मी आज माझ्या सगळया वाचकांसाठी एक नवीन, वेगळी अशी रेसिपी घेऊन आले आहे......... उपवासाला नेहमीचेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल , तर चला आज वेगळे काहीतरी बनवूया ..........
उपवासाचे पनीर रोल........
उपवासाचे पनीर रोल........
साहित्य
१) एक वाटी साबुदाणा
२) २ मध्यम आकाराचे बटाटे
३) अर्धा वाटी किसलेले पनीर
४) चीज
५) ६-७ हिरव्या मिरच्या
६) जिरे
७) पाव वाटी भाजलेले शेंगदाणे
८) अद्रक
९) दही
१०) ड्रायफ्रूट
१) एक वाटी साबुदाणा
२) २ मध्यम आकाराचे बटाटे
३) अर्धा वाटी किसलेले पनीर
४) चीज
५) ६-७ हिरव्या मिरच्या
६) जिरे
७) पाव वाटी भाजलेले शेंगदाणे
८) अद्रक
९) दही
१०) ड्रायफ्रूट
साबुदाणा नॉनस्टिक पॅन वर थोडा वेळ भाजून घ्या...... त्यानतंर मिक्सर मधून त्याचे बारीक पीठ बनवा....... साबुदाण्याचे पीठ एका पराती मध्ये काढून घ्या......... दोन बटाटे शिजवून त्यांची साल काढून घ्या........ शिजवलेले बटाटे किसून त्या पिठामध्ये मिक्स करा........ चार-पाच मिरच्या , अद्रक , जिरे मिक्सरला बारीक वाटून घ्या....... मिरचीचे वाटण त्या पिठामध्ये मिक्स करा...... शेंगदाण्याचा कूट करून तोही त्या पिठामध्ये मिक्स करून घ्या........ चवीनुसार सेंधा मीठ टाकून आता दही घालून ते पीठ व्यवस्थित मळून घ्या..........
एका बाऊलमध्ये किसलेले पनीर घ्या....... त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार चीज किसून घाला......... एक दोन मिरच्या बारीक चिरून पनीर मध्ये घाला....... तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेऊन त्याचे बारीक तुकडे करून ते पण पनीर च्या मिश्रणात घाला....... चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करुन घ्या...........
आपल्या हाताला थोडे तेल लावून घ्या....... साबुदाण्याच्या पिठाचा एक गोळा आपल्या हातात घ्या...... हातानेच त्याची छोटी पुरी बनवा....... आता त्या पुरी मध्ये पनीरचे मिश्रण घालून त्याचे व्यवस्थित रोल तयार करा........ एक एक करून सगळे रोल व्यवस्थित बनवून घ्या........ बनवलेले रोल तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्या........ तुमचे कुरकुरीत पनीर रोल खाण्यासाठी तयार झाले आहे........ हे पनीर रोल तुम्ही उपवासाच्या चटणी सोबत किंवा दही सोबत खाऊ शकता.........
तुम्ही पण तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स मध्ये कळवा........
एकता निलेश माने
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा