Login

रेखांश १४

Abhay Reached To Rural Place And Asked Few People About That Lady
अभयच्या चेहऱ्यावरती थकवा स्पष्ट जाणवत होता. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना बघून दर्शन करत होता, अभय तिथेच टेकून बसला. मंद गार वारा त्याच्या चेहऱ्याला स्पर्शून जात होता .थकल्यामुळे त्याचा डोळा लागला. गावातली दोन माणसं जी मंदिर मध्ये दर्शन घेत होती. ती कुजबुजत होती, ‘ हा कोण नवीन आला आहे पाहुणा? “
“कोणाकडे आला असेल? थकलेला दिसतोय, त्याला विचारू कोण आहे तो..”
त्यांनी अभयला हलवलं त्यामुळे अभयची झोपमोड झाली .त्याचा डोळा लागला होता.
“काय पाव्हणं..? कुणीकडे आला सा” माणूस
“ते मी. मला सरकारी कार्यालयात जायचं होतं..”अभय
“अहो इथे काही सरकारी कार्यालय नाही. बंद असलेली खोली आहे ती ,तिथला माणूस दोन-तीन दिवसातून एकदा येतो काम करतो आणि जातो..”
“तुम्ही काय काम काढले इकडे”दुसरा माणूस “नाही म्हणजे कधी पाहिला नाही तुम्हाला इथे म्हणून विचारतो कोण आहात?”
“मी अभय मला इथल्या सरपंचाला भेटता येईल का?”
“हा ते येतील आता ते आरतीची वेळ झाली ना..”तो माणूस
“काय खाल्लं बिल्ला आहे का नाही?”माणूस
“नाही म्हणजे हो सोबत डबा आणला होता, तो खाल्ला मी थोडं पाणी पाहिजे होतं प्यायला..”अभय
“बर बर मागेच पुजारीच घर आहे चला मी दावतो तुम्हाला..”माणूस
“थँक्यू..”अभय आणि तुम्हाला पुजाराच्या खोलीमध्ये गेले . पाणी पिऊन अभयला तर तरी आली आता त्याला बऱ्यापैकी फ्रेश वाटत होता.. आरतीची वेळ झाली म्हणून पुजारी आणि बाकी सगळे मंदिर मध्ये आले. अभय सुद्धा देवाची मनोभावे आरती करू लागला आरती झाल्यानंतर सरपंचांना भेटला…
“मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं.”. त्यांनी त्या बाईचा फोटो दाखवला..”तुम्ही कधी ह्यांना इथे पाहिला आहे का?” या कुठे राहतात मला सांगू शकता का?” अभय…
सरपंच नी फोटो हातात घेतला आणि निरखून बघितला मग एकदा ते अभय कडे बघून दोन मिनिटे विचार करू लागले “तुम्ही यांना का शोधत आहात? फोटो तर तुमच्या सोबत आहे तुम्हाला माहित नाही कुठे असतात त्य?ा.”सरपंचांना संशयास्पद आणि अभय कडे बघितले आणि विचारले.
“हा फोटो माझा आहे पण मला त्या बाई आठवत नाहीयेत आणि माझं त्यांच्याकडे काम आहे म्हणून मी इथे आलो आहे.” अभय
“माफ करा मला माहित नाही त्या बाई इथे आहेत की नाह.ी मी यांना येथे पाहिले नाही..”आणि सरपंच निघून गेले.
अभयला थोडी वेगळच वाटले, त्याला शंका आली पण तो शांत बसला.. पुढे काय करावे कळत नव्हतं. त्याला वाटलं होतं त्या बाईचा इथे पत्ता लागेल काहीतरी सुगावा मिळेल पण आता नाही. पुढचा मार्ग स्पष्टनव्हता काय करावं काहीच कळत नव्हते पुजारी त्याच्या जवळ आले आणि म्हणाले,
“काय झालं बाळा तू एवढा चिंताग्रस्त का आहेस?”पुजारी
‘मि या बाईना शोधत आह.े तुम्हाला माहित आहे का?”अभय
“दोन मिनिटांसाठी पुजारी पुन्हा एकदा अभय कडे बघतो
“तुला कशासाठी हवी आह?े तुझा काय संबंध? फोटोमध्ये तर तूच आहेस” पुजारी
“तुम्ही हिला ओळखता का? कृपया मला सांगा मी यांना कुठे भेटू शकतो? खूप महत्त्वाचं काम आहे” अभय
“मला माहित नाही हे आता कुठे आहे ते आणि एवढेच सांगू शकतो की तू इथून निघून जा. तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो..” पुजारी
“म्हणजे ..सांगा ना काका मी खूप लांबून आलो आह.े खूप आस घेऊन आलो आहे”अभय.. पुजारी इकडे तिकडे बघतो आणि त्याला म्हणतो “चल माझ्यासोबत..”
अभय शंका येते .त्याच्यासोबत जावं की नाही हा प्रश्न असतो पण नाही केलं तर काहीच कळणार नाही म्हणून हिंमत करीन तो पुजारी सोबत चालतो..
क्रमशः

सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्यासाठी पेजला फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन फेवरेट हे ऑप्शन निवडा म्हणजे एक ही भाग चुकणार नाही.. ही कथा मनोरंजन म्हणून लिहिली आहे..तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी प्रेरणा देणार आहे.तेव्हा नक्की कळवा..

0

🎭 Series Post

View all