Login

रताळ्याची_खीर

Sweet potato kheer is a creamy, flavorful Indian dessert made by simmering sweet potatoes in milk, flavored with cardamom and garnished with nuts.
नवरात्रीचा उपवास सुरू आहे. घरोघरी फराळ बनत आहेत.मैत्रिणी एकमेकींना घरी फराळाला बोलवत आहेत. आज माझी सखी शेजारीण रत्नकला घाटोळकडे फराळाचे निमंत्रण होते.
तिने फराळाचे विविध पदार्थ बनवले होते त्यात अतिशय स्वादिष्ट झालेला पदार्थ म्हणजे 'रताळ्याची खीर'. सगळ्याजणींनी खीर पुन्हा पुन्हा मागून पिली. तिने सांगितलेली रताळ्याची रेसिपी येथे देत आहे.

साहित्य
  • दोन मध्यम आकाराची रताळी
  • एक वाटी साखर
  • काजू, बदामाचे बारीक केलेले तुकडे अर्धी वाटी
  • चारोळी एक छोटा चमचा
  • वेलची, जायफळाची पूड
  • दोन छोटे चमचे तूप

कृती

प्रथम रताळी स्वच्छ धुवून त्याची साले काढून घ्यावी

नंतर अर्धवट शिजवून घ्यावी, जास्त शिजवू नये म्हणजे छान किसली जातात.

नंतर किसणीवर किस करून घ्यावा.

कढई गॅसवर ठेवून त्यात दोन छोटे चमचे तूप घालावे, त्यावर रताळ्याचा किस घालून परतावे.
मध्यम आचेवर चांगले परतून झाल्यावर त्यात दूध घालावे

काजू, बदामाचे तुकडे आणि चारोळी घालावी
शेवटी वेलची आणि जायफळ पूड घालून मंद आचेवर पंधरा ते वीस मिनिटे शिजवून घ्यावे.
रताळ्याची खिर खायला तयार.

उपवासाला रताळी नुसती शिजवून, किंवा दूधात कुस्करून ही खातात.

लक्ष्मीला प्रिय असलेले हे फळ औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे

रताळ्यत व्हिटॅमिन बी, डी जास्त प्रमाणात असम्यामुळे याच्या सेवनाने, अॅसिडटी बध्दकोष्टतेच्या तक्रारी दूर होतात.

तसेच फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पोट साफ रहाते.

रताळ्याच्या सेवनाने शरीरात उर्जा निर्माण होते. त्यामुळे नक्की नवरात्रीच्या उपवासासाठी रताळ्याची खीर बनवा.
@ सौ. सुप्रिया जाधव