बाबांची अस्वस्थता बघून अभय थोडासा घाबरला पण त्याला एक कळून चुकलं की ह्या फोटोमध्ये दिसणाऱ्या बाईचा बाबांशी काहीतरी संबंध आहे आणि तो आता आपण शोधलाच पाहिजे. तेवढ्यात आई आली, “ अभय काय झालं बाबांना त्यांना ही गोळी द्यायला लागेल, थांब मी पाणी आणते” आणि आई पाणी आणायला गेली .
आई आणि अभय ने बाबांना गोळी दिली. बाबा शांत झाले आणि झोपले. “अभय असं काय झालं की बाबांना आज अचानक पुन्हा एकदा अस्वस्थ झालं?”आई
“आई मी बाबांशी बोलत होतो त्या फोटोबद्दल, त्या गावाबद्दल आणि जेव्हा मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव बदलले. आई यामागे कोणीतरी आहे. नक्कीच याचा संबंध आपल्या जुन्या नात्यांशी असू शकतो ,बाबांशी त्या बाईचा काय संबंध आहे हे मला शोधावच लागेल .” अभय
“अभय, तू बरोबर बोलत आहेस .मलाही वाटतं की सत्याचा शोध लागायला हवा पण शांत पाणी ढवळलं तर त्याच्या खाली फक्त गाळ निघतो आणि सगळं पाणी गढूळ करतो, नात्यांचाही तसंच आहे आपले सगळे व्यवस्थित चाललेलं आहे .देव न करू एखादी घटना अशी असेल की जी मी सहन नाही करू शकणार ,ज्याच्यामुळे आपल्या घराण्यावरती डाग लागेल, पुढे प्रियाचा सुद्धा आपल्याला विचार करायला हवा ..”आई
“मला समजते आई तू काय म्हणते, पण तू काळजी करू नकोस .मला नाही असं वाटत की काहीतरी खूप अघटीत असेल. जे काही होईल ते आपल्या भल्यासाठीच होईल .असं अर्धसत्य घेऊन मी नाही जगू शकत नेहमी नेहमी डोक्यामध्ये शंकेची पाल चुकत राहणार आणि मग कशातच लक्ष नाही लागणार. मी माझ्या एका मित्राला पण हे सांगणार आहे जो पोलीस खात्यात आहे तुला आठवतंय ना मी अर्जुन बद्दल बोलतोय..”
“हा तू एकदा अर्जुन शी बोलून बघ कारण प्रत्यक्षपणे जर आपण पोलिसांची पण मदत घेतली आणि त्यात काही उलट सुलट निघालं तर खूप अवघड जाईल, तसही शहाण्याने कोर्टाची पायरी आणि पोलिसांच्या भानगडीत पडू नये म्हणतात..”आई
अभय विचार करत होता आणि त्यांनी लगेचच बाहेर जाऊन अर्जुनशी बोलायचं ठरवलं. अर्जुन ला कॉल केल्यावरती अर्जुन चा फोन काही उचलला गेला नाही त्याने तो फोन तसाच ठेवला आणि निधीशी बोलाव म्हणून कॉल केला.
“निधी कालपासून तुझा एक फोन नाही, मेसेज नाही हे सगळं काय चाललंय? कुठे आहेस तू ?कशी आहेस ?बाबा कसे आहेत ?”
निधीच काही न ऐकताच अभय बोलत होता. दोन दिवस झाले होते निधीचा काही फोन नव्हता मेसेज नव्हता त्यामुळे तसंच तो चिंताग्रस्त होता ,त्याने केलेला फोन निधी उचलत नव्हती .
“अभय मला वाटतं आपल्याला आपलं नातं संपवाव लागेल .”
असं अचानक पणे निधी कडन हे ऐकणं खूप अनपेक्षित होतं .अभयला काही सुचलं नाही दोन मिनिट त्याला असं वाटलं की कदाचित राँग नंबर लागलाय.
“हॅलो हा फोन कुठे लागलाय? मी निधी पटवर्धन शी बोलत आहे ना ..”
“अभय तू बरोबरच नंबर लावला आहे. मी निधीच बोलत आहे पण मला असं वाटतं की यापुढे आपण एकमेकांच्या संपर्कात न राहणंच योग्य आहे .”निधी

अभयला काहीच कळत नव्हतं. घरात बाबांची परिस्थिती अशी होती. त्यात हे रहस्यमय फोटो आणि फोन कॉल आणि आज अचानक निधी असं म्हणत होती त्याला तर दोन मिनिटं चक्कर आली आणि तो पटकन खुर्चीत बसला..
क्रमशः
काय होईल पुढे अभय आणि निधीचं नातं इथेच संपेल का असं अचानक निधी का म्हणत असेल की आपलं नातं संपायला हवं बाबांचा भूतकाळ आईच्या नात्यावरती आणि प्रियाच्या भविष्यावरती काय परिणाम करेल वाचत रहा रेखांश ही कथा..

सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्यासाठी पेजला फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन फेवरेट हे ऑप्शन निवडा म्हणजे एक ही भाग चुकणार नाही.. ही कथा मनोरंजन म्हणून लिहिली आहे..तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी प्रेरणा देणार आहे.तेव्हा नक्की कळवा..