ऐकायला खूपच वेगळे वाटत असेल पण हो खरं आहे हे.. ..... आपण नॉर्मली कलिंगड खाल्ल्यानंतर त्याची साल फेकून देतो, पण आता असे न करता तुम्ही त्या सालीचा ही उपयोग करू शकतो...... तो कसा आपण जाणून घेऊया.........
लाल भडक कलिंगड खाल्ल्यानंतर त्याच्या हिरवी सालीच्या आणि लाल गरा च्या मध्ये जे पांढऱ्या रंगाचे जाड आवरण असते ते आवरण त्याची हिरवी साल काढून स्वच्छ धुऊन घ्या......... आपल्याला आज त्या पांढऱ्या आवरणाचा हलवा बनवायचा आहे.......
साहित्य
१) गराचा किस एक वाटी
२) काजू
३) दोन मोठे चमचे साजूक तूप
४) चवीनुसार साखर
५) लिंबू
६) खाण्याचा रंग
२) काजू
३) दोन मोठे चमचे साजूक तूप
४) चवीनुसार साखर
५) लिंबू
६) खाण्याचा रंग
कृती
कलिंगडाची हिरवी साल काढून राहिलेले पांढर आवरण स्वच्छ धुऊन घ्या..... त्याला गाजराप्रमाणे बारीक किसून घ्या......... आता एका कढईमध्ये आपण दोन मोठे चमचे भरून साजूक तूप घालणार आहोत........ त्यात आधी घेतलेले काजू चांगले फ्राय करून बाजूला काढा......... आता त्यात किस घालून चांगले शिजवून घ्या......... त्याला सुटलेले पाणी कमी झाल्यानंतर त्यात आपल्याला चवीनुसार साखर घालायची आहे........ कलिंगड जर गोड असेल तर साखरेचे प्रमाण थोडे कमी ठेवा......... साखर वितळेपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्या......... त्यानंतर एक लिंबू घेऊन त्याचे फक्त चार ते पाच थेंब आपल्याला त्या हलव्यात टाकायचे आहे....... लिंबूच्या आंबट पणामुळे त्या हलव्याला छान चव येते........ शेवटी थोडा नारंगी रंग त्यामध्ये मिक्स करून हलवा थोडासा शिजू द्या....... आता त्यात काजू घालून बाऊलमध्ये काढून घ्या........ तुमचा कलिंगडाच्या सालीचा हलवा खाण्यासाठी तयार आहे..........
या हलव्याची चव गाजराच्या हलव्यासारखीच लागते........ लिंबू मुळे त्याला वेगळीच आंबट गोड अशी चव येते........ तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा..........
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा