26 जानेवारी प्रजासत्ताकदिन भाषण

26जानेवारी भाषण
अध्यक्ष महोदय आणि इथे जमलेले गुरुजन तसेच माझ्या विद्यार्थी मित्र- मैत्रिणींनो आज आपण इथे का जमलो आहोत हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. आज 26 जानेवारी म्हणजे आपला प्रजासत्ताक दिन यांचं दिवशी 26 जानेवारी 1950 रोजी भारताला संविधान मिळाले आणि आपण जगात एक गणराज्य म्हणून उदयास आलो या घटनेला आज 75 वर्षे पूर्ण झाली.आपले संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलं आणि आजच्याच दिवशी ते आपल्या देशासाठी अर्पण आले. आपण जगातील सगळ्यात मोठे प्रजासत्ताक राज्य आहोत. तसेच आपली राज्य घटना ही जगातली सगळ्यात मोठी राज्य घटना आहे.

या दिवशी आपण सगळे एकत्र जमा होतो तिरंगा फडकवून त्याला अभिवादन करतो पण फक्त इतकेच आपले कर्तव्य आहे का? तर नाही आपण आपल्या देशासाठी काय करता येईल याचा विचार केला पाहिजे. सगळ्यांनी एकत्र मेहनत करून आपली आणि आपल्या देशाची प्रगती केली पाहिजे. तरच हा दिवस साजरा करण्याला अर्थ आहे.

तसेच आजच्या दिवशी आपण आपल्याला स्वतंत्र मिळवून देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले पाहिजे. आज आपण स्वातंत्र्य देशाचे नागरिक म्हणून जगात फिरतो ते फक्त आणि फक्त आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या हुतात्म्यांमुळे महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळलवून देण्यासाठी खूप प्रदीर्घ लढा दिला आहे तसेच महात्मा फुले, लोकमान्य टिळक आणि डॉ. आंबेडकर या सारख्या समाज सुध्दारकांनी आपल्या संस्कृतीचा पाया रचला आहे.

डॉ. आंबेडकरांनी लिहलेल्या संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य भारताचे नागरिक म्हणून जसे हक्क बहाल केले आहेत तसेच कर्तव्य ही सांगितली आहेत. आपण मेहनत करून आपली कर्तव्य प्रामाणिकपणे निभावून आपल्या देशाच्या विकासात वाटा उचलायला हवा.

प्रजासत्ताक दिन हा केवळ मिरवणुकीचा दिवस नाही; हा चिंतन आणि नूतनीकरणाचा दिवस आहे. या वैविध्यपूर्ण आणि चैतन्यमय राष्ट्राचे नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांचे स्मरण आहे. आपल्या संविधानाचा गाभा असलेल्या लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे.

आपण आपल्या प्रवासात मागे वळून पाहताना, आपल्याला प्रगती आणि उपलब्धी दिसतात, परंतु आपल्याला आव्हाने आणि असमानता देखील दिसतात. या आव्हानांना तोंड देणे, आपल्यात फूट पाडणारी दरी भरून काढणे आणि विकासाचे फायदे आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आणि आपली सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या आपल्या सशस्त्र दलांना सलाम करण्यासाठी आपणही थोडा वेळ काढूया. त्यांचे समर्पण आणि बलिदान आमच्या अत्यंत आदर आणि कृतज्ञतेला पात्र आहे.

शेवटी, या प्रजासत्ताक दिनी, आपण स्वत:ला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या आदर्शांकडे झोकून देऊ या. चला अशा भारतासाठी प्रयत्न करूया जिथे प्रत्येक नागरिक सन्मानाचे आणि परिपूर्ण जीवन जगू शकेल.

आपल्याला देशाच्या विकासात सहभागी व्हायचे आहे. आपल्या शाळेत, आपल्या महाविद्यालयात, आपल्या कार्यालयात, आपल्या गावात आणि आपल्या शहरात आपल्या कामातून देशाचे भविष्य उज्ज्वल करायचे आहे.

शिक्षण, आरोग्य , रोजगार आणि पर्यावरण यासारख्या क्षेत्रात मोठ्या प्रगती करण्याची गरज आहे.

आपल्याला शिस्तबद्ध राहून, प्रामाणिकपणे काम करून, आणि एकमेकांचे सहकार्य करून भारताला जगात आदर्श देश बनवायचा आहे.

आपल्याला आपल्या पर्यावरणाचे संवर्धन करायचे आहे. आपल्या नदी, डोंगर आणि जंगले यांचे जतन करायचे आहे.

आपल्या येणार्‍या पिढींसाठी , सुंदर आणि निरोगी पृथ्वी देण्याची जबाबदारी आपली आहे ती पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत राहायचे आहे आणि त्यासाठी प्रयत्न करत राहायचे आहे .

आपल्या देशाला आणखी मजबूत आणि विकसित करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे.

आपण स्वच्छ आणि सुंदर भारत निर्माण करण्यासाठी, भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आणि सामाजिक एकोपा वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील असले पाहिजे .

आपण आपली संस्कृती आणि देशभक्तीचा वारसा कायम जतन करून तो पुढच्या पिढीला देऊ आणि आपल्या देशाला विकासाच्या शिखरावर नेऊ. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो.

जय हिंद