Login

रेखांश भाग ६

Abhay Mother Shared Some Past Incidents With Abhay
भाग ६

“कोणत्या गोष्टी आहे आई? तू ओळखतेस का या बाईला?”अभय 
“नाही मी या बाईला नीट ओळखत नाही पण माझे काही अंदाज आहेत ते मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि ते तू शांतपणे ऐकशील म्हणून मी तुला इथे बोलावलं आहे.”आई 
“नक्कीच मला असं वाटतंय की मी या सगळ्याचा शोध घ्यायला हवा मी खरं तर हा विषय सोडून दिला होता पण तुला जेव्हा फोटो आला आहे तेव्हा मला या मुळाशी पोहचावचं लागेल..”अभय 
“या फोटोमध्ये जी बाई आहे तीच तुझ्या बाबांच्या भूतकाळशी संबंध आहे. तुझ्या बाबांचा एका गावामध्ये ट्रान्सफर झाल होत .वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आणि तिथे या बाईसोबत त्यांची भेट झाली.तुझे बाबा एक शासकीय कर्मचारी आहेत आणि रोज बऱ्याच लोकांना भेटतात त्यावेळी इथे असेच एका प्रोजेक्ट वरती काम करत होते आणि त्या गावांमध्ये त्यांची बदली झाली होती तेव्हा ही बाई त्यांना काही कामांमध्ये मदत करत होती .हे सगळं माझ्या लग्नाच्या आधी घडलेल्या गोष्टी आहेत त्यामुळे मला एवढेच माहित आहे.”आई 
“पण तुला हे सगळं कसं माहित? आणि तू आधी का नाही सांगितलं?”अभय
 “अभय मला यातलं काही फारसं माहीत नाही .काल जेव्हा हा फोटो मी बघितला तेव्हा मी कोड्यामध्ये पडले मला या मधलं काहीच कळत नव्हतं .. दारावरची बेल वाजली म्हणून मी तो फोटो तसाच टेबल वर ठेवून दार उघडायला गेले, मी जेव्हा मध्ये आले तेव्हा पाहिलं तुझे बाबा त्या फोटोकडे डोळे मोठे करून बघत होते आणि त्यांची धडधड वाढली होती त्यांच्याच कपाळावर घाम आला होता.”आई 
“पुढे काय झालं?”अभय
“बाबांना कसला त्रास होत होता?”
“दोन मिनिटांसाठी मला कळलं नाही मी जेव्हा नीट बघितला तेव्हा मला कळलं की त्या फोटो मधलं काहीतरी आहे जे त्यांना त्रास देत हो. मी त्यांना खूप विचारलं पण त्यांना बोलता आलं नाही .मी जेव्हा तो फोटो हातात घेतला आणि त्याच्याकडे बघत होते तेव्हा तुझ्या बाबांनी थरथरत्या हातांनी एक बोट त्या बाईकडे दाखवलं..”आई 
“काय? बाबांनी हात हलवला किती चांगली गोष्ट आहे ही..”अभय 
“हो मी सुद्धा याच गोष्टीचा विचार करत होते. मला आश्चर्य झालं इतके दिवस तुझे बाबा हात हलवत नव्हते पण अचानक त्या फोटोकडे बघून त्यांनी हात हलवला पण ते थोडे घाबरलेले दिसत होत , मग मी त्यांना विचारलं तुम्ही हिला ओळखता का? त्यांनी फक्त थोडीशी  होकारार्थी मान हलवली.. मग मी त्यांना विचारलं की ही बाई कोण आहे? ते काही बोलू शकले नाही .मी त्यांना विचारलं की तीच बाई आहे का ज्याबद्दल तुम्ही मला एकदा सांगितलं होतं …तेव्हा पुन्हा त्यांनी होकारार्थी मान हलवली.. म्हणून मी तुला इथे बोलावलं आणि हे सगळं सांगितलं..”आई 

क्रमशः
 सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्यासाठी पेजला फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन फेवरेट हे ऑप्शन निवडा म्हणजे एक ही भाग चुकणार नाही.. ही कथा मनोरंजन म्हणून लिहिली आहे..तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी प्रेरणा देणार आहे.तेव्हा नक्की कळवा..

0

🎭 Series Post

View all