चिखलातील सौंदर्य

A Poem On Nature


अव्यक्त प्रेम
या चिखलातल्या सुंदरतेसाठी....
आयुष्यभर चिखलात राहूनही
हसत हसत फुलणाऱ्या या
कमळासाठी....
चिखलात फुलणाऱ्या त्या कमळा-
सोबत असणाऱ्या
हिरव्यागार पानांसाठी.....
नीर,चिखल
या निखळ मनांसाठी...
???
आयुष्य चिखलासोबत....?
कदाचित वेगळ वाटेल काहीतरी..
पण आज चिखलाने साथ सोडली नाही
म्हणून तर ते कमळ
हसत हसत फुलतय
सवे घेऊनी एकमेकांस
वाऱ्यावरी आनंदाने डोलतय...!!

कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे