Login

रेखांश भाग ४

Abhay Got A Call And Nidhi Father Met With An Accident
दीर्घ कथा डिसेंबर २०२५_जानेवारी २०२६
रहस्य कथा

बराच वेळ विचार करून दोघेही झोपून गेले .दुसऱ्या दिवशी सकाळी कोवळं ऊन खिडकीतून डोकावत होतं , बाहेर हवेमध्ये थोडासा गारवा होता पण सुंदर प्रसन्न अशी सकाळ झाली होती. डोळे किल करत निधीने थोडीशी चुळबुळ केली आणि मग ती उठली. बाहेर जाऊन बघते तर हॉलमध्ये अभय सोफ्यावर झोपला होत.ा आपण कधी बेडरूम मध्ये गेलो आणि अभय कधी बाहेर झोपला तिला कळलच नाही तिच्या चेहऱ्यावर गोड हास्य आलं.
अभय आणि निधी हे एकमेकांबद्दल सिरीयस होत.े कधी कधी ते अभयच्या फ्लॅटमध्ये एकत्र असत पण त्यांनी कधीही मर्यादा ओलांडल्या नव्हत्या .त्यांना एक कळून चुकलं होतं की आपलं एकमेकांवरती जिवापाड प्रेम आहे पण आता कोणत्याही परिस्थितीत आपण एकमेकांना साथ देऊ शकतो का? हे त्यांना बघायचं होत.ं ते लिविंग मध्ये राहत होते पण मर्यादा सहित.. निधी फ्रेश होऊन बाहेर आली आणि तिने कॉफी बनवायला घेतली. एव्हाना अभयची सुद्धा झोप गेली होती. तो ब्रश करून आला आणि निधीने दोन कॉफीचे कप टेबलावर ठेवले .
“गुड मॉर्निंग अभय” निधी
“गुड मॉर्निंग स्वीट हार्ट”झोप नीट झाली ना..
“हो आणि तुझी?”निधी
“हो सकाळ बघ ना किती सुंदर दिसते आहे”अभय
“हो ना तुला माहित आहे अभय ,रोज सूर्य अस्ताला जातो पण पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्या उमेदीने उगवतो तसेच काही आपलं आहे कालच्या ज्या काही घटना घडल्या त्या आपण तिथे सोडून देऊ मला असं वाटतं आपण त्याच्या मागे नको लागायला”निधी
“खरं म्हणजे मी सुद्धा रात्रभर हाच विचार केल,ा येणारा फोन कॉल हा फोटो हे सगळं काय आहे आपल्याला माहित नाही आणि खरंच एखाद्याने आपल्याला अडकवायचं ठरवलं असेल , आपल्यासाठी एखादं जाळ विणलं असेल तर आपण का म्हणून त्यात अडकायचं सध्या आपलं खूप छान चाललंय मला असं वाटतं आपण त्यामध्ये नकोच पडायला” अभय
“अरे वा चला आपलं एक मत आहे तर अजून.”निधी
“म्हणजे काय आपण एकच आहोत अजून एक झालो नाही एवढंच”अभय हळूच तिला डोळा मारतो
निधी थोडीशी लाजते आणि हसतच उठून तयार व्हायला जाते.
दोघांनी हा विषय सोडायचा ठरवलेला असतो पण हा विषय त्यांना सोडणार आहे का हे अजून त्यांनाच माहीत नसतं आपापल्या आवरून ते दोघे एकत्रच ऑफिसमध्ये जातात.
दिवसभराच्या मीटिंग आणि नव्या प्रोजेक्टचं काम यामध्ये अभय खूप गुंतून जातो. आपल्या सोबत काय झालंय काय नाही याची त्याला आठवणही राहत नाही तसेच निधी सुद्धा सगळ्या कामांमध्ये मित्र-मैत्रिणींमध्ये रमून जाते.
त्यांनी जरी ही गोष्ट सोडली असली तरी सुद्धा काही गोष्टी ह्या त्यांच्या मागावरच होत्या पुन्हा एकदा अभयचा फोन वाजतो
अभय कम्प्युटरवर काम करत असतो फोन न बघताच तो उचलून कानाला लावतो आणि मग तिकडं गंभीर आवाज येतो,
“कोणताही शोध घ्यायचा नाही असं ठरवलंय का? रेषा चा अर्थच तुम्हाला कळला नाही क?ा तुम्ही कितीही पाठ फिरवली तरीही भूतकाळ तुला सोडणार नाही तुला यावच लागेल नाहीतर परिणाम खूप गंभीर होतील बघ विचार कर तुला मार्ग नाही सापडला तर तुझा भूतकाळ तुझ्या भविष्यावरती गंभीर परिणाम करेल.”
हे असं काही ऐकल्यावर दोन मिनिटांसाठी अभय स्तब्ध होतो त्याच्या कपाळावरती घाम जमा होतो त्याला नेमकं कळत नाही की काय चाललंय कोणाचा फोन आहे..
आणि अशातच निधी धावतच त्याच्याकडे येते.
“अभय, अभय ऐक ना ' निधी निधी घाबरलेली असते ती अभयला हलवते अभय त्याच्यात असतो “अभय ऐक ना”
“काय काय झालं निधी तू इतकी का घाबरलीस?”अभय
“अभय मला जावं लागेल पप्पांचा एक्सीडेंट झाला आहे”निधी
‘काय, कधी झालं हे? आणि तुला कसं कळलं?”हे सगळं काय सुरू आहे?थांब मी पण येतो तुझ्यासोबत”अभय

अभय आणि निधी पटकन ऑफिसमध्ये निघतात. पुण्यापासून तीनशे किलोमीटर लांब एका दुसऱ्या शहरात निधी च घर असत.
निधी अभयला सांगते की तू नको येऊस .मी जाऊन येते.
“ ऐक मला तुझ्या सोबत येऊ दे निधी ,मी तुला एकटीला नाही सोडणार.”अभय
“अभय यावेळेस मला जाऊ दे तुझी गरज लागली तर तुला नक्की कळवेन.. तुला माहित आहे पप्पांना अजूनही आपल्या नात्याबद्दल शंका आहे त्यामुळे सध्या तरी मी एकटीच जाते.”निधी
खूप जड मनाने अभय निधीचा ऐकतो आणि तिला रेल्वेमध्ये बसून देतो निधीला सोडून अभय घरी येतो फ्रेश होऊन डोळे लावून सोफ्यावर ती डोकं मागे ठेवून बसतो थोडा वेळ तो बसतो तेव्हा त्याला आठवतं आपल्याला आलेल्या फोनबद्दल..

आणि त्याच्या मनात भीतीची एक थंड लहर उठते.
क्रमश:

वाचक आहो तुम्ही जर कथेला प्रतिसाद दिला तर पुढे लिहायला प्रेरणा मिळते तुम्हाला कथा आवडत असेल तर नक्की सांगा.
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्यासाठी पेजला फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन फेवरेट हे ऑप्शन निवडा म्हणजे एक ही भाग चुकणार नाही..

0

🎭 Series Post

View all