Login

रणसंग्राम - एक झुंजार भाग २३ #मराठी_कादंबरी

Abhishree deals with polis interrogation very fluently and Nihar murder file closes very soon. Vijay Singh wins election and again back to mla. Adinath tries to contact Shambhavi but refuse him since 3 years. Abhishree is frustrated because of upcomi

रणसंग्राम - एक झुंजार भाग : २३

मागील सर्व भाग खालील लिंक वर मिळतील

मागील भागात -

आदिनाथने शांभवीबद्दल घरी सांगायचं नाही असं त्यांना सांगितलं. आदिनाथ त्याच्या कामात स्वतः ला व्यस्त करुन घेत होता. अभिश्री आणि तिच्या चौकडीचं पार्टी तील लोकांशी चांगलं जुळत होतं.‌ हार्दिक लंडनला जाणार म्हणुन ती शिवा व गौरीला तिकडे घेऊन गेली आणि त्यांना वेळ घालवण्यासाठी बाहेर पाठवलं. परी तोष त्यांचं बोलणं ट्रांस्मिटर वरुन ऐकत होता. तिकडे विजय सिंहांनी न्युज बघितली - निहार च्या खुनाच्या आरोपाखाली अभिश्रीची पोलीस चौकशी.

***************************************

"ही तर सुरुवात आहे. बाहेरची खेळी रांगणारच पण यावेळी घरात शिरुन वार खावे लागतील सरपोतदार कुटुंबाला. बास्स एकदा माझ्या हुकुमचा एक्का त्या घरात शिरु दे..." संपतराव शेलार

----------------------------------

हार्दिक आणि अभिश्री टेरेसवर बोलत होते.

"ह्ममम… बोल आता. अचानक असं काय झालं की तु चक्क देश सोडुन जातोय??" इथे काय गाड्या नाहीत का..? लंडनला असं काय शिकायचं जे इथे नाही जमणार..? बरं १-२ वर्ष नाही तू तर नेहमीसाठीच म्हणत आहेस..? सर्व उत्तरं हवी आहेत मला." अभिश्री

हार्दिक एवढे प्रश्न ऐकुण गोंधळाला.

"यू नो इट.. मला पॉलिटिक्स आवडत नाही आणि इथे राहिलो तर घरचे बाहेरचे सगळे मला त्यात ढकलत राहतील. मला स्वतः चं असं काही शोधायचं आहे. ज्यासाठी मला शांतता हवी आहे." हार्दिक

"बरोबर आहे तुझं. स्वतः चं असं काही हवंच. बाबाची मुलगी याशिवाय माझीही ओळख मला तयार करायची आहे. पण त्यासाठी तू इंडियामध्ये काही शोधु शकतो." अभिश्री

"कारण… मला आठवण येत राहील." हार्दिक

"कोणाची…? कोणी आवडते का तुला..?" अभिश्री

हार्दिक ने संपुर्ण बळ एकवटलं...

"तू… अभी.. आय…" हार्दिक

"अभिश्री…" मागुन सी.एम. नी आवाज दिला.

"तुला लगेच पुण्यासाठी निघावं लागेल." त्यांनी तिला न्युज मधील प्रकार सांगितला. निहारच्या खुनाचा तिच्यावर आळ आल्याबद्दल.

"काका… खरंच मी हे…" अभिश्री

"आय नो बेटा… तू निघ आता.. आपल्या प्रायव्हेट जेटने जा.. तिकडे पोलीस स्टेशनमध्ये सर्व अरेंजमेंट तयार असेल. तू शांत पने उत्तरं दे." सी.एम.

"मी पण निघतो तिच्या सोबत." हार्दिक

"नको…" दोघंही एकदम बोलले.

"ते सी. एम. आहेत. तू माझ्या बरोबर आला तर त्यांचही नाव यात गोवल्या जाईल. हे अपोजिट पार्टीतील लोकांना फेवरेबल ठरेल. आणि मी एकटी नाहीये." अभिश्री

तेवढ्यात विजयसिंहांचा तिला फोन आला.

"बाबा मी एकदम ठीक आहे. तू काळजी करु नको." अभिश्री.

हार्दिकला या गोष्टीचा प्रचंड राग आला. त्याला गोष्टी सरळ सरळ करणे जास्त पसंत होते. मैत्रिणीला आधाराची गरज असताना रेपयुटेशन साठी न जाणे हे त्याला पटत नव्हते. सी.एम. आणि त्याच्यात यावरुन बराच वाद झाला. अभिश्री फोनवर बोलताना दुरुन तो बघत होती. तो तडक तिथून निघाला. 

"प्लीज डोन्ट स्टॉप मी अटलिस्ट नाऊ. तुमचे हे खेळ मला नाही सहन होत. पण एवढं नक्की ज्या दिवशी तुला माझी साथ हवी असेल त्यादिवशी फक्त माझा विचार मनात आणायचा. तुझा मित्र तुझ्या सोबत असेल." हार्दिक.

अभिश्रीने त्याला मिठी मारली. "आणि तू आला नाही न.. तर असशील तिथून कान धरुन परत आणेल. " अभिश्री

सी.एम. तिला सोडण्यासाठी बाहेर पर्यंत आले.

"काका.. हार्दिकला खरंच त्याच्या मनाची शांतता मिळणार असेल तर नका थांबवू. तो नक्की काहीतरी वेगळं करुन दाखवेल. आणि आपल्यात परत येईल" अभिश्री

"तू आत्ता यावेळी हा विचार करु शकते कमाल आहे. अशा प्रसंगी तुझा हा अडीग आणि निर्भिड स्वभाव तुला पुढे खुप कामी पडेल." सी.एम.

"थँक यु काका.. तुम्ही सगळे सोबत असल्यामुळे मला एवढं बळ मिळालंय." 

शिवा आणि गौरी बाहेरच उभे होते. अभिश्री त्यांना घेऊन एअर पोर्टकडे निघाली. ते लोक निघुन गेल्यावरही सी. एम. तिथेच शुण्यात बघत उभे होते.

"लक्ष्मी… फार घाबरली का रे पोर…? खुनाचा आळ म्हणजे फार मोठी गोष्ट झाली. हार्दिकला पाठवायला हवं होतं का तिच्या सोबत." गिरिजा (मिसेस. रणदिवे)

"तिच्याच विचारात उभा होतो इथे. तिच्याकडे बघून आमच्या तरुणपानाच्या आठवणी ताज्या झाल्या. असंच बेधडक, बेफाम आयुष्य होतं." सी.एम.

"मग मी आले.. आणि सिंह पिंजऱ्यात अडकला न…" गिरिजा

"नाही ग.. तू आहेस म्हणुन माझं राजकारणी वेड सहन करतेस. पण ही मुलगी बेफाम आहे आणि तिला तशी दिशा सुध्दा मिळत आहे. आजच्या प्रकरणातून तर ती बाहेर पडेलच हे तिलाही माहिती आहे त्यामुळेच ती एवढी अडिग आहे. पण हा प्रसंग तिच्या आयुष्यातील एक मोठा टर्निंग पॉईंट ठरेल. सी. एम. (लक्ष्मीकांत रणदिवे)

"हार्दिकला तिच्यासोबत जाण्याची खुप इच्छा होती. खुप नाराज झाला तो. उद्या ऐवजी आजच लंडनला निघायचं म्हणतोय." गिरिजा

"ह्ममम्… जाऊ दे त्याला. आता त्याची काळजी करायची गरज नाही. त्याची गाडी रुळावर आणण्याचा मार्ग दिसतोय मला." सी. एम.

म्हणजे…?" गिरिजा (मिसेस. रणदिवे)

"योग्य वेळ आली की बोलू त्यावर सध्या मलाही खात्री नाही." सी.एम.

पुण्यात पोहचताच गौरी तिच्या हॉस्टेलवर गेली. शिवा आणि अभिश्री पोलीस स्टेशनला पोहचले.

समोर परीतोष वकीलासोबत उभा होतं. घरच्या कोणाचं  तिथे न येणं योग्य होतं याची तिला कल्पना होतीच. पण परीतोष येईल  असं वाटलं नाही. त्याने ती येण्यापूर्वीच वकीलाकर्वे पोलिसांना संबंधित सीसीटीव्ही फुटेज देऊन ठेवल्या होत्या. त्यात अभिश्री २ दिवस आधी निहारला भेटली पण त्यांचं बोलणं, संवाद अगदी नॉर्मल होतं. कुठलाही वाद विवाद त्यात दिसुन नाही पडला. तिला भेटल्या नंतर तो ईतर बऱ्याच लोकांना भेटला ज्यामध्ये काही अज्ञात पाठमोरे असणारे लोक होते ज्यांच्या सोबत त्याचं भांडण झालं. आणि तो नंतर गायब झाला. तिथे असणारे ऑफिसर चौकशी साठी तिला आत घेऊन गेले. तिने अगदी खणखणीत आवाजात सर्व गोष्टी विस्तृतपणे सांगितल्या. 

निहारने स्वतः कॉल करून तिला कॉलेज बाहेर भेटायला बोलावले. त्याने कॉलेज इलेक्शनमध्ये पैश्याच्या अमिषाला बळी पडून अभिश्रीला खुप त्रास दिला आणि कॉलेजच्या मुलांच जे नुकसान केलं त्याबद्दल तो खजील होता आणि आता त्याला प्रामाणिकपणे काम करुन अभिश्रीच्या गँगमध्ये सामील व्हायचं होतं. अभिश्रीने त्याला इतर मित्रांशी बोलुन कळवते असं तेव्हा सांगितलं आणि त्याच्या या विचाराचं कौतुकही केलं. तिला भेटुन तो खुश होता हे सीसीटिव्ही मध्ये दिसत होतं.

तिथे असणाऱ्या ऑफिसरला तिच्या निर्भिडपणाचं आश्चर्य वाटलं. साध्या सुध्या चौकशीमध्ये मोठ्या मोठ्या लोकांना घाम फुटतो आणि ही एवढीशी पोर अस्खलितपणे उत्तरं देते.

"मॅडम... खुनाच्या चौकशीमध्ये न घाबरता बोललात. काय बोलायचं ते पढून अलात की करतानाच सर्व ठरवुन केलं." ऑफिसर

"जो आरोप माझ्यावर होतोय मी तसं काहीही केलं नाहीये. माझा बाबा म्हणतो.. काही केलं नसेल तर घाबरायच नाही आणि जे काही करायचं ते न घाबरता करायचं. " अभिश्री

ऑफिसरने काही न बोलता तिला बाहेर पाठवलं.

"साळुंके लक्ष ठेवा या मुलीकडे. वितभर मुलगी वादळाची चाहूल देऊन गेली." ऑफिसर

"लहान असली तरी सिंहाचं मुल ती.. गर्जना केल्यावाचून राहणार काय…?" साळुंके

"ह्ममम… पण आपल्या मागचा ताप वाढवतात त्याच काय. असो चहा आणा कडक डोकं बधीर झालंय." ऑफिसर

सी.एम.चा दबाव आणि ठळक पुराव्यांमुळे अभिश्रीची चौकशी लवकर आटोपली. नेहमी तिला टोचुन बोलणारा परीतोष आज एकदम शांत होता. त्याच्यासोबत ती घरी पोहचली.  ते यायच्या आत पी. ए. दळवींनी मीडियाला घरासोमोरून परत पाठवून दिलं. रात्री जेवताना घरी मुद्दाम सर्वांनी वातावरण हलकंच ठेवलं. अभिश्री वर वर जरी हसत असली तरी तिच्या मनात एक  अपराधी भाव निर्माण झाला होता. तिच्या राजकारणात येण्याच्या महत्वाकांशेमुळे हे घडत आहे याची तिला जाणीव झाली. 

रात्री अभिश्री झोपणार नाही हे माहिती असल्याने विजयसिंह तिला बोलण्यासाठी तिच्या रुम मध्ये गेले. सोबत विजयसिंह स्पेशल जिंजर टी सुध्दा नेली. टेरेसवर बसुन चहा पीत त्यांच्या चांगल्याच गप्पा रंगल्या. विजयसिंहांनी तिला  सी.एम रणदिवे, दळवी यांच्या सोबत मिळुन तोंड दिलेले त्याकाळचे बरेच किस्से, प्रसंग रंगवुन सांगितले. 

"राजकारणात आपण घडलेल्या चुकीच्या गोष्टी तुझ्यामुळे घडत आहे याचा अपराधीपणा स्वतःवर घेण्यापेक्षा तू त्यात चुकीची नाही हे लक्षात ठेव. कदाचित पुढे तुला अशा गोष्टी कराव्याही लागतील ज्याचे सर्वस्वी परिणाम तुझ्या हातात नसतील. पण एक नियम नेहमी पाळायचा.." 

त्यावर अभिश्री बोलली…

"पहिली चाल आपण नाही खेळायची. रणशंख आपल्याकडून कधीच फुंकल्या जाऊ द्यायचा नाही." 

दोघंही खळखळून हसले.

------------------------------------

निहार खुन प्रकरण लवकरच निवळलं. दारूच्या नशेत पाण्यात पडुन त्याचा मृत्यू झाला असा निकाल लाऊन त्याची फाईल क्लोज करण्यात आली. तरी अभिश्रीच्या मनात ती कायम कोरली गेली. विजयसिंहांचा अपप्रचार व अभिश्रीला अडकविण्यासाठी निहारच्या अपघाताचा वापर करण्यात आला होता की तो घडवुन आणण्यात आला होता हे तिला शोधुन काढायचं होतं. पहिला संशयी मंत्री मोहितेंचा मुलगा सौरभ हाच होता. कॉलेज इलेक्शनमध्ये त्यानीच निहारला भडकवलं होतं.

विधानसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला होता. सर्वत्र जय्यत तयारी सुरु होती. जुन्या नवीन विचारांचा कधी सुर तर कधी बेसूर ताल वाजत होते. पी. ए. दळवी दोन्ही विचारांचा समतोल साधण्याचा कसोशीने प्रयत्न करत होते. खडकवासला विभागातील लोकांसाठी विजयसिंह सर्वस्व होते आणि अभिश्रीने त्यांची मन जिंकण्यात कुठलीच कमी ठेवली नव्हती. 

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विजयसिंह आमदार म्हणुन निवडून आले. सर्वत्र जल्लोष आणि जयघोषाने परिसर दुमदुमत होता. पण निहार प्रकरणापासून अभिश्री व कट्टा गँग खुप सावध झाली. आपल्या छोट्या छोट्या हालचाली किती खोलवर परिणाम करु शकतात याची झलक त्यांनी बघितली.

---------------------------------------

"अप्पा… काय हे.. निहार प्रकरण उचलुन धरायला पाहिजे होतं. यंदा आमदारकी तर सुटली असतीच त्याची. आणि लेकही पुन्हा कधी वर आलीच नसती. स्वतःच तयार केलेली संधी गमावली आपण." अज्ञात इसम

"सिंहाची शिकार करण्यासाठी बोकडाचा बळी द्यावा लागतो. यंदाचं इलेक्शन तसच समजा. नुसतं हरवायच नाही त्यांना रडवायच आहे. तुम्हाला नाही समजणार. आत्ता कुठे डाव रचुन झालाय आता सोंगट्या आपल्या हिशोबाने चालतील. बस बघत राहा" संपतराव शेलार.

******************************************

तीन वर्षांनंतर

Love you My everything…

Good morning..

आज तीन वर्ष झाली रोज तुला msg करुन दिवस सुरु होतो आणि संपतो ही तुला msg करूनच. तुझा आजवर एकदाही reply आला नसेल तरी मला खात्री आहे तू माझे msg रोज वाचत असशील. माझी चूक क्षमा करण्यासारखी नसेल तरी आपलं प्रेम तुला माझाकडे घेऊन येईल हे नक्की.

फक्त तुझाच - आदिनाथ.

तीन वर्ष आदिनाथ रोज नित्यनियमाने शांभवीला msg करत होता. ती प्रत्येक वेळी नंबर ब्लॉक करत आणि आदिनाथ त्याच्या ट्रिक्स वापरुन तो unblock करुन परत msg करत आणि मगच ऑफिससाठी बाहेर पडत. जसं ३ वर्षापूर्वी ते फोन वर बोलताना करत.

अभश्री आज तिच्या आर्ट गॅलरीच्या टेरेसवर धुमाकूळ घालत होती. जो समोर येईल त्याच्यावर तिचे अंगार बरसत होते. तीन वर्षात तिच्या artifacts, पेंटिंग्ज, गिफ्ट आर्टिकलसाठी भरघोस प्रतिसाद मिळाला होता. सध्या गणपतीच्या शाडू मुर्त्यांची खुप मोठी ऑर्डर तिला मिळाली होती. त्यासाठी बचत गटातील काही बायकाही लावल्या होत्या. 

अभिश्रीने एक बकेट पाणी घेऊन झाडाखाली झोपलेल्या जोसेफवर ओतलं.

"जोसेफ sss… बिंडोका उठ… दोन दिवसांवर गणपती आलेत आणि तू झोपा काढतोय.. मुर्त्यांचे करल संपलेत, बाप्पाचे दागिने राहिलेत, फिनिशिंग राहिलंय.. झोपू कसा शकतो तू." अभिश्री

चिल्ल अभी.. आत्ताच झोपलाय तो. आणि सगळं काम अगदी सुरळीत सुरु आहे दरवर्षीप्रमाणे. यावर्षी ऑर्डर मोठी असली तरी आपले लोक पण भरपुर आहे." हिमानिका

"हो पण म्हणुन दिवसा ढवळ्या झोपायच का.. सामान आणायला सांगितलं होतं तुला कुठे आहे ते." अभिश्री

जोसेफ डोळे चोळत आरामात उठला. आता त्याला सवय झाली होती याची. वर्कलोड वाढल्या नंतर अभिश्रीच्या तावडीत सापडनारा हक्काचा बकरा तो. 

"बिन पगारी नोकर बनवून ठेवलंय गरिबाला... विघ्नहर्त्या तूच वाचव आता या महिषासुर मर्दिनी पासुन आता सहन होत नाही रे देवा.. बाप्पा ये धाऊन भक्तासाठी." 

तिकडून स्पीकरवर राहत फतेह अली खानच गाणं सुरु झालं..

सानु इक पल चैन ना आवे

सानु इक पल चैन ना आवे

सजणा तेरे बिना

सजणा तेरे बिना…

परीतोष हातात वडापावच्या पिशव्या घेऊन आला आणि येताच मंद आवाजात गाणं सुरु केलं.

"काय तुम्ही असं शांतपणे उपाशी बसून काम करता. म्युसिक वगैरे लावत जा जरा, पोटभर खात जा.

"आमचं म्युझिक म्हणजे हिटलरचा ओरडा" दक्ष

"आणि खायला पण तेच." नित्या

अभिश्रीने त्यांच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकला.

परीतोषने तिच्याकडे दुर्लक्ष करत भराभर सर्वांना वडापाव वाटले.

मागे असलेल्या दोन बॉक्स मधुन समान काढून घेतलं. 

"मावशी गँग हे घ्या वडापाव आणि तुमचं सर्व सामान. थेट बोरी आळीतून आणलंय. संपलेले रंग, बाप्पाचे दागिणे आणि पॅकिंगचे बॉक्स खाली गाडीत आहेत." परीतोष

जोसेफनी परीतोषला मिठीच मारली.

"You are the life savior. जुग जुग् जिओ.. तुला हवी ती बायको मिळो." जोसेफ

परीतोषने त्याच्या बॅग मधुन एक पाउच काढलं त्यात थंडगार असं रोज मिल्क होतं. अभिश्री टेन्शन मध्ये असली की तो रामबाण उपाय असायचा. त्याने ते रोज मिल्क दक्षला दिलं तिला देण्यासाठी. 

परीतोष घायाळ नजरेनी तिच्याकडे बघत होता आणि ती सपशेल दुर्लक्ष. 

जानते है हम रुठे हो तुम...

जानते है हम क्यों रुठे हो तुम...

बस एक बार झाक जो लो दिलं मे हमारे..

सारे गिले शिकावे भुला देंगे हम..

  • परीतोष

---------------------------------------

विजयसिंह आणि आदिनाथ हॉलमध्ये बसुन पेपर वाचत असतानाच गणू काकांनी बाहेर संपतराव आल्याचा निरोप दिला. त्यांचा मुलगा चिरागला जाऊन आता जवळपास १५ वर्ष झाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच ते विजय सिंहांच्या घरी आलेले. आदिनाथच्या पोटात गोळाच आला. 

क्रमशः

पुढील भाग येत्या शुक्रवारी पोस्ट करण्यात येईल.

निहारचा नक्की अपघात होता की खून..? सौरभचा त्याच्याशी काही संबंध असेल का..?

परीतोष अचानक एव्हढा कसा बदलला..? आणि अभिश्री त्याच्यावर का नाराज आहे…?

१५ वर्षानंतर संपतराव त्यांच्या घरी कशासाठी आले असतील…?

जाणुन घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

कथा शेअर करताना नावासह शेअर करावी. आपल्या प्रामाणिक प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरुर कळवा.

(सदर कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. कथेतील पात्रांचा व घटनांचा वास्तविकतेशी काहीही संबंध आल्यास तो योगायोग असेल. राजकारणा विषयी संपुर्ण ज्ञान मिळवणे ही अत्यंत कठीण गोष्ट असल्याने त्यातील चुकांसाठी क्षमस्व.)

{ कथा २००४ पासुन सुरु झाली आहे असे ग्राह्य धरण्यात यावे. काळ पुढे सरकल्याने साल २०१८ सुरु झाले आहे.}

रणसंग्राम - एक झुंजार

लेखन : रेवपुर्वा

0

🎭 Series Post

View all