सध्या नवरात्र सुरू आहे आणि या काळात देवीच्या नैवेद्यासाठी काही खास पारंपरिक पदार्थ बनवले जातात त्यातील एक पदार्थ म्हणजे 'कडाकणी'. त्याच्या नावातच आहे सारे काही. खुसखुशीत, कडकडीत तोंडात घातल्यावर दाताखाली कड् असा आवाज निघणारा हा पदार्थ खूप छान लागतो.
पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर पट्टयात हा पदार्थ देवीच्या घटावर देखील बांधतात. देवीची पालखी दसऱ्याच्या दिवशी गावातून निघते तेव्हा पालखीत ही कडाकणी दोऱ्याने बांधतात. तसेच मंदिरातील, घरातील घटावरही बांधतात. कडाकणी बनवत असतानाच दोऱ्यात ओवता यावीत म्हणून त्याला छोटेसे छिद्रं बनवतात. आता त्याची पाककृती तुम्हाला सांगते.
*साहित्य:*
- चार वाट्या गव्हाचे पीठ
- एक वाटी बेसन
- दोन वाट्या गूळ
- पाव वाटी तूप
- तळण्यासाठी तेल
- एक चमचा वेलची पूड
- जायफळाची पूड
- एक चहाचा चमचा सुंठ पावडर
- चिमूटभर मीठ
- एक वाटी बेसन
- दोन वाट्या गूळ
- पाव वाटी तूप
- तळण्यासाठी तेल
- एक चमचा वेलची पूड
- जायफळाची पूड
- एक चहाचा चमचा सुंठ पावडर
- चिमूटभर मीठ
*कृती:*
- एक वाटी पाण्यात गूळ घालून ते पाणी गरम करून घ्या म्हणजे गूळ चांगला विरघळेल.
- तुपाचे मोहन कडकडीत करून गहू पीठ व बेसन एकत्र करून त्यात घाला व पीठ चांगले चोळून घ्या, म्हणजे सर्व पीठाला तूप व्यवस्थित लागेल.
- वेलची पूड, सूंठ पावडर घालून पीठ एकत्र मिक्स करून घ्या.
- चवीसाठी चिमूटभर मीठ घालावे नंतर गुळाच्या पाण्याने घट्ट मळून घ्या. आवश्यक असल्यास पाणी घाला व पापडाच्या आकारा एवढे चपातीसारखे पातळ लाटून घ्या.
- सगळी कडाकणी एकदम लाटून घ्यावीत. एक एक लाटून झाल्यावर पेपरवर टाकावेत.
- कढईत तेल घालून तेल गरम झाल्यावर मंद आचेवर तळून घ्यावे.
- कडाकणे तळल्यावर पुरीसारखे फुगू नयेत, कडकडीत, खुसखुशीत व्हावे म्हणून त्यावर काटे चमच्याने टोचे मारावेत.
- गरम असताना थोडे नरम वाटतात पण थंड होत जातील तसे कडकडीत होतात आणि कडकडीतपणा हेच त्याचे वैशिष्ट्य आहे.
- देवाला नैवेद्य दाखवून, घटावर बांधून झाल्यावर कडकडीत कडाकण्यावर मस्त ताव मारा. काही जणांना नुसतीच कडाकणी खायला आवडतात तर काही जण चहा बरोबर खातात.

नक्की बनवा आणि तुमच्या आवडीनुसार कसेही खा. नक्कीच खूप छान लागतात.
*टीप:*
मी गहू पीठ आणि गुळाचाच वापर करते. पण तुम्ही आवडीनुसार गहू पिठाऐवजी मैदा पण घेऊ शकता. गुळाऐवजी साखर वापरू शकता.
*© सौ. सुप्रिया जाधव*

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा