Login

रेखांश भाग ५

Abhay Mother Call Him And Show Him The Envelope
अभय खूप विचार करतो. आपल्याला आलेला फोन कॉल ,त्यानंतर निधीच्या वडिलांचा झालेला ॲक्सिडेंट चा फोन कॉल हे सगळे एकमेकांशी जोडलेलं असेल का? या सगळ्या काय घटना आहेत? कोण आहे जो माझ्या मागावर आहे?मी या सगळ्याचा शोध का घ्यावा? ती बाई कोण असेल तिचा माझ्याशी काय संबंध? या सगळ्या गुंता गुंती च्या प्रश्नांमध्ये अभय अडकला होता. आणि त्याला उत्तर सापडत नव्हते. 
त्याला पुन्हा एक फोन येतो आणि तो घाबरून जातो पण बघतो तर त्याच्या आईचा तो फोन असतो. आणि तो फोन उचलतो“हॅलो आई.. कशी आहेस तू?”अभय 
“मी बरी आहे अभय पण तुझा आवाज असा का येतोय? काही झाले का?”आई
 “नाही तू असं का विचारतेस आई? मी बरा आहे तू सांग तू कशी आहेस आणि बाबा कसे आहेत? तूअसा ह्यावेळी फोन केलास ना म्हणून चिंता वाटली. ”अभय 
“नाही तसं काही खास कारण नाही. पण अभय मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं मला असं वाटतं की तू घरी यावस आपण समोरासमोरच बोलायचं का?”आई
“काय झालं आहे आई? असं कोड्यात नको बोलूस डोक्याचा आधीच फार भुगा झाला आहे.”अभय 
“हे बघ बेटा फोनवर सांगण्यासारखं असतं तर मी तुला लगेच सांगितलं असतं पण तसं नाहीये तू उद्या सकाळीच इथे निघून ये आपण सविस्तर इथेच बोलू काही गोष्टी तुला दाखवायचे आहे..”आई 
“ठीक आहे येतो मी उद्या.”अभय .
तसंही निधी नसल्यामुळे अभयचं मन काही लागणार नव्हतं त्यात हा फोन कॉल आणि ऑफिसमध्ये आलेला फोन हे सगळ्या विचार चक्र मधून एक ब्रेक घेण्याची खूप गरज होती. शांततेची खूप गरज होती तेव्हाच काही उत्तरे सापडणार होते अभयने त्वरितच ऑफिसमध्ये ईमेल केला आणि दुसऱ्या दिवशीची सुट्टी टाकली. अभय आणि निधी कामानिमित्त या शहरात राहत होते. तसं पाहिलं तर अभय सुद्धा या शहरापासून 200 किलोमीटर लांबच राहत होता त्याचे आई वडील आणि त्याची बहीण असा छोटासा त्याचा परिवार होता. एका अपघातामुळे त्याच्या वडिलांची वाचा गेली होती. ते काहीच बोलत नसत दिवसभर खुर्चीवर बसून राहत असत खिडकीतून बाहेर बघत त्यांना काय होतं काय नाही हे काही कळत नसे.त्यांच्या उपचारासाठी खूप खर्च होत होता आणि त्यासाठी एका उच्च पदाची आणि चांगल्या पगाराची नोकरी गरजेची होती .सगळा भार अभय वरतीच होता. बहिणीचे शिक्षण होत आलं होतं पण अजून एक वर्ष बाकी होतं. 
दुसऱ्या दिवशी सकाळीच अभय घराकडे जायला निघाला. घरी पोहोचताच प्रियाने अभयला मिठी मारली. “काय मग काय सुरू आहे? अभ्यास करताना?” अगदी मोठ्या भावाच्या सारखा खूप मोठा झाल्यासारखा अभय तिच्याशी बोलत होता .
“तू पण काय रे? तेच तेच बोलतो.. चालू आहे सगळं व्यवस्थित..”प्रिय पाणी आणण्यासाठी मध्ये गेली आणि आई बाहेर आली अभय तोपर्यंत बाबांच्या रूममध्ये गेला. त्यांच्या हातावरती हात ठेवून दोन मिनिटे शांत बसून राहिला. आपले बाबा जे आपल्याशी एवढे बोलत होते, जे इतके छान आणि हुशार होते ते एकदम शांत झाले होते.
काय झालं ?कसं झालं ?अभय ला माहित नव्हतं..
तेवढ्यात आई सुद्धा त्या रूममध्ये येते. तिच्या हातात काहीतरी असतं. 
“आई कशी आहेस तू? एवढ्या तातडीने मला का बोलवून घेतलं? काही झालं का”अभय 
“तू खूप व्यस्त झाला आहेस. तुझ्याकडे वेळच नाही म्हणून म्हटलं आज तुला बोलावूनच घ्यावं ..”आई हसत म्हणाली “आई ,..
आई खरं सांग तू फक्त माझी भेट व्हावी म्हणूनच मला बोलावलं..? मी किती घाबरलो होतो.”अभय 
“तुला भेटायचं होतं हे एक कारण आहे आणि महत्त्वाचं अजून एक कारण आहे”आईने हातातला लिफाफा त्याच्या पुढे धरला. त्याला खुणवलं ते उघडण्यासाठी
 “काल सकाळी हा लिफाफा येथे पडला होता दारात..मी जेव्हा हे उघडून बघितलं तेव्हा मी चकित झाले आणि खरं म्हणजे त्याच्यानंतर एक फोन आला..”आई शांतपणे बोलत होती. 
“काय? तु मला हे आधी का नाही सांगितलंस?”अभय 
“तू तरी कुठे बोललास? याबद्दल..”आई अभय थोडा चक्रावला त्याला कळत नव्हतं त्याची आई नेमकं काय बोलते आहे म्हणजे त्याला येणारा फोन कॉल आणि सेम फोटो याबद्दल आईला कसं माहिती? 
“हो हा लिफाफा मला अचानक मिळाला आणि मग जो फोन आला त्यामध्ये मला सांगितलं गेलं की माझ्या मुलाला म्हणजेच तुला सुद्धा हा लिफाफा मिळाला आहे आणि जर सत्य जाणून घ्यायचं असेल तर मार्ग शोधावा लागेल या रेषांचा अर्थ लावावा लागेल..”आई 
“हो आई मला सुद्धा असे फोन येत आहेत पण मला कळत नाही की याचा माझ्याशी काय संबंध आहे .मी ह्या बाईला ओळखत नाही तरी पण तिच्यासोबत माझा फोटो कसा असू शकतो मला वाटतं की कोणीतरी माझी मस्करी करत आहे आणि म्हणूनच मी आता पोलिसात जाण्याचा विचार करत आहे.”अभय
 “थांब ..तू या बाईला ओळखत नाहीस हे माहित आहे मला पण त्यासोबत तू अजून काही गोष्टी जाणून घ्याव्या असं मला वाटतं म्हणून मी तुला इथे बोलावलं आहे.”आई 
क्रमशः 
ही कथा पुढे अजून रंजक वळण घेणार आहे पण त्यासाठी तुम्ही मला फॉलो करायला हवं आणि या कथेवर तुमच्या प्रतिक्रिया द्यायला हव्या जेव्हा मी एखादी कथा लिहितो तेव्हा त्यामध्ये आम्हाला तुमच्या प्रतिक्रियेची खूप गरज असते कारण तेव्हाच आम्हाला कळतं की आम्ही आमच्या वाचकांसोबत जोडले जात आहोत की नाही.. ह्या कथेतून तुमच मनोरंजन  होत असेल तर नक्कीच प्रतिक्रिया कळवा मी वाट बघत आहे .
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्यासाठी पेजला फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन फेवरेट हे ऑप्शन निवडा म्हणजे एक ही भाग चुकणार नाही..