Login

रेखांश भाग १

Is There Any Past Connection Between Abhay And Nidhi Read Full Story
दीर्घकथा लेखन स्पर्धाडिसेंबर २०२५ _ जानेवारी २०२६
ही कथा आहे अभय आणि निधी ह्या दोघांची ..त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या उलट सुलट घटनांची.. बघूया काय काय घडतंय ते …पण ही कथा तेव्हाच खुलेल जेव्हा तुमचा प्रतिसाद मिळेल, मी वाट बघते.


रात्रीचा साडेबारा वाजले असतील.. पाऊस हलक्या स्वरूपात पडत होता. दिवसभर  ऑफिसमध्ये प्रचंड काम होतं तरीसुद्धा घरी अभय आपल्या कम्प्युटरवर डोळे लावून बसला होता. त्याचा प्रोजेक्टच तसा होता. मागच्या दोन-तीन महिन्यांमध्ये त्याला एवढीशी पण उसंत नव्हती. चांगल्या पद्धतीने काम करून एक चांगली टीम तो हाताळत होता आणि त्यामुळे त्याच्या जबाबदाऱ्या दिवसेंदिवस वाढत होत्या. त्याचं काम तसं सुरू होतं पण दोन मिनिटांसाठी म्हणून त्याने डोळे बंद केले आणि हात ताणून दिले, मस्तपैकी आळस झटकला आणि 30 सेकंदासाठी डोळे लावून बसला, तेवढ्यात त्याचा फोन वाजला. आपल्या तंद्रीतून तो बाहेर आला तर बघितलं फोनवर अनोळखी नंबर होता , “हॅलो” करताच त्याला एक थरारक आवाज ऐकू आला “तुला जर काही शोधायचे असेल तर एकच संधी आहे,” त्याला आवाज थोडासा ओळखीचा वाटत होता पण नक्की कोणता आणि कोणाचा हे आठवत नव्हते. तो फोन बंद झाला .त्याला काही कळण्याच्या आतच फोन कट झाला होता. अभयने फोन कानावरून काढला आणि बघितलं, “ कसली संधी? कोण आहे हा?” त्याला काहीच कळत नव्हतं. पुन्हा पुन्हा चेक केल्यानंतरही त्याला तो नंबर सापडत नव्हता. त्याला वाटलं स्कॅम असेल .तो हळूच उठून खिडकी जवळ गेला. हृदयामध्ये धडधड होत होती. रात्रीच्या एवढ्या गर्द शांततेमध्ये असा फोन खूप भीतीदायक होता. खिडकीतून बघितलं तर सगळेच  शांत होते ,अंधार होता सावल्यांचा खेळ चालू होता. त्याला काहीच कळायला मार्ग नव्हता पण आता करणार काय चुकून कोणीतरी आपल्या सोबत मजा मस्ती केली आहे असं वाटत होतं. फोन येऊन गेल्यानंतर ते रस्ते, पावसाची रिपरिप सगळच भीतीदायक वाटत होतं. आता काही त्याच कामांमध्ये लक्ष लागणार नव्हतं , त्याने छोटासा दिवा लावला आणि विचार करतच पलंगावर झोपून गेला .दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेला.कॅफेटेरिया मध्ये जाऊन कॉफी घेऊन आला आणि आपल्या सभोवतालच्या लोकांना हाय हॅलो करून कप टेबलवर ठेवला .खुर्चीवरती बसला तेवढ्यात त्याला दिसलं की आपल्या टेबलवर एक लिफाफा पडलेला आहे. त्याने सहजच तो ओपन केला आणि बघतो तर त्यामध्ये एक फोटो होता. अभयचा आणि अजून एका स्त्रीचा.. तो एकटक फोटोकडे बघत होता.. त्याला काहीच कळले नाही पण त्याला असं जाणवत होतो जणू काही कोणीतरी त्याच्यावरती नजर ठेवून आहे. त्या फोटोकडे बघण्यामध्ये तो मग्न असतानाच त्याच्या खांद्यावरती हातचा स्पर्श जाणवला..
“काय मग काय चालू आहे ?”अरे वा फोटो तर छान आहे कुठून आला हा फोटो कोणाचा आहे .? निधी बोलत होती .
निधी त्याच्याच कंपनीमध्ये काम करत होती आणि ते दोघं एकमेकांचे खूप चांगले मित्र होते .तिच्याशी बोलल्यानंतर अभय या सगळ्या गोष्टीतून थोड्या वेळापूर्ती का होत नाही पण बाहेर पडला .त्या दिवशी रात्री थकून भागून जेव्हा तो निवांत बसला होता तेव्हा पुन्हा एकदा फोन आला. अभयने लवकर फोन उचललाच नाही .पुन्हा  न राहून त्याने उचलला आणि हॅलो एवढाच म्हणाला,
 “तुला घाई करावी लागेल, तुझी वेळ संपत आलेली आहे .निर्णय तुझाच आहे, शोधायचं असेल तर लवकर ठरव” एवढं ऐकू आलं आणि फोन कट झाला.अभय दोन मिनिटे विचार करू लागला.
पुन्हा एकदा स्क्रीन वरती कोणताच नंबर दिसत नव्हता हे सगळं काय आहे. माझ्यासोबत अशी रोज रोज कोण मस्करी करेल. तो फोटो कोणाचा आहे हे सगळं आता आपण शोधल पाहिजे. भीतीकडे आपण दुर्लक्ष करून या रहस्याचा छडा आता लावलाच पाहिजे या ठाम निश्चयाने तो डोळे लावून बसला..


वाचकहो कथा कशी वाटत आहे ते नक्की कळवा माझी कथा आवडत असल्यास भरभरून प्रतिक्रिया द्या आणि लाईक द्या मला फॉलो केल्यानंतर माझ्या कथेचे भाग लवकरात लवकर तुम्हाला वाचता येतील भेटूया दुसऱ्या भागात..
क्रमशा
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून ते चुकू नयेत यासाठी पेजला फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन फेवरेट ऑप्शन निवडा जेणेकरून एकही भाग सुटणार नाही

0

🎭 Series Post

View all