Login

रेखांश भाग १६

Abhay Got To Know About That Lady And His Father.,
दीर्घकथा डिसेंबर २५- जानेवारी २०२६
रहस्य कथा

“हा तोच अधिकारी आहे…, तू ह्यांच्यासारखा दिसतो..कोण आहेस तू?…म्हणजे तु तुज्या आई ला शोधतो आहेस? पुजारी
“नाही ही माझी आई नाही..”अभय ओरडतो एकदम…

“काय? मग कोण आहेस तू? हा तुझा बाप आहे बरोबर….”पुजारी
अभय फक्त मान होकारार्थी हलवतो..त्याच्या डोळ्यात राग, हतबलता, अश्रू भरून आलेले असतात..
“तुझा बाप हिच्यासोबत होता इथे…तुझ्यासोबत चित्रा cha फोटो आणि तू म्हणतो ती तुझी आई नाही..मग का शोधतोस तिला..”पुजारी
“काका ही माझी आई नाही…माझे बाबा काही बोलत नाही त्याचा अपघात झाला आहे आणि मला सत्य शोधायचं आहे…”अभय
अभय डोक्याला हात लावून खाली मान खालून बसतो..
५/१०मिनिटे गेल्यावर पुजारी काका त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याच्याशी बोलतात..
“हे बघ पोरा शांत हो…. नियती पुढे काही चालत नाही आपले…. तुझा बाप सज्जन माणूस होता मला आजही अस वाटतं., चित्रा पण साधी मुलगी होती पण जे काही त्यावेळी ऐकलं दिसलं त्यावरून त्याच्या त काय घडलं पुढे काय झालं सगळ गुपितच आहे अजून..” पुजारी
अभय थोडा शांत झाला होता..
“काका त्यावेळी इथे अजून कोण लोक होती? तुम्ही ओळखता का कोणाला..? मला सत्य जाणून घ्यायचं आहे..”अभय
तेच गावात गोंधळ झाला होता..काही सरकारी कामासाठी काही जमिनी लागणार होत्या पण सरपंचांनी नकार दिला..त्यात तुझे बाबा आणि अजून एक दोन जण होते जे ते काम बघत होते.. त्याचं नाव मला नीट आठवत नाही…..पण तुझे बाबा इथून निघून गेले आणि मग सगळ्या गोष्टींवर पर्दा पडला….”पुजारी
“असं काय झालं होत? कोण होतं त्यांच्या सोबत अजून?”अभय
पुजारी “मला आठवत नाही आता…थोडावेळ बैस मी भात शिजवतो आपण जेवण करू अन् मग सकाळी इथून जा आता रात्रीचा नको जाऊ…
अभय बसतो विचार करत…पुजारी ने बनवलेलं भात आमटी जेवतो..त्याला बरं वाटतं.. फोन बघतो तर बॅटरी लो असते आई ला
मेसेज पाठवतो आणि फोन चार्जिंग ला लावतो ..
पुजारीच्या घरचा दरवाजा वर टक टाक होते.. अभय उठणारच की पुजारी हाताने त्याला थांबवतो.. आणि मध्ये खोलीत पाठवतो..
अभय गुपचूप मध्ये जातो..
“कोण आहे?”पुजारी
पुन्हा टाक टाक होते..”बाबा दार उघडा…मी रामू “ सरपंच च माणूस असतो.
पुजारी दार उघडतो”काय रे, काय कामं काढलं?”दारात उभ राहून बोलत असतो
“हे सरपंचांनी दिलं आहे.. उद्या ह्या तुपाचा दिवा लावायचा आहे दिवसभर साठी….”रामू बोलत बोलत आतमधील अंदाज घेत असतो..
“बरं बरं ठीक आहे..”पुजारी ते घेऊन दार लावायचा प्रयत्न करतो.. रामू हाथ दार ला लावून विचारतो,”ते नवीन पाखरू गेलं का?”
“कोण?”पुजारी
“ते आलं होतं ना कोणाला तरी शोधत..”? रामू
“मला काय माहित तेव्हा मंदिरातून कुठे गेला ते..”? पुजारी
“हम्म…बरंय मग….”रामू निघतो…
अभय ला शंका येते… पुजारी दार लावून घेतो आणि चेहरा पुसून घेतो स्वतः च्….अभय बाहेर येतो..
“तो फक्त तू इथे आहे की नाही ते बघायला आला होता..”पुजारी
अभय ला कळत नाही का ते?...

क्रमशः…

सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्यासाठी पेजला फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन फेवरेट हे ऑप्शन निवडा म्हणजे एक ही भाग चुकणार नाही.. ही कथा मनोरंजन म्हणून लिहिली आहे..तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी प्रेरणा देणार आहे.तेव्हा नक्की कळवा..


0

🎭 Series Post

View all