Login

नाती औपचारिकतेची

नाती
आपुलकी आणि विश्वास असेल तर
नाती कधीही तुटत नाहीत
नुसतीच  'औपचारिकता' असेल तर
ती कधीच टिकत नाहीत.

प्रेम आणि आठवण ही
दाखवली जाते वरवरची
म्हणून नाती ही झालीत
आता नावापुरती.

बोलणे भेटणे तर होत नाही
मोबाईल मध्ये नंबर आहे
हे ही लक्षात येत नाही.

औपचारिकता ही जगातच पसरली
कोण कोणाचे कोण आहे
हेही कोणाला माहित नाही.

औपचारिकता म्हणून
निभावली जातात नाती
माया, ममता उरलीच नाही.

तेही वाटतात आता डोईजड
म्हणून कोणी करत नाही तडजोड
स्वतात आहेत इतके मग्न
कोणता असो सण की असो कोणाचे लग्न
कोणाला कोणाची फिकरच नाही.

भावनिक बंध नसेल तर
नाती कशी बांधून राहतील
औपचारिकता म्हणून
निभावली जाणारी नाती ही
एक दिवस तुटून जातील.

काळापुरती आठवण आणि
कामिपुरतीच नाती.
आपल अस कोणी उरणारच नाही..
0