वेळेनुसार दोघांची मैत्री अधिकच घट्ट होत गेली . आणि अखेरीस परीक्षेची वेळ आली . परीक्षा देत असताना सुद्धा दोघांना कधी काही वेगळे असे जाणवले नाही . आणि एक दिवस अचानक अथर्व रोहिणीला अगदी उत्सुकतेने कोणाविषयी तरी सांगू लागला . अगदी रंगवून ...
कदाचित परीक्षेला त्याच्या पुढे असणारी मुलगी असावी .
रोहिणी एक ना अग माझ्या वर्गात एक मुलगी आहे , खूप गोड़ आहे ग ती .. आणि एकदम हुशार आहे बर का!
अच्छा .. पुढे
अग पुढे काय? मी सांगतो ना तुला खूप मस्त आहे ग ती मला खूप मदत पण करते !
बराच वेळ झाला रोहिणी काही उत्तर देईना ... आणि अथर्वने अंदाज लावला
मॅडम झोपल्या ..
दुसऱ्यादिवशी अथर्व पेपरझाल्यावर समोरून गेला पण बोलला सुद्धा नाही .. रोहिणीला काही कळेना .शेवटी घरी जाऊन तिने विचारले तर त्याचे उत्तर ऐकून रोहिणी क्षणासाठी एवढी चिडली होती पण काहीही राग न दाखवता तिने निमूटपणे फक्त त्याचे बोल ऐकले ...
पण मुळात घरी गेल्यावर रोहिणी खूप शांत झाली होती . कारण कदाचित तिची जागा कोणीतरी जणू घेत आहे अशी भावना तिच्या मनी आली. कारण आज खूप दिवसांनंतर अथर्व तिच्यावर चिडला होता कारण रोहिणी त्याचे बोलणे न ऐकता झोपून गेली . आणि ते सुद्धा त्या मुलीची प्रशंसा रोहिणीने ऐकली नाही . जणू मनात त्या मुलीविषयी तिला द्वेष उत्पन्न झाला होता
पण क्षणात विचारांना पूर्ण विराम लावत ती अभ्यासाला लागली. अथर्वने सुद्धा परत काही तिचा विषय काढला नाही . पण रोहिणी ची मनोस्थती कदाचित त्याला समजली होती. रोहिणीला स्वतः ची परिस्थिती तर समजली होती पण याची मात्र तिला जाणून घ्याची होती आणि परत एकदा मुद्दाम रोहिणीने अथर्वला डिवचले ...
अथर्व माझा हा मित्र .. तो मित्र .. मग मी आता तुला नाही भेटणार वगैरे रोहिणीने अथर्वला खूप डिवचले परंतु अथर्व एक नाही कि दोन नाही ...
पण रोहिणी चेहरा बघून त्याला ओळखत असे ...
मुळात त्याला फरक पडायचा पण कदाचित त्याला माहित होते कि हि गोष्ट रोहिणीला आवडत नाही म्हणून भावना लपवण्याचे कौशल्य त्याला खूप चांगले येत होते.
वेळ सरत राहिली आणि परीक्षेचा निकाल लागला ..
आणि हाच तो क्षण होता.... दोघांच्या नात्याच्या परीक्षेचा ..... नाजूक नाते सांभाळण्याचा..
आणि अखेरीस या नात्याला पूर्ण विराम लागला .
जे दोन व्यक्ती दिवसातली प्रत्येक गोष्ट एकमेकांना सांगत असे ते दोन व्यक्ती एकदम नाबोलते झाले .
जणू दोघांचे नाते कायमचे संपले होते ...
आणि यास जबाबदार फक्त रोहिणी होती कदाचित ती आणि तिचा स्वार्थीपणा ..
महिने - दोन महिन्यांनंतर रोहिणी ला जाणीव तर झाली कि तिने खूप चुकीचे केले आहे पण कदाचित वेळ आता निघून गेली होती .. कारण त्यांनतर तिने केलेले सर्व प्रयत्न केवळ विफल झाले...
आणि आज एवढ्या वर्षांनंतर रोहिणीला तीच जाणीव होत होती. ..
कदाचित आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची किंमत हि त्याला गमावल्यावरच येते..
आपल्या आयुष्यातल्या व्यक्तींना गृहीत धरणे किती चुकीचे असते याची जाणीव आणि ग्लानी आजही तिच्या मनात घर करून बसली होती.
पण गरज सरो आणि वैद्य मरो. अशी परिस्थिती जणू समोर होती.
कदाचित एक सखा नाही तर एक चांगला मित्र गमावल्याची भावना मात्र तिच्या मनात नेहमी राहणार होती..
याची जाणीव तिला आज होत होती पण नेहमीसारखा सर्व विचारांना पूर्ण विराम देत ती कामाला लागली.
समाप्त.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा