दीर्घकथा डिसेंबर २५जानेवारी २०२६
“तू या बाईंना का शोधत आहेस? पुजारी
“या बाईंशी मला काम आहे.. काही माहिती हवी आहे म्हणून मी यांना शोधतोय. तुम्ही यांना ओळखता का? या मला कुठे भेटतील .
“हे बघ लेका या तुला कुठे भेटतील हे मला माहित नाही पण वीस पंचवीस वर्षांपूर्वी ही बाई या गावातच होती. खूप चांगली होती चित्रा नाव तिचं …”पुजारी
“अजून काही तुम्ही सांगू शकता का या चित्राबाई बद्दल “ अभय
‘मला जास्त माहित नाही. मी खूप दिवसापासून इथे पुजारी म्हणून काम करतोय .माझं लहानपण इथेच गेलं. या गावात किसन केसकर म्हणून गृहस्थ होता त्याच्याशी हीच लग्न झालं होतं .लग्न करून ती या गावात आली. सुंदर ,सोजवळ, साधी बाई होती तिला लोकांना मदत करायला खूप आवडायचं ..”
“मग पुढे काय झालं त्यांचं घर असेल ना इथे ?”अभय
“हे बघ पोरा बऱ्याच गोष्टी घडल्या, त्या बाईचे विवाहबाह्य संबंध होते एका शासकीय अधिकाऱ्यासोबत असं ऐकण्यात आलं तिचं आणि तिच्या नवऱ्याचं खूप भांडण झालं आणि त्याने तिला हाकलून दिली. पुढे तिचं काय झालं ती कुठे गेली काहीच माहित नाही ..”पुजारी
“आणि तिचा नवरा तो कुठे असतो? “अभय
“दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला आहे. तो कसा मेला हे अजूनही कळलेलं नाही त्याला कोणी मारलं, काही घातपात झाला, कि ती बाई चित्रा पळून गेली काहीच माहित नाही “.. पुजारी
“असं कसं होईल ती तर खूप चांगली होती असं म्हणता ना तुम्ही ..”अभय
“तेच तर कळत नाही ना.. त्या मुलीला गावातल्या सगळ्या लोकांना मदत करायला आवडायचं. छोट्या छोट्या मुलांना ती शिकवायचे .त्यांच्या घरामध्ये तीच एक खूप शिकलेली मुलगी होती पण त्या किसनला ते आवडत नव्हतं .तो काही लोकांशी चांगला वागत बोलत नव्हता, त्यामुळे काही लोक म्हणतात की त्याने आत्महत्या केली कारण बायकोचे बाहेर संबंध होते तर काही म्हणतात बायकोनेच त्याला मारलं आणि पळून गेली त्या अधिकाऱ्यासोबत ..”पुजारी
“कोण होता तो अधिकारी ?त्याचं नाव माहित आहे का ?काय काम करायचा “अभय उदास होऊन…
“मला एवढं काही माहित नाही आणि तू सुद्धा नसत्या चौकशा करू नकोस. तुझ्या जीवाला इथे धोका आहे त्या सरपंचाला सुद्धा माहित आहे ही बाई कोण आहे ते पण त्याने सांगितलं नाही म्हणजेच त्याला असं वाटतं की तू याच्या मुळापर्यंत पोहोचू नये”पुजारी
“पण का असं काय रहस्य आहे? ह्याच्यात त्याचा काय फायदा ?”अभय
“हे बघ मला जे माहित होतं ते मी तुला सांगितलं. या पलीकडे जास्त मी तुला काही सांगू शकत नाही .. इथून सरळ सरळ सरळ जेव्हा शाळेकडनं तिसऱ्या गल्लीत जर तू गेला तर त्याच्या शेवटच्या टोकाला त्या चित्राचं घर होतं, जे आता बंद पडले तिथे कोणीही राहत नाही .तिथले सगळे कुठे आहेत? काय आहे काही माहित नाही तू आता इथून निघून जा त्यातच तुझं भल आहे…”पुजारी
“तुम्ही एवढी मदत केली ,माहिती दिली त्यासाठी धन्यवाद .फक्त एकच सांगा सरपंचचा ह्या सगळ्यामध्ये काय हेतू आहे ?”अभय
“मी सांगितलं ना मला नाही माहित, सरपंच दिसतो तेवढा चांगला आणि सरळ नाही. खूप वर्ष आधी जेव्हा तो अधिकारी इथे होता तेव्हा जमिनीच्या काही व्यवहारांमध्ये या सरपंचाचं नाव आलं होतं आणि बाजूच्या गावा मधल्या एका माणसाचं पण.. पण त्याच्यापुढे काय झालं आणि काय नाही हे कोणाला कळलं नाही ते प्रकरण दाबलं गेलं आणि त्यातच चित्रा आणि तो अधिकारी यांचे संबंध. उघडकीस आले म्हणून ते दोघे फरार झाले.. असं या गावांमध्ये ऐकण्यात येतं “
“तुम्ही त्या अधिकाऱ्याला ओळखू शकता?” अभय
“हो मी पाहिला आहे त्याला ..तसा तो भला माणूस होता पण कोणाच्या मनात काय आहे हे आपण सांगू शकत नाही ना .”पुजारी
अभयच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकते .त्याला बऱ्याचदा असं वाटतं की पुजारी ला आपल्या बाबांचा फोटो दाखवावा आणि विचारावं ही तीच व्यक्ती आहे का पण जर पुजारी हो म्हणाले तर तर हे सिद्ध होईल की बाबांचा त्या बाईशी संबंध होता आणि हे सत्य खूप जड आहे जे पचवणं अवघड आहे .
काय करावं काय नाही अशा द्विधा मनस्थितीमध्ये अभय त्याच्या घरातून बाहेर पडतो आणि मंदिर मध्ये येऊन टेकतो न राहून तो पुन्हा पूजारी कडे जातो आणि त्याला बाबांचा फोटो दाखवून विचारतो,
“तुम्ही यांना ओळखता का?” अभय
क्रमशः
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्यासाठी पेजला फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन फेवरेट हे ऑप्शन निवडा म्हणजे एक ही भाग चुकणार नाही.. ही कथा मनोरंजन म्हणून लिहिली आहे..तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी प्रेरणा देणार आहे.तेव्हा नक्की कळवा..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा