राग बसला. तिने त्यांचं नाव कधीच लावलं नाही. तिला त्या आठवणी विसरुन एक साधं आयुष्य जगायच होतं. पण मी तेच सर्व तिच्या आयुष्यात परत घेऊन आलो." आदिनाथ
--------------------------------------
संपतराव शेलारांना एक फोन आला आणि त्यांच्या चेहऱ्यावर बऱ्याच वर्षांनी आनंद झळकला.
"वाह पोरी शाब्बास.. मानलं तुला. जे मला १० वर्षात जमलं नाही ते तू १० महिन्यात करुन दाखवलं. माझ्या चिरागचं अधुरं स्वप्न तू नक्की पुर्ण करशील."
"अप्पा… एवढ्या रात्री कोणाशी बोलत आहा." संपतरावांचा खास कार्यकर्ता.
"ह्ममम… आहेत आपले काही नविन, जुने शुभचिंतक. लवकरच भेट घ्यावी लागेल आता." संपतराव
--------------------------------
आदिनाथच्या बोलण्याने सर्वच सुन्न झाले होते. कोणातच परत भुतकाळ अठवण्याची हिम्मत नव्हती.
"सॉरी भाई.. हे सगळं माझ्यामुळे झालं." अभिश्री
"हे कधी न कधी होणारच होतं अरे.. तू निमित्त झाली." आदिनाथ
"पण तिने अभिश्रीला ओळखलं कसं…?" भार्गवी
"तिचा भाऊ जयेश बारावीला आहे. त्याच्या कॉलेज मध्ये अभिश्री आणि गँगचे कॅंपेन झालेले तेव्हापासुन त्याने त्यांचं पेज फॉलो केलं होतं आणि आपण त्यांचं टेरेस रीनोव्हेट केलं तेव्हा जयेशनी त्यांना बघितलं. नंतर त्यांनी ते व्हरिफाय करुन आनंदानी शांभवी ला दाखवलं की आपली फॅमिली किती रेप्युटेड आहे. त्याला कुठे एव्हढा सगळं इतिहास माहिती होता." आदिनाथ
"मी जर त्या दिवशी आलेच नसते तर..?" अभिश्रीला खुप अपराधी वाटत होतं.
"आजचं मरण उद्यावर ढकलं असतं." परीतोष
"बरोबर आहे.. तिच्याबद्दल ही गोष्ट माहिती असुन मी असं खोटं वागायला नको होतं." आदिनाथ
"पण तुझं प्रेम खरं होतं ना… आपण काढू यातुन ऑप्शन. मला नाही वाटत आई बाबा नाही म्हणतील. उलट संपतरावांबद्दल ते आजही चांगलंच बोलतात. मे बी तुमच्या दोघांमुळे गोष्टी परत सुरळीत होतील. नवीन सुरुवात होईल." अभिश्री
"उलट झालं तर..?" भार्गवी
"एक्झॅक्टली.. म्हणुन सध्या तरी हा विषय घरी नको. बाबांचं इलेक्शन तोंडावर आहे. आपल्या पर्सनल गोष्टींचं पॉलिटिक्स व्हायला वेळ नाही लागत. राहिला प्रश्न आमचा.. प्रेम खरं असेल तर योग्य वेळ आली की ते पुर्ण होईल आणि नाही पुर्ण झालं तर ते खरं नसेल.. मला शांभवीला आणखी दुखवायचं नाही." आदिनाथ
सर्वजण डोक्यात बरेच प्रश्न घेऊन घरी गेले. आदिनाथ हळु हळु रुळत होता. अभिश्रीने घरी सांगितलं की वेळ आली की भाई त्यांना सर्व सांगेलच. आदिनाथ आता आधीपेक्षा जास्त कामात गढून जाण्याचा प्रयत्न करत होता. शांभवीच्या आठवणींपासुन त्याला शक्य तेवढं लांब राहायचं होतं.
विधानसभा निवडणुका जवळच आल्या होत्या. आता प्रचाराने चांगलाच जोर पकडला. कट्टा गँग आता कार्यकर्त्यांची स्ट्रातेजी समजुन त्यांचं लॉजिकल सोलुषण काढण्याचा प्रयत्न करत होती. कधी ते जमतं होतं कधी नाही. पोस्टर आणि बॅनर तर लावले पण त्यात नुसते फोटो न देता त्यात शिक्षण, शेती, स्त्री सन्मान, आरोग्य या सर्व क्षेत्रात विजयसिंहांनी केलेली काम दाखवली होती. डिजिटल बोर्ड वर पुढचे प्लॅन दाखवले जात. प्रचारासाठी भाषणं तर झाली पण अभिश्री स्वतः भाषणं न देता एक एक कार्यकर्त्याला पुढे आणायचा प्लॅन दक्ष ने सुचवला. त्यांचे विचार अपडेट करायचे असतील तर त्यांचा विश्वास जिंकण आवश्यक होतं. जे खरंच लागू पडलं. कार्यकर्त्यांना सतेज वर बोलण्याचा मान मिळाल्याने त्यांना खुप भरुनआलं.कार्यकर्त्यांचे म्होरक्या चंदू काका अगदी सातव्या अस्मानावर होते. मुलं आगव असली तरी गुणाची आहे असं सर्वांना ते सांगत.
गँगचे सर्व मेंबर संपुर्ण विभागात आपली ओळख न सांगता मुद्दाम फेरफटका मारत. कधी दुकानांच्या ओट्यावर गप्पा ऐकत, कधी पाणी भरणाऱ्या बायकांशी गप्पा मारत, तर कधी सेल्समन बनुन तिथे विषय काढत जाणून घेण्याचा प्रयत्न करत nkp पार्टी आणि विजयसिंह व अभिश्री बद्दल त्यांची मतं काय आहेत. सर्वांनी आपापले ऑब्जार्व्हेशन नोट करुन दक्षकडे द्यायचे असं ठरलं.
अभिश्रीला एक दिवस हार्दिकचं स्टेटस दिसलं.
वे टू लंडन… रेडी टू रेस… आणि एका फॉर्म्युला वन रेसिंग गाडीचा फोटो.
तिने लगेच त्याला फोन केला.
"अरे तू खरंच जाणार आहेस…? तू नंतर काही बोलला नाही मला वाटलं कॅंसल झालं असेल.. मला येऊन भेटणार होता न तू ?" अभिश्री
"कॅंसल नाही पोस्टपोन झालं होतं पण आता खरंच जातोय परवा सकाळची फ्लाईट आहे." हार्दिक
"म्हणजे तू ऐकणार नाही तर… फाईन.. मी उद्या येतेय." एवढं बोलुन तिने फोन कट केला. नेहमी हसत मन मौजी असलेला हार्दिक असा का वागत आहे तिला कळत नव्हतं.
दुसऱ्या दिवशी सकाळीच तिने शिवाला सोबत घेतलं. त्याला आश्चर्य वाटलं एरवी आवश्यक असताना ती सिक्युरिटी टळते आता स्वतः कसकाय म्हणत आहे. तिलाही ती गोष्ट कळली.
"अरे मी नाही सी.एम. काकांनी तुला बोलावलंय." अभिश्री
"ओके.. मॅडम.. " शिवा
"अरे चार लोकात ठीक आहे. इतर वेळी तरी नॉर्मल नावाने बोलत जा. किती ते रोबोट सारखं बोलणं वागणं. बायकोशी पण असच बोलशील का..?" अभिश्री
शिवाने कृतीम स्माईल दिली आणि गाडीत बसण्यासाठी वळला. अभिश्री पटकन ड्रायव्हरच्या शेजारच्या सिटवर जाऊन बसली. शिवा मागे जाऊन बसला आणि जवळपास उडालाच. कारण शेजारी गौरी बसुन होती.
" गौरे.. छान शॉपिंग कर मुंबईला दिवसभर. माझं काम झालं की पीक करते तुला." अभिश्री
शिवा काय समजायचं ते समजला. गौरीचं तिरप्या नजरेने त्याच्याकडे बघणं सुरु होतं. अभिश्री शक्य तेवढा त्यांचा संवाद करुन देण्याचा प्रयत्न करत होती.
ते लोक सरळ सी.एम.च्या घरीच पोहचले. हार्दिक त्यांना घेण्यासाठी बाहेर आला. अभिश्रीला बघुन त्याला खुप आनंद झाला. तो त्यांना आत घेऊन जात होता.
"अरे तुम्ही नुसते बोर व्हाल की… मी तसही हार्दिक वर ओरडण्यासाठीच इथे आलेय. तुम्ही जरा बाहेर शॉपिंग वगैरे करुन या." अभिश्री हसत हार्दिकसोबत निघुन गेली.
सी. एम. तिथेच बागेत बसुन होते. त्यांनी शिवाला बोलवून घेतलं. सोबतच्या सर्व लोकांना सी. एम. नी जायला सांगितलं व जवळपास १०-१५ मिनिट ते दोघंच बोलत होते. गौरीला आश्चर्य वाटत होतं. विजयसिंहांनी जेल मधुन सोडवुन आणलेला एक कैदी ज्याला त्यांनी सिक्युरिटीचं काम दिलं. त्याच्याशी खुद्द सी. एम. काय बोलत असतील…?
शिवा तिच्याजवळ गेला.
"मॅडम तुम्हाला जिथे जायचं असेल तसं ड्रायव्हरला सांगा तो येईल सोबत." शिवा
"मला मुंबई बद्दल फारसं माहिती नाहीये. आणि आज बर्थ डे च्या दिवशी असं एकटं कुठे सेलिब्रेट करावं तेही नाही माहिती. तुम्ही चलता का प्लीज…?" गौरीने एकदम केविलवाणं असं तोंड करुन त्याच्याकडे बघितलं. असं बोलल्यानंतर दगडाला ही पाझर फुटतोच.
त्याने ड्रायव्हरला तिथेच ठेवलं आणि गौरीला घेऊन निघाला. तिच्या पोटात फुलपाखरं उडत होते.
"तुम्ही सी. एम. सरांसोबत काय बोलत होते..?" गौरी
"सॉरी… आम्हाला तसं सांगणं अलाऊ नसतं." शिवा
"मी परीतोष आणि आदिनाथसोबत काही वेळा पण हाय हॅलोच्या वर कधी बोलले नाही. तुमच्याशी एव्हढा वेळ बोलले म्हणुन आश्चर्य वाटलं." गौरी
तो काहीच बोलला नाही.
"बरं आपण कुठे जात आहोत शॉपिंगला की एखाद्या रेस्टॉरंटमध्ये..? आता काय तेही सांगण्याची परमिशन नाही का..? तुमचे शब्द विकत घेण्यासाठी काही चार्जेस लागतात का..?" गौरी
गौरीच्या १०० शब्दांवर त्याचा एखादा शब्द येत. अधुन मधुन हलकीशी स्माईल. त्यातही तिला समाधान वाटत होतं. त्याने एका दुकानातुन खुप सारे चॉकलेट घेतले आणि तिच्या हातात ठेवले.
"थँक यू.. झालं का आता सेलिब्रेशन.." गौरी
परत स्माईल..
त्याने गाडी एका लहान मुलांच्या वसतिगृहा समोर थांबवली तिथेच लागुन त्यांची शाळा सुध्दा होती.
"इथे काय आहे..?" गौरी
"माझं घर.. बाबा गेल्यानंतर काही वर्ष मी इथेच होतो. हे फक्त विजयकाकांनाच माहिती आहे. आणि आता तुम्हाला.. त्यावेळी जगायला मिळालेलं निरागस आयुष्य परत कधीच जगायला मिळालं नाही. इथे आलं की निदान या मुलांच्या रुपात बघायला तरी मिळतं."
गौरीला ते ऐकुन खुप स्पेशल वाटलं. त्या वसतिगृहात लहान मोठे भरपुर मुलं होते. शिवा तिथे जाताच त्या मुलांमध्ये अगदी त्यांच्याच सारखा होऊन गेला. मस्ती, दंगा, खेळ, धुमाकूळ. जेवढा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता त्यापेक्षा कितीतरी जास्त त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. तो त्यांच्यासोबत निरागसपणे खळखळून हसत होता. गौरी ने त्यांचे खुप सारे फोटोज्, vdo काढले. भान हरपून ती त्याच्या कडे बघत होती. एक मुलगा ओढत तिला त्यांच्यात घेऊन गेला आणि ती सुध्दा त्यांच्यात तशीच लहान होऊन गेली. तेवढ्यात तिला परीतोषचा कॉल आला.
"अगं कुठे आहेस… आम्ही केक वर बसलेल्या माशा मोजू का आता… सुट्टी घेतलीस तरी केक साठी येऊ शकते न.. पटकन ये नाहीतर आम्ही फस्त करु." परीतोष
तिने तिचं मुंबईचं सेलिब्रेशन त्याला सांगितलं.
ओ"ओह. द मॅच मेकर मॅडम नी घडवून आणलं तर… मजा आहे. आता शिवा सोबत आहे म्हटल्यावर आमचा केक थोडी गोड लागणार. संध्याकाळी घेऊन ये त्याला पार्टी करु फुल्ल ऑन." परीतोष
"ओके.. अभीचं झालं की निघतो." गौरी
"म्हणजे..? अभी कुठे आहे..?" परीतोष
"हार्दिकसोबत त्याच्या घरी. त्याला लंडन ला जाण्यापासून थांबवायचं म्हणुन तर प्लॅन केला." गौरी
"व्हॉट तो गेला नाही अजुन..? मागच्या महिन्यात तर जाणार होता तो. आणि ती का थांबवत आहे त्याला..? वेडी आहे का ती..?" परीतोष
"वेडी ती नाही तू आहेस..? आता जेलस होऊन काय उपयोग..?" गौरी
"जेलस नाही गं. भिती वाटते. ही इज सो चार्मिंग, स्मार्ट, अभीची नेहमी साथ देतो तिला खुश ठेवतो. अनलाईक मी." परीतोष
"तुझी तीच लायकी आहे. मला तर वाटते तो आज तिला प्रपोज करेल आणि ती हो म्हणुन त्याला थांबवुन देईल." गौरी
"ए sss… बाई असं नको बोलू प्लीज.. मी तुझ्या पाया पडतो. एक काम कर शिवाला बोलाव." परीतोष
शिवाला बोलावुन तिने फोन स्पीकरवर टाकला. तिलाही त्याची मजा बघायची होती.
"भाई… क्या है ये..? प्लीज डू वन फेव्हर फॉर मी.. प्लीज.." परीतोष
"नो.. तू काय बोलणार हे मला माहिती आहे. मी तसं काहीही करणार नाही." शिवा
"शेवटचं यार.. प्लीज.. माझं फ्युचर धोक्यात येईल.. त्या दोघांचं जमलं तर मारेल यार मी.." परीतोष
"फाईन.. दिस इज लास्ट टाईम. अभिश्रीला जर ही गोष्ट कळली तर त्या कधीच माफ नाही करणार मला." शिवा
"डोन्ट वरी आमचं लग्न झालं की पहिल्या रात्री सगळं सांगेल तिला की शिवाला मीच सांगायचो तुझ्या बॅगला ट्रांस्मिटर बग लावायला. त्याची काही चूक नाही." परीतोष
"ती तुझं तोंडही बघत नाही आणि स्वप्न लग्नाचे." गौरी
"माते… प्लीज ऐकू दे मला.. तुझं जुळवण्यासाठी तुम्ही या बिचाऱ्याला गुंडळताच न तसही.
दोघंही ऑकवर्ड होऊन एकमेकांच्या बजुला झाले. शिवाने अभिश्रीच्या सेफ्टीसाठी एक ट्रांस्मिटर बग दिला होता. जो ती नेहमी तिच्या साईड बॅगमध्ये ठेवत. ज्यामुळे एमर्जन्सी सीच्युएशनमध्ये तिची लोकेशन ट्रॅक करता येत सोबत आजुबाजुचे आवाजही येत. परीतोषच्या सांगण्यावरून शिवा तो बग कधी कधी ऑन करत हे तिला माहिती नव्हतं.
परीतोष इअर फोन लाऊन त्यांचं बोलणं ऐकत होता.
दोघंही हार्दिकच्या रुममध्ये होते.
" हार्दिक यार बंद कर ती बॅग भरणं. कुठेही जायचं नाहीये तू. हे कार रेसिंग काय आहे नवीन..? किती रिस्क असते त्यात." अभिश्री
"पॉलिटिक्समध्ये काय कमी असते का..?" हार्दिक
"लिसन अभी.. मला नेहमी तुझा हेवा वाटतो कसं काय तू तुझ्या करिअर, पॉलिटिक्स बद्दल एवढी फोकस्ड् असते. मला असं का वाटत नाही..? डडपण नाराज असतात मला पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट नाही आणि दुसरही कुठलं पॅशन नाही. आज मला स्वतः ला शोधणं आवश्यक आहे. इथे राहिलो तर तुझ्या…" हार्दिक
"माझ्या काय..?" अभिश्री
( परीतोष त्याच्या ऑफिस मध्ये बसून "नो नो.. डोन्ट से दाट यू लव्ह हर प्लीज डोन्ट से.")
"तुझ्या मुळे काही करता नाही येणार. सारखी डोक्यावर बसशील न माझ्या तू." हार्दिक
"खरं कारण काही वेगळं आहे. सांग मला.. हे बघ आपण फक्त मित्र नाही. एक वेगळा बाँड आहे आपल्यात. तुला तुझ्या f1 कारची शप्पथ सांग मला" अभिश्री
"तू आणि परीतोष…? त्याचा विषय गोव्यातच संपला. ज्याला माझ्या भावनांची कदर नाही त्याला माझ्या आयुष्यात जागा नाही. त्याचा आता आपल्याशी काय संबंध. तू सांग बरं… का जातोय आम्हाला सोडुन…?" अभिश्री
"मला खूप रेस्टलेस होतंय.. टेरेस वर बोलुयात मोकळ्या हवेत. मला बऱ्याच दिवसंपासचन तुला काही गोष्टी सांगायच्या होत्या." हार्दिक
"ओके." अभिश्री तिची साईड बॅग रुममध्येच ठेऊन टेरेसवर गेली.
परीतोष आता त्यांचं काहीही ऐकु येत नव्हतं. तो खूप घाबरला, हात पाय थरथरत होते. तिचं मन दुखावून आपण खुप मोठी चुक केली असं त्याला वाटत होतं. त्याने ठरवलं की जर आज अभिश्रीने हार्दिकला हो म्हटलं तर तो तिच्या आयुष्यात येण्याचा कधीच विचार करणार नाही. पण आपण जगायचं कसं…? हा विचार त्याला अस्वस्थ करत होता.
---------------------------------
घरी विजय सिंह बातम्या बघत होते आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
"पुण्यातील विद्याभारती कॉलेजच्या निहार नावाच्या मुलाचा झाला खून."
"संशयित आरोपी - आमदार विजयसिंह सरपोतदारची मुलगी अभिश्री सरपोतदार."
"दोन दिवस आधीचे त्यांच्या भेटीचे सापडले सी.सी. टी. व्ही. फुटेज.. निहार हा तोच मुलगा जो कॉलेज इलेक्शनमध्ये अभिश्रीच्या विरोधात उभा राहिला होता. "
"अभिश्रीच्या भेटीनंतरच निहाल झाला होता बेपत्ता. आज खडकवासला धरणाच्या बॅक वॉटरमध्ये सापडला मृत देह."
"अभिश्रीची होणार तत्काळ पोलीस चौकशी."
अशा न्युज टी. वर सुरु झाल्या.
---------------------------------------
स्थळ कोल्हापूर
"वाह… अप्पा मानलं तुम्हाला… १० वर्षात पुण्यात राहून जे मी नाही करु शकलो ते तुम्ही इथे कोल्हापुरात बसुन करुन दाखवलं. तुम्ही इथे असल्याने कोणाला तुमच्यावर तीळभरही शंका राहणार नाही. एकंच वार बापाचं वर्तमान अन् पोरीच भविष्य खल्लास…!" अज्ञात व्यक्ती
"ही तर सुरुवात आहे. बाहेरची खेळी रांगणारच पण यावेळी घरात शिरुन वार खावे लागतील सरपोतदार कुटुंबाला. बास्स एकदा माझ्या हुकुमचा एक्का त्या घरात शिरु दे..." संपतराव शेलार
क्रमशः
हार्दिक - अभिश्री एकत्र येतील का..?
निहारचा खुन कोणी व का केला असेल..? त्यामध्ये अभिश्रीचा काही हात असेल का..?
संपतरावांसोबत तो माणूस कोण..? काय असेल त्यांची पुढची चाल..?
त्यांचं प्रेम पुढे बहरेल की त्यातुन एक राजकारणी कट शिजेल..?
जाणुन घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
कथा शेअर करताना नावासह शेअर करावी. आपल्या प्रामाणिक प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरुर कळवा.
(सदर कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. कथेतील पात्रांचा व घटनांचा वास्तविकतेशी काहीही संबंध आल्यास तो योगायोग असेल. राजकारणा विषयी संपुर्ण ज्ञान मिळवणे ही अत्यंत कठीण गोष्ट असल्याने त्यातील चुकांसाठी क्षमस्व.)
{ कथा २००४ पासुन सुरु झाली आहे असे ग्राह्य धरण्यात यावे. काळ पुढे सरकल्याने साल २०१५ सुरु झाले आहे.}
रणसंग्राम - एक झुंजार
लेखन : रेवपुर्वा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा