आज अचानक अगदी पूर्वीसारखा अनपेक्षितपणे तो तिच्या डोळ्यासमोरून गेला पाहताच तिची चाल फिरली ..तिच्या चेहऱ्यावरचे ते निर्मळ हसू सरून गेले जणू केलेल्या चुकांचा विसर पडलेला या निसर्गाला मंजूर नव्हता. पण पुन्हा नेहमीसारखी ती स्वतः ला सावरत ती त्याला सामोरी गेली जणू तिने कोणाला बघितलेच नाही जणू ती क्षणांसाठी आंधळी...बहिरी...मुकी...आणि निर्जीव झाली होती.
दुपारच्या भर उन्हात शरीराला शांती देणारी झोप नव्हे तर विचारांचे जाळे मनात घेऊन ती खूप दिवसानंतर एकदम जुन्या आठवणीत रमली होती .
तर गोष्ट होती वयातली.. अनपेक्षित व्यक्तीची आणि अगदी चुकीच्या वेळेची ...गोष्ट होती तिच्या पहिल्या पण सर्वात सुंदर अनुभवाची ...एका नात्याची अशा नात्याची जे नाते वेळेवर जर सांभाळले असते तर आज त्याचे भविष्य कदाचित खूप सुंदर असते .
रोहिणी सरपोदार. शांत ,साधी,सरळ गुणी मुलगी .मित्र मैत्रिणी होते पण त्यांच्यामध्ये रमायला मात्र तिला वेळ नसे . कदाचित रमली तर नवे नाते जन्म घेईल हे तिला ठाऊक होते. पण वेळ कधी सांगून येत नसते आणि त्या दिवशी तिला आलेल्या त्या एका फोन कॉल मुळे तिच्या आयुष्यात अनेक नव्या घटनांनी जन्म घेतला अनेक नव्या व्यक्तींनी जागा कमावली .
नेहमीप्रमाणे आपल्या अभ्यासात रमलेली रोहिणी आज एका वेगळ्याच जाळ्यात अडकली होती जणू तिची शांती कोणाला बघवत नव्हती ,
फोन कॉल...
दोन दिवसांपूर्वी रोहिनिला एक फोन आला तिच्या क्लासमेटचा पण त्या फोन कॉल नंतर तिची झोप जणू उडाली होती . तिचा संताप होत होता..कारण त्या फोन कॉल मधले स्वर तिला सतावत होते.
" रोहिणी मला तुला एक महत्त्वाची बातमी सांगायची ..कदाचित तुला सांगितली तर तुला विश्वास बसणार नाही पण तरीही मी सांगतो आहे . रोहिणी अथर्व सानप नावाचा एक मुलगा आहे आणि तुझ्या विषयी बातमी पसरवत आहे की " रोहिणी माझी प्रेयसी आहे आणि तिच्या पासून सर्वांनी दूर राहायचे "
त्याचे ते स्वर ऐकून रोहिनीची तळपायाची आग जणू मस्तकाला लागली आणि फोन कट करून ती त्या मुलाचा विचार करू लागली .
कोण आहे हा अथर्व सानप? आणि का हा माझे नाव खराब करत आहे , मला याचा पत्ता हवा .
मित्रांसोबत बोलून तिला एवढे तर समजले की हा व्यक्ती तिच्याच सोबत शिकतो आणि तिच्या एका मित्राकडून तिला त्याची माहिती देखील मिळाली.
वेळ मिळताच रोहिनिने त्या अथर्व सानपला कॉल करून खूप खडेबोल सुनावले पण त्याने एक आरोप स्वीकारला नाही . त्याचे मात्र एकच गाणे चालू होते ..
" कोण आहेस तू? मी तुला नाही ओळखत! आणि मी असे काहीही केले नाही " पण रोहिनीच्या संतापापुढे तिच्यात ऐकून घेण्याची क्षमताच नाही हे जणू त्याला समजले होते.
अखेरीस काही कालावधी नंतर संभाषण थांबले आणि रोहिणी शांत झाली. वेळेनुसार या घटनेचा तिला विसर पडत चालला होता ...
परीक्षांची वेळ हळू हळू जवळ येत होती आणि रोहिणीला अभ्यास आणि मज्जा दोन्ही करायची होती .
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा