इच्छेतील खंत...

Desire
इच्छा तुझ्या आगमनाची....
खंत तुझ्या परतण्याची...
इच्छा तुझ्या सहवासाची...
खंत तुझ्या विरहाची...
इच्छा तुझ्याशी बोलण्याची....
खंत तुझ्या अबोल्याची...
इच्छा तुला मन भरून बघण्याची...
खंत तुझ्या चोरून लाजण्याची...
इच्छा तुझ्या अमर्याद गोष्टींची...
खंत तुझ्या मर्यादित वेळेची...
इच्छा तुझ्या व्यक्त बोलण्याची...
खंत तुझ्या अव्यक्त स्वभावाची...
इच्छा तुझ्या मोकळ्या वेळेची...
खंत तुझ्या व्यस्त कारणांची...
इच्छा तुझ्या विचारपूसेची...
खंत तुझ्या निरुत्तरत्तेची...
इच्छेत इच्छा माझी.....
खंतेत खंत तुझी.....