दीर्घकथा डिसेंबर २५- जानेवारी २०२६
रहस्य कथा
रहस्य कथा
"पण का माझ्या येथे असल्याने त्यांना काय प्रॉब्लेम आहे ?”
“हे बघ बाळा त्या सरपंच चा हात कशातरी असल्याशिवाय तो एवढा घाबरणार नाही .मी तुला एवढेच सांगतो आता तू आराम कर आणि सकाळी लवकरात लवकर इथून निघून जा त्याच्या नजरेस पडू नको ..”पुजारी
रात्रभर अभय विचार करत होता की हा सगळा काय गुंता आहे माझ्या इथे येण्याने सरपंच ला असा काय प्रॉब्लेम आहे?, ती बाई आणि बाबांचा काय संबंध आहे ,त्यांचे अनैतिक संबंध होते तर बाबांनी आईला धोका दिला आणि हे चुकीचं आहे त्याला त्याच्या बाबांवरती खूप राग येत होता पण त्याच सोबत हेही कळत नव्हतं की सरपंचाला जर माहित आहे ती बाई कोण आहे तर तो मला का सांगत नाही .कुठेतरी पाणी मुरतंय हे स्पष्ट दिसत होता. या सगळ्या विचार चक्रांमध्ये त्याला झोप लागली .पहाटे पाचच्या सुमारास पुजाराने त्याला उठवलं आणि त्याला तिथून जायला सांगितला. अजूनही बाहेर अंधार होता आणि सगळीकडे शुकशुकाट होता .अभय फ्रेश झाला आणि पटकन गावाच्या मेन रस्त्यावरती जाण्यासाठी निघाला. बराच वेळ चालत असल्यामुळे त्याला थकवा येत होता ,त्याच्याकडे पाण्याच्या बाटली शिवाय आता काही नव्हते. चालता चालता दोन मिनिट एका झाडाखाली तो विश्रांतीला बसला त्याने डोळे लावलेच होते एका माणसाने त्याला उठवले ,
“ए उठ “
अभय दचकला उठून उभा राहिला. त्या माणसाने चेहऱ्यावरती स्कार्फ गुंडाळलेला होता. त्याचे फक्त डोळे दिसत होते आणि तो रागामध्ये अभयशी बोलत होता . “इथून पटकन निघून जा …पुन्हा या गावांमध्ये पाय ठेवायचा नाही नाहीतर तुझ्यासाठी चांगला होणार नाही .त्या बाईला शोधायचा प्रयत्न करू नकोस “.
“कोण आहेस तू आणि या सगळ्याशी तुला काय संबंध”? अभय त्या माणसाला विचारत होता पण त्याने अभय कॉलर पकडली आणि रागाने त्याला म्हणाला, “ तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का जुने मुर्डे पुन्हा काढायचे नसतात नाहीतर तुला सुद्धा तसंच गाडून टाकू…लक्षात ठेव पुन्हा या गावची वाट नाही धरायची आणि तो त्याला धक्का देऊन तिथून निघून जातो..” अभय त्याला आवाज देत राहतो पण तो निघून जातो गाडीवर बसून ..
अभय तसाच तिथे उभा राहतो एव्हाना दिवस निघायला सुरुवात झाली होती अभय मोठ्या श्वास घेतो आणि रस्त्याच्या मार्गाला लागतो चलता चलता मेन रस्त्यावर आल्यावर त्याला एक बस मिळते आणि तो त्या बस मध्ये बसून शहराकडे निघतो..
थोडं पुढे जाऊन जेव्हा बस थांबते तेव्हा तुम्ही चहा बिस्कीट आणि नाश्ता करून पुढच्या प्रवासाला लागतो शहरांमध्ये नोकरीवरती जॉईन व्हायचं असतं त्यामुळे सरळ तो आपल्या रूम वरती येतो.
आईला फोन लावतो “अभय कसा आहेस तू ?कुठे आहेस? काही कळलं का तुला”आई
“आई मला काही जास्त कळलं नाही मी बरा आहे आणि आता रूमवर आलो आहे उद्या मला ऑफिसला जायचं आहे. मी काही दिवसात पुन्हा तुला येऊन भेटेल तोपर्यंत काळजी घे आणि काहीही लागलं किंवा झालं तर लगेच कळवा..”, अभय
अभय न्यायला कसलीच कल्पना दिलेली असते काय सांगणार होता तो आपल्या आईचा आपल्या बाबांवरती इतका विश्वास तुमचा क्षणात होऊन जाईल आईला केवढा मोठा धक्का बसेल पुढे प्रियाचाही लग्न सगळं व्हायचं आहे त्यामुळे सध्या तरी जोपर्यंत या गोष्टीचा पूर्ण छडा लागत नाही ती गोष्ट तो आपल्यातच ठेवणार होता.
दिवसभराच्या प्रवासामुळे त्याला पटकन झोप लागली दुसऱ्या दिवशी तयार होऊन तो ऑफिसला जाण्यासाठी निघाला डोक्यामध्ये निधीचे विचार येत होते.. एवढ्या दोन-तीन दिवसात निधी नाही एकही मेसेज किंवा कॉल केलेला नव्हता.
क्रमशः

सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्यासाठी पेजला फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन फेवरेट हे ऑप्शन निवडा म्हणजे एक ही भाग चुकणार नाही.. ही कथा मनोरंजन म्हणून लिहिली आहे..तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी प्रेरणा देणार आहे.तेव्हा नक्की कळवा..