दिवाळीच्या सणाला सगळ्याच बायकांची खूप धावपळ उडते....... त्यात जर बाहेर जाऊन काम करणाऱ्या बायका असेल, तर त्यांना ऑफिसचे काम मॅनेज करत घरचे साफसफाई, फराळ ही करावा लागतो, त्यामुळे या दिवसात त्या खूपच दमून जातात....... दिवाळीचे फराळ बनवणे गरजेचे असते........
आज मी तुमच्यासाठी झटपट होणारी चकली घेऊन आली आहे.......... या चकलीसाठी जास्त काही त्रास घेण्याची ही गरज पडत नाही............ अगदी कमी वेळात आणि कमी सामानांमध्ये ही चकली बनवून तयार होते.......... याची टेस्ट मुरकु सारखीही लागते त्यामुळे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चकली किंवा मुरुकू दोन्हीपैकी काहीही बनवू शकता.........
साहित्य
१) एक कप उडदाची डाळ
२) दोन कप तांदळाचे पीठ
३) एक चमचा काळ तीळ
४) एक चमचा काळीमिरी पावडर
५) करण्यासाठी लागणारे तेल
२) दोन कप तांदळाचे पीठ
३) एक चमचा काळ तीळ
४) एक चमचा काळीमिरी पावडर
५) करण्यासाठी लागणारे तेल
कृती
सगळ्यात पहिलं उडदाची डाळ चांगली स्वच्छ धुऊन घ्या....... आता कुकरमध्ये ती डाळ घेऊन एक कप डाळीसाठी दोन कप पाणी टाकून, चवीपुरते मीठ टाकून कुकर बंद करून गॅस वर ठेवा........ कुकरला चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत डाळ चांगली शिजू द्या.........
एका गोल परातीमध्ये दोन कप तांदळाचे पीठ घ्या..... त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडं हिंग, काळी मिरी पावडर , दोन चमचे अमूल बटर , काळे तीळ हे सगळं साहित्य मिक्स करून घ्या..........
गॅस बंद केल्यावर कुकर थोडा थंड झाला की, त्याचे झाकण उघडून तुम्ही पाहू शकता........ आपण चमच्याने गरगटवली तरी ती डाळ गळून चांगली मिक्स झाली पाहिजे........ त्या दाळीला कुकरमध्ये चांगली गरगटून घ्या...........
आता डाळीचे मिश्रण थोडे थोडे करून तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून हलक्या हाताने त्याचे पीठ मळून घ्या........ शक्यतो पाणी घालण्याची गरज पडणार नाही परंतु जर तुम्हाला ते पीठ थोडे दाट वाटत असल्यास त्याच्यात दोन ते तीन चमचे पाणी घाला......... आपल्याला सॉफ्ट असे पीठ मळून घ्यायचे आहे......... मळलेले पीठ पंधरा ते वीस मिनिटांसाठी सुती कपड्याने झाकून बाजूला ठेवून द्या.............
चकलीच्या शाशा हातात घेऊन त्याला आतून थोडे तेल लावून घ्या........... आता माझ्या पिठाचा गोळा त्या शाशामध्ये भरून त्याच्या गोल आकाराच्या चकल्या पाडून घ्या....... तुम्ही त्या शाशामध्ये मुरुकु चे पाते घालून त्याला मुरूकूप्रमाणे पण पाडू शकता..........
कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा....... तेल चांगले गरम झाले की त्याच्यामध्ये आपण बनवलेल्या चकल्या हळूहळू करून सोडा आणि मध्यम आचेवर चकल्या चांगल्या गोल्डन फ्राय करून घ्या................... तुमच्या चकल्या तयार झाल्या आहेत........
अगदी कमी वेळात आणि कमी सामानांमध्ये बनणारा हा पदार्थ आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा.........
******************************************
( रेसिपी चांगली वाटल्यास लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका......... )
( रेसिपी चांगली वाटल्यास लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका......... )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा