Login

रेखांश भाग ११

Nikki Breaks The Relationship With Abhay, He Does Not Understand The Reason
निधी तू काय म्हणते तुला कळतंय का? काय झालं अचानक तुझे बाबा कसे आहेत?”अभय
“बाबा बरे आहेत अभय पण आपल्या नात्याचं काही भविष्य नाही माझ्या आईने आणि मामाने मिळून एक स्थळ आणले आणि आई आणि बाबांची त्याला पसंती आहे..” निधी
“असं कसं अचानक तू म्हणू शकतेस त्यांनी पसंती केली म्हणजे तुलाही पसंत आहे का आणि आपले काय गेलं एक वर्ष आपण एकमेकात गुंतलो आहे हे सगळं एक खेळ होता असं वाटतं का तुला?”अभय अभय वैतागला होता चिडला होता रागावला होता त्याला काय बोलावं कसं बोलावं काहीच कळत नव्हता त्याचा आवाज मोठा झाला होता श्वास वाढला होता त्याचा आवाज बघून आई आणि प्रिया तिथेच आले होते.
“अभय शांत हो मला याच्या पलीकडे जास्त तुला काहीच सांगता येणार नाही. मी माझ्या आई बाबांच्या शब्दाच्या बाहेर नाही जाऊ शकत आहे. जी तब्येत मी आता बाबांची बघितली आणि आईने ज्या पद्धतीने मला सांगितलं आहे त्यानुसार मला असं वाटतंय की आपण इथेच थांबलेलं बरं..” निधी फोन कट करते
“निधी हॅलो हॅलो निधी ऐक..”फोन कट झालेला असतो
“काय झालं बाई तू एवढा का रागावलय “आई
“काही नाही निधीच्या घरचे ऐकत नाहीयेत त्यांनी निधीसाठी स्थळ आणलं.”अभय
“शांत हो , प्रिया पाणी आण.”आई
“कसा शांत राहू मी आई मी निधी शिवाय नाही जगू शकत आणि निधीचही माझ्यावरती खूप प्रेम आहे माहित आहे मला एकीकडे बाबांची अशी परिस्थिती दुसरीकडे तो फोटो दुसरीकडे आज अचानक निधी मला म्हणते की आपण पुढे जाऊ शकत नाही असं का?”अभिजीत चिडचिड वाढत चालली होती आई त्याला शांत करायचा प्रयत्न करत होती .
“असं अचानक ती कसं म्हणू शकते आई इथे येईपर्यंत सगळं ठीक होतं ती आई-बाबांशी बोलणारही होती आणि अचानक हे सगळे झाले तिच्या आईला पसंत आहे म्हणून ती कोणाशी लग्न करेल का? माझ्यात काय कमतरता आहे मी सुद्धा सगळं कमवतो ,व्यवस्थित फ्लॅट आहे तुमच्याकडून काही प्रॉब्लेम नाही पण मला एक कळत नाही तिचा आई वडील असं का करतायेत”? अभय खूप चिडचिड करत होता आणि हातपाय आपटे तो त्वचा रूम मध्ये जाऊन बसला त्याला काही सुचत नव्हते.
निधीचे व घरी गेली बाबांना बघायला तेव्हा बाबांना पायाला फ्रॅक्चर होतं आणि एक दिवसात त्यांना घरी सोडणार होते जेव्हा निधी बाबांना घेऊन घरी आली तेव्हा आईने तिला सांगितलं की निधी तुझ्यासाठी एक स्थळ आला आहे आणि आम्हाला ते पसंत आहे मुलगा एकुलता एक आहे कमवता आहे चांगली नोकरी आहे निधीने सुद्धा घरी बोलण्याचा प्रयत्न केला अभयसाठी पण तिची आई ऐकत नव्हते त्यात बाबांची तब्येत अशी होती.
इकडे अभयला काही सुचत नव्हते काय करावं काय नाही संध्याकाळी आई जेवायला बोलवायला आली तरीसुद्धा अभय आला नाही मला भूक नाही आई आज मला कुठेच बाहेर जायचं नाहीये मला तू त्रास देऊ नकोस थोड्यावेळ एकटा सोड
आई हताशपणे बघत होती घरात काय काय अचानक घडतंय हे तिच्या आकलना पलीकडे होतं ती शांतपणे तिथून निघून गेली अभयला काही वेळ एकट्या राहायला पाहिजे म्हणजेच तोडगा निघेल असा तिलाही वाटलं बराच वेळ विचार करत होता आणि अचानकपणे पुन्हा एकदा त्याचा फोन वाजला त्याला वाटलं निधीचा असेल तरी न बघता पटकन उचलला
हॅलो निधी आपण बसून बोलूयात काय झाले मला नीट सांग तू काही पुढे बोलणार तेवढा तिकडं आवाज आला
तुझ्या हातातून वेळ निघून चालला आहे तुला तुझ्या बाबांचा सत्य आणायचं असेल त्यांच्या अपघाताचे कारण माहिती पाहिजे असेल तर लवकरात लवकर रेषांचा अर्थ लाव आणि सत्य शोधून काढ माझ्याकडे जास्त वेळ नाहीये आणि हो पोलिसात जायची घाई करू नकोस त्याने तुला मदत नाही तर त्रास होईल..
हॅलो कोण बोलताय तुम्ही समोर का नाही येत एवढेच तुमच्याकडे काही सत्य असेल तर माझ्या समोर या अभय बोलत होता पण तोपर्यंत तिकडनं कॉल कट झालेला होता
कळत नव्हतं कोण काय फोन करता येते आणि कशासाठी होत आहे ते अभय पूर्णपणे चक लावला होता डोक्याला हात लावून तो बेडवरती तसाच बसला होता.
क्रमशः
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्यासाठी पेजला फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन फेवरेट हे ऑप्शन निवडा म्हणजे एक ही भाग चुकणार नाही.. ही कथा मनोरंजन म्हणून लिहिली आहे..तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी प्रेरणा देणार आहे.तेव्हा नक्की कळवा..