रणसंग्राम - एक झुंजार भाग : २७
मागील सर्व भाग खालील लिंकवर मिळतील
मागील भागात -
अभिश्री आणि परीतोषची आंबट गोड लव्ह स्टोरी आता छान रंगात येत होती. दोघंही त्याच्या ऑफिसमध्ये निवांत वेळ घालवत असताना आदिनाथ शांभवी आले. शांभवीला त्यांच्यात काहीतरी सुरु असल्याची कुण कुण लागली. सर्वजण मग त्यांच्या एंगेजमेंट शॉपिंगसाठी मॉलमध्ये भटकत होते. शिवा गौरी मॉलबाहेर शॉपिंगला गेले असताना शिवावर हल्ला झाला. नित्या मॉलमध्ये एका लिफ्ट मध्ये अडकली आणि समोर एक अज्ञात इसम आला. तिकडे विजयसिंह दळवींना घेऊन संपतरावांकडे निघाले. ज्यांच्या घरी आधीच काही लोक बसुन होती. त्यांना नेहमी भेटणारी अज्ञात व्यक्ती ही माजी शिक्षण मंत्री थोरात होते आणि त्यांच्या जोडीला आमदार मोहिते सुध्दा ज्यांच्या मुलाच्या डोळ्याला अभिश्री मुळे दुखापत झाली होती.
--------------------------------------
"विज्या… गाडी वळव, परत चल. मला खूप निगेटिव्ह वाईबस येत आहेत त्या दिशेनी. तसही शांभवीने त्यांना साखरपुड्याला येण्यासाठी मनाई केली आहे. मग औपचारिक निमंत्रण कशाला..? तसही खरंच तो माणूस परत आपल्या आयुष्यात नको." पी. ए. दळवी
"दळव्या तू आधी तुझं ते रेकी, विपश्यना बंद कर बरं. लग्न तर केलं नाही उगाच कुठे कुठे भटकत बसतो. निगेटिव्ह, पॉझीटीव्ह करुन डोक्याचं भजं करुन ठेवलंय. तुला बायको नाही पण मला तरी माझ्या बायको सोबत सुखानी राहु दे. " विजयसिंह
"तू ऐकणार नाही ठरवलंच असेल तर ठीक. पण मी घराच्या आत येणार नाही. गाडीतच थांबणार.." पी. ए. दळवी.
"ठीक आहे." विजयसिंह
दोघंही थोड्या वेळात संपतरावांकडे पोहचले. ते दोघं येणार त्या आधीच संपतरावांकडील मंडळी आधीच वरती जाऊन बसली होती. दळवींचा मुड तिकडे गेल्यानंतर आणखीच बीचकला. तोंड पडून का होईना ते मित्राखातर आत गेले.
संपतरावांनी विजयसिंहांचं भरभरून स्वागत केलं. शाही भोज ठेवले. दळवींनी परान्नाचा त्याग केला या नावाखाली पाणी सुद्धा पिलं नाही. सर्वांना त्यांच्या विक्षिप्त स्वभावाची कल्पना होती आणि त्यासोबत त्यांच्या गूढ राजकारणी चालींविषयी ज्ञात होते. विजयसिंहांच्या बाबतीत ते कुठल्याही थराला जाऊ शकतात हे सर्व जाणुन होते. त्यामुळे त्यांच्या वाटी कोणी जात नसे. संपतराव हल्ली कोल्हापुरात बरेच रमत असं खोचकपणे बोलुन दळवी मोकळे झाले. संपतरावांची सर्व प्लॅनिंग कोल्हापुरातच होत असल्याने ते थोडे चपचपले आणि कार्यक्रम आवरता घेतला. शांभवीच्या इच्छेनुसार संपतराव एंगेजमेंटमध्ये जरी येऊ शकत नसतील तरी त्या हॉटेलच्या एका प्रशस्त हॉल मध्ये थांबुन अप्रत्यक्षपणे उपस्थित रहावं यासाठी विजयसिंहांनी त्यांना विनंती केली. जी त्यांनी पडत्या फळाच्या आज्ञेनुसार स्वीकारली. तिथून बाहेर पडताच दळवी गाल फुगवून गाडीत बसले.
"तुला यायचं नसेल तर येत नको जाऊ. पण असं तोंड फुगवून माझी शोभा तरी नको करत जाऊ. बायकोपेक्षा जास्त नखरे सांभाळाव लागतात तुझे." विजयसिंह
"तुला तुझ्या सो कॉल्ड गुरूचा पुळका येत राहतो ते नेहमी महागात पडते आपल्याला. त्यांच्या पार्टीमध्ये भ्रष्टाचार वाढलाय बघत नाही का..? काही कामीचा राहिला नाही तू. रक्त गोठलंय तुझं. आता माझी पोरगी बघ कशी धुवून काढेल एकेकाला." दळवी
"त्याचीच तर भिती वाटते दळव्या. ज्या गोष्टी मी एवढ्या मुश्किलीने संपवलेल्या त्या परत समोर येऊन उभ्या राहतील का..?" विजयसिंह
"गोष्टी कधी संपत नसतात विजा… फक्त काही काळासाठी थांबुन राहतात. परत चौपट गतीने आपल्या अंगावर येण्यासाठी आणि यावेळेस तर वेग आणि दिशा सर्वच अंधाधुंद असेल." दळवी.
------------------------------------------
शिवा आणि गौरी मार्केटमध्ये असताना समोरुन बाईकवर येणाऱ्या माणसाणे त्याच्या अंगावर केलेला चाकुचा वार तिने स्वतःवर घेतला आणि तिला चाकू हलकासा चाटून गेला. शिवाने लगेच त्यांच्या बाईकला मागुन पकडलं आणि गाडी तिथेच थांबवली.
"कम ऑन शिवा मार त्याला… पंच हिम" गौरी
शिवाने इकडे तिकडे बघितलं सर्व लोक त्यांच्याचकडे बघत होते. गौरी एकदम खुंखार मोडमध्ये आली होती तेवढ्यात शिवाने बाईक सोडली आणि त्यांना जाऊ दिलं. गौरी चिडली आणि त्यांना मारण्यासाठी मागे धावली शिवाने तिला दोन्ही हातांनी मागुन पकडुन जवळपास हवेत उचललं. तरी ती हवेत हात पाय मारत होती. तशीच कसरत करत तिने पायातल्या हील सँडल काढून त्यांच्या डोक्यात मारल्या. कशेबशे धडपडत ते दोघं पळून गेले. शिवाला तिला सांभाळण्यात नाकी नऊ येत होते. त्याने तिला शांत करत फर्स्ट एड साठी मॉल बाहेर गाडीकडे नेलं.
--------------------------------------------
नित्या तिकडे मॉलच्या लिफ्टमध्ये एका माणसा सोबत अडकली होती. लिफ्ट अचानक बंद पडल्याने ती थोडी घाबरली. आतले लाईट चालू बंद होत होते. त्यात समोर डोक्यावर हुडी घातलेला, काळा गॉगल, स्लिव्हलेस टी शर्ट, हातभर कोरलेले ट्रायबल टॅटू तिने लगेच बॅग मधुन एक चाकू काढला आणि त्याच्यावर वार करणार एवढ्यात त्याने तिचा हात घट्ट पकडला.
"हाडाची पत्रकार शोभते. एरवी मला शोधत इकडे तिकडे फिरते. माझ्या एरिया मध्ये घुसून चौकशी करते आणि आता साधं ओळखत नाही."
नित्या आश्चर्य चकित झाली आणि तिच्या तोंडुन निघालं. "कदिरन…"
त्याने गॉगल आणि डोक्यावरची हूडी काढली. आता तो तिला स्पष्ट दिसत होता. नेहमी पेक्षा अगदी वेगळा. ती आणखीनच त्याच्यावर फिदा झाली. कदिरनच्या गूढ व्यक्तिमत्त्वावर तिला स्टोरी बनवायची होती. पण तो त्यानी ठरवल्या शिवाय कधीच तिच्या हाती लागत नव्हता.
"ओह… म्हणुन लाइट्स, लिफ्ट असे होत होते. तू आला तिथे सीसीटीव्ही पण बंद झाले असतील ना..? स्वतः ची ओळख एवढी सिक्रेट ठेवण्याची गरज काय पण..?"
कदिरनने तिला डोळा मारुन फक्त एक किलिंग स्माईल दिली. त्याने मोबाईल वर बोटं फिरवली आणि लिफ्ट लगेच सुरु होऊन खाली निघाली. कदिरनचा मेसेज आदिनाथ आणि शांभवी सोडुन बाकी सर्वांना फ्लॅश झाला आणि ते ग्राउंड फ्लोअरवर लिफ्टमध्ये घुसले. लिफ्ट थेट ग्राउंड फ्लोअरहुन ३ मजले खाली बेसमेंटला.
"वाह देवा… आलात तुम्ही." जोसेफ
"ए… तुला कसं कळतं हाच आहे…? कितीही वेशांतर करुन आला तरी..?" नित्या
"यालाच म्हणतात खरी भक्ती. तुला नाही कळणार. या मॉलमध्ये एवढे वेळा आली कधीतरी या तिसऱ्या बेसमेंटला लिफ्ट आली का तुझी…? सगळी सूत्र देवाच्या हातात असतात." जोसेफ
सर्वांना या गोष्टीचं आश्चर्य वाटलं. कारण ते सुद्धा कधीच या फ्लोअरवर आले नाही. पायऱ्या सुध्दा ब्लॉक असायच्या. कदिरन त्यांना त्या अंधाऱ्या फ्लोअरवर एका मोठ्या हॉलमध्ये घेऊन गेला. तिथे १०-१२ लोक विविध कम्प्युटर्सवर काम करत होते. एका बाजूला संपुर्ण भिंत भरुन स्क्रीन लावलेल्या होत्या. ती सर्व सिस्टीम अत्यंत हायटेक होती. जिथे जगातील कुठलाही फोन ते टॅप करुन ऐकू शकत होते, कुणाचेही फेसबुक वॉट्स ॲप मेसेज मॉनिटर करणं, सीसीटिव्ही, मोबाईल किंवा कुठलही टेक्निकल उपकरण हॅक करुन त्याचा कॅमेरा स्पीकर स्वतः च्या मर्जीने वापरता येत होता. ती सर्व टेक्नॉलॉजी जोसेफने कदिरनच्या त्या छोट्याशा रुम मध्ये बघितली होती. ते सर्व बघुन सर्वांच्या मनात धडकी भरली.
"काळजी नका करु. ही गॅजेट्स आणि इथे असलेला प्रत्येक माणूस हा फक्त योग्य कामासाठी अयोग्य मार्गाने काम करतो. मी तुम्हाला इथे काही खास गोष्टी सांगण्यासाठी बोलावलं आहे. काही दिवसांपूर्वी आपण सर्व विभागांचे जे डिटेल्स बघितले ते चिंताजनक होते हे माहितीच आहे. मागच्या ३ वर्षात कुठल्याही हालचाली नव्हत्या पण आता त्या अचानक सुरु झाल्या आहेत. पैशांची अफरातफर, ब्लॅक मनी माफिया सक्रियपणे घडत आहेत. थोडी फार अफरातफर सगळीकडेच चालते आणि त्याचा तेवढा फरक पडत नाही. पण मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या भ्रष्टाचाराचा फरक नक्कीच आपल्यावर होऊ शकतो." कदिरन
"जसे भ्रष्टाचार करणारे लोक आहेत तसच चांगलेही लोक आहेतच की. जर ते सर्व आपल्याशी जोडले गेले तर उलट आपण वाईट लोकांवर फरक पाडू शकू." अभिश्री
"अगं भस्म्या झालाय का तुला…? आधी आपला विभाग, मग आपलं शहर, आता देशावर हल्ला करणार का तू गॉडमदर…?" जोसेफ
"हरकत काय आहे…? आय मीन देश नाही पण महाराष्ट्रात आपले १० million followers आहेत. आणि प्रत्यक्ष गँग मध्ये राज्याच्या सर्व विभागातून १० हजारांच्यावर active members आहेत." नित्या
"True.. आपण आपला विभाग ज्या नवीन टेक्नॉलॉजीने डेव्हलप केलाय त्याला Rainbow model असं नाव दिलंय. लवकरच त्याचा एक 3D view तयार होईल. तो आपण महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागात स्वतः न जाता अगदी virtually पसरवू शकतो." दक्ष
"ते आपण easily करु शकतो पण आपलं ऐकेल कोण…?" जोसेफ
"मी सांगितलं तर २-४ लोक ऐकतील असं वाटतं."
बाजुला एका मोठ्या स्क्रीनवर खुद्द सी. एम. लक्ष्मीकांत रणदिवे हे वाक्य बोलले.
सर्वजण अभिश्रीकडे आश्चर्याने बघत होते. पण तिच्याही चेहऱ्यावर आश्चर्य होतं.
ते सर्व आता कदिरनकडे बघत होते. त्याने नेहमी प्रमाणे फक्त स्माईल दिली. सी.एम. आणि त्यांची Rainbow Model वर बराच वेळ चर्चा झाली. बाकी details वर काम करुन ते लोक सी. एम. ला नंतर रिपोर्ट करणार होते.
थोड्या वेळात सर्व जन २ फ्लोअर वरती जाऊन पार्किंग मध्ये पोहचले. शिवा व गौरीही तिथे आले.
कदिरनने शिवाला बघताच कडकडून मिठी मारली.
"अर्सा हो गया भाई… आपसे मिलके." कदिरन
"अरे बापरे.. हे तर सदाशिव पेठेतले हरवलेले शेजारी दिसताय." जोसेफ
"वहिनी… काय मस्त फाईट करता तुम्ही. चिरकुट गुंड होते ते. Don't worry." कदिरन
"हे कोण…?आणि यांना कसं माहिती आणि तुमचा accident झाला का…?" गौरी लाजून बोलली.
"खुप मोठी स्टोरी आहे. नंतर सांगतो वहिनी." कदिरन
"बस कर यार.." शिवा
"अरे… तुझ्या या भोळ्या शंकराने मोडलाय माझा पाय. तेही एका कुऱ्हाडीच्या झटक्यात." कदिरन
अभिश्री सह सर्वजण shocked होते.
"म्हणून तुम्ही शिवाला जेल मध्ये पाठवलं का…?" गौरी ने निरागसपने विचारलं.
कदिरनला खुप हसू आलं.
"भाई तू निघ. इथे जास्त वेळ बाहेर नको." शिवा
"वहिनी.. निवांत भेट.. आमचे एक एक किस्से सांगतो तुला." कदिरन
गौरी लाजुन गुलाबी होत होती. तिलाही कदिरनबद्दल कुतूहल निर्माण होत होतं. शिवाबद्दल आणखी जाणुन घेण्यासाठी तो perfect माणूस होता.
"हॅलो… आम्हा सर्वांना पण ऐकायचे आहेत." अभिश्री
"Yess bossss." कदिरन
नित्याच्या डोक्यात आता विचारचक्र सुरु झाले. ती बाजुला जाऊन एकटीच बडबडत होती. तिच्यातला रिपोर्टर तिला वेड लावत होता. कदिरनची नक्की पोहोच काय..? तो सी. एम. सोबत थेट कसा बोलू शकतो..? गौरीच्या सांगण्या नुसार मुंबईला सी.एम. च्या घरी शिवा पण त्यांच्याशी एकट्यात बराच वेळ बोलत होता. शिवा आणि कदिरनचे एवढे संबंध कशे..? शिवा कशासाठी जेल मध्ये होता…?
अभिश्रीला यातलं बरंच माहिती असणार. पण ते न सांगण्याचं सुध्दा काही कारण असेल.
कदिरन हळूच तिच्या मागुन आला आणि एक पेंडंट तिच्या गळ्यात घातलं.
"जास्त विचार करु नको. सर्व गोष्टी हळु हळु कळतील तुला." एवढं बोलून तो अचानक गायब झाला.
तेवढ्यात आदिनाथ, शांभवी शॉपिंग उरकून तिथे पोहचले. इथेही स्वतःचं काम घुसवल्याबद्दल आदिनाथ अभीवर रागावला. त्याने आणि खासकरून शांभवीने तिचे कार्यक्रमाचे ड्रेस निवडले होते. तिने निरागसपने कान धरून माफी मागितली. धावपळ करत अखेर एंगेजमेंट सोहळ्याचा दिवस आला. अभिच्या वाढदिवसाप्रमाणे पूजेचा कार्यक्रम जवळच्या मोजक्या लोकात घरी पार पडला आणि दुसऱ्या दिवशी हॉटेल मध्ये मोठी पार्टी आयोजित करण्यात आली. पार्टी संध्याकाळी होती आणि दुपारी अभिश्रीने घरी गोंधळ घातला होता.
"आई माझा ड्रेस कुठे आहे संध्याकाळचा…?" अभिश्री
"मला काय माहिती…? साधा स्वतःसाठी ड्रेस घेणं नाही झालं तुला. आदी आणि शांभवीने सिलेक्ट केले तर तेवढंही सांभाळणं नाही झालं." ईश्वरी
"वहिनी कडे जाऊ का..?" अभिश्री
"अजिबात नाही. आज तिला त्रास नको. बाकी बरेच घेऊन ठेवलेत आम्ही त्यातला घाल एखादा." ईश्वरी
तेवढ्यात परीतोष तिथे आला.
"काकु.. कुठलाही ड्रेस घातला तरी हिच्यावर काय फरक पडणार…? आहे तशीच दिसणार (मनात - सुंदर, ग्रेसफुल, माझी वाट लावणारी) मग आहे तशी आली तरी काय..?"
"हो ते तर आहेच म्हणा..? ईश्वरी
अभी तोऱ्यात वर तिच्यारूम मध्ये गेली आणि परीतोष आदीच्या रुममध्ये जाण्याच्या बहाण्याने तिच्यामागे जाऊन कॉरिडोअर मध्ये थांबला. अभिश्री तिथे येऊन त्याच्या कानाजवळ किंचाळली आई सापडला माझा ड्रेस. कोणी काही म्हटलं तरी माझं काही बिघडत नाही. एवढं बोलून ती नखरे करत रुममध्ये गेली.
समोरुन दळवी काका आले आणि परीतोषला हळूच म्हटले.
"बघ… म्हणत असशील तर आणखी २ अंगठ्या आणून घेतो. म्हणजे तिच्या रूममध्ये जाऊन येण्यासाठी मागच्या जिण्याचा वापर नाही करावा लागणार." पी. ए. दळवी
"काका पण मी तर समोरुन आलो." परीतोष
"आत्ता तर समोरुन आला पण त्या आधी तर तिच्या रूम मागच्या जिन्यावरून उतरला न..? ड्रेस गायब करुन परत ठेवण्या मागचं गमक काय नक्की…?" पी. ए. दळवी
परीतोष लाजुन आदिनाथच्या रुममध्ये गेला.
घरचे आणि जवळचे सर्वजण संध्याकाळी हॉटेलच्या पार्टी हॉल मध्ये पोहचले. पार्टी सुरु व्हायची वेळ आलीच होती पण आभीचा पत्ता नव्हता. परीतोषचा जीव वर खाली होत होता. कानोसा घेण्यासाठी तो ईश्र्वरीच्या जवळपास फिरत होता.
"काय करावं या मुलीचं. आधी ड्रेस हरवला मग तो सापडला तर आता म्हणे घालता येत नाहीये." ईश्वरी
"आई तसा तर आम्ही तिच्या कंफर्टनुसार साधाच घेतला होता. मी बघुन येऊ का…?" शांभवी
"नको ग नेहमीचच आहे तिचं. जाऊदे येईल काहीतरी गुंडाळून. तसही मेक अप आर्टिस्ट आहेत तिच्या सोबत." ईश्वरी
"अरे यार.. असं कसं.. एवढी मेहनत केली मी. तिने तोच ड्रेस घालायला हवा." परीतोष
त्याने लगेच गौरीला कॉल लावला.ती पार्किंग मध्ये होती.
"गौरे घरी जाऊन अभीची मदत कर ना प्लीज.. प्लीज यार…" परीतोष
गौरीने लगेच हो म्हटलं कारण समोर शिवा होता.
"हाय.. कशी दिसतेय मी..? तू मी चुज केलेला ड्रेस नाही घातला..?" गौरी
"हम्मम.." शिवा
"बरं माझ्यासोबत अभिच्या घरी चल ना.. तिला थोडी हेल्प करायची होती." गौरी
त्यादिवशीच्या हल्ल्या नांतर शिवा गौरीसोबत परत फटकून वागत होता. तरीही ती प्रयत्न करतच होती. त्याने जोरात तिच्यासमोर हात जोडले.
"मॅडम खरंच मला माफ करा. मी या कसल्याही गोष्टींच्या लायक नाही. प्लीज उपकार करा माझ्यावर, असले नखरे नाही झेलू शकत मी. एखादा योग्य मुलगा बघुन त्याच्याशी लग्न करा. तिथे सिक्युरिटीच्या गाड्या आहे त्यात बसुन घरी जाऊ शकता. कृपा करून माझा पिच्छा सोडा."
तो स्वतः वर आलेल्या रागाच्या भरात सर्व बोलुन गेला.
पण गौरी ते ऐकून आज पूर्णपणे तुटली होती. माणसं दगड असतात पण एवढी…?
ती रागा रागात तिथून निघून पलीकडे असलेल्या दुसऱ्या गाडीत बसली.
हॉटेलच्या सर्वात वरच्या मजल्यावर एका हॉलमध्ये संपतराव आणि मंडळी बसली होती.
"पोरगी बरोबर आपल्या गाडीत बसली की नाही रे..? आणि तो भिकरचोट वाचमनचा पोरगा शिवा तर नव्हता न तिथे..? आता वेळ आली आहे पहिल्या अहुतीची.. " संपतराव
गौरीची गाडी अचानक दुसऱ्या दिशेनी वळलेली तिला दिसली. अचानक गाडीच्या मागच्या भागातून अंधारात दोन भयंकर चेहरे हापापल्या नजरेने तिच्या कडे बघतांना दिसले. ती जोरात किंचाळली. त्यातील एकाने तिचं तोंड दाबलं आणि दुसऱ्याने तिला किळसवाणे स्पर्श करण्यास सुरुवात केली.
शिवा त्या परिस्थितीपासुन संपूर्णपणे अनभिज्ञ आणि उदास होऊन फक्त गौरीचा विचार करत होता. त्याच्या सोबत राहिल्यास आयुष्यभर तिचा जीव धोक्यात असेल. हा विचार त्याला सहन होत नव्हता. त्यापेक्षा तिने एका सर्वसाधारण मुलाशी लग्न करावं अशी त्याची इच्छा होती.
दुसरीकडे परीतोष अधीर होऊन सतत गौरीला कॉल करत होता पण ती उचलत नव्हती. न राहून त्याने अभीला कॉल केला. ती वैतागून खेलासली.
"अरे एंगेजमेंट पार्टी माझी नाही भाईची आहे. किती कॉल करताय सगळे. एक तर २ तास झाले या ड्रेस मध्ये घुसावतेय स्वतः ला. आत्ता कुठे जमलं. १० मिनटात पोहचते म्हणा." एवढं बोलून तिने फोन कट केला.
परीतोष एकदम खुश झाला. त्याला वाटलं गौरीनेच त्याचं काम करुन दिलं.
क्रमशः
परीतोषचं अभीसाठी असं काय सरप्राइज होतं.. ज्यासाठी तिने तोच ड्रेस घालणं आवश्यक होतं…?
संपतरावांचा असा काय प्लॅन होता ज्यात त्यांनी निर्दोष गौरीला गोवलं…?
गौरीसोबात पुढे काय होईल..? सर्व गडबडीत हे कोणाच्या लक्षात येईल का ..?
जाणुन घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
कथा शेअर करताना नावासह शेअर करावी. आपल्या प्रामाणिक प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरुर कळवा.
(सदर कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. कथेतील पात्रांचा व घटनांचा वास्तविकतेशी काहीही संबंध आल्यास तो योगायोग असेल. राजकारणा विषयी संपुर्ण ज्ञान मिळवणे ही अत्यंत कठीण गोष्ट असल्याने त्यातील चुकांसाठी क्षमस्व.)
{ कथा २००४ पासुन सुरु झाली आहे असे ग्राह्य धरण्यात यावे. काळ पुढे सरकल्याने साल २०१८ सुरु झाले आहे.}
रणसंग्राम - एक झुंजार
लेखन : रेवपुर्वा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा