दिवाळी जवळ आली आहे त्यामुळे आपण मुलांना फोडण्यासाठी सुतली बॉम तर घेऊन येतो, पण आज जरा वेगळं काहीतरी करूया........ मुलांना सकाळी नाश्त्यांमध्ये पनीरचे सुतली बॉम्ब बनवून दिले तर....... चला तर मग ट्राय करूया...... रेसिपी एकदम सोपी आणि सिम्पल आहे, पण खायलाही तितकीच टेस्टी आहे....... दिवाळीच्या खमंग फराळामध्ये मुलांसाठी वेगळा काहीतरी नाश्ता बनवण्याची ही थोडी आगळीवेगळी रेसिपी.......
साहित्य
१) पनीरचे चौकोनी तुकडे
२) एक छोटी मैदा
३) दोन चमचे कॉर्नफ्लॉवर
४) दोन चमचे शेजवान सॉस
५) शिजवलेले नूडल्स
१) पनीरचे चौकोनी तुकडे
२) एक छोटी मैदा
३) दोन चमचे कॉर्नफ्लॉवर
४) दोन चमचे शेजवान सॉस
५) शिजवलेले नूडल्स
कृती
एका बाऊलमध्ये मैदा कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घ्या....... त्यामध्ये शेजवान सॉस घाला....... सॉस तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी-जास्त करू शकता........ यामध्ये कोणतेही इतर मसाले किंवा मीठ मिक्स करण्याची गरज नाही....... तरीही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर काही मसाले मिक्स करायचे असेल तर तुम्ही करू शकता..........
या मिश्रणामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची गाढी पेस्ट तयार करा.......... त्यामध्ये पनीरचे तुकडे मिक्स करून घ्या...... पनीरच्या सगळ्या तुकड्यांना ती पेस्ट व्यवस्थित लागेल याची काळजी घ्या..........आता शिजवलेले नूडल्स हातात घेऊन पनीरच्या तुकड्यांना चारही बाजूंनी गुंडाळून घ्या.......... हे तयार केलेले तुकडे तेलामध्ये फ्राय करा ........
बनवलेले पनीरचे सुतली बॉम्ब तुम्ही चहा सोबत किंवा टोमॅटो केचप सोबत मुलांना खायला देऊ शकता.........
एकता निलेश माने
*******************************************
( रेसिपी नक्कीच घरी ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट्स करून कळवा......... रेसिपी ला लाईक करायला विसरु नका............ )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा