Login

रेखांश भाग ३

Abhay And Nidhi Finding Way To Reach At A place Where They Can Find Answers
दीर्घकथा डिसेंबर २०२५_जानेवारी २०२६रहस्य कथा 

“अभय,हे काय असेल?” “कोण आहे हा?”निधी ला थोडी भीती वाटू लागली .
“काय माहित.. माझ्याच मागे का लागलंय कोण जाणे “? अभय 
“अभय त्या फोटो मध्ये ती बाई कोण होती? तू ओळखतो का तिला? निधी “
नाही ना.. पण ती माझ्यासोबत कशी असेल? कोण आहे ती? आणि जिला मी ओळखत नाही तिच्या सोबत फोटो कसा असू शकतो?”अभय.
 अभय मला वाटत कोणीतरी तुला अडकवतंय..हा फोटो बनवला असेल कोणीतरी”निधी 
“असू शकत.. आजकाल काही खर नाही..पण मग हा फोन…”आणि त्या रेषा?” अभय 
“सगळ गूढ आहे”निधी 
ते दोघे ही त्या फोन बद्दल आणि फोटो बद्दल विचार करत होते…
“अभय तो फोटो बघू “निधी अभय बॅगेत हाथ घालून एक डायरी काढतो आणि मग त्यातला तो लिफाफा, ज्यामध्ये तो फोटो असतो..बाहेर काढून दोघे ही पुन्हा त्याच निरीक्षण करतात..निधी त्या फोटो वरून हाथ फिरवते आणि बारकाईने निरीक्षण करते..

“अभय हे बघ…तू पाहिलंस का हे? निधी त्याला काहीतरी दाखवायचा प्रयत्न करत असते..
“काय”अभय 
“हे बघ ह्या बाईच्या हातात काहीतरी आहे…काळा धागा मे बी “निधी “अभय एक काम करू ह्याला स्कॅन करू आणि लॅपटॉप मध्ये घेऊन झूम करून बघू”निधी 
अभय तो फोटो स्कॅन करून लॅपटॉप मध्ये घेतो आणि निरीक्षण करतो ..त्याला सुद्धा त्या बाईच्या हातात एक काळा धागा दिसतो.. “हो ग .हा तर गळ्यात बांधता तसे ताईत वाटत आहे..”अभय.
“असा एक ताईत माझ्याकडे पण होता पण मला आठवत नाहीय. तो
आता कुठे आहे?”
“तुला असताना तुझ्याकडे असेल ना.. त्यामुळे त्याबद्दल तुझ्या आईलाच विचारावा लागेल”निधी 
“हम्म “अभय. या फोटोमध्ये ज्या रेषा आहेत आणि  वळण आहे तो कोणता तरी मार्ग आहे”अभय “हो नक्कीच पण शोधायचं  कसं? एखाद्या शहराचा गावाचा किंवा अजून दुसऱ्या ठिकाणी हा मार्ग आपल्याला कुठे येणार? ते कसं सांगता येईल”निधी 

“ज्याने कोणी आपल्याला हे पाठवलं आहे त्याचा उद्देश असा आहे की आपण तो रस्ता ,मार्ग शोधायचा आणि तिथे पोहोचायचं पण मला एक कळत नाही की तिथे जाऊन आपल्याला काय सापडेल?”अभय 
“कदाचित  ती बाई? किंवा असं काही जे आपल्याला म्हणजेच तुला स्पेशल माहित नाही”निधी
 “पण मग सरळ सरळ ऍड्रेस का नाही दिला?”अभय आणि त्या बाईचा किंवा इतर कसल्याही गोष्टीचा माझा काय संबंध?”अभय 
“ते तर आपल्याला हा रस्ता फॉलो केल्यावरच कळेल?”निधी 
“पण जर कोणी आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असेल तर? उगीच च अडकवत असेल तर?”. “मला वाटते आपण ह्यात पडूच नये..”अभय
 “शक्यता नाकारता येत नाही.”निधी.
.ते दोघे ही बराच वेळ विचार करत असतात…पुढे काय करावं आणि काय होईल ह्याचा अंदाज त्यांना येत नसतो..
क्रमशः 
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्यासाठी पेजला फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन फेवरेट हे ऑप्शन निवडा म्हणजे एक ही भाग चुकणार नाही..