Login

नाते दोघांचे

नाते दोघांचे
नवऱ्याला बायकोचे
अन बायकोला नवऱ्याचे
मन ओळखता
आले पाहिजे....

नव्या नव्या
नात्यातील
गुज उलगडता आले पाहिजे....

प्रत्येक वेळी शब्दाचा
आधार न घेता
मनाने मनाला
साद दिली पाहिजे.......

प्रेमाने प्रेमाला
वाव दिला पाहिजे
नजरेला नजरेची
भाषा कळली पाहिजे......

कधी तुझी चुकी तर
कधी माझी चुकी
न बोलताही कृतीतून
माफ केली पाहिजे.......

मुक्याने ही समजतील
असे भाव प्रीतीचे
नयन पाहून
समजले पाहिजे........

नवरा बायको चे नाते
तनामनाला जोडून जाते
जशी ती असतात
एका रथाची दोन चाके. .......

एकमेकांशी जोडून ती
कधी न कोणा कमी लेखते
एक थांबला कि थांबते दुसरे
जणू त्यांना मनातले कळते......

होतो जीवनात संसार सुखी
असते नेहमी प्रेम मुखी
मनाने मनाला देऊन कबुली
प्रेमाची मग खुलेल अबोली.....

एकमेकांच्या मनातील
न बोलताही ओळखायला
हवी सोबत प्रेमाची शिदोरी
नात्याला त्या जपून ठेवण्यास
हवी प्रेमळ मनाची
एक तिजोरी......