पुन्हा विचार कर ... भांडायचे असेल तर बोलूच नको.
तिच्या सर्व वचनांना जणू तो आजही पाळत होता कारण त्या संभाषणांतर त्यांच्यामध्ये एकही भांडण झाले नाही .
ही मैत्री मात्र खूप सुंदर आणि घट्ट होऊ लागली ...
दोघांचा स्वभाव खूप विरोधी होता पण तरी त्यांची सांगड खूप सुंदर होत होती . हळू हळू दोघांचे बोलणे खूपच वाढले आणि जणू पारदर्शकता त्यांच्या मैत्रीत झळकली . अशी पारदर्कशता की जी दुसऱ्यांना मात्र नवीन नात्याची पालवी वाटे.
परंतु रोहिणी मात्र ठाम होती ही फक्त मैत्री आहे पण तिला त्याच्या मनातले जाणून घ्यायचे होते .
आणि असेच दोघ एकदा बोलत असताना मुद्दाम रोहिनिने विषय छेडला .
" अथर्व तू माझा चांगला मित्र ना मला एक खर खर सांगशील का? "
हा बोल ना , तसा सगळं मी खरंच सांगतो पण बोल तरी !
मला एक सांग तू पाहिले बघ जेव्हा आपण खूप भांडायचो तेव्हा तू मला विचारायचा नेहमी की तुला कुणी आवडत का ? आणि
मी नाही बोलली की तू थट्टा करायचा की
" अग मग मी काय वाईट का ? मलाच हो म्हण ना!
तेव्हा ते तू खरंच बोलायचा की थट्टा रे ..
अरे, बापरे बर तू विचारते म्हणून सांगतो पण मारू नको बर का !
अग मला जसे कळले ना की ती ओरडणारी तूच होती मी मनाशी पक्के ठरवले आता हीचा होकार कमवायचा आणि हो बोली की मग हिच्या घरी सांगून द्यायचे.
पण तू इतकी अवघड की मला हो तर बोलली च नाही पण कधी तशी वागली पण नाही .
काय??? बापरे अथर्व अरे नरकात जाशील रे तू .. शी बाई कसा ना तू ! मला तर भीतीच वाटते तुझी आता !
अग अग थांब... मानतो खूप चूक होतो पण कळली नंतर चूक आणि मला तेव्हा तरी काही नव्हते बर का मनात ..!
अच्छा आणि आता?
आता ..काय माहित ? तुझा काय विचार तू सांग सगळं मलाच विचारते!
अरे चल हट...तू आणि मला काही पण मस्करित सुद्धा नाही .
अरे तुला मराठी सुद्धा शुद्ध येत नाही इंग्लिश मिडीयमचे पोर तुम्ही आणि हो मी गोरी ना मला नाही आवडला जा तू ..
असे बोलत रोहिणी जोरात उठून हसत हसत निघून गेली.
अरे वा...मराठी अग ए बोलतो ना बोलता येत आता तू जर परीक्षा घेतली तर कसा होईल आणि आली मला ज्ञान देणारी तुला इंग्लिश येत का थांब मी बघतोच आता पुढच्यावेळी ये
इंग्लिश दाखवतो तुला...
आणि राहील गोरी च तर एक सांगतो..
" भारतातले लोक कृष्णवर्णीय असतात बर का ! "
आली मोठी गोरी ....उन्हात फिरली की काळी पडते चल पळ इथून..
• आणि हसत हसत च दोघे घरी परतले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा