Login

जाणीव भाग एक

मित्र आणि व्यसनाच्या नादी लागून भरकटत गेलेल्या तरुणाला कुटुंबाच्या प्रेमाची झालेली जाणीव
जाणीव भाग १

चॅम्पियन ट्रॉफी 2025

"ए भिकारी चल फोन ठेव! कवडी कमवायची अक्कल नाही, माझ्या पैशावर जगते आणि मला शहाणपणा शिकवते ××× ×××"


आदित्यने फोनवर मनसोक्त शिव्या देत फोन कट केला आणि मित्रांकडे बघत कॉलर उडवली.

मित्र देखील त्याच्या मर्दानगीवर खूश झाले. परत मस्ती करत दारू पिणं चालू होतं. रात्रीचे अकरा वाजले म्हणून शाल्मलीने घरी कधी येणार म्हणून फोन केला होता.


हल्ली आदित्यच हे नेहमीचच झालं होतं. दररोज ऑफिस सुटलं की, मित्रांकडे जायचं दारू पिऊन मध्यरात्री घरी यायचं. मित्रमंडळींसोबत ट्रिप्स काढायच्या. बायको आणि मुलं त्याच्यासाठी जणू नसल्यातच जमा होते. सोळा वर्षे झाली होती आदित्य आणि शाल्मलीच्या लग्नाला. संसार वेलीवर तीन फुलं होती.पंधरा वर्षाच्या दोन जुळ्या मुली केतकी आणि ऋतुजा व दहा वर्षाचा अर्णव.

उच्चशिक्षित शाल्मलीने लग्नानंतर नोकरी न करता पूर्णवळ घरासाठी दिला होता. सुरुवातीला काही वर्ष दोघांचाही संसार सुखाचा होता. आदित्य ही एका कंपनीत चांगल्या पदावर काम करायचा. काही वर्षांनंतर आदित्यला एका दुसऱ्या कंपनीतून चांगल्या जॉबची ऑफर आली. पगारही आत्ताच्या नोकरीपेक्षा दीडपट मिळणार होता, म्हणून आदित्यने ती ऑफर स्वीकारली आणि त्या कंपनीमध्ये रुजू झाला. हळूहळू मित्र जमत गेले. आधी वीकेंडला चालणाऱ्या पार्ट्या आणि त्यात घेतली जाणारी ड्रिंक हळूहळू व्यसन बनत गेली. दररोज दारू पिऊन घरी येणे आणि नशेमध्ये शाल्मलीला शिवीगाळ करणे आता रोजच झालं होतं.


नवीन झालेले मित्र आदित्यची जान बनले होते. तो नेहमीच बोलायचा की, माझे मित्र कधीपण माझ्या अडचणीला धावून येणार. शाल्मलीने आदित्यला वारंवार दारू सोडायची आणि मित्रांपासून लांब राहायची विनंती केली,परंतु आदित्य ऐकायचा नाही. मित्रांसोबत दारू प्यायला बसला आणि शाल्मलीचा फोन आला की, आदित्य मनसोक्त शिव्या द्यायचा. मित्रांच्या समोर तिच्या माहेरचा उद्धार करायचा आणि आज तर आदित्यने शाल्मलीच्या आत्मसन्मानावर घाव घातला होता. ती काही कमवत नाही याची जाणीव करून दिली होती.


मोठ्या झालेल्या मुली, त्यांनाही आता बऱ्यापैकी समज आली होती. अर्णवला ही आता हळूहळू सर्व समजत होते आणि अशावेळी आदित्यच वागणं दिवसेंदिवस बेताल होत चाललं होतं. मुलांच्या समोर एक दोन वेळेस आदित्यने शाल्मली वर हात पण उचलला होता.

अगोदर आदित्यला वारंवार समजून सांगणारी त्याच्याशी वाद घालणारी शाल्मली आता एकदम शांत झाली.

तिने स्वतःच्याच मनाशी एक निश्चय केला.


काय असेल शाल्मलीचा निश्चय? आदित्यला स्वतःच्या चुकांची जाणीव होईल का? बघूया पुढच्या भागात.

©® खुशी अशोक कांबळे
0

🎭 Series Post

View all