Login

रेखांश भाग १३

Abhay Starts His Journey To Find Out The Truth..
अभय हाताशपणे चालत होता ,चालता चालता तो बस स्टॉप वर आला. त्याला पुढे काय करावं काहीच कळत नव्हतं पाच दहा मिनिटं शांत बसला. त्यांनी दीर्घ श्वास सोडल.ा पाणी पिलं आणि आणि स्वतःला म्हणाला," जे झालं ते झालं मला आधी हे सत्य शोधलं पाहिजे त्या बाईचा सत्य…"
त्याने एक बस घेतली आणि त्या बस मध्ये बसून पुढचा प्रवास सुरू केला.
खिडकीतून गार वारा येत होत.ा त्याचे डोळे त्या प्रवासामध्ये उजाडलेल्या जमिनीकडे बघत होते सध्या त्याला त्याचा आयुष्य त्या भकास उदास जमिनीसारखंच वाटत होतं यावरती एकही गवताचं पातं किंवा हिरवळ नव्हती. राहून राहून एकच प्रश्न येत होता निधी तू असं का केलं ?न राहून त्याने पुन्हा एकदा फोन काढला आणि चेक केला पण निधीचा काही मेसेज नाही की कॉल नाही शेवटी त्याने एक मेसेज टाईप केला .
“प्रिय निध,ी मला नाही माहित तू असं का केलं? मला हेही माहित नाही की तू माझ्याशी का बोलत नाहीयेस... तुझा निर्णय जर तुला आनंद देत असेल तर तू खुश रहा मी तुला कधीही विसरू शकणार नाही जमलं तर नक्की सांग माझी काय चुक होती ते..?”
आणि पुन्हा एकदा त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू जमा झाले. मोबाईल कपाळाला लावून डोकं खाली घालून तो तसाच बसून राहिला. त्या क्षणाला त्याला सगळे सगळे क्षण आठवल.े निधीचे बोलणं हसणं रूम वरती एकत्र राहण,ं त्यांच्या कॅन्टीन मधल्या गप्पा आणि इथे येण्याच्या आधी त्यांचा झालेला प्रेमळ संवाद.. एकत्र असूनही त्यांनी कधी मर्यादा ओलांडल्या नाही. सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांनी जशी फुल सुंदर ताजी तवाने वाटतात त्यावर पडलेले दवबिंदू जसे चमकतात तशीच निधी आणि तिचा हास्य त्याच्या आयुष्याला प्रसन्न करत होता . तो निधीमध्ये इतका गुंतला होता की एक वर्षापासून त्याला कसलंच भान राहिला नव्हता. निधी सोबत लग्न करून संसार थाटायचा आणि आपला पूर्ण आयुष्य तिच्यासोबत हसत खेळत घालवायचं असाच त्याचा विचार होता त्याच्या घरच्यांकडून तर कधीच नकार नव्हता पण प्रश्न होता निधीच्या आई-वडिलांचा पण निधी मिळाली होती किती तिच्या वडिलांची आणि आईशी बोलून नक्कीच यावर तोडगा काढेल आणि अभय शिवाय दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही पण हे काय तू असं कसं करू शकतेस निधी…
पुन्हा एकदा अभयला तोच प्रश्न सतावत होता..
चार-पाच तास असेच निघून गेले .बस एका थांब्यावरती थांबली अभय उतरला एक कप चहा घेतला आणि पिऊ लागला. तिथे अजून काही लोक बसलेली होती .त्याला पुढचा रस्ता माहित नव्हता त्याला फक्त एवढे माहीत होतं की पुढच्या येणाऱ्या दोन स्टॉप नंतर त्याला उतरायचं आहे. तो बस मध्ये चढला आणि एका गावामध्ये उतरला तिथे उतरल्यानंतर त्याने इकडे तिकडे पाहिलं पण एकही वाहन गावाच्या आत मध्ये जात नव्हतं .
खूप वेळ पायी चालून चालून दमल्यानंतर त्याला एक सायकल रस्ता वरून जाताना दिसली त्यांनी हात करून त्याला थांबवलं ,
“दादा हा रस्ता गगनवाडी कडे जातो ना..?”अभय
“हो तुम्हाला कुणीकडे जायचंय?” तो माणूस..
“कुणीकडे असं नाही पण मी एका व्यक्तीचा शोध घेत आहे. तुम्ही मला सांगू शकता गगनवाडीच्या पंचायत ऑफिसमध्ये कस जायचं ते..?” अभय
“ते तरी बंद पडलेली खोली आहे .तिथे कोणीच नसतं पण तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर तुम्ही असं सरळ सरळ सरळ जा 15 मिनिटांनी एक मंदिर येईल त्या मंदिर मध्ये तुम्हाला काही माहिती मिळू शकेल..”आणि तो माणूस निघून गेला.
अभय पुन्हा चालत राहिल.ा डोक्यामध्ये विचार येत होते..
मी जे करत आहे ते बरोबर आहे खरंच मला काही सापडेल का काय गोंधळ आहे हा असो.
खूप वेळ चालून चालून दमल्यानंतर त्याला ते मंदिर दिसलं आणि तो मध्ये जाऊन गणपती बाप्पाचं आणि शिवलिंगाचे दर्शन घेऊ लागला थोड्यावेळ असच गेला असेल आणि तो तिथेच बसला .संध्याकाळ झाली होती. आरतीसाठी लोक जमत होती .तो खूप थकला होता.
त्याच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट जाणवत होता.
क्रमशः

प्रिय वाचक मी आशा करते की तुम्हाला माझी कथा आवडत असेल या कथेमध्ये पुढे खूप रंजक वळण येणार आहे आणि एक रहस्येचा पर्दाफाश होणार आहे, त्यामुळे मला फॉलो करा आणि कथेचे भाग लवकरात लवकर वाचण्यासाठी सबस्क्रीप्शन घ्या.
तुमची पसंती तुम्ही जर मला प्रतिक्रियाद्वारे कळवली तर मला खूप आनंद होईल मी वाट बघते भेटूया पुढच्या भागात

0

🎭 Series Post

View all