हताशपणे अभय तसाच बसून राहिला. एवढ्या विचारचक्रानी त्याचा मेंदू थकून गेला होता, त्याला रात्री किती वाजता झोप लागली हे त्याला काहीच कळलं नाही. सकाळी जेव्हा तो उठला तेव्हा गडबडून उठला .त्यांनी फोन बघितला. निधीचा एकही फोन नव्हता की मेसेज नव्हता ,त्याने पुन्हा एकदा निधीच्या फोनवर फोन केला पण निधी ने फोन नाही उचलला.
" तू फ्रेश होऊन आला."आईने त्याला चहा दिला.
आई बघत होती की अभय खूप शांत झाला आहे पण आईने कोणताही विषय नाही काढला. अभय ने पुन्हा एकदा खूप आशेने निधीला फोन केला आणि तिकडं फोन रिसीव झाला,” हॅलो “पण आवाज वेगळा होता .
“हॅलो कोण बोलताय? निधी आहे का ?”अभय
“निधीताई सध्या तयार होत आहे. आज तिचा साखरपुडा आहे .”

हे ऐकून अभयला धक्का बसला. अचानकपणे निधीचा साखरपुडा तेही काहीही न सांगता . तो आता पूर्णपणे कोलमडला होता त्याला कशातच रस नव्हता .काय करावं काय नाही हे त्याला काहीच कळत नव्हतं. असाच बऱ्याच वेळ गेल्यानंतर त्याला रात्रीचा फोन आठवला त्यांनी पुन्हा एकदा तो फोटो बघितला ,रेषा जोडल्या आणि गगनवाडी येथे जाण्याचा निश्चित केल. त्याने बॅक भरायला घेतली .
“अभय हे काय करतोय कुठे निघालास तू?” आई
“आई सगळं संपलं .माझं मन कशातच लागत नाहीये. निधी माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाहीये आणि काल पुन्हा एकदा मला फोन आला. आई हे सगळं आता शोधलच पाहिजे. मी ऑफिसमध्ये सुद्धा कळवलंय ते पुढचे पंधरा दिवस मी येणार नाहीये .माझी तब्येत बरी नाहीये .”अभय
“अभय ते सगळे ठीक आहे पण तु अचानक कुठे निघालास? काय करणार आहेस ?अर्जुन शी बोलला का ?”
“नाही आई ,अर्जुन चा फोन लागत नाहीये .काल त्या फोनमध्ये माणसाने सांगितलं की जर बाबांच सत्य आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला याच्या मुळाशी पोहोचावेच लागेल आणि आता मी त्याच्यासाठी पुढे चाललोय. मी तुला कळवत राहीन काय आहे कसा आहे .”अभय
“जेवण करून जा आणि ऐक मला असं वाटतं की या सगळ्याची सुरुवात करण्याच्या आधी तू निधीशी भेटावं ,बोलावं ..”
“त्याचा आता काही उपयोग नाही आई ..आज तिचा साखरपुडा आहे .ती माझ्या फोन चा उत्तर देत नाही आणि माझा फोन उचलतही नाही..”
अभय खूप हताश झाला होता त्याला अचानक पणे रडू कोसळलं इतका वेळ डोळ्यांमध्ये साठवलेला पाणी आईच्या समोर डोळ्यातून अश्रू ओघळले .एक छोटा हुंदका बाहेर पडला आणि तो हताशपणे पुन्हा बसून राहिला .

आईला आपल्या मुलाची परिस्थिती जाणवत होती .अचानक आलेली सगळी संकट आणि त्यातून न दिसणारा मार्ग यापुढे आई सुद्धा हतबल झाली होती .काय करावे काहीच कळत नव्हतं आपल्या मुलाला तिने पाठीवरती हात ठेवून फक्त धीर दिला .त्याला शांत होऊ दिल…
अभयचा निर्धार पक्का होता. तो आता याच्या मुळाशी जाणारच होता..
राहून राहून एकच विचार निधी तू असं का वागलीस? का ?काय कारण आहे की तू मला न सांगता आपल्यताल नातं तोडून टाकलं.. आपण सोबत घालवलेली क्षण ,आपलं प्रेम हे काहीच नाही…असं काय कारण आहे की, तू मला विसरलीस.. तुझं प्रेम ,तुझं हसणं ,खेळणं सगळं खोटं होतं….?
अभयला अतिशय मनस्ताप होत होता .निधीच्या विचारातून बाहेर कसं पडावं हे त्याला कळत नव्हतं त्यांनी बॅग घेतली. जिकडे वाट मिळेल तिकडे तो चालू लागला..
आई मात्र त्याला जाताना बघत होती तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते कंठ दाटला होता .तिने पदर तोंडाला लावला आणि मध्ये निघून गेली..
क्रमशः
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्यासाठी पेजला फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन फेवरेट हे ऑप्शन निवडा म्हणजे एक ही भाग चुकणार नाही.. ही कथा मनोरंजन म्हणून लिहिली आहे..तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी प्रेरणा देणार आहे.तेव्हा नक्की कळवा..

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा