Login

नाते परिवाराचे

नाते परिवाराचे
नात्याला नात्याची ओढ हवी
मनाला मनाची जाणीव हवी.......

प्रत्येकाला हवे कोणीतरी आपले
त्याकरिता बंधलेली
प्रेमाची नाती हवी.......

परिवार म्हणजे असतो एक मेळा
त्यात सामावतो सगळा गोतावळा......

वेळ काळ काही न पाळता
वेळेला वेळेवर पळत येणारा
मायेचा किनारा......

नात्याला हवे एक कुंपण प्रेमाचे
जे बांधून ठेवेल
सगळ्या नात्याच्या धाग्यांना.......

एक एक मोत्याने बनते माळ
अन एका एका नात्याने
बनतो परिवार.......

परिवारावर अवलंबून असते
आपले जीवन त्याशिवाय
जगण्यात येत नाही रस........

नाते हे परिवाराचे
प्रेम आणि आपुलकीचे
बनते त्याने एक विश्व
जे दिले आपणास आपल्याच
आपुलकीचो माणसाने.........