❤️❤️❤️ईरा दिवाळी अंक 2021 ❤️❤️❤️
बहुप्रतिक्षित ईरा दिवाळी अंक 2021 आम्ही आपणासमोर सादर करत आहोत एका सुंदर स्वरूपात. अंकात आपण वाचू शकता विविधांगी लेख, कथा, विनोदी साहित्य, कविता, expert's talk, दिवाळीच्या रांगोळ्या, रेसिपीज आणि बरेच काही. यावेळच्या दिवाळी अंकाचे खास आकर्षण म्हणजे "बाल ईरा". लहान मुलांना वाचनाची गोडी लागावी आणि पुस्तकाच्या माध्यमातून विविध उपक्रमात त्यांनी व्यस्त राहावे यासाठी खास विभाग.
मर्यादित प्रति..
आजच बुक करा खालील फॉर्म भरून.
रणसंग्राम - एक झुंजार भाग : २६
मागील सर्व भाग खालील लिंकवर मिळतील
मागील भागात -
शांभवी आणि तिच्या घरचे स्वतःहुन आदिनाथकडे परत आले. शांभवी आता कायमची आदिनाथची झाली होती पण तिचे वडील संपतराव शेलार कायम त्यांच्यातुन लांब राहतील या अटीवर. कट्टा गँगने सर्व गणपती मोठ्या टँकमध्ये शिरवुन ती माती घोले गणेश वनात नेऊन त्यात झाडे लावली. कदिरनने अभिश्रीच्या सांगण्यानुसार शहरातील इतर विभागांची माहिती काढली. जी बघुन सर्व चकित झाले. त्यावर विजयसिंह आणि त्यांचे पी. ए. दळवी यांनी आणखी काही गोष्टी सुचवल्या. ते सर्व ऐकुन अभिश्रीची अवस्था सुन्न झाली आणि ती परीतोषला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये गेली.
***********************************
अभिश्रीने ऑफिस केबिनमधील लॅंडलाईनवर कॉल केला एका मुलीने कॉल उचलला.
"सर बिझी आहेत. मी त्यांची पी. ए. बोलत आहे. थोड्या वेळाने कॉल करा"
आता तिचा पारा १०० क्रॉस झाला. तिने तडक जाऊन त्याच्या केबिनचं दार जोरात उघडलं आणि सर्व भिंती हादरल्या.
परीतोष चेअरवर बसुन समोर मोठ्या स्क्रीनवर व्हिडियो कॉन्फरन्स घेत होता. अभिश्रीचा असा अवतार बघुन त्याचे धाबेच दणाणले तसा तो घाबरुन ताडकन उभा राहिला आणि बाजुला असलेली त्याची असिस्टंट त्याच्या हातात येऊन आडवी झाली. ते बघुन अभिचे अधिकच मोठे झाले.
"तू समजतोस काय स्वतःला..? वाटेल तेव्हा बोलतो, वाटेल तेव्हा ॲटिट्युड दाखवतो." अभिश्री
गोंधळ ऐकुन गौरी लगेच तिथे आली.
परीतोषने गडबडून त्याच्या सेक्रेटरीला धाडकन खाली सोडलं.
कॉन्फरन्स मधील सर्व डेलिगेट्स एखाद्या मूव्हीच्या सीन प्रमाणे चहा बिस्कीट खात तो ड्रामा एन्जॉय करत होते. आजवर त्यांनी डॅशींग, जबाबदार असा आदिष एम्पायरचा मालक या भूमिकेमध्ये बघितलं होतं. जो सराईत पने लाखोंच्या डील हॅण्डल करतो. आता अशा परिस्थिती त्याला बघणे म्हणजे आश्चर्यच. गौरीने लगेच येऊन परिस्थिती सांभाळली व कॉन्फरन्स साठी पुढची तारीख दिली. सर्वांनी परीतोषला हसत हसत all the best दिलं. खाली पडलेली त्याची नवीन सेक्रेटरी कंबर चोळत उभी राहिली.
"बॉसी… व्हॉट्स दिस.. सेल्फी न घेताच खाली पाडलं मला."
"ए गौरी.. या हिडिंबाला घेऊन जा न इथून…
"कोण हिडिंबा… मी??
"नाही sss… नाही sss… नाही sss… यू आर माय सिंड्रेला...रे…" परीतोष
"बॉस्सी… व्हॉट इज हिडिंबा… नविन सॉफ्टवेअर का…?" सेक्रेटरी
"ए पोरी… चल इथून नाहीतर फुकट करप्ट होशील." गौरी
अभिश्रीने त्या मुलीचा ताल बघितला. नुकतीच कॉलेज पास आऊट मुलगी. तोडके मोडके कपडे, भडक मेक अप, सेन्सचा पत्ता नाही. ही काही परीतोषची चॉईस असु शकत नाही. त्याच्या वडिलांनी केलेली मस्करी तिच्या लक्षात आली. त्यामुळे ती शांत झाली आणि थोडी वरमली.
" अरे sss… इट्स ओके… फार काही महत्त्वाची नव्हती मीटिंग. सॉरी तुझे कॉल अटेंड नाही केले. जाम बोअरिंग मीटिंग सुरु होती." परीतोष
"तसही तुमचं ऑफिस बोअरिंगच आहे." अभिश्री
"हा… आता तुझ्या आर्ट गॅलरी एवढं इंटरेस्टिंग कसं असेल ते. असो एक भारी जागा आहे आमच्या इथे पण." परीतोष
एवढं बोलुन तो तिला वरती एका मजल्यावर घेऊन गेला.
"हा काय प्रकार… नुसताच मोकळा हॉल, फर्निचर नाही. खिडक्या, जाळ्या काही नाही बसवलं. पडेल ना कोणी." अभिश्री
"अगं हा Refuge area आहे प्रत्येक बिल्डिंग मध्ये सोडावा लागतो. आग किंवा भूकंपाच्या वेळी जर खाली जाता येत नसेल तर इथे यायचं मग फायर ब्रिगेड वाले या मोकळ्या खिडकीतून रेस्क्यू करतात. कधी कधी कंटाळा आला की शांततेसाठी आम्ही इथे येऊन बसतो." परीतोष
तो शांतपने खिडकी जवळ जाऊन उभा राहिला. कोटच्या खिशातून एक डब्बी काढली. ज्याचा खेचुन फूट भर लांब एक टेलिस्कोप तयार केला आणि वर अवकाशात बघितलं.
"काय बघतो तू अवकाशात रोज…? मला तर कळतच नाही." अभिश्री
परीतोष नुसताच तिच्या चेहऱ्याकडे बघत होता.
"काय सांगु तुला.. मी अवकाशात काय बघतो…
काय सांगु तुला.. मी अवकाशात का बघतो…
त्या लक्षावधी तऱ्यांना रोज हरताना बघतो…
वेडे.. आपल्यातच पैज लावत पोरखेळ करतात...
आणि तुला बघताच एका दमात गळून पडतात…
"अरे sss… काय म्हणतेय मी बोल की काही." अभिश्री
"हा ss… अरे हल्ली खुप इंटरेस्टिंग दृश्य आहे वरती. अगदी रोमँटिक." परीतोष
त्याने तिच्या हातात टेलिस्कोप दिला.
"असा योग फार क्वचित येतो. संध्याकाळच्या वेळी काही दिवसांसाठी शुक्राची चांदणी चंद्राच्या अशीच अगदी जवळ येऊन पोहचते. दोघांचंही सौंदर्य मग एकमेकांच्या प्रकाशाच्या परिस्पर्षाने न्हाऊन निघतं." परीतोष
टेलिस्कोप ॲडजस्ट करण्यासाठी बोलता बोलता तो अगदी तिच्या जवळ येऊन पोहचला. तिला कळत नव्हतं की आपण अवकाशातील रम्य दृश्य बघण्यात रमतोय की त्याच्या स्पर्शात. तेवढ्यात मागून धाडकन दरवाजा वाजला. त्यांच्या हातातील टेलिस्कोप खिडकीतून थेट खाली पडला. समोरुन शांभवी येताना दिसली. तिला बघुन दोघंही दचकले आणि एकमेकांच्या लांब झाले. पण ती गोष्ट शांभवीच्या लक्षात आली.
मागून गौरी आणि आदिनाथ सुध्दा आले.
परीतोषने मिष्खील पने हसणाऱ्या गौरी कडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. शांभवीला तो प्रकार हळू हळू समजत होता. पण आदिनाथ मात्र यापासून अनभिज्ञ होता.
"काय रे… गौरी सांगत होती तू हिला चंद्र तारे दाखवण्यासाठी घेऊन गेलाय म्हणुन. गाढवाला गुळाची चव असते का कधी..?" आदिनाथ
"भाई..ss…प्लीज" अभिश्री
शुक्राची चांदणी बघत तिथे बराच वेळ त्यांच्या गप्पा रंगल्या. लवकरच सर्वांनी एकत्र इंगेजमेंट शॉपिंगसाठी जाण्याचा प्लॅन ठलरा.
----------------------------------
एक दिवस ठरवुन सर्वजण मॉलमध्ये जमले. आदिनाथ आणि शांभवीची एंगेजमेंट आठवड्यावर येऊन पोहचली. एका मोठ्या शोरुम मध्ये आदिनाथ - शांभवीची स्पेशल सबराई सुरु होती. शांभवीला एवढा खर्च करणे पटत नव्हते पण आता तिला कोणाचं मन दुखवायचं नव्हतं, खास करुन आदिनाथचं. त्यामुळे ती पुर्णपणेत्याच्या रंगात रंगली होती. थोडावेळ तिथे थांबुन अभिश्री आणि तिची चौकडी इकडे तिकडे फिरत होते. परीतोष त्यांना उशिरा जॉईन होणार होता.
गौरी आता शिवावर चांगलाच हक्क गाजवायला लागली होती. तिने कॉल करुन त्याला जबरदस्ती मॉलमध्ये बोलवुन घेतलं. शिवा आता तिच्यासोबत बराच मोकळा वागत होता. तिने शिवाला मॉल मधील ५० एक शॉप्स मध्ये फिरवलं पण त्याने एकही ड्रेस पसंत केला नाही. एक छोटीशी बॅग त्याच्या हातात दिसली पण त्याने काय घेतलं हे तिला दाखवलं नाही.
"ह्ममम्… मला वाटते माझा शॉपिंग सेन्स तुम्हाला आवडत नसावा. असं कधी होत नाही सहसा."
"तसं नाही पण मी खर्च आवश्यकता बघुन करतो." शिवा
तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला. ती सरळ त्याला मॉल बाहेरच्या घेऊन गेली. तिथे ती जे जे सिलेक्ट करत गेली ते तो डोळे बंद करुन बॅगेत भारत गेला. शेवटी दोघंही थकुन एका भेळच्या गाडीजवळ थांबले.
"इथे थांबु नाही.. निघू लवकर.." असं म्हणुन शिवा तिला जवळ जवळ ओढत घेऊन जायला निघाला. तेवढ्यात त्यांच्या समोरुन दोन माणसं आली. जवळ येताच त्यांच्या बाईक चा स्पीड वाढला. मागे बसलेल्या माणसाने एक चाकू काढला आणि शिवावर उगारणारंच की गौरी त्याच्यामध्ये आली.
-----------------------------------
नित्या मॉल फिरता फिरता लिफ्ट मध्ये घुसतच होती की तिला आजूबाजूला विचित्र हालचाली जाणवल्या. लाईट बंद सुरु होत होते, सीसीटीव्ही मधुन वेगळा आवाज येत होता. तेवढ्यात लिफ्टचा दरवाजा उघडला आणि ती आत गेली. आत जाताच लिफ्ट अचानक बंद पडली. समोर काळा गॉगल घातलेला, स्लिव लेस शर्ट, अंगावर विचित्र टॅटू असलेला धिप्पाड इसम तिच्या कडे बघत उभा होता.
-----------------------------
तिकडे विजयसिंह पी. ए. दळवींना जबरदस्ती संपतरावांकडे पुण्यापासून दीड तास दूर शिरूरकडे घेऊन निघाले.
संपतरावांच्या घरी आधीच एक मैफिल जमुन होती.
"अजुन किती वाट बघायची. कधी येणार आपला खेळ रंगात. तीन वर्ष होऊन गेली. १० वर्ष गाजवत असलेलं शिक्षण मंत्री पद तुमच्या एका शब्दावर सोडलं अप्पा…" संपतरावांच्या पक्षात असलेले माजी शिक्षण मंत्री आणि आजी आमदार थोरात. एवढे दिवस संपतरावांना भेटणारी अज्ञात व्यक्ती हीच. विजय सिंहांमुळे त्यांचं मंत्रीपद गेलं हे त्यांना सहन होत नव्हतं.
"धीर धरा थोरात.. आम्ही पण आहोत की तुमच्या सोबत. आपले मेडिसिन किंग पण पोहचतिलच थोड्या वेळात. अप्पा घात लाऊन एकच वार करुन शत्रूला नेस्तनाबूत करतात. माझेपण बरेच हिशेब चुकते करायचे आहेत. दोघं बाप लेकीनं मिळुन खुप नुकसान केलं आमचं. माझ्या पोरगा सौरभचा एक डोळा निकामी केला. पण एक गोष्ट समजली नाही. तुमची मुलगी तर तुम्हाला बोलत नाही आणि तिकडे येऊ पण देत नाही मग तुम्ही त्यांच्या घरात शिरणार कशे…? " आमदार मोहिते
"आत्ता कुठे डाव रंगात आलाय. शांभवी तर फक्त एक प्यादा होती. एकदा का शेवटच्या घरात पोहचली की तिथे तयार होणार आपला वजीर." संपतराव शेलार
"म्हणजे…? शांभवी तुमच्या कडून उभी राहणार नसेल तर आपला काय फायदा..?
------------------------------------
"विज्या… गाडी वळव परत चल. मला खूप निगेटिव्ह वाईबस येत आहेत त्या दिशेनी. तसही शांभवीनी त्यांना साखरपुड्याला येण्यासाठी मनाई केली आहे. मग औपचारिक निमंत्रण कशाला..? तसही खरंच तो माणूस परत आपल्या आयुष्यात नको." पी. ए. दळवी
"दळव्या तू आधी तुझं ते रेकी, विपश्यना बंद कर बरं. लग्न तर केलं नाही उगाच कुठे कुठे भटकत बसतो. निगेटिव्ह, पॉझीटीव्ह करुन डोक्याचं भजं करुन ठेवलंय. तुला बायको नाही पण मला तरी माझ्या बायको सोबत सुखानी राहु दे. " विजयसिंह
"तू ऐकणार नाही ठरवलंच असेल तर ठीक. पण मी घराच्या आत येणार नाही. गाडीतच थांबणार.." पी. ए. दळवी
क्रमशः
शांभवीला अभिश्री आणि परीतोष बद्दल कळेल का..? ती आदिनाथला त्यांच्या बद्दल सगेल का…?
शिवावर हल्ला करणारे लोक कोण असतील..? गौरीवर त्याचे काय पडसाद उमटतील..?
नित्यासमोर त्या बंद लिफ्टमध्ये कोण आलं असेल…?
विजयसिंह संपतरावांच्या घरी त्या लोकांना बघुन सावध होतील का…? त्यांचा खरा चेहरा ओळखतील का..?
जाणुन घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
कथा शेअर करताना नावासह शेअर करावी. आपल्या प्रामाणिक प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरुर कळवा.
(सदर कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. कथेतील पात्रांचा व घटनांचा वास्तविकतेशी काहीही संबंध आल्यास तो योगायोग असेल. राजकारणा विषयी संपुर्ण ज्ञान मिळवणे ही अत्यंत कठीण गोष्ट असल्याने त्यातील चुकांसाठी क्षमस्व.)
{ कथा २००४ पासुन सुरु झाली आहे असे ग्राह्य धरण्यात यावे. काळ पुढे सरकल्याने साल २०१८ सुरु झाले आहे.}
रणसंग्राम - एक झुंजार
लेखन : रेवपुर्वा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा