"मी आधीच टेन्शन मध्ये आहे आता परत तू टेन्शन देऊ नकोस"
"मी टेन्शन देतेय? अलर्ट करतेय तुला"
"बरं, pen ड्राईव्ह घेतलाय, रिपोर्ट्स ची फाईल घेतलीये, अजून काय राहिलं?"
"झालंय सगळं..चिल..ते बघ, सरांचा कॉल येतोय..पण रिंग का नाही वाजली?"
"ओहह गॉड... मिटिंग मध्ये जायचं म्हणून सायलेंट केलेला..नशिब तू पाहिलंस...मी पण आयत्या वेळी अशी माती खाते ना.."
शारदा धडपडत मिटिंगसाठी जायला निघाली. जाता जाता केबिनच्या काचांमध्ये स्वतःला परत एकदा नीट पाहून घेतलं आणि घाबरतच मिटिंग हॉल मध्ये शिरली.
"May I come in sir?"
"Please come in Sharda"
मिटिंग हॉल मध्ये शांतता होती, समोर सुटा बुटात आणि चेहऱ्यावर चमक असलेले दिग्गज लोकं बसले होते. कंपनीत नव्या प्रॉडक्ट launch साठी नवीन मार्केटिंग strategies apply करायच्या होत्या आणि त्याची पूर्ण जबाबदारी खान सरांनी शारदावर सोपवली होती.
या सर्वांना पाहून शारदा अजूनच घाबरली, इतकी दिग्गज मंडळी आपल्याकडे मोठ्या आशेने पाहताय आणि आपण जर माती खाल्ली तर? नको नको ते विचार तिच्या मनात थैमान घालत होते.
"या आहेत मिस शारदा, मार्केटिंग assistant. आपल्या नवीन प्रोडक्ट साठी कुठल्या चॅनेल मधून मार्केटींग करायची, थीम काय असेल, मॉडेल्स कुठले असावेत याची पूर्ण माहिती तुम्हाला मिस शारदा देतील. मिस शारदा, प्लिज प्रोसिड.."
शारदा सर्वांसमोर येते आणि लॅपटॉप ला आपला पेन ड्राईव्ह लावते, प्रोजेक्टर चा रिमोट घेऊन स्क्रीन त्यावर सेट करते. स्क्रीन दिसताच पेन ड्राईव्ह मधलं तिचं प्रेझेंटेशन ती सुरू करते..पण...समोर जे दिसतं ते बघून तिच्या पोटात गोळाच उठतो"
"Error in opening this file"
ऐन वेळी प्रेझेन्टेशन फाईल corrupt झाली, शारदा आधीच घाबरलेली त्यात हे..तिच्या कपाळावर घाम जमा झाला, काय करावं सुचेना.. समोर बसलेल्या लोकांसमोर कारणं तरी काय द्यावी? आत्ता ओपन होत होती, आता काय झालं काय माहीत असंही सांगू शकत नव्हती"
खान सर रागाच्या सुरात..
"मिस शारदा...पूर्ण तयारीनिशी यायला हवं होतं तुम्ही..इथले सगळे लोकं खूप व्यस्त माणसं आहेत, त्यांना वेळ नाही तुमच्या साठी जास्त"
शारदाच्या डोळ्यात पाणी आलं, इतक्यात समोर असलेल्या इन्व्हेस्टर्स मधला एक चाळिशीतील व्यक्ती उत्तरला..
"अहो होतं असं, इतकं काही नाही..टेक्निकल प्रॉब्लेम आपल्या हातात नसतात.."
ते ऐकून शारदाला हायसं वाटलं..खान सर पण शांत झाले.
"मिस शारदा, कन्सेप्ट काय आहे ती आम्हाला बोर्ड वर explain करा.."
शारदाला आनंद झाला, तिला असं चांगलं जमायचं, कॉलेजला असताना शाळेच्या मुलांच्या ती शिकवण्या घेत असे. तिने पटकन प्रोजेक्टर बंद केला आणि बोर्ड स्टॅण्डसकट समोर आणून ठेवला.
सर्वप्रथम self introduction दिलं, नाव, पत्ता, ऑफिसमधली पोझिशन; मग वेळ न दवडता एकेक मुद्दा ती समजावत गेली. तिचं ते आकृत्या काढून समजावणं, ग्राफ काढून रिपोर्ट दाखवणं आणि त्यात तिचं सुंदर अक्षर याकडे सर्वजण पापणी न लवता एकटक बघू लागले. तासभर तिने दिलेल्या प्रेझेन्टेशनला क्षणभरही कुणी कंटाळलं नाही. ते पूर्ण झालं, शारदाने सुटकेचा निश्वास टाकला. आपण आपले शंभर टक्के दिलेत याची तिला खात्री पटली. सर्वांनी मनापासून कौतुक केलं आणि तिनेही सर्वांचे आभार मानले, खास करून इनामदार सरांचे, त्यांनी ऐनवेळी धीर दिला नसता तर हे सगळं शक्य झालं नसतं. सर्वांना मार्केटिंगच्या कल्पना आवडतात, अगदी नाविन्यपूर्ण कल्पना होत्या त्या!
सर्वप्रथम self introduction दिलं, नाव, पत्ता, ऑफिसमधली पोझिशन; मग वेळ न दवडता एकेक मुद्दा ती समजावत गेली. तिचं ते आकृत्या काढून समजावणं, ग्राफ काढून रिपोर्ट दाखवणं आणि त्यात तिचं सुंदर अक्षर याकडे सर्वजण पापणी न लवता एकटक बघू लागले. तासभर तिने दिलेल्या प्रेझेन्टेशनला क्षणभरही कुणी कंटाळलं नाही. ते पूर्ण झालं, शारदाने सुटकेचा निश्वास टाकला. आपण आपले शंभर टक्के दिलेत याची तिला खात्री पटली. सर्वांनी मनापासून कौतुक केलं आणि तिनेही सर्वांचे आभार मानले, खास करून इनामदार सरांचे, त्यांनी ऐनवेळी धीर दिला नसता तर हे सगळं शक्य झालं नसतं. सर्वांना मार्केटिंगच्या कल्पना आवडतात, अगदी नाविन्यपूर्ण कल्पना होत्या त्या!
मिटिंग सम्पली अन सर्वजण मिटिंग हॉल मधून बाहेर पडले. शारदा प्रोजेक्टर बंद करायला आणि इतर आवराआवर करायला तिथेच थांबली. तेवढ्यात मिस्टर इनामदार तिथे आले. त्यांचं काहीतरी राहिलं असावं असं शारदाला वाटलं, मघाशी त्यांच्या वागण्याने ती आधीच सुखावलेली होती, तिने स्वतःहून अगदी अदबीने त्यांना विचारले,
"सर काही राहिलंय का?"
"तसं तर बरंच काही घ्यायचं आहे तुझ्याकडून.."
"म्हणजे? मला समजलं नाही.."
"हे माझं कार्ड, tonight, 9 pm... माझ्या घरी.."
इनामदार आपलं कार्ड शारदाला देत म्हणाले..
शारदाला काही क्षण समजेना हे नक्की काय बोलले, नंतर तिच्या लक्षात आलं..तोवर इनामदार पुढे चालायला लागलेले..शारदाला त्यांचा मनसुबा कळला. मघाशी इतका चांगला वागलेला माणूस इतक्या खालच्या थराला जातो? संतापाने तिचं अंग तापलं, मघाशी मनात सुरू असलेली घालमेल, यशस्वी झालेली मिटिंग आणि सर्वांनी तिचं केलेलं कौतुक; सगळं डोक्यातून बाहेर पडलं आणि मनात इनामदार सरांबद्दल असलेला आदर क्षणात गळून पडला, त्याची जागा तिरस्काराने घेतली..
इनामदारांना तिने थांबवलं..
"Excuse me sir.."
इनामदारांनी मागे वळून पाहिलं,
"काय म्हणालात तुम्ही आत्ता? काय अर्थ आहे त्याचा?"
इनामदार छद्मी हसले आणि म्हणाले,
"अर्थ न समजण्याइतपत तुम्ही नादान नक्कीच नाहीत.."
"सर, मी...मी कम्प्लेन करेल तुमची, तुमच्या ऑफिसमधल्या एम्प्लॉयीला तुम्ही एका रात्रीसाठी घरी बोलावताय? हे वागणं शोभतं का तुम्हाला? मी ऑफिसमध्ये सर्वांना सांगेन...खान सरांना सांगेन.."
"वा..धमकी? शारदा बाई, तुम्ही तुमच्या introduction मधेच सांगितलं, की तुम्ही शांतीपेठेत वाढल्यात म्हणून, मग तुमच्यासाठी तर हे सवयीचं असावं..."
शांतीपेठ, नाव ऐकताच शरदाने डोळे गच्च मिटले कारण पुन्हा तिच्या वर्मावर घाव घातला गेला होता. इनामदाराला तिने जाऊ दिलं आणि ती मटकन खाली बसली..
"पुन्हा शांतीपेठ, आयुष्य बरबाद झालंय माझं त्या चाळीमुळे. लोकांना मीही त्यांच्यातलीच वाटते.."
समोर असलेल्या ग्लासातील पूर्ण पाणी ती घाटाघट पिऊन टाकते..पुन्हा एकदा दरवाजाकडे बघते..तिचा संयम सुटलेला असतो..ती मोठ्याने ओरडते...
"अरे कोण वाटले मी तुम्हाला? शांतीपेठेत जरी वाढले असले तरी वेश्या नाही मी.."
____
शांतीपेठ, मुंबईत गजबजलेल्या ठिकाणी असलेली आणि बदनाम झालेली एक चाळ वस्ती..40-50 खोल्या आणि चाळीच्या मध्यवर्ती मोकळी जागा. चाळीकडे पाहून नवीन असलेल्या माणसाला ती एक कौटुंबिक वस्तीच वाटू शकते, पण त्या वस्तीची खरी ओळख पटते एखादा पुरुष तिथे आत शिरल्यावर.
एखादं सावज मिळाल्यावर जसं तुटून पडतात तसं एखादा पुरुष तिथे गेला की तिथल्या वेश्या त्याच्याभोवती पिंगा घालतात..
"ए चल ना, तुला काय दाखवते मी बघ.."
"जन्नत चाहीये क्या, इधर तो आ.."
"आ तेरी प्यास बुझादू.."
असं म्हणत तिथली एकेक वेश्या त्याला आपल्या तावडीत घेण्याचा प्रयत्न करते. या चाळी समोरून मुख्य रस्ते असल्याने लोकांना तिथून जाण्याशिवाय पर्याय नसे, तिथून जातांना लोकं झपझप पावलं टाकत रस्ता ओलांडत असत. काही पुरुष शिरायचे वस्तीत, चेहरा लपवत...
वस्तीत अनेक वेश्या वस्तीला होत्या. अगदी कुठून कुठून आलेल्या..
शर्मिला..हरयाणा मधून आलेली बाई, नवऱ्याने दुसऱ्या बाईशी लग्न केलं, हिला मुलबाळ होत नव्हतं, नवऱ्याने मुंबईला आणून सोडून दिलं आणि गेला पळून..पदराच्या आड तोंड लपवून बसलेली ती, ना शिक्षण ना कसला अनुभव.. मग पोट भरण्यासाठी तिला इथे यावं लागलं..
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा