Login

रेखांश भाग ७

Abhay Decide To Find The Truth..Nidhi And Abhay Talk To Eachother On Phone
"आई या बाईचा बाबांशी काय संबंध आहे?”अभय 
“म्हणजे”आई 
“हे बघ आई,तुज्या लग्नाआधी बाबांचा हिच्याशी काही संबंध होत का? त्यांचांकाही प्रेम वैगरे..”अभय पुढे बोलत होता की आई ने त्याला टोकलं “अभय,तू तुज्या बाबा विषयी बोलत आहेस..लक्षात येते ना “आई
 “हो आई पण अस असून शकत ना… म्हणजे कशावरून ती बाई च हे सगळ करत नसेल..?आणि मला हे कळत नाही आपण काय शोधायचं? कदाचित त्याचं प्रेम असेल किंवा त्यांनी सगळ्यांपासून लपवून लग्न केलं असेल,म्हणून त्यांचा भूतकाळ शोधायला ती आपल्याला भाग पाडते आहे.”अभय 
“अभय, काय बोलतो आहेस ह्याच भान ठेव जरा..”आई थोडीशी रागात आणि थरथरत बोलत होती..”
“हे अस काही करू शकत नाही, नाहीतर त्यांनी आधीच मला सांगितलं असत…तुझे बाबा अतिशय ईमानदार आणि सरळ मार्गी आहेत..”आई
 “मी कुठे नाही म्हणतोय पण प्रत्येकाचा भूतकाळ असू शकतो, आणि आज तो भूतकाळ समोर येऊ पाहतोय…”अभय 
“अभय…मला असं नाही वाटत. माझा आजही त्यांच्यावर विश्वास आहे.. आज गेली १२/१३ वर्ष ते फक्त एका विश्वात हरवले आहे.. काहीच करू शकत नाही अन् त्याआधी त्यांनी कधी आपल्या परिवाराला सोडून काही केले नाही..तुला आठवत ना ते किती खुश असायचे,किती वेळ द्यायचे तुला आणि प्रिया ला.. त्यांच्यासाठी अस बोलू नकोस “आई 
“आई, शांत हो, मला तुला दुखवायचं नव्हतं पण मी फक्त शक्यता बघतो आहे…बाबांचा अपघात झाला त्याआधी ते कसे होते माहित आहे मला, आणि मी ते नाकारत नाही पण मला ह्याच्या मुळाशी जावं लागेल”अभय.
“हे बघ अभय ज्याने कोणी हे केलं आहे त्याला आपल्याबद्दल काय माहित आहे ,काय नाही हे बघावं लागेल.. उद्या प्रिया चे काही झालं तर, तुला काही झालं तर मी कुठे बघणार..म्हणून सांभाळून कर आणि तू ठरव पोलिसात जायचं की नाही ते ..”आई 
“हम्म,आई, बाबांचा अपघात कसा झालं हे पण आपल्याला नक्की माहीत नाही.. तुला काही माहित आहे का अजून…”अभय 
“नाही.त्या दिवशी मला फोन आला होता हॉस्पिटल मधून,मी तुज्या मामांकडे होते गावाला…त्यामुळे डायरेक्ट हॉस्पिटल ला गेले होते. तुम्हाला दोघांना मामाकडे ठेवून.. त्याचा काही संबंध आहे अस वाटतं का तुला?”आई
 “माहित नाही.. आता मला काहीच कळत नाहीये आई.. बघू ..तू आराम कर..मी बघतो काय ते ..”अभय
 “अभय, निधी कशी आहे?”आई
 “बरी आहे घरी गेली आहे तिच्या…तिच्या वडीलांच्या अपघात झाला आहे..”अभय .
“काय? कास काय ? कसे आहेत ते?” आई.
आई ला पण आश्चर्य वाटते सगळ्या गोष्टी एकदम कश्या होत आहेत ह्याच …निधीचा विषय निघताच अभयच्या कपाळावर चिंतेची  रेषा उमटली.खूप वेळ झाला होता निधीची त्याचा काही कॉन्टॅक्ट झाला नव्हता. तो रूम मध्ये गेल्यानंतर त्याने तिला फोन केला .एकदा दोनदा फोन वाजला पण तिकडन काय उचलला गेला नाही . ती आत्ता काय करत असेल, ती व्यस्त असेल, तिथे काय घडलं असेल हे कळायला काहीच मार्ग नव्हतं. त्याने तसाच फोन टेबल वर ठेवला .. तसाच तो फ्रेश व्हायला निघून गेला आणि मग प्रियाने त्याला जेवायला बोलावलं ,जेवण वगैरे सगळं आटोपून तो आपल्या रूम मध्ये आला तेव्हा त्याने बघितलं तर निधीचा मिस कॉल होता. त्याने पुन्हा तिचा फोन ट्राय केला साधारण दुसऱ्या कॉल मध्ये निधीने फोन उचलला “नीती कशी आहेस तू? मी कधीच तुला फोन करतोय. बाबा कसे आहेत काय झालं नेमकं कळलं का ?"
“अरे हो सांगते, सांगते बाबा आता ठीक आहेत .गाडी स्लीप झाली त्यामुळे पायाला थोड खरचटलं आहे, सगळ्या लोकांनी त्यांना नेलं होतं हॉस्पिटलमध्ये.. पायाला फ्रॅक्चर आहे पण उद्या त्यांना घरी सोडणार आहेत. काळजी करू नकोस मी व्यवस्थित आहे. “निधी तू सांग कसा आहेस?”निधी
 “ चला बरं आहे काही सिरीयस नाही..मी पण घरी आलो आहे .आईचा फोन आला होता. तुला माहित आहे निधी जो फोटो आपल्याला आला तसाच फोटो आईकडे सुद्धा पाठवण्यात आला आहे आणि म्हणून आईने मला बोलून घेतलं” अभय 
“ हे सगळे विचित्रच आहे..”तेवढ्या निधी ला कोणीतरी आवाज देतो..अभय मी तुझ्याशी घरी जाऊन सविस्तर बोलते मला आई बोलावत आहे.”निधी फोन ठेवते..
अभय फक्त फोन कडे बघत असतो..
क्रमशः 
प्रिय वाचक माझी कथा तुम्हाला कशी वाटत आहे ते नक्की कळवा .तुमच्या एक लाईक आणि एक प्रतिक्रिया मला भरभरून प्रेरणा देतो.सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्यासाठी पेजला फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन फेवरेट हे ऑप्शन निवडा म्हणजे एक ही भाग चुकणार नाही.. ही कथा मनोरंजन म्हणून लिहिली आहे..तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी प्रेरणा देणार आहे.तेव्हा नक्की कळवा..