आपण नेहमी ऐकतो . कुणी म्हणतं, माझी आई उत्तम पदार्थ बनवते, तिच्या हातच्या पदार्थांना वेगळीच असते. कोणी म्हणतं, माझ्या ताईच्या हातचं पिठलं खाऊन तर बघा. खरंतर ते पदार्थ बनवणाऱ्या व्यक्तीने आपल्या स्वयंपाक घरातीलच अनेक वस्तू वापरून आणि अतिशय प्रेमाने म्हणजे त्यात एक प्रकारचे प्रेम ओतून तो पदार्थ बनवलेला असतो. म्हणून त्याची चव अप्रतिम असते. तेव्हा अशा स्वयंपाक घरातील वस्तू वापरून आपण रव्याचा केक करणार आहोत.
साहित्य
एक वाटी रवा, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी साखर, अर्धा चमचा खाण्याचा सोडा, चवीपुरते मीठ, तूप आणि वेलची.
कृती
एक वाटी रवा घेऊन त्यात दही, दूध व साखर घालून तीन ते चार तास भिजू द्या. केक करतेवेळी त्या भिजलेल्या रव्यात एक मोठा चमचा तूप , थोडी वेलची पूड आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाका. केक पात्र किंवा जाड बुडाचे भांडे घेऊन त्याला बुडाशी व आजूबाजूला तूप लावा व त्यात ते मिश्रण टाका. आणि ओव्हन मध्ये किंवा गॅसवर तवा ठेवून त्यावर ते भांडे ठेवा. भांड्यावर व्यवस्थित झाकण ठेवून मंद आचेवर पंधरा ते वीस मिनिट शिजू द्या.. केक झाल्यानंतर पाहिजे तसा सजवा. हा केक अगदी कमी खर्चात आणि पाहिजे तसा करता येतो.
२) पनीर पॅटीस
साहित्य
100 ग्रॅम किसलेले पनीर, एक बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी कोथिंबीर, तीन ते चार चिरलेल्या हिरव्या मिरच्या, दोन चमचे ओल्या खोबऱ्याचा चव, अर्धा चमचा साखर, एक चमचा लिंबू रस, थोडे तूप व चवीनुसार मीठ, दहा ते पंधरा मनुका.
पारीसाठी पाच मध्यम आकाराचे उकडून बारीक केलेले बटाटे, एक-दोन स्लाईस ब्रेडचा चुरा, चवीनुसार मीठ.
कृती
प्रथम वरील सर्व पदार्थ एकत्र करून त्याचा सारण तयार करावं. पारीसाठी उकडून बारीक केलेल्या बटाट्यामध्ये ब्रेडचा चुरा व चवीनुसार मीठ घालून चांगलं मळून घ्या. व त्याचे छोटे छोटे गोळे तयार करा. एक एक छोटा गोळा घेऊन त्याची हाताने पारी तयार करा त्यात सारण भरून पारी बंद करा. हलक्या हाताने दाबून थोडा चपटा आकार द्या. तव्यावर थोडे थोडे तूप सोडून खरपूस भाजून घ्या.व लगेच खायला घ्या. अतिशय पौष्टिक असे पनीर पॅटीस खाण्यास तयार.
चला तर मग वाट कसली बघतायं.
करा की रेसिपी ला सुरुवात.
मस्त खा.
स्वस्थ रहा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा