तिच्या अभ्यासात तिला अचानक फार अडचणी येऊ लागल्या आणि ओळखीच्या सरांकडे ती शिकवणीला जाऊ लागली.
काही दिवस ती सुरळीत गेली आणि तिचा अभ्यास सुद्धा चांगला चालू होता आणि अशातच सरांकडे अजून काही मुलांनी शिकवणीस मागणी केली . त्यामुळे आता तिची आणि त्या मुलांची शिकवणीची वेळ एकच होत होती .
आणि हीच ती वेळ होती ....चुकीची सुद्धा आणि अनपेक्षित सुद्धा.
कारण या सर्वांमध्ये तिने आज खूप दिवसानंतर ते नाव ऐकले
" अथर्व सानप"
तिच्या सोबत तिच्याच शिकवणीला.
तिच्या मनात जणू क्षणांसाठी संतापाची लाट उसळली परंतु क्षणात तिला आठवले
"हा तर मला ओळखत सुद्धा नाही" आणि तिच्या मनाला दिलासा भेटला .
"अथर्व सानप"...आणि त्याचे मित्र नेहमीच टिंगलटवाळी करण्यात गुंग असे . अभ्यासात तसे चांगले होते पण मज्जा जास्तच असायची त्यांची . मग काय हळू हळू बोलणे सुद्धा झाले आणि वह्यांची अदलाबदली सुद्धा. स्वभावाने तो शांत वाटायचा पण राग जणू नाकावर घेऊन फिरायचा आणि सर्वात महत्वाचे वर्गात तो स्वतः बोलायचा पण साधे गुणगुणले ना तरी सरांना तक्रार करत असे.कधी कधी तर असे वाटायचे ना की जोरात ओरडुन बसावं पण काय करणार शांत होती ना म्हणून गप्प बसायचे.
पण आता मात्र उत्सुकता लागली की हा एवढा नीट वागतो
याला माहीत नाही का मी तिचं आहे जिणे याला खूप सुनावले होते ....
आणि उत्सुकता तपासण्यासाठी अखेरीस रोहिनिने सर्व काही सरळ सरळ अथर्वला सांगून दिले ..
.ज्यामुळे तिला एक जाणीव तर झाली की रागाचा बाण आता तुटला आहे त्यामुळे हा सावरण आता अवघड आहे .
याची जाणीव तिला जणू रोज होत होती. कारण आता रोजच भांडण होत असे .
हळू हळू जणू बोलणे कमी होऊ लागले पण रोहिनिला मात्र हे नको हवे होते कारण रागीटस्वभावाचा पण निर्मळ मनाचा मित्र तिला गमवयचा नव्हता . तो कितीही रागीट असो पण त्याचे बोलणे नेहमी सरळ असे . तो आतापर्यंत तिच्याशी कधी उद्धट सुद्धा झाला नव्हता. किंवा कधीच त्याने अपशब्दाचा प्रयोग सुद्धा केला नव्हता कमीत कमी तिच्या समोर तरी ! पण खूप प्रयत्न करून सुद्धा तिला यश प्राप्त झाले नाही आणि अखेरीस तिने ठरवले की आता पुरे.
आता आपण काही बोलायचे नाही कशाला दुसऱ्याला एवढा त्रास द्यायचा, आणि सरत्या वर्षासोबत तिने त्याला शेवटचा मेसेज दिला .
तो मेसेज पाहून जणू अथर्वचे मन हळवे झाले आणि त्याने ठरवले की आता हिच्याशी बोलायचे .
शिकवणी झाल्यानंतर अथर्व आज थांबला पण रोहिणी मात्र आज वाऱ्यासारखी उडून गेली.
जणू तिने ठरवले होते की आता परत या मार्गी यायचे नाही
अखेरीस खूप प्रयत्नानंतर रोहिणी मंजूर झाली पण सोबत एक वचन सुद्धा घेतले की ही संधी जर तू घालवली तर बघ मी पुन्हा कधीच तुझ्यासोबत बोलणार नाही ..
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा