Login

रेखांश भाग ९

Abhay Gets Emotional For His Father,He Wanted To Speak With Him
अभय निरखून बघतो तर त्याला जाणवत की त्या रेषा ह्या एका जागेचा मार्ग आहे..तो पेन्सिल ने त्यावर फिरवतो आणि टेबल खाली ठेवलेल्या नकाशावर लावतो त्याला एक ठिकाण सापडत..एक जिल्हा.. आणि त्याचे विचारचक्र जोरात फिरू लागतात…
सकाळी अभय उठतो आणि चहा पित पित आई का विचारतो
आई, बाबांची बदली कधी ‘गगनवाडी’ ला झाली होती का?
“हो हो तुझे बाबा तिथे एकदा बदलीवर होते. वानवळे कर यांचा उल्लेख करताना एकदा तुझे बाबा म्हणाले होते की त्यांची भेट तिथेच झाली होती म्हणून” आई
“पण तू का हे विचारत आहेस?”
“आई मला जो फोटो आला त्याच्या मागे ज्या रेषा आहेत त्यावरील बिंदू जोडल्यानंतर एक नाव दिसलं आणि ते आहे गगनवाडी …. म्हणून विचारलं ज्याने कोणी हा फोटो पाठवला तो तिथेच किंवा मी तिथे जावो अशी त्याची इच्छा आहे” अभय
“मी तुला तिथे जाऊ देणार नाही.. कोण कशासाठी काय करत आहे काहीच कळत नाही..”आई
“पण आई आपल्याला त्या बाईचा शोध घ्यावा लागेल “अभय
“काही गरज नाही..जे चालू आहे ते बरं आहे मला अजून पुढे विषय नाही वाढवायचा..”आई
आईला बऱ्याच गोष्टींची चिंता लागली होती,तिला कोणताही भूतकाळ नको होता कारण काय माहिती त्या भूतकाळात काय घडले असेल ?ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो,त्या विश्वासाला धक्का तर बसणार नसेल.. किंवा अजून काही भयानक घटना उघडकीस आली तर…. त्याचा आपल्या मुलांवर परिणाम व्हायला नको.. एवढाच तिला वाटत होतं..
एका आईचा मग आपल्या मुलांच्या विचाराने जास्तच घाबरून जात,ती पण तर एक माऊली होती.. काळजी वाटणारच…
आईचा नकार होता…अभय ला आता काय करावे सुचत नव्हते..
आधी त्याने हा विषय सोडायचा अस ठरवलं होत पण नंतर घरी आईशी बोलल्यावर आपण ह्याचा शोध घ्यायच अस त्याला वाटू लागले होते पण आता आई नाही म्हणत होती.
हा गुंता कसा सोडवावा हे काही कळत नव्हतं…
थोडा वेळ तो बाबांच्या खोलीत जाऊन बसला..
बाबा बाहेर बघत होते…त्याने हातावर हाथ ठेवला तसा त्याच्या बाबाने त्याच्याकडे पाहिलं.. त्यांच्या खोल डोळ्यात काहीतरी हरवले आहे असे वाटत होते…
“बाबा,कसे आहात तुम्ही? कधी बोलणार पाहिल्यासारखं आमच्याशी?..”अभय फारच भावनिक झाला होता त्याला आधाराची, मार्गदर्शनाची गरज होती..
“बाबा, आज तुमच्याशी खूप बोलायची इच्छा आहे,तुम्ही आमच्यासोबत असून पण नसता.. एका अपघाताने आपलं आयुष्य एवढं बदलून टाकलं की सगळंच अर्धवट वाटतं… काय झालं तुम्हाला? तुम्ही असे का झालात? तुम्ही कधीच बोलणार नाही का?
बोला ना बाबा,आज मला तुमची गरज आहे…काय संबंध आहे तुमचा त्या बाईशी?”अभय
अभय चे बाबा सगळ ऐकत होते, त्याच्या हृदयापर्यंत आपल्या मुलाची हाक पोहचत होती पण ते काही करू शकत नव्हते. त्याच्या शब्दानुसार त्यांच्या चेहऱ्यावर हावभाव बदलत होते फक्त…
त्या बाईचा विषय निघताच पुन्हा एकदा हाथ थरथरला त्यांचा…अभय ने पटकन हेरले
“बाबा, काय बोलायचं आहे..तुम्ही ओळखत तिला? कोण आहे ती?”अभय ने त्यांचा हात हातात घेतला…त्याला विश्वास होता काहीतरी बाबा नक्की सांगतील..
“बाबा, तुमचा तिच्याशी काय संबंध आहे.. तुम्हाला गगन वाडी बद्दल काय माहित आहे?” अभय
अभय ने जेव्हा गावाचा नाव घेतलं तेव्हा बाबांच्या डोळ्यात भीती उमटली..चेहऱ्यावर पुन्हा घाम येऊ लागला..अभय ला वाटले बाबांची तब्बेत आता खराब होत आहे.
“बाबा शांत व्हा..शांत व्हा.. पाणी प्या…तुम्हाला त्रास होत असे तर राहू द्या मी जा विचारणार मी शोध घेईन…
”चला तुम्ही आराम करा.. अभय ने त्यांना हाताला धरून उभे केले आणि सावकाश आधार देत बेड वर झोपवले ..
अभय तिथून निघणार तेवढ्यात बाबांची हातची हालचाल वाढली..त्यांनी इशाऱ्याने कपाटकडे बोट दाखवले..
क्रमशः.

सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्यासाठी पेजला फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन फेवरेट हे ऑप्शन निवडा म्हणजे एक ही भाग चुकणार नाही.. ही कथा मनोरंजन म्हणून लिहिली आहे..तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी प्रेरणा देणार आहे.तेव्हा नक्की कळवा..

0

🎭 Series Post

View all