Login

रेखांश भाग २

Story About Two Life Connections With Line
भाग २दीर्घकथा लेखन स्पर्धाडिसेंबर २०२५ _ जानेवारी २०२६रहस्य कथा 
सलग दोन रात्री त्याला फोन आले. त्यामध्ये कोणी काहीच बोललं नाही. कोण बोलतय कोणाचा आवाज आहे त्याला काही कळत नव्हतं, पण आता या प्रकरणाचा आपण छडा लावायचा असं त्यांनी ठरवलं होतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो ऑफिसमध्ये गेला तेव्हा त्याने तो लिफाफा ड्रॉवर मधून काढला आणि पुन्हा एकदा बघू लागला. त्या फोटोच्या मागे एक छोटा कागद होता ज्यावर काही रेषा होत्या. पहिल्यांदा बघितल्यावर त्याला काहीच कळत नव्हते .छोटे वळण, तिरकस रेषा असं बरंच काही होतं वैतागून तो स्वतःमध्येच पुटपुटला , “आता हे काय आहे? आधी इथे काम भरून पडलेत ,आता ह्यात सुद्धा डोक लावायचा का?”परत परत निरीक्षण करून सुद्धा काहीच कळत नव्हतं .तेवढ्यात निधी त्याच्या जवळ आली त्याला एवढं गढून गेलेलं बघितलं .. “अभय हे काय आहे “?“तेच तर मला कळत नाहीये ना, नाहीतर तुला सांगितलं नसतं का?”अभय “अभय ह्याच्यावरती फक्त रेषा आहेत पण याचा काहीतरी अर्थ असेल, अस होऊ शकते की त्यात काहीतरी संदेश असेल”निधी 
“तुला खरंच असं वाटतं निधी.. मला काही कळत नाहीये यामध्ये” अभय 
“हो, हे बघ ना.. या रेषा तिरप्या  आहेत पण हा कोपरा त्याच्यामध्ये एक वळण आहे .एक विचित्र कोड असल्यासारखं आहे..”निधी त्याने निरीक्षण केलं तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. खरंच एक कोड्यासारखा होतं जणू काही त्याच्यामध्ये एक मार्ग लपलेला होता आणि आता तो त्यांना शोधायचा होता .“अभय जर आपण याला जोडलं तर कदाचित यामध्ये काहीतरी अक्षर दिसू शकतील .”निधी अभयला सुद्धा निधीचे म्हणणं पटल त्याला वाटलं की म्हणजे खरंच कोणीतरी आपल्याला हे पाठवत आहे.. या सगळ्याचा विशिष्ट असा काहीतरी हेतू आहे. “थँक्यू निधी तू नसतीस तर मला हे कळलच  नसतं .“अभय मी नेहमी तुझ्या सोबत आहे तू एकटा नाहीस”निधी 
दोघेही दोन क्षणांसाठी एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरवले, त्यांची जवळीक हळूहळू रंगात येऊ लागली पण अचानक पुन्हा एकदा अभयचा फोन वाजला आणि त्यावर प्रायव्हेट म्हणजेच गुप्त असा नंबर येत होता .दोघेही स्तब्ध झाले निधी ने डोळ्यानेच त्याला खुणावले की फोन उचल अभयने सुद्धा तिला सहमती दर्शवली आणि फोन उचलून कानाला लावला तिकडून एक आवाज आला “रेषांचा अर्थ समजला असेल तरच पुढे जा..” आणि फोन बंद झाला 

दोघेही स्तब्ध झाले. संध्याकाळी दोघेही ऑफिस मधून एकत्रच बाहेर पडले आणि अभय च्या रूम मध्ये आले .येताना जेवण घेऊन आले होते त्यामुळे निवांतपणे त्यांनी जेवण केलं आणि आरामात सोफ्यावरती दोघेही बसले होते .अभय आणि निधी यांची मैत्री पुढे गेलेली होती. ऑफिसमध्ये पण बऱ्याच लोकांना याबाबतीत माहीत होतं. त्या दोघांना एकमेकांबद्दल भावना आहेत हे त्या दोघांनाही कळत होतं बरेच क्षण आणि बऱ्याच वेळा ते दोघेही एकत्रच अभयच्या रूमवर असायचे. आता या रहस्याचा मागे सुद्धा ते दोघे एकत्रच उभे होते ,एकमेकांवरती विश्वास ठेवून एकमेकांचा हात हातात ठेवून…
क्रमशः वाचक हो पहिले दोन भाग तुम्हाला कसे वाटले ते नक्की कळवा जितकी तुमची प्रतिक्रिया असेल तितकाच कथा पूर्ण करायला उत्साह येईल मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघत आहे आणि हो मला फॉलो केला नसेल तर नक्की करा. सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्यासाठी पेजला फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन फेवरेट हे ऑप्शन निवडा म्हणजे एक ही भाग चुकणार नाही..
भाग २
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ _ जानेवारी २०२६
रहस्य कथा

सलग दोन रात्री त्याला फोन आले. त्यामध्ये कोणी काहीच बोललं नाही. कोण बोलतय कोणाचा आवाज आहे त्याला काही कळत नव्हतं, पण आता या प्रकरणाचा आपण छडा लावायचा असं त्यांनी ठरवलं होतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो ऑफिसमध्ये गेला तेव्हा त्याने तो लिफाफा ड्रॉवर मधून काढला आणि पुन्हा एकदा बघू लागला. त्या फोटोच्या मागे एक छोटा कागद होता ज्यावर काही रेषा होत्या. पहिल्यांदा बघितल्यावर त्याला काहीच कळत नव्हते .छोटे वळण, तिरकस रेषा असं बरंच काही होतं
वैतागून तो स्वतःमध्येच पुटपुटला , “आता हे काय आहे? आधी इथे काम भरून पडलेत ,आता ह्यात सुद्धा डोक लावायचा का?”
परत परत निरीक्षण करून सुद्धा काहीच कळत नव्हतं .तेवढ्यात निधी त्याच्या जवळ आली त्याला एवढं गढून गेलेलं बघितलं .. “अभय हे काय आहे “?
“तेच तर मला कळत नाहीये ना, नाहीतर तुला सांगितलं नसतं का?”अभय
“अभय ह्याच्यावरती फक्त रेषा आहेत पण याचा काहीतरी अर्थ असेल, अस होऊ शकते की त्यात काहीतरी संदेश असेल”निधी

“तुला खरंच असं वाटतं निधी.. मला काही कळत नाहीये यामध्ये” अभय

“हो, हे बघ ना.. या रेषा तिरप्या आहेत पण हा कोपरा त्याच्यामध्ये एक वळण आहे .एक विचित्र कोड असल्यासारखं आहे..”निधी
त्याने निरीक्षण केलं तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. खरंच एक कोड्यासारखा होतं जणू काही त्याच्यामध्ये एक मार्ग लपलेला होता आणि आता तो त्यांना शोधायचा होता .
“अभय जर आपण याला जोडलं तर कदाचित यामध्ये काहीतरी अक्षर दिसू शकतील .”निधी
अभयला सुद्धा निधीचे म्हणणं पटल त्याला वाटलं की म्हणजे खरंच कोणीतरी आपल्याला हे पाठवत आहे.. या सगळ्याचा विशिष्ट असा काहीतरी हेतू आहे.
“थँक्यू निधी तू नसतीस तर मला हे कळलच नसतं .
“अभय मी नेहमी तुझ्या सोबत आहे तू एकटा नाहीस”निधी

दोघेही दोन क्षणांसाठी एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरवले, त्यांची जवळीक हळूहळू रंगात येऊ लागली पण अचानक पुन्हा एकदा अभयचा फोन वाजला आणि त्यावर प्रायव्हेट म्हणजेच गुप्त असा नंबर येत होता .
दोघेही स्तब्ध झाले
निधी ने डोळ्यानेच त्याला खुणावले की फोन उचल
अभयने सुद्धा तिला सहमती दर्शवली आणि फोन उचलून कानाला लावला तिकडून एक आवाज आला
“रेषांचा अर्थ समजला असेल तरच पुढे जा..” आणि फोन बंद झाला


दोघेही स्तब्ध झाले. संध्याकाळी दोघेही ऑफिस मधून एकत्रच बाहेर पडले आणि अभय च्या रूम मध्ये आले .
येताना जेवण घेऊन आले होते त्यामुळे निवांतपणे त्यांनी जेवण केलं आणि आरामात सोफ्यावरती दोघेही बसले होते .
अभय आणि निधी यांची मैत्री पुढे गेलेली होती. ऑफिसमध्ये पण बऱ्याच लोकांना याबाबतीत माहीत होतं. त्या दोघांना एकमेकांबद्दल भावना आहेत हे त्या दोघांनाही कळत होतं बरेच क्षण आणि बऱ्याच वेळा ते दोघेही एकत्रच अभयच्या रूमवर असायचे.
आता या रहस्याचा मागे सुद्धा ते दोघे एकत्रच उभे होते ,एकमेकांवरती विश्वास ठेवून एकमेकांचा हात हातात ठेवून…

क्रमशः
वाचक हो पहिले दोन भाग तुम्हाला कसे वाटले ते नक्की कळवा जितकी तुमची प्रतिक्रिया असेल तितकाच कथा पूर्ण करायला उत्साह येईल मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघत आहे आणि हो मला फॉलो केला नसेल तर नक्की करा.
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्यासाठी पेजला फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन फेवरेट हे ऑप्शन निवडा म्हणजे एक ही भाग चुकणार नाही..

0

🎭 Series Post

View all