"आई,हा सर्वेश बघं ना , माझं ऐकत नाही आहे. मी अभ्यास करते आहे आणि हा मला त्रास देतो आहे. सांग ना त्याला काहीतरी.."
सर्वेशची ताई सर्वेशची तक्रार आपल्या आईकडे करत म्हणाली.

"सर्वेश नको ना त्रास देवू तिला ,ती अभ्यास करते आहे ना.. तू पण अभ्यास करं.."
आई सर्वेशला रागावून म्हणाली.
सर्वेश घरात लहान होता,त्यामुळे सर्वांचा लाडका होता पण तितकाच खोडकर ही होता.अभ्यासाचा त्याला कंटाळा होता. मित्रांबरोबर खेळणे,हिंडणे,फिरणे,
गप्पागोष्टी हे सर्व जास्त आवडत होते. घरात आईबाबांचा त्याला धाक तर होताच पण ताई व दादालाही तो घाबरत होता. शाळेतून त्याच्याविषयी नेहमी तक्रारी यायच्या. त्यासाठी त्याला आईबाबा,ताईदादा कधी खूप ओरडायचे तर कधी प्रेमाने समजूनही सांगायचे.

एका हाताची पाचही बोटे सारखी नसतात.
त्याप्रमाणे आईवडिलांची सर्व मुले सारखी नसतात.
सर्वेश आपल्या ताईदादासारखा अभ्यासू नव्हता. फक्त मजा करणे एवढेचं त्याला माहित होते. कसातरी पास होत तो पुढच्या वर्गात जात होता.

सर्वेश आपल्या दोन्ही मुलांसारखा अभ्यासू नाही आहे, हे आईबाबांना माहित होते. त्याने चांगला अभ्यास करावा,चांगले शिक्षण घेऊन जीवनात पुढे जावे. असे त्यांना वाटत होते आणि ते नेहमी त्याला सर्वोतोपरी समजावून सांगायचे.
आपला सर्वेश अभ्यासू नाही आहे, पण त्याचे आपल्या आईबाबांवर,ताईदादावर जीवापाड प्रेम आहे,हे सर्वांना माहित होते आणि जाणवतही होते.घरात सर्वेशचे आईबाबा त्याला बारीकसारीक कामे सांगत होती आणि तो ती करतही होता. त्याचे ताई व दादा हे घरातील इतर मोठी कामांची जबाबदारी आनंदाने स्विकारून पार पाडत होती. सर्वेश त्यांच्यापेक्षा लहान असल्याने ,त्याच्यापर्यंत ती कामे येतही नव्हती आणि त्याला ही कामे सांगावी ,असे घरातल्यांनाही कधी वाटतही नव्हते.
असेच दिवस जात होते, हे बहीण भाऊ लहानाचे मोठे होत होते.

ताईचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ताईचे लग्न होऊन ती सासरी गेली. भाऊही चांगले शिक्षण घेऊन नोकरीला लागला. एक दोन वर्षात त्याचेही लग्न झाले.
सर्वेशला मुळातच अभ्यासात रस नव्हता. पण आईबाबा, ताई व दादा यांच्या सांगण्याने तो शिक्षण घेत होता. आणि त्याने कसेतरी एकदाचे कॉलेज पूर्ण केले.

अगोदरच खोडकर असलेल्या सर्वेशला कॉलेजात असताना वाईट मित्रांची संगत मिळाल्याने, तो वाईट मार्गावर जात होता. हे घरातल्यांच्या लक्षात येताच त्याच्या ताईने त्याला ती रहात होती , त्या शहरात बोलावून घेतले. गावी राहिला तर त्याचे आयुष्य वाया जाईल , इथे नोकरी वगैरे करेल या उद्देशाने त्याला बोलावले. काही दिवस सर्वेशने नोकरीही केली पण त्याला त्यातही रस वाटला नाही. मग त्याने कपड्यांचे एक छोटेसे दुकान सुरू केले. यासाठी त्याच्या आईबाबांनी,दादाने व ताईने पैशांची मदत केली व सपोर्ट ही केला.
संकटाच्या वेळीच आपल्याला आपल्या खऱ्या नातेवाईकांची मदत होत असते.
आपल्या सर्वेशचे भविष्य चांगले व्हावे, यासाठी आईबाबा, बहीण, भाऊ हे सर्व त्याला सांभाळून घेत होते. तो आयुष्यात भरकटून जाऊ नये म्हणून त्याला सर्वोतोपरी मदत करत होते.
सर्वेशही मन लावून व्यवसाय करत होता आणि त्याचा व्यवसाय वाढत होता. त्याच्या छोट्याशा दुकानाचे मोठ्या दुकानात रूपांतर झाले होते. त्याची आर्थिक परिस्थितीही सुधारली होती व जीवनालाही योग्य दिशा मिळाली होती.

क्रमशः
नलिनी बहाळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा