Login

कुरकुरीत मुगडाळ वडी

खमंग मेजवानी
मुलांसाठी काय नवीन बनवावे याचा सतत आपण विचार करत असतो, पण काहीही बनवताना आपण पहिले तर ते हेल्दी असावे या गोष्टीला जास्त प्राधान्य देतो......... शरीरासाठी पोषक असलेली वस्तू टेस्टी कशी बनवायची याचाच विचार करत आपल्या मुलांसाठी आपण काहीतरी वेगळे बनवण्याचा प्रयत्न करतो....... आज मी अशीच एक नवीन आगळीवेगळी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे........

साहित्य
१) एक कप मुगाची डाळ ( ४ तास भिजवलेली)
२) गव्हाचे पीठ
३) लसुन पाकळ्या
४) अद्रक
५) धने पावडर
६) बडीशेप
७) जीरा
८) हिरवी मिरची
९) कांदा
१०) कोथिंबीर
११) चवीपुरते मीठ
१२) तळण्यासाठी तेल

कृती

सगळ्यात पहिलं मी मुगाची डाळ चार तास आधीच स्वच्छ पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली होती...... मुगाची डाळ छानच दिसली तिला आता एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ त्यात सात आठ लसणाच्या पाकळ्या थोडसं अद्रक धन्याची पावडर घालून त्याची दरदरी पेस्ट बनवून घेऊ......

आता त्या मिश्रणामध्ये चवीपुरते मीठ , एक छोटा चमचा बडीशेप, एक छोटा चमचा जिरा , दोन बारीक चिरलेल्या मिरच्या , थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, जर तुम्ही कांदा खात असाल तर एक छोटा कांदा ही बारीक चिरून तुम्ही या मिश्रणामध्ये घालू शकता....... हे मिश्रण चांगलं चमच्याने ढवळून घ्या......... आता या मिश्रणाला झाकून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा.........

एका पसरत भांड्यात दीड कप गव्हाचे पीठ घ्या...... त्यात चवीपुरते मीठ आणि दोन चमचे तेल टाकून त्याचा सॉफ्ट पीठ मळून घ्या.............. महिलेला पेट कपड्याने थोडा वेळ झाकून ठेवा..........

एका वाटीमध्ये दोन चमचे गव्हाचे पीठ घ्या....... त्यात चिली फ्लेक्स, बारीक चिरलेली कोथिंबीर , जिरे आणि चवीपुरते मीठ घालून त्यात पाणी घालून पातळ अशी पेस्ट तयार करा.........

आता पिठाचा एक पोळी लाटण्यासाठी घेतात तेवढ्या आकाराचा गोळा घ्या......... त्याची छान पैकी पोळी लाटा........ लाटलेल्या पोळीवर मुगाच्या डाळीचे मिश्रण व्यवस्थित पसरवा........ हे मिश्रण पसरवताना पोळीच्या मधोमध गोलाकार पसरवायचे आहे....... बाजूने काही जागा आहे का मी ठेवायची आहे.......... आता आपण ज्याप्रमाणे आळूची पाने दुमडतो त्याचप्रमाणे पोळीला चारही बाजूने दुमडून त्याची गोलाकार वडी बनवून घ्यायची आहे........

या बनवलेल्या वड्या स्टीमर मध्ये दहा ते पंधरा मिनिटांसाठी चांगल्या स्टीम करून घ्यायचे आहेत...... स्टीम झालेल्या वड्या थोड्या थंड करून त्याचे जशी आपण अळूची वडी बनवतो तसेच चाकुने काप करून मध्यम आकाराच्या वड्या बनवायचे आहेत........ या वड्या गव्हाच्या पिठाच्या पेस्टमध्ये बुडवून गरम तेलामध्ये मध्यम आचेवर तळायच्या आहेत.......... तळलेल्या वड्या काही वेळासाठी टिशू पेपरवर काढून ठेवा..........

सगळ्यांसाठी खुशखुशीत खमंग अशा मुगाच्या डाळीच्या आणि गव्हाचे पीठ वापरून बनवलेल्या वड्या खाण्यासाठी तयार आहे......... या वड्या तुम्ही हिरवी चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर खाऊ शकता............

( टीप - तुम्हीं मुगाच्या डाळी ऐवजी मसूर किंवा चण्याची डाळ हि वापरू शकता....... )


**************************************
( रेसीपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे ते सांगा........ रेसीपी ला लाईक आणि कमेंट करायला विसरु नका.............. )